मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त धागा आहे हा!
पाखर्या नावाची बैलाबद्दल कथा होती सातवीला, बहुधा शंकर पाटलांची.
अकरावीला अरविंद गोखल्यंाची कातरवेळ नावाची कथा होती, अविनाश धर्माधिकारींची 'भिरीभिरी भ्रमंती' होती.

मनातल्या उन्हात नावाची श्रीनिवास विनायक कुलकर्णींची कथा बहुधा अकरावीला होती. त्यातले मोरांच्या उडण्याचे वर्णन अप्रतिम होतं, ती सगळी कथाच सुंदर होती, त्यातल्या प्रतिमा सुंदर होत्या.

वावे, कातरवेळ अगदी जशीच्या तशी आठवते Happy
कोणाचं नविन लग्न झालेलं ऐकलं की तर आठवतेच!
पुन्हा वाचावी लागणार. आत्ताही नुसती आठवुनच अंगावर काटा उभा राहिला

अरेच्या... आत्ताच बायकोने या कातरवेळ बद्दल विअचारले पण आम्हाला ती नव्हती / किंवा ठार आठवत नाही.

निपा तुम्ही दहावी कधी झालात? तुम्ही लिहिलेले सगळे धडे होते मला Happy

मराठीत एक लव्हाळी नावाची कविता होती. त्यात चित्र होते एक तरूणी तळ्याकाठी आपल्या प्रियकराची वाट पहात बसलेली असते. शिवाय मला अन्योक्ती, बकान्योक्ती, शुकान्योक्ती पण आठवतेय. पण इयत्ता आठवत नाही Sad

मला एक दादा धर्माधिकार्‍यांचा धडा आठवतो. दागिने - आणि ते घालण्यासाठी नाककान टोचून घेणं म्हणजे स्त्रियांच्या गुलामगिरीचं लक्षण आहे, उपभोगप्रधान जीवन म्हणजे एखाद्याकडे इतक्या गाद्या आहेत की त्या घालण्यात रात्र संपते आणि झोपायचं राहूनच जातं अशा अनेक कल्पना त्यावेळी आय-ओपनर वाटल्या होत्या. अजूनही वाटतात. Happy

बर्‍यापैकी कंटाळ्वाणा वाटायचा तेव्हा. >>> हो !! काहीच्या काही होतं त्यात !!
पु.लंचा अपूर्वाईच मधला एक भाग होता सातवीत.
आठवीत बालकवींची 'पाऊस' नावाची कविता होती..

इंग्लिशच्या पुस्तकातल्या वर लिहिलेल्या गोष्टी मस्त होत्या एकदम.
मंथरका, द विवर.
तेनाली रामन, द जज
वुडन ब्रिज हॉटेल : त्यातली ती थर्ड लेडी एकदम व्हिलनच निघते शेवटी Happy
कीडनॅप्ड

दहावीचे इंग्लिशचे धडे पण मस्त होते एकदम.
अ लेटर फ्रॉम मदर अर्थ
राऊंडेड अप
आऊटविटेड
आणि एक खुशवंत सिंगांची गोष्ट
एक रविंद्रनाथ टागोरांची कविता पण खूप मस्त होती.

एकंदरीत मला शाळेत बर्‍याच कविता आवडायच्या असं आता वाटतय... नंतरच्या वर्षांमध्ये काय झालं कोण जाणे.. Proud

अरे व्वा ! मस्त धागा आहे.....सर्वांचे प्रतिसाद वाचून रम्य भूतकाळात फिरून आले.
मलाही वर उल्लेखलेले बरेच धडे /कविता आठवतात.
माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे, झिजणे - ही आईवरची कविता शिकवताना त्यावेळी बाईंच्या डोळ्यांतही पाणी आले होते......

सहावीत एक सागर नावाची कविता होती, तीही मस्त होती. आवडतो मज अथांग सागर अफाट पाणी निळे.....

झुबे लालसर - निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झुबे लालसर ल्यावे कानी ही पण भारी होती.

कवी बी. ची चाफा बोलेना होती (कितवीत ते नीट आठवत नाही).
दहावीत बालकवींच्या फुलराणीचा काही भाग होता.
संत वाङमयात ताटीचे अभंग होते. ताटी उघडा ज्ञानेश्वरा...

धडे..

एक धडा होता स्नेही नावाचा, लेखक नाही आठवत पण कोकणातले वर्णन, स्नेह्याचे वर्णन अप्रतिम.

श्यामची आईतला पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसा मनाला लागू नये म्हणूनही जप....

रायगडाला जेव्हा जाग येते या वसंत कानेटकर लिखित नाटकातला एक प्रवेश होता.
स्वा. सावरकरांच्या माझी जन्मठेप या आत्मचरित्रातील काही भागही होता.

हे सगळे पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते, शिकावेसेही वाटते, कदाचित आता जास्त चांगले समजून घेता येईल, नाही का?

स्वा. सावरकरांच्या माझी जन्मठेप या आत्मचरित्रातील काही भागही होता >>> अंदमानातून सुटका नाव ना त्या धड्याचं ? स्वातंत्र्यलक्ष्मी की जय! वंदे मातरम्.. Happy

निवांत पाटील. मस्त आठवण काढलीत. तुम्ही लिहीलेल्या सगळ्या कविता आणि धडे मला होते.
हिंदीत काला कलुटा जादुगर आणि हॉकीके जादुगर (ध्यानचंद).
मीना क सपना, उड चली गगन छुने पतंग,
मां क्या मुझको उडना आया, नहीं चुरुगंन तु भर्माया,
आभाळ वाजलं....
आवडतो मज अफाट सागर...
दिवस सुगीचे सुरू जाहले,ओला चारा बैल माजले,

मस्त वाटलं सगळ आठवून.

हिंदीत दुख का ताज म्हणुन एक गोष्ट होती. तीन मित्र आपल्या दु:खाची चर्चा करतात आणि माझेच दु:ख जास्त मोठे म्हणुन शेवटी भांडतात.

अजुन एक सौ सुनार की म्हणुन विनोदी गोष्ट होती. ही गोष्ट भारी महान होती.

कोणाला दुसरीत झुळूक नावाची कविता होती का? Proud

त्यातली कडवी बसवलेल्या नाचाच्या स्टेप सकट आठवतायेत Lol

आणखी सातवीत एक किनारा नावाची कविता होती.
माझी कायम आवडती राहिलीये ती
पुन्हा एक सुर्यफुलाची कविता पण होती. मी फुल तृणातील इवले बहुदा नाव त्याचं

ही कविता आम्ही ए मेरे वतन के लोगो च्या चालीवर गायचो Rofl

आता ठिकेय का चिनूक्स?

११वी, १२वि ईंग्लिशचे पण छान धडे होते.
शिंपी असणार्‍या साध्यासुध्या बाबांची गोष्ट.. सिम्पल मॅन नाव असावं बहुतेक
तोतरं बोलणार्‍या पण तरी जिद्दिने शिकणार्‍या मुलीची. म्हातार्‍याशी ठरवलेलं लग्न मोडून आईवडिलांना ठामपणे मि तुमची काळजी घेईन सांगते - तिची टिचर तिला बोलायला शिकवते.प्रोत्साहन देते.
मालकिणीचा मुलगा आपल्या चूकिने हरवला म्हणून तिला उतारवयात झालेला आपला मुलगा देतो तो नोकर.
खेडेगावात फंड अभावी उसाच्या शेतात शाळा घेणारा शिक्षक

ही खालची मला होती का जुन्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकातली ते आठवत नाही पण छान होती
दि नाईटिंगेल -- राजाला बर वाटाव म्हणून खिडकीत येऊन गाणारी नाईटिंगेल

एक ती खंड्या पक्षाची कविता होती 'तुझे डोळे जास्वंदीचे' इ.इ., आमचे गुर्जी ती 'मेरा दिल ये पुकारे आजा' या चालीवर गायचे!

अजुन एक हिंदीत ती चुडीवाले बाबांची गोष्ट होती. ते आपल्या गाढवाबरोबर ही तसेच छंगले बोलत असतात आणि कारण विचारल्यावर ते सांगतात कि कहि बहु बेटीयों के सामने अगर मेरे मुंह से गाली निकल गयी तो?.

५ वी इंग्रजी म्हन्जे... गोपाल सिता अहमद आणि यास्मिन... Happy

एक ती खंड्या पक्षाची कविता होती 'तुझे डोळे जास्वंदीचे' इ.इ., आमचे गुर्जी ती 'मेरा दिल ये पुकारे आजा' या चालीवर गायचे! <<<

आमचे गुर्जी याच चालीवरील खालील कविता शिकवायचे.
अरे खोप्यामदी खोपा
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर

निंबोणीच्या झाडामागे च्या चालीवर-
झोपडीच्या झापाम्होर कसं चांदणं टिपुरं

सावन का महिना च्या चालीवर -
शेताला गेली कुरी शेत काजळाची वडी

गोरी गोरी पान फुलासारखी छान च्या चालीवर -
घाटातली वाट काय तिचा थाट, मुरकते गिरकते लागते पाठोपाठ

इत्यादी. Proud

इंग्रजीतले दोन-तिन धडे आठवताहेत. त्यातले दोन बहुतेक बारावीला होते. एकात लंडनच्या रस्त्यांबद्दल लिहिलेले होते. टेलेफोनवाले लोक काम झाल्यवर रस्त्यावरचे खड्डे भरुन रस्ते परत गुळगुळीत करत अस्तात तेव्हा रस्त्याच्या कडेला ड्रेनेजवाले लोक बसुन रस्ता कधी गुळगुळीत होतो याची वाट पाहतात. रस्ता नीट झाला की ते लगेच रस्ता खोदायचे काम सुरू करतात. हे वाचुन आम्ही तेव्हा खुप आनंदित झालेलो. जगात फक्त आपणच दु:खी नाही याची खात्री पटलेली.

अजुन एक एका उभरत्या लेखकाबद्दल होता - द लंचन. एक चाहती त्याला भेटायला येते म्हणुन कळवते. तो खिशातले पैसे खर्चुन खुप महागडे जेवण अरेंज करतो आणि मग त्याचा कसा पचका होतो. Happy

दहावीला बहुतेक एक धडा होता, नाव आठवत नहई, त्यातला सुपरमार्केटमध्ये काम करत असलेला नायक अल्फ्रेड चोर समजुन दुकानाने नेमलेल्या डिटेक्टीवलाच पकडतो आणि त्या गोंधळात नेहमीचा चोर चोरी करुन जातो.

अजुन एक होता द इम्पेशंट लुइ. हाही मस्त होता. लुई सगळ्यात शेवटी भात लावतो. बाकिच्यांची रोपे उंच डोलायला लागतात पण याची उशीराने पेरली असल्याने लहान दिसतात म्हणुन हा रात्री बसुन गुपचुप सगळी रोपे वर ओढुन ठेवतो. सकाळी सगळी मेलेली असतात.

गजानन Proud

नववीत अरूणा ढेर्‍यांची कविता होती.. श्रावण महिन्यावर..
चार दिसांवर उभा, ओला श्रावण हिरवा..
न्याया पाठवा भावाला, तिला माहेरी बोलवा..

ही कविता आम्ही 'एक हो गये हम और तुम..'(हम्मा हम्मा) च्या चालीवर म्हणायचो.. Proud

Pages