मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैठणी छान होती खूप.. डोळ्यात पाणी यायच ..
कवितांना कुणी 'ए दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है' ही चाल लावायचं नाही का ? >> हो आमच्या बाई.. ५वीत असतांना.. कविता आठवत नाहीये..

अगो, तो फटका अनंत फंदींचा असणार.

चौथीत असताना 'निळ्या खाडीच्या काठाला' अशी एक बोरकरांची कविता होती, तिला तर चक्क 'मेरा दिल ये पुकारे आजा' ची चाल लावलेली असायची Proud

अगो माझी पोस्ट बघ मी लिहिलय ना ,
राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ही कविता म्हणायचो आम्ही त्या चालीत.

हां बरोबर, अनंत फंदी. मला फ.मु.शिंदेच आठवत होतं सारखं. त्यांचीही एक कविता होती.
अर्र, इन्ना मिसलं मी ते.
गजानन, कविता नाही रे आठवत. हिंदी कविता पण असायच्या त्या चालीत एवढेच आठवते.

रच्याकने, त्यावरुन आठवलं. एकदा एका रटाळ तासाला मराठीतला धडा मंगलाष्टकांच्या चालीवर म्हणून मैत्रिणीचे मनोरंजन करत असताना बाईंनी मला रंगेहाथ पकडलं होतं आणि करुणाष्टकं म्हणायची पाळी आणली होती Proud

ती 'तिफन..' विठ्ठल वाघांची होती ना?
फ. मुं. शिंद्यांची एक मुक्तछंदातली कविता होती, त्यातली एकच ओळ आठवतेय - मास्तर, तुमच्या स्पर्शातून उगवत होती, माझी कोवळी फांदी....
आणि रमेश तेंडुलकरांची एक होती - सायरनचे सूर जेव्हा आभाळात उंच उंच चढत असतात, तेव्हा पक्ष्यांनो तुम्ही कुठे असता...

छान आहे हा धागा. वरती युद्धबंदी झाल्यावर heart attack येतो, उल्लेख असलेला तो धडा मलाही होता.

सहावीला उत्तम बंडू तुपे यांचा 'आई' हा धडा होता आणि अनामवीरा ही कविता होती.

वामन चोरघडे यांचापण एक त्यांनी काढलेल्या अत्यंत कष्टातल्या दिवसांचा एक धडा होता.

ना स इनामदार यांचा एक होता त्यात उरलेल्या पोळ्याचा घरातील ताई सणाच्या दिवशी लाडू करते, गोड म्हणून (गरीबीचे दिवस असतात) असा एक धडा होता. श्रीना पेंडसे यांचा शुभस्य शीघ्रम हा धडा होता.

चाफा ही कविता आठवते, 'भारतमाते पुत्र शहाणे अमीत तुला लाभले परी तुझ्या कुशीत जन्मली काही वेडी मुले' ही कविता आठवते. श्रावणमासी, औदुंबर ह्या आठवतात.

झोंबीमधला धडा होता.

माय god खूप कमी आठवतंय. १९८४साली १०वी झालेना, ८५मध्ये पुस्तके बदलली. आमची जुन्या पुस्तकांची शेवटची batch.

सुधा अत्रे यांचा धडा होता तसंच आचार्य अत्रे यांच्या झेंडूच्या फुलेमधलं विडंबन काव्य असायचं.

विंदाच्या कविता असायच्या, अर्थात सर्वात आवडलेली 'देणाऱ्याने देत जावे'.

नववीत नल- दमयंतीचं एक काव्य होतं राजहंसाला नळराजा पकडतो तेव्हा तो सांगतो घरी आई म्हातारी, बायको मुले आहेत, मला सोड. फेमस आहे ते काव्य, कोणाला आठवत असेल तर लिहा.

म्हातारी उडता नयेचि तिजला माता मदीया अशी
कांता काय वदू? नवप्रसव ती साता दिसांची तशी
पातां त्या उभयांस मी मज विधी घातास योजितसे
हातामाजि नृपा तुझ्या गवसलो आता करावे कसे

त्या आधीची काही कडवी आठवत आहेत

टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी
केली विजार वरि डौरही मौन सेवी
हस्ती करी वलय उंच अशा उपायी
भूपे हळूच धरला कलहंस कानी

कलकल कल हंसे फार केली सुटाया
फडफडफड निजपक्षी दाविले की सुटाया
--------------------------------
-------------------------------- (आठवत नाहीत)

तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन जल केलि जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो

फ.मु. शिंद्यांची आम्हाला 'आई' ही कविता होती. ही वरची नव्हती. "आई असते जन्माची शिदोरी ...सरतही नाही, उरतही नाही." !
मध्ये कुणाच्यातरी पोस्टमध्ये उल्लेख येऊन गेलाय बहुतेक ह्या कवितेचा.

ते 'सोडील पंचू' वाचून कायम फिस्स्कन हसू यायचं म्हणून लक्षात. Proud

'बोला हवे ते मला काय त्याचे पुरे जाणतो मीच माझे बल'
ही ना.वा.टिळकांची होती का?

याच वृत्तात अजून एक आठवते -
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी तसे पाहिले मी न कोठेतरी!

कुसुमावती देशपांडे ह्यांनी परीटावर लिहिलेला एक ललित लेख होता. नाव आठवत नाही त्या धड्याचे आता पण त्यातली भाषा फार आवडली होती असे आत्ता एकदम आठवले Happy

फमु शिंद्यांची आई मला प्रचंड आवडते.
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते..

मला कधीतरी फिटे अंधाराचे जाळे होती कवितांंमध्ये.

तुम्ही कुठल्या काळातलं बोलताय? Uhoh
माझ्या आधीच्या सिलॅबसमध्ये पण नव्हतं बहुदा हे Uhoh

रच्याकने अन्जुचे काही काही धडे (खर तर फक्त युद्धच) मला आठवतायेत पण बाकीचे अजिबात नाही. म्हणजे नाव आणि कथासारही वाचल्यासारखं वाटत नाहीये Uhoh

असं कसं?

मी ईश्वराच्या जगत्कारणाच्या खर्‍या हेतुची पूर्तता मंगल
बोला हवे ते मला काय त्याचे पुरे जाणतो मीच माझे बल

माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती पहावे कशाला दुजे आरसे...

याच वृत्तात आणखी एक कविता आठवतेय

मी एक पक्षीण आकाशवेडी दुजाचे मला भान नाही मुळी..

>> मी एक पक्षीण आकाशवेडी दुजाचे मला भान नाही मुळी..
ती पद्मा गोळ्यांची बहुतेक.

विंदांची 'पवित्र मजला' होती - माझ्या ऑलटाइम फेव्हरिट लिस्टमधे अजूनही आहे ती.

एक 'आली लाजत आज सकाळ - मेंदीभरल्या चरणी बांधुन सोनफुलांचे चाळ' अशी काहीतरी गोग्गोड वर्णनात्मक कविता (बरीचशी) आठवते - तसल्या कवितांची नावड तिथे स्पष्ट सुरू झाल्याचंही आठवतं. Proud

मर्ढेकरांची 'या दु:खाच्या कढईची गा' होती.

हो त्यांचीच होती.

आणखी आधी एक जिऊ म्हणून कविता होती तीही आवडायची -
गोधूमवर्ण तीचा हरणाच्या पाडसापरि डोळे
------------ प्रसन्न विधुबिंब जेवि वाटोळे

आणि ना वा टिळकांची
वन सर्व सुगंधित झाले...

बींची 'गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या'

मर्ढेकरांची 'काय मागावे परि म्या तूही कैसे काय द्यावे' आणि 'या दु:खाच्या कढईची गा अशीच देवा घडण असूदे'

असो. Happy

तसल्या कवितांची नावड तिथे स्पष्ट सुरू झाल्याचंही आठवतं>> Lol अनुमोदन

Pages