मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकण्या, तुम्ही म्ह्णता आहात तो धडा म्हणजे WoodenBridge Hotel
त्याने रात्री पाहिलेल असत सगळं म्हणून सकाळी ती पोळी खात नाही. हळूच खिशात ठेवतो. नंतर शहरात जाऊन संध्याकाळी परत येतो त्या हॉटेलमध्ये आणि ही शहरातून आणलेली पोळी म्हणून त्या मालकिणीला देतो. ती चव घेते आणि स्वत:च गाढव बनते.

मयूर, विज्ञानदास,

इथे प्रताद्जिकाराचा भंग होईल असे पूर्ण लेख/स्कॅन्/धडे टाकू नका. हा धागा चर्चा करण्यासाठी आहे. मी वरचे काही प्रतीसाद अप्रकाशीत केले आहेत.

रॉबीनहूड,
कायद्याचे पालन करण्यासाठी तुम्हीही मदत करू शकता. इतरांची वाट बघण्याची गरज नाही.

चैत्रगंधा, अगदी बरोबर त्या धड्याचे नाव वुडन ब्रीज हॉटेल होते, आणखी एक इंग्रजीचा धडा होता जी एक रशियन लोककथा होती ज्यामध्ये एक गरीब शेतकरी असतो तो मेहनती असतो पण त्याची गरीबी दूर होत नसते त्याबद्दल तो कधीही देवाला दोष देत नसतो. मग सैतान आपल्या दूताला त्याच्याकडे पाठवतो जो त्याला मदत करतो आणि तो शेतकरी सधन होतो त्याच्याकडे मुबलक धान्य उरते त्यापासुन सैतानाचा दूत त्याला व्हो़डका बनवायला शिकवतो अशी कथा होती. ह्या कथेचे नाव कुणाला आठवते का?

सॉरी, (इंग्लिशचा विषय काढ्ते) विंग्रजीचा एक धडा आम्हाला होता ११वी किंवा १२ला. एका गावाची अर्थव्यवस्था ठप्प होते पण कोणीतरी माणूस एक ऑर्डर देतो आणि त्यावर दुस्-या एकमेकांना पुरक जोडधंद्याना चालना मिळते आणि तो माणूस असायलममधुन पळालेला असतो पण त्याच्यामुळे मरगळलेले गाव परत कामाला लागते.

चला ईग्रजी चे धडे आले आहेत हे बघुन हिंदी पुस्तकातली एक कविता टाकतो.

ए मातृभुमी तेरी जय हो सदा विजय हो,
तेरे सशक्त नभ मे सुख सुर्य का उदय हो |
निज प्रेम की किरन से मन को जगा दे मेरे,
पिछे न पैर द डालू चाहे महाप्रलय हो |
तुझको प्रसन्न देखू बस कामना यही है,
फिर गोद मे रो हे तेरे मेरा शरिर लय हो |

हिंदीतला शेखचिल्ली चा धडा आठवतो का कोणाला?

हिंदीतला शेखचिल्ली चा धडा आठवतो का कोणाला?>>> हो आठवतो जी फांदी तोडायची असते त्यावरच बसुन तोडत असतो.

हिंदी कवितेतील हरिवंशराय बच्चन यांची 'चिडीया और चुरूंगन' कविता कोणाला आठवते का?

अजुन एक धडा होता हिंदी च्या पुस्तकात.

काला कलुटा जादुगर- डांबराचे उपयोग सांगितले होते त्यात.

आठवतोय अजुन कोणाला?>> मला आठवतोय.
हिंदीच्या परिक्षा असायच्या त्यातल्या एका परिक्षेला मी बसलो होतो पाचवीत.
त्या अभ्यासक्रमात होती.
नंतर परत रेगुलर अभ्यासक्रमात होता.

एक्च्च प्रामाणिकपणे काम करणार्‍या चर्मकाराची गोष्ट.

हिंदीत एक धडा होता प्रामाणिक लाँड्रीवाल्याचा...लेखकाच्या घरी कपडे आणण्यानेण्याचं काम करायचा.
आणखी एक धडा.अगिनिशमन द्ल,एक मुलगा नदीत अडकतो वगैरे. अजून एक म्हणजे लेखकाला ऑस्ट्रेलियन युनिवर्सिटी दाखवताना पैसे नाकरणारा टॅक्सीवाला विद्यार्थी.

इंग्रजीमध्ये लॉस्ट बिनीथ द माऊंटन्स नावाचा धडाअकरावी वा बारवीला होता.नंतर कॉफीवरती आणि चहावर माहीती देणारा एक धडा.

नदीला पूर आलेला तो धडा 'बाढ का नियंत्रण' त्यात सरकारी यंत्रणेची खिल्ली उडवलेली होती. भारी होता.
आणि एक धमाल विनोदी धडा होता त्याचे नाव बहुतेक 'मैं लेखक बनना चाहता हूँ.' आणखी क आठवला 'साईकील खो जाने का सुख'. हिंदीतले विनोदी ढंगाचे धडे धमाल असायचे.
आणखी एक डबली बाबू नावाच्या प्रामाणिक चाकराचे व्यक्तिचित्र होते. हाही धडा फार चांगला होता.

साइकिल खोने वरून आठवले. हिंदीत एक कथा होती. एक माणूस नवीन सायकल घेतो. सायकल घेऊन ऑफिसला निघतो. पण कोणाशीतरी बोलता बोलता रोजच्या सवयीने बसमध्ये चढतो. काही वेळाने त्याला सायकलची आठवण आल्यावर देवाचा धावा करीत मागे पळत येतो. सायकल सुखरूप. देवाचे आभार मानायला देवळात जातो. देवळातून बाहेर येतो तो सायकल गायब.
बहुतेक मुन्शी प्रेमचंद यांची कथा होती.

महादेवी वर्मांच्या बालपणीच्या आठवणींचा एक लेख होता. अतीत के चलचित्र या पुस्तकातून घेतलेला.

सायकल चोरी हो जाने का दुख
आणि एक चोरी होते तो धडाही होता की.
विनोदी ढंगातला.

कला धोबीण धडा आठवतोय का?
मला लेखीकेचं नाव आठवत नाहिये.

येस्स..बाढ का नियंत्रण..बरोबर.. डबली बाबूच तो बहुतेक...
अंगुलीमाल,चीटी की आत्मकथा आठवतोय का?
इंग्रजी मध्ये एक रोहन्ताचा धडा होता.हाच पुन्हा बंबी हरणाचा धडा म्हणून बदलला गेला.
माझीही ह्हपुवा.नाव आठवेना मगाशी तेव्हा बिंबोचा अर्थ माहीत असूनही टाकलं तसंच.. Wink

William tell
bambi
vanishing forests
a date or two
Gypsies
Bird Watcher....

हिंदी चा झिद्दी चिडिया
जॉर्ज वाशिंगटन चा वेळ पाळण्यावर एक धडा होता....

अरे काय धागा मागे पडला की काय?
माझे माहेर वाघदरा-अण्णा भाऊ साठे
नवा पैलू-प्रतिभा पानट
जडण-घडण-किशोरी अमोणकर

चला सांगा बघू पटपट !
आणखी नंतर टाकतो...

अहो असणारच... या मराठी बालभारतीच्या पुस्तकाच्या आवृत्तीचं पहीलं वर्ष १९९६ आणि पुनर्मुद्रण २००५.म्हणजे तब्बल ९-१० वर्ष या पुस्तकाने धडे दिले. त्यात माबोवरचे बरेच जण असणार. Happy
त्यातल्यच या कविता बघा
या हो सूर्यनारायणा!-
पाणपोई-
आला आला अश्विन-
प्रकाशमान व्हा! -
कवि,कवयित्री सांगा बरं!

अजुन एक प्रबोधनकार ठाकरे यांच्या आईंवर एक धडा होता..त्याचा उल्लेख आलेला दिसत नाही...कितवीत होता, नाव काही आठवत नाही पण २ प्रसंग आठवत आहेत...
१. लेखकाचे मास्तर अंकगणित शिकवण्यासाठी मुलांना येताना गोट्या घेउन यायला सांगतात. लेखक घरी मागणी करतो..आई ( कदाचीत माई की ताई असे ते आईस म्हणत ) म्हणते, "तु हो पुढे .मी घेउन येते ". आई शाळेत गेली की मास्तर पण त्यांना टरकुन असत. बोलल्याप्रमाणे आई शाळेत जाते आणी मास्तरांस विचारते , " काय मास्तर पोरांना गल्लोगल्ली टब्बु खेळायला शिकवणार आहात वाटतं "

२. एकदा लेखकाला १०० रु . चे लॉटरी चे तिकीट लागते त्यावर आई म्हणते त्या १०० रुपयांतल्या १ रुपया आपला सोडला तर बाकी ९९ रु. ज्यांचे गेलेत त्यांचे तळतळाट आपल्याला लागतात

मस्त धडा होता.. मला वाटत किशोरी आमोणकर च्या माईंचा धडा ८वीत होता...तसाच हा ही ८ वी की ९ वीत होता

@ अन्जू >>विंग्रजीचा एक धडा आम्हाला होता ११वी किंवा १२ला. एका गावाची अर्थव्यवस्था ठप्प होते पण कोणीतरी माणूस एक ऑर्डर देतो आणि त्यावर दुस्-या एकमेकांना पुरक जोडधंद्याना चालना मिळते आणि तो माणूस असायलममधुन पळालेला असतो पण त्याच्यामुळे मरगळलेले गाव परत कामाला लागते.>>

हो आम्हालाही होता तो...Man Who Saved Pumplesdrop....बहुतेक रविन्द्रनाथ टागोरांचा होता

गीता, रविन्द्रनाथ टागोर नव्हते बहुदा लेखक. आता नीट आठवत नाहीये.

माओरी विलेजेस हापण धडा होता. न्युझिलंडमधील माओरी या आदिवासी जमातीबद्द्ल. ते गरम पाण्याचे झरे वगैरे.

चिमण्या सापाला मारुन बदला घेतात असा एक धडा होता. नाव आठवत नाही. पण त्यातले वर्णन एकदम झकास होते. एका पिवळ्या सापाचा फोटो पण होता ज्याला चिमण्या टोचत असतात काही चिमण्या मरतात. पण सगळ्या एक होउन त्याचा त्रास (अंडी खाण्याचा) बंद करत्तात.

Pages