मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुसु नका पुसु नका
रंग कोणता पुसु नका

अशी एक कविता होती.
मला वाटायच फुलाचा रंग कसा पुसता येइल. Proud
सरांनी अर्थ सांगितला की पुसणे म्हणजे विचारणे.
जातपात निर्मुलन अशा विषयावरची सुंदर कविता.

हो, हो,

जात कोणती पुसू नका
धर्म कोणता पुसू नका
उद्यानातील फुलास त्याचा रंग कोणता पुसू नका

नंदू नाटेकरांचा एक धडा होता - माझी बॅडमिंटनची साधना. यात एका मॅचमध्ये त्यांची आईच त्यांचा पार्टनर्/प्रतिस्पर्धी म्हणून असते. हे वाचताना त्यांच्या कुटुंबाबद्दल एकदम भारी वाटायचं. Happy

नंदू नाटेकरांचा धडा आठवतोय. मस्त होता एकदम.
बहूतेक पाचवीत चंदू बोर्ड्यांचा पण धडा होता. तो ही खूप मस्त होता..

तो जम्माडी जम्मत लय बोर होता मात्र !

झोपाळु गोष्ट आठवते झकासराव. ट्रेन पकडता येत नसते. मग ते वेटर ला सांगतात कि उठवायचे असेल तर 'खाना तय्यर है' अस सांग.
अजुन एक झोपेचा शत्रु म्हणुन एक धडा होता. ढेकणांवर. कितवीत आठवत नाही पण शेवटी लेखक घर पेटवतो असे काहिसे होते.

'रक्तदान नव्हे जीवदान!' आठवतोय का कोणाला? Happy

आणखी एक धडा चौथीला होता. त्यात कथानायिका विहिरीतून पाणी काढताना रहाटावरून घागर वेगाने विहिरीत जात असताना तिला थांबवण्याच्या नादात स्वतःच विहिरीत पडते. आणि रहाटाच्या दोराला हातात घट्ट धरून कोणी येतंय का मदतीला याची वाट बघत दोराला लोंबकळत असते. तो परिसर तसा वर्दळीचा नसल्याने तिकडे कोणी फिरकण्याची शक्यताही फारशी नसतेच. बराच वेळ दोराला घट्ट धरून ठेवल्याने दोर कचून हातातून रक्त यायला लागते. शेवटी त्या वाटेवरून जाणारे (पण या प्रकाराची अजीबात कल्पना नसलेले ) एक लहान मूल जाताजाता बालसुलभ कुतुहलाने त्या विहिरीत डोकावते आणि मग हिची सुटका होते.

काही वेळेला एक धडा आठवला की दुसरा एखादा धडाही लगेच आठवतो. कारण एका धड्याच्या एखाद्या शब्दाशी, चित्राशी, घटनेशी दुसर्‍या धड्यातल्या घटनची त्यावेळी मेंदूने सांगड घालून ठेवलेली असणार. मला हा विहिरीत पडलेल्या महिलेचा धडा आता लगेच आठवला कारण त्या धड्यातल्या चित्रात दोराला लोंबकळणार्‍या नायिकेच्या हातातून ठिबकणारे रक्त माझ्या चांगलेच लक्षात राहिले होते आणि 'रक्तदान नव्हे जीवदान!' हा धडा आठवल्यावर लगेच दुसर्‍या धड्यातले रक्त ठिबकणारे ते चित्र आठवले अन् मग धडाही!

खरोखर नॉस्टॅल्जिक केलं ह्या धाग्यानं. मस्त वाटल वाचून. गजानन आणि पराग आणि इतरांना इतक आठवतय पाहून आश्चर्य वाटल. काहीजणांकडे अजून ती जुनी पुस्तके आहेत कि काय असे वाटते. मात्र बरेच विस्मरणात गेलेले धडे, कविता आठवल्या. मला शाळेत असताना पुढच्या वर्गाचे धडे वाचायची आवड होती तसेच मागच्या वर्गांचा अभ्यासक्रम बदलायचा मग मी त्या लहान वर्गाची नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके पण वाचायचो ते सगळ आठवल.

आम्हाला मराठीच्या पुस्तकात दरवर्षी (बहुतेक ५वी ते ७वी) चि वि जोशी यांचा एकतरी धडा असायचा, मज्जा यायची चिमणराव-गुंड्याभाऊना वाचायला. डॉक्टरांची चेन असते, वेगवेगळ्या तपासण्या असा एक धडा आठवतोय.

'औंधाचा राजा'मस्त धडा होता. त्यात तो राजा लेखकाला त्यांच्या लहानपणी (गदिमा) सांगतो 'बाळ तू टाकीत जा (talky- movie) शिकला नाहीस तरी चालेल.' तेव्हा आम्ही पण आम्ही पण वर्गात एकमेकांना बाळ तु टाकीत जा, इकडे जा तिकडे जा असे म्हणत असू. सावरकरांचा धडा. अंदमानातून भारताकडे येताना ते भावाला म्हणतात, 'ते पहा भारत. ते पहा त्याचे निलसिंधूजलधौत चरणतल!' डॉ आंबेडकरांचा धडा त्यातली त्यांची वाक्ये , 'करणी करेगा तो नर का नारायण बनेगा. If you want success you must be narrow minded.' रेडीओची गोष्ट,स्मशानातल सोन, निशाण, काळे केस, हे माझ्या पर्वता हे धडे तसेच कणा, प्रतिभा विहंगा वगैरे कविता आठवतात . लहानपणी (पाचवी -सातवी) 'बोलावण आल्याशिवाय नाही', 'स्नेही' आठवतात. कुणाला ती समाधी वरील कविता आठवते का? गावाबाहेर एका जुन्या समाधीवर ती कविता आहे. कवितेच नाव पण संधीच असाव. सातवी आठवीत असताना असावी ती कविता.

त्यात तो राजा लेखकाला त्यांच्या लहानपणी (गदिमा) सांगतो 'बाळ तू टाकीत जा (talky- movie) शिकला नाहीस तरी चालेल.' तेव्हा आम्ही पण आम्ही पण वर्गात एकमेकांना बाळ तु टाकीत जा, इकडे जा तिकडे जा असे म्हणत असू

>>> मस्त

आठवू लागल्यावर किती धडे/कविता आठवतात !
१. त्या विहिरीत पडलेल्या मुलीची गोष्ट. तिच्या धैर्याचे कौतुक करणारी धड्याची शेवटची ओळ 'बहादूर आहे मुलगी!'
२. आईस पत्र आणि आईचे पत्र असे दुसरीतले आणि तिसरीतले धडे
३. असंख्य कविता 'इंजिनदादा काय करता', 'पाहुणा गोजिरा', 'कोण गे त्या ठायी राहाते गे आई', 'धीट बाई धिटुकली', 'तिफन', 'असेल हिंमत लढ्णार्यंची', 'नव्या जगातील शूर शिपाई', 'मेंदी', 'कसा मी कळेना', 'कोलंबसाचे गर्वगीत',
४. ससा आणि राजकन्येची कथा, उदबत्तीच्या सुवासाने भरलेली खोली, सोन्याची जांभळे, तीन वाटसरूंच्या उबेने पळून गेलेली थंडी, जी ए ची कथा 'भेट'

वरती बालभारतीचा दुवा दिलेला आहे पण त्यावर आधीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध नाहीत. ती कुठे मिळू शकतील का? का बालभारतीच्या कार्यालयात चौकशी करावी?

. आईस पत्र आणि आईचे पत्र असे दुसरीतले आणि तिसरीतले धडे>>>>>>>>>. अनु ने तीच्या आईला लिहिलेले पत्र अस्ते ते...म्हैसुर ला ट्रीप जाते... तीची आई तीला भडक रंगाचा स्वेटर बनवुन देते मग मुली तीला हसतात असा काहीसा धडा होता नं तो??
मला वाटतं तो ५ वी ला होता धडा

ह्या धाग्यावर नवीन पोस्ट पाहिली की खरंच अनेक धडे आणि कविता आठवतात.

कोणाला हवा आणि सुर्याचा तो धडा आठवतोय का ज्यात शेतकर्‍याच्या अंगावरील कपडे काढण्यावरून शर्यत लागली असते आणि सुर्य ती जिंकतो.

कोणाला हवा आणि सुर्याचा तो धडा आठवतोय का ज्यात शेतकर्‍याच्या अंगावरील कपडे काढण्यावरून शर्यत लागली असते आणि सुर्य ती जिंकतो.>>>>>>>>> हो ही गोष्ट मला माहीतेय

बालभारतीने पुस्तके प्रकाशित करण्यास सुरुवात केल्यापासूनची पुस्तके त्यांच्याकडे आहेत . परंतु त्यापूर्ब्वी खाजगी लेखक प्रकाशक पाठ्यपुस्तके प्रकाशित करीत असत व शाळा त्यापैकी पुस्तके निवडून अभ्यासास लावीत. आचार्य आत्र्यांच्या नवयुग मालेची पुस्तके होती. वि स खांडेकरांनी संपादित केलेली पुस्तके होती. इतिहास भूगोलाची पुस्तकेही खाजगी लेखकांची असत. उदा. जगताप गोंधळेकर द्वयीचे चरित्रे यांची पहा जरा या नावाचे इतिहासाचे पुस्तक होते. आम्हाला नवा नगर जिल्हा हे पुस्तक कि बा म्हस्के नावाच्या प्राथमिक शिक्षकानी लिहिले होते ते नन्तर आमदारही झाले Happy मोठ मोठ्या व्यक्तींची चरित्रे असत. एक आधुनिक विज्ञ्यान रसायन म्हणून बहुधा सोहोनीम्चे पुस्तक होते. तेव्हा फक्त एस एस सी च्या ११ वी च्या वर्गाला बोर्डाने प्रमाणित केलएली पुस्तके महाराष्ट्रभर एकच असत. पुढे एन सी ई आर टी आल्यावर सर्व अभ्यासक्रमाचे प्रमाणीकरण झाले व पुस्तकेही केन्द्रीय पद्धतीने बनतात आता अभ्यासक्रम तयार करणे व तज्ञ्या कडून लिहून घेणे , व प्रसिद्ध करणे ही कामे एसेस्सी बोर्ड व बालभारती करते. सध्या १ ते ४ चा अभ्यासक्रम बदललेला आहे व ही पुस्तके जवळ जवळ आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत . ती वेब साईटवर उपलब्धही आहेत.

मला आता नीट नाव आठवत नाही..बहुधा "टोमॅटोचा चिखल" नावाचा एक धडा होता १० वी ला... मस्त होता..
आनि पु.ल चा उपवास नावाचा एक धडा होता..

रॉबीनहूड , `बालभारतीने पुस्तके प्रकाशित करण्यास सुरुवात केल्यापासूनची पुस्तके त्यांच्याकडे आहेत .' > मिळू शक्तील का ही पुस्तके?

कोणाला हवा आणि सुर्याचा तो धडा आठवतोय का ज्यात शेतकर्‍याच्या अंगावरील कपडे काढण्यावरून शर्यत लागली असते आणि सुर्य ती जिंकतो.>>>>> इंग्रजी माध्यामाच्या मराठी पुस्तकातला बहुधा ७ वी तला धडा होता हा... सुर्य जिंकतो ना शेवटी..

इतका सुंदर धागा आज दिसतोय! एकदम नॉस्टॅलजिक !! Happy सगळी पानं सवडीने वाचीनच. बहुतेक आवडत्या कविता आठवून झालेल्या दिसताहेत. माझ्या अजून काही आठवणी -

दहावीत बा.सी. मर्ढेकरांची कविता - "भंगू दे काठिन्य माझे - आम्ल जाऊ दे मनीचे" पृर्ण आठवतेय कां कोणाला?

दुसरीत "आज ये अंगणा पाहुणा गोजिरा" बाबा आमटे बहुदा … 'रोपट्याची पालखी' मस्त कल्पना होती! तिसरीमध्ये "जिकडे तिकडे पाणीच पाणी …" चौथीमध्ये "इथे" म्हणून एक सुरेल कविता होती, "आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ नीज साऊली" पाचवीत बालकवी " थबथबली ओथंबून खाली आली …" मधे ढगांच्या रंगांचं काय सुंदर वर्णन होतं!! Happy सहावीत त्यांचीच 'आनंदी पक्षी … "

"या दूरच्या दूर ओसाड जागी "अशी समाधी वरची कविता कधी/कोणाची होती?

सातवीत "लाल मऊ धुळीतील उमटली खूण खूण - माझ्या अंतरीचा ठेवा पहा गडे न्याहाळून" "संथ निळे हॆ पाणी …" Happy आठवी का नववीत एक रविंद्रनाथ टागोरांची शिवाजी महाराजांवर कविता - कोणाकडे आहे कां अजून?! आणि एक "आवा चालली पंढरपूरा - वेशीपासूनि आली घरा" Happy

आदिवासी वर कविता होती ना एक? मला "अनवाणी शिसवी पायांना, पायवाट तर पडते अपुरी. दिवस पळे अन रात्र भीतसे, जीवनास त्या अशी खुमारी " एवढेच आठवतेय …

बाकी, माझ्या अभ्यासक्रमाची काही मंडळी ओळखू आलीत बरं! Happy

मृत्यूत कोणी हासे , मृत्यूस कोणी हसतो.
कोणी हसून मरतो , मरत्यास कोणी हसतो

ही पण एक कविता होती. अभ्यास क्रमातुन कदाचित काढून टाकलेली.

इतिहासात 'राजा भिकारी, माझी टोपी चोरली, डूम डूम डूमाक ,डूम डूम डूम' अशी पण एक गोष्ट होती. एक उंदीर आणि राजाची. आठवते का कोणाला?

उंदीर आणि राजाची गोष्ट इतिहासात?

आत्ता रामनगरी वाचतोय. त्यातला लग्नाच्या वर्णनाचा भाग होता अभ्यासाला. अनेक वाक्य जशीच्या तशी लक्षात राहिलीत.
"त्यांना तशीच घाई होती." संदर्भासहित स्पष्टीकरण लिहा बरं.

मृत्यूत कोणी हासे ही आरती प्रभूंची कविता. आम्हाला ११/१२वी ला
कुणासाठी , कशासाठी, कुठे आणि कुठवर
ओढायचा गाडा इमानाने जन्मभर
या ओळी असलेली त्यांचीच कविता होती.

Pages