मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्न्हेह्याना शेन्डी का असते??

चहा फर्मास झालाय.
चाहापावडर कुठुन आणलीए वर शेजार्‍यांकडुन अशं मनात उत्तर ठेवणारा कथानिवेदक..

कोणती रे ती कथा?

एका छोट्या झाडांची मूळं रुसून बसतात कारण त्यांना त्याच झाडाच्या पानांचा खोडाचा हेवा वाटत असतो. आपणही जमिनीवर असावं असं मूळांन वाटतं. मग एक दिवस माळी चुकून झाडाला केलेलं खळं तसाच ठेवून जातो. मग सूर्य वाढतो आणि मूळांना कळतं की जमिनी च्या आतच असणं चांगल.

हा धडा कोणता? कितवीत होता? मला फार आवडायचा. <<< मुळांची तक्रार. तिसरीला.

तुकाराम महाराजांचा अभंग
कदाचित ९ वी त होता....

ससाना
सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे ।
प्रेम मिठी पडे वदनासी ॥१॥

व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी ।
आला दुराचारी पारधी तो ॥२॥

वृक्षाचिया माथा सोडिला ससाना ।
धनुष्यासि बाणा लावियेले ॥३॥

तये काळी तुज पक्षी आठविती ।
धावे गा श्रीपती मायबापा ॥४॥

उडोनिया जाता ससाना मारील ।
बैसता विंधील पारधी तो ॥५॥

ऐकोनिया धावा तया पक्षियाचा ।
धरिला सर्पाचा वेष वेगी ॥६॥

डंखोनि पारधी भुमीसि पाडिला ।
बाण तो लागला ससान्यासी ॥७॥

ऐसा तू कृपाळु आपुलिया दासा ।
होसील कोंवसा संकटीचा ॥८॥

तुका म्हणे तुझी कीर्ति त्रिभुवना ।
वेदाचिये वाणी वर्णवेना ॥९।।

फटका - अनंत फंदी

बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको
संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||

चल सालस पण धरुनी निखालस बोला खोट्या बोलू नको
अंगी नम्रता सदा असावी राग कोणावर धरु नको ||

नास्तिक पणात शिरुनि जनाचा, बोल आपणा घेऊ नको
भली भलाई करा काही, पण अपधर्मंमार्गी शिरू नको ||

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलू नको
बुडवाया दुसरयाचा ठेवा, करुनी हेवा झटू नको ||

उगाच निंदा स्तुति कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची मैत्री करू नको ||

कष्टाची बरी भाजी भाकरी तुप साखरेची चोरी नको
आल्या अतिथि मुठभर द्याया मागे पुढती पहु नको ||

हिमायतीच्या बले गरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसाची जाइल सत्ता अपेश माथा घेवू नको ||

सुविचारा कतरू नको , सतसंगा अंतरु नको
द्वैताला अनुसरू नको , हरिभजना विसरु नको ||

संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||

मयूर , पुस्तकातला फटका एवढा मोठा नव्हता असे वाटते.

प्रेमाचा गुलकंद -खूपच आवडली होती कविता.
पण काही काही धडे झेपत नव्हते तेव्हा , महापुरुषांचा पराभव,बुद्ध हसला सो अन सो

मस्त धमाल धागा.
मी अगो, परागच्या बॆचची.
कर्मवीर भाऊराव पाटील, ठोकळ्याचे चित्र (ग. ल. ठोकळांचाच बहुतेक), झेल्या हे सगळे सहावीला.
पाचवीला गिरणी कामगारांची कहाणी सांगणारी बहुतेक नारायण सुर्व्यांची झपझप चाललेत नाजुक पाय
एक विवेकानंदांचाही धडा होता ज्यात दुर्गापूजेच्या दिवशी ते एका लहान मुलीचा जीव वाचवतात.
आगरकरांच्या धड्याचे नाव - आमचे ग्रहण कधी सुटेल काय?
पहिलीला बेडूक आणि दगड मारणाऱ्या मुलांचा तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो
अजून बरेच

मस्त धागा.
मलाही एक मराठी कविता आठवते.

जे देशासाठी लढले,
ते अमर हुतात्मे झाले.
सोडिले सर्व घरदार,
सोडिला सुखी संसार,
ज्योतीसम जिवन जगले,
ते अमर हुतात्मे झाले.

आणी बर्‍याच कविता होत्या.

झुले बाई झुला माझा झुले बाई झुला...

अजुने एक आठवते.

घाटातली वाट काय तिचा थाट
मुरकते गिरकते लवते पाठोपाठ.
खाली खोल दरी वर ऊंच कडा
भलामोठा नाग जणु उभा काढुन फणा.
भिऊ नका कोणी पावसाची गाणी
सोबतिला वाहाते खळाळतं पाणी.
घाटातली वाट काय तिचा थाट
मुरकते गिरकते लवते पाठोपाठ.

पारवा

भिंत खचली, कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा
तिच्या कौलारीं बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो.

सूर्य मध्यान्हीं नभीं उभा राहे
घार मंडळ त्याभंवतिं घालिताहे
पक्षि पानांच्या शांत सावल्यांत
सुखें साखरझोपेंत पेंगतात.

तुला नाहीं परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यांत दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडीत

चित्त किंवा तव कोवळ्या विकारें
दुखतेखुपतें का सांग, सांग बा रे
तुला कांहीं जगतांत नको मान ?
गोड गावें मग भान हे कुठून ?

झोंप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची ?
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीतें घुमवीत जगी आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतांत उष्ण वारें
तुला त्याचे भानही नसे बा रे !

– बालकवी

स्न्हेह्याना शेन्डी का असते??

चहा फर्मास झालाय.
चाहापावडर कुठुन आणलीए वर शेजार्‍यांकडुन अशं मनात उत्तर ठेवणारा कथानिवेदक..

कोणती रे ती कथा?>>>> झकास राव

त्याचे नावच स्नेही होतं.... त्याच्या पुढच वाक्य दुध... घरच दुध असे होते. Happy

मला माहित आहे.. हा मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा असा धागा आहे.

मला एक ईग्लीश धडा हवा आहे..

मला थोडा आठवतोय.. चाउ रात्री त्या घरी राहतो. रात्री त्याला जाग येते.. तर त्याला मालकीन एक नांगर आनी एक बैलाचि जोडी घेवुन शेती करत असते. एका रात्रित ति गहु पेरते , गहु उगवतो आनि पिठ पन होत.. त्या पिठाच्या चपत्या खाल्ल्या कि मानस जनावर होतात.. मग चाओ काहि तरी करतो आनि तिलाच ति चपाति खायला लावतो.. असा काहि तरि धडा होता..

कोनाला आठ्वतो का?

जरा इथे हा प्रश्न सुट होत नसेल तर मी काढुन टाकेन...

....

१० वी ला english ला two's company नावची कविता होती..
एक जण झपाटलेल्या घरात राहून दाखवायची मित्रांमधे फुशारकी मारतो आणि नंतर त्याची फजिती होते.
Raymond Wilson ची कविता होती ती.

कोकण्या, मला आठवतोय हा धडा. ते खाणारे सगळे गाढव बनत असतात आणि ती त्यांना बाजारात जाउन विकत असते.

कोनाला आठ्वतो का? >> हो मला आठवतोय.
जादुची गव्हाची शेती. खाणारे होतात गाढव.
हा आयडीया करुन सुटतो.

निपा हो घरच दुध अस उत्तर देतात.

....

धड्यांचे scann उडविले..... मग काय कामाचा हा धागा ??? आपल्याला मिळालेल आठवणितिले शाळेतील धडे , कविता दुसर्यांना पण वाचायला मिळावे म्हणून scann टाकल्या होत्या.... मराठील धडे कविता इंग्रजी सारखं नाही की कुठेही net वर मिळतील.... जर तुम्ही scan उडवून टाकाल तर काय उपयोग नुसती चर्चा करून???

प्राथमिक शाळेत एका हुशार शेतकर्‍याचा धडा होता. दरवर्षी पिकाचा कोणतातरी भाग (वरचा, खालचा, मधला,.इ.) कोणालातरी (देवालाच?) द्यायची त्याची बोली असते, तेव्हा तो वेगवेगळी पिके घेतो आणि त्या घेणेकर्‍याच्या हाती काही लागू देत नाही. कोणती पिके ती?

हो आणि तो ति चपाति तिलाच खायला लावतो बहुतेक.. पण त्यासाठी तो काय आयडीया करतो हे कोनाला आठवतय का...

Pages