मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा बरोबर धडयाच्या खाली गुलाबाची डिझाइन होती माझ्या एका मित्राने मला एका धडयाची आठवण करून दिली धड्याचे नाव होते "आजीने पाहीलेला चोर "त्या धड्याचे नाव काय होते ज्यात शेतकरी आपल्या तिन मुलानां समान पैसे देतो दोन मुले पैसे वाया घालवतात मात्र लहान मुलगा खोली साफ करतो बाजारातून चटई आणतो गांधीजी चा फोटो समोर अगरबत्ती लावतो त्याचा अोळी अजून आठवत आहेत
"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धि चे कारण "

हा बरोबर धडयाच्या खाली गुलाबाची डिझाइन होती माझ्या एका मित्राने मला एका धडयाची आठवण करून दिली धड्याचे नाव होते "आजीने पाहीलेला चोर "त्या धड्याचे नाव काय होते ज्यात शेतकरी आपल्या तिन मुलानां समान पैसे देतो दोन मुले पैसे वाया घालवतात मात्र लहान मुलगा खोली साफ करतो बाजारातून चटई आणतो गांधीजी चा फोटो समोर अगरबत्ती लावतो त्याचा अोळी अजून आठवत आहेत
"मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धि चे कारण "

एकीचे बळ धडया खाली पेनसिल आणि चेंडू चे चित्र होते ,स्नेही धड्यात दोन चित्र होती एक स्नेही लेखकाच्या वडिलासोबत चर्चा करत आहेत लेखक बाजूला बसला आहे आणि दुसरे लेखकाला जे स्वप्न पडते पत्त्यांच्या मारामारी चे विद्न्यानजत्रा धडा अाठवतो कोणाला?

एकीचे बळ धडया खाली पेनसिल आणि चेंडू चे चित्र होते ,स्नेही धड्यात दोन चित्र होती एक स्नेही लेखकाच्या वडिलासोबत चर्चा करत आहेत लेखक बाजूला बसला आहे आणि दुसरे लेखकाला जे स्वप्न पडते पत्त्यांच्या मारामारी चे विद्न्यानजत्रा धडा अाठवतो कोणाला?

मला आठवतो.
यात तीन चार तंबू असतात.
एकात एक साधू प्रत्येकाला हाताच्या चिमटीतून भस्मं काढून देत असतो.
खरं म्हणजे एका रबरी चेंडूत राख भरून ती काखेत ठेवलेली असते आणि एक नळी अंगरख्यातून हातापर्यंत असते. बॉल दाबून हातावर राख घ्यायची.
आणि निळा लिटमस लाल होतो एका तंबूत.

हा धागा पूर्ण वाचायची हिंमत होत नाही , नॉस्टाल्जिक व्हायला होतं.

वर कुठल्यातरी पेजवर उल्लेख असलेला 'काला कलूटा जादूगर' हा शब्दं अजून वापरतो आम्ही.

येस्स साती, किरण, विज्ञानजत्रा आठवला!

आणखी एक आठवला. ज्यात गावात नदीला पूर येऊन जनजीवन विस्कळीत होते. बहुदा 'पूर' असेच नाव असावे. पूर ओसरला तरी त्याच्या खुणा मागे असतात. या धड्याशी संबंधित एक आठवण म्हणजे तो शिकवताना आम्ही लपवून वर्गात आणलेली कारे खाताना, डोळा चुकवून एकमेकांना ती पास करताना, आम्हाला गुरुजींनी रंगेहात पकडून छड्या देऊन चांगलेच झापले होते. प्रत्येकाचे खिसे व्यक्तिशः तपासून सगळी कारे काढून घेऊन पुढची घंटा होईपर्यंत टेबलावर ठेवली होती.

चौथीच्या पुस्तकातला घाम हवा घाम आठवतो का?
श्रमाचा घाम , निढळाचा घाम.

त्याची सुरूवात-
ऐका हो ऐका , पैशाला दोन बायका
आम्ही डमडमपूरचे रहाणार, रोज नव्या गोष्टी सांगणार.

हो, Happy

किरण, हो बरोबर.

तुमच्या पोस्टच्या पुनरावृत्तीबद्दल जरा शोध घ्या ना, कशाने असं होतंय याचा.
कदाचित मदतसमिती किंवा अ‍ॅडमिन तुम्हाला मदत करू शकतात.

ब्राऊझरचे बॅक किंवा फॉरवर्ड बटन पुन्हा पुन्हा दाबले जातेय का?

तुम्हाला धाडसी फेलिसीटा धडा वाचायचा असेल तर फेसबुक वर Chinchavli marathi shala सर्च करा त्यात कोणासाठी? बाळासाठी हा पण आहे अगदी आपल्या जुन्या स्वरूपात

व्रुत्त-शार्दुलविक्रडीत
कवि-रघुनाथ पंडित
पोटीच ऐक पद,दुजा तो लाम्बविला
निश्प्राण देह पडला,श्रम ही निमाले.
सन77/78,इयत्ता7/8वीत ही कविता.
चूडीवाले बाबा, काला कलुटा जादूगर, रानात एकटेच पडलेले फूल, शेखचिल्लि, 5वी तील सालोंमण ग्रंन्ड़ई, बरच काही आठवल.

नमस्कार, किरण, पाटीलबाबा, क्रिश्नन्त. चर्चा चालूच आहे. Happy

किरण तुम्ही म्हणताय तो फुले आणि आभाळाचा धडा आठवतो.

क्रिश्नन्त, Fui Bhau ase hote का कोणता धडा?

आधिच्या चर्चेत कुणी म्हणाले की जम्माडी जम्मत बोर होता पण मला तर जाम आवडायचा धड्यातले शेवटची लाइन थोडीफार आठवते "रात्री तुझ्या कुशीत झोपताना मी खुप खुप हसीन तू मला बोलशील का हसते ग..पण आम्ही नाय सांगणार आमची जम्माडी जम्मत "

हा धागा वर आला की खुप नॉस्टॅल्जिक व्हायला होते. त्या रम्य दिवसांची आठवण म्हणजे......................

यावेळेला जाऊन मुलांची पुस्तके घेऊन आले.
मोठ्या दोन्ही मुलांनी त्या पुस्तकांना बघण्यात ढिम्मं उत्साह दाखविला नाही.
धाकटीने मात्रं सगळी पुस्तके हौसेने पाहिली आणि अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत चाळली.

आमच्या शाळेची वार्षिक परीक्षा १३ एप्रिलला संपायची आणि एक मेला रिझल्ट.
शेवटच्या दिवशी आपला पत्ता लिहिलेलं एक पाकिट शाळेत द्यायचं असे.
३० एप्रिलला रिझल्ट पोष्टात पडायचा आणि एकला घरी यायचा.
तो आला की खाली (आमचं घर डोंगरावर होतं, रिजल्ट घ्यायला घाटी उतरून खाली यावं लागायचं.)रिझल्ट हातात पडताच आणि तो वाचताच खाली रहाणार्या एका मुलाची जुनी पुस्तके घेऊन मी घरी यायचे आणि माझी जुनी पुस्तके त्याच्या भावाला पाठवून द्यायचे. मग महिनाभर ती पुस्तके वाचून अगदी शाळा सुरू व्हायच्या वेळेला माझी नविन पुस्तके आणायचे.
त्यामुळे बालभारतीच काय पण इतिहास भूगोल हिंदी इंग्रजी पण अनेकदा वाचून व्हायचं .

यावेळेला मोठ्या मुलांनी नेहमीप्रमाणेच पुस्तकांत अनुत्साह दाखवला त्यावेळी हे सगळे आठवले:

Pages