मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी महानगरपालिका शाळा घरापासून दहा मिनिटे दुर रिझल्ट आणायला मोठी बहिण जायची आणि बाबा नविन पुस्तके आणायचे मी तर पहिला भाषेच पुस्तक वाचुन काढायचो आता बालभारती पुस्तकं अाँनलाइन अाहेत पण ती सध्याची मजा नाय येत वाचायला ८५ साली मी पहिलीत होतो अामची चिंचवली ची शाळा सातवी पर्यंत होती २३ वर्षा पूर्वी आम्ही मित्र मैत्रीणी बिछडलो पण मि एका फेमस सोशल साइट वर आमचा ग्रुप बनवला आणि हळूहळू सर्व परत एकत्र आले आता चाळीस पैकी पंधरा जण आहेत ग्रुप मध्ये ......

आता शाळेतल्या मित्रांसोबत चँट करतांना परत शाळेत गेल्यासारख वाटतं ......
अरे तो धडा आठवतो कोणाला लिन -तु आणि शिन -तू दोन भाउ असतात दोन्ही लाकूडतोडे पण एक भाउ सुकि लाकड तोडायचा आणि दुसरा ओलि झाडे जपानी दंतकथा होती ती

नविन पुस्तकांचा सुगन्ध, त्यात पिंपळपान, मोरपीस, विद्या चं पान (त्याने विद्या येते असा खुळा समज)
ब्राऊन पेपरचं कवर, लेबल (ही-मॅन, स्केलेटन चलती तले), वह्या दुकानात ३च ब्रांड अजन्ता, कमल आणि नवनीत (वर्गपाठ २०० पानी, ग्रुहपाठ १०० पानी, निबंध १०० पानी, आलेख वही, चित्रकला वही).
बाबौ... काय काय आठवलं... !

नविन पुस्तकांचा सुगन्ध, त्यात पिंपळपान, मोरपीस, विद्या चं पान (त्याने विद्या येते असा खुळा समज)
ब्राऊन पेपरचं कवर, लेबल (ही-मॅन, स्केलेटन चलती तले), वह्या दुकानात ३च ब्रांड अजन्ता, कमल आणि नवनीत (वर्गपाठ २०० पानी, ग्रुहपाठ १०० पानी, निबंध १०० पानी, आलेख वही, चित्रकला वही).
>>>>> ते रम्य दिन गेले आता Sad

आणि साठ पानांचीही वही असायची, आमच्या भूगोलाच्या स्वाध्यायासाठी. त्या बाईंना १०० पानी वही चालत नसे, साठ पानांचीच चालायची Happy

ब्राऊन पेपरचं कव्हर घातलं की आम्ही त्याचा वास घेऊन बघायचो..मस्त वाटायचं!

कंपासपेटीतीलही साधनं आठवतात्..कंपास, कर्कट्क, एक काहीतरी अर्धवर्तुळाकार होते, पट्टी, खोडरबर, पेन्सिली, फाऊंटन पेनं. बॉलपेनांनी अक्षर बिघडते असे शिक्षकांचे म्हणणे. त्यामुळे त्या पेनासाठी शाईची दौत. ती भरायला एक छोटा पंप, सगळं आठवलं आता Happy

कंपास पेटीतील साहित्य- पट्टी, कोनमापक, गुण्या, त्रिगुण्या, कर्कटक, लंगडा परकार, खोडरबर(साधे - हिरवे , सुगंधीत - रंगीत) शार्पनर. कार्यानुभव वही(व्यावसायीक जगाची तोंडओळख, पाव बिस्किटे, कुन्डीतील लागवड),
स्काऊट गणवेश, आर एस पी (रस्त्यावर सोडलेले पागल - त्या काळचा विनोद). अजुन बरंच काही

नेट वर पहा किवां बाजारपेठेत जाऊन पहा जुनी बालभारती ची पुस्तकं कुठेच मिळत नाहीत कमीत कमी पाठ्यपुस्तक मंडळाने तरी एखादी लायब्ररी बनवायला पाहिजे होती जुन्या पुस्तकांची

खुशखबर ! जुनी बालभारती ची पुस्तकं नेटवर उपलब्ध होणार आहे म्हणे लोकाग्रहास्तव!! (वर्षभर लागेल पण अजुन Sad )

काही पुस्तक esahity.com साईटवर आहेत सध्या.. वाचता येत आहेत की नाही ते माहीत नाही, पण दिसत तरी आहेत..

जुन्या आठवणी पुन्हा उजळतील.
सर्व बालभारती पुस्तके मोफत आहेत.डाउनलोड करुन आनंद घ्या!
लिंन्क वर तुमची Series निवडा आणी डाउनलोड करा!
मि सर्व डाउनलोड केले. cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx

balbharti.png20160202222940.jpgshyamchiaai.jpgpatang.jpg

अनाहत, हे इथे शेअर केल्याबद्दल तुम्हाला उदंड आयुष्य लाभो!

आनंद पोटात माझ्या माईना.

अनाहत, हे इथे शेअर केल्याबद्दल तुम्हाला उदंड आयुष्य लाभो! >>>+१००००००

केकावली
- कवि मोरोपंत
(मोरोपंत रामचंद्र पराडकर)

यांच्या आर्याभारत, मंत्रभागवत आणि मंत्ररामायण तसेच इतर आख्यानात्मक रचना प्रसिद्ध आहेत.
पुढील केका त्यांच्या केकावलीतून घेतला आहे. केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे पंक्ती.
म्हणजे मोरोपंतानी आपणास मोर मयुरपक्षी समजून आपण इश्वरास मारलेल्या हाकांना केकावली अशी संज्ञा दिली आहे.

दयाब्द वळशील तू, तरि न चातकां सेवकां
उने किमपि, भाविकां उबगशील तू देव का?
अनन्य-गतिका जना निरखिताची सोपद्रवा
तुझेचि करुणार्णवा मन धरी उमोप द्रवा

तुम्ही परम चांगले बहु-समर्थ दाते, असे
सु-दीन जन मी, तुला शरण आजि आलो, असे
पुन्हाहि कथितो, बरे श्रवण हे करा यास्तव
समक्ष किति आपुला सकळ-लोक-राया! स्तव!

प्रभो शरण आलियावरि न व्हा कधी वाकडे
म्हणोनि इतुकेचि हे स्व-हित-कृत्य जीवांकडे
प्रसाद करिता नसे पळ विलंब बापा! खरे
घनांबु न पडे मुखी उघडिल्याविना पाखरे

म्हणा मज उताविळा, गुणाचि घेतला, घाबरे
असो मन असेचि, बा भजक-बहिर्मेघा ! बरे
दिसे क्षणिक सर्व हे, भरवसा घडीचा कसे
धरील मन, आधिने बहु परिभ्रमे चाकसे

न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो
न चित्त भजनी चळो, मति सदुक्त-मार्गी बळो
स्व-तत्त्व ह्रदया कळो, दुराभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्म-बोधे जळो

शब्दार्थः
दयाब्द = दयारुप पाणी देणारा मेघ
अनन्यगतिक = ज्याला आप्ल्या वाचून दुसरा थारा नाही असा
सोपद्रवा = पिडलेल्यास
करुणार्णव = करुणेचा सागर
घनांबु = पावसाचे पाणी
भजक बर्हिर्मेघा = भक्तरुपी मोरास मेघच असणार्‍या तू देवा
आधि = मानसिक दु:ख, त्रास
चाकसे = चाका प्रमाणे
कुजन विघ्न बाधा = दुर्जनाने आणलेल्या संकटाची पीडा
सदुक्तमार्गी = सज्जनानीं सांगितलेल्या मार्गाकडे
आत्मबोधे = आत्मज्ञानाने
(बाल भारती, पहिली आवृत्ती १९७१)
निनाद

अनाहत, हे इथे शेअर केल्याबद्दल तुम्हाला उदंड आयुष्य लाभो!>>>> +१००

मस्त साईट आहे. सर्व पुस्तके डाऊनलोड केली. कित्येक विस्मरणात गेलेले, आठवणीतले धडे वाचायला मिळाले.

अनाहत, लिंकबद्दल आभार. एकाच पुस्तकातले काही धडे लखलखीत आठवतात, कविता जास्तच. पण काही आधी कधी वाचलेत असंही वाटत नाही. असा अनुभव आला. वृत्तांची माहिती वाचायला तर फार मजा आली.

अनाहत, हे इथे शेअर केल्याबद्दल तुम्हाला उदंड आयुष्य लाभो! >>>+१००००००

मनापासून धन्यवाद, अनाहत

अनाहत, हे इथे शेअर केल्याबद्दल तुम्हाला उदंड आयुष्य लाभो! >>>+१००००००

खूप खूप धन्यवाद!!

नमस्कार गजानन ,साती
या अनाहत ने तर कमालच केली याचे तर फारच उपकार झाले आपल्यावर
मि तर सर्व पुस्तके डाउनलोड केली आता विचार करतोय की कलर झेराँक्स मारुन परत पुस्तके बनवू

अनाहत, हे इथे शेअर केल्याबद्दल तुम्हाला उदंड आयुष्य लाभो! >>>+१०००००००

माझ्या वेळची मराठीची पुस्तकं पाहून मन हरखून गेलं अगदी.>>++११११११

अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे झालेय.

वरची लिन्क छान आहे बालभारतीची!

९ वी ते १२ वी SSC च्या नियंत्रणाखाली असल्याने ती पुस्तके नाहीत समविष्ट केवळ ८ वी पर्यन्तचीच आहेत.

अनाहत, हे इथे शेअर केल्याबद्दल तुम्हाला उदंड आयुष्य लाभो! >>>+१०००००००

अनिश्का. | 10 April, 2014 - 04:59
झोंबी आनंद यादव

लाल चिखल मधे शेवटच वाक्य....'' आणि नंतर कितीतरी वेळ तो त्या चिखलात नाचत होता" अरेरे

दमडी ( ५ वी ) >>> तीला भाकरी बरोबर शेव खायला हवी होती...

गोकुळ > अर्धा तोळा साखर आणि शेरभर केशर आणतो

शितु > हुप्प्याने हात फोडला

बेगड > प्रकाश बर्‍याच काळाने आपल्या घरी गावी येतो पण बसमधून उतरल्या क्षणापासून त्याच्या तुसड्या वागण्याला सुरुवात होते. घरातली प्रत्येक गोष्ट त्याला ठसठशीतपणे ओंगळ दिसू लागते. त्याच्या मामाच्या मुलीशी लग्न याने करावे असे आई-वडलांचे मत असते पण त्याला अचानक मामाची मुलगी (सीता?) गावंढळ वाटू लागते.

धुणं > साट्यालोट्याचे लग्न.. मनाने प्रेमळ पण आपल्या मुलीला सासुरवास होतोय हे ऐकुन रागाने सुनेला म्हणजे मुलीच्या नणंदेला थोबाडीत मारणारी सासु

<<<<<<<< हे सगळे धडे मला आजही आठवतात. आपण दोघी batch मेट म्हणायला हरकत नाही. माझी पण १० वि २००२ ला च झाली.

अरे गजानन खंत फक्त इतकीच वाटते की आता आपली चर्चा परत पूर्वी सारखी रंगणार नाही कधी एकमेकांना न ओळखणारे आपण
सर्व ह्या आठवणिंच्या जगात कसे एकत्र आलो होतो

Nat khat tera lal yashoda nat khat tera lal gavla bal sang le aata dahi khata makhkhan udata kardeta beial hindi kavita hoti 5vi

मस्त धागा आहे !!! आम्हाला होती झुबे लालसर कविता . सुरुवात निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे अशी होती, पुढचे जास्त काही आठवत नाही.

Pages