होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>>>>जान्हवी १ वर्ष कोमात होती का?
.
कोमात कशी असेल ? तिच्या घरच्यांचे तिच्याशिवाय पान हलत नाही. असं कामाचं माणूस थोडंच का कोमात जात.
शिवाय आपटे पण किती करतात ना तिच्यासाठी . बापाच्या पायाचे operation करणार आहे तो भला माणूस.
त्या पर्यावरणवादी गोखाल्यासारखा नाही काही. एक वर्ष मजा केली पण सासर्याकडे ढुंकून सुद्धा पहिले नाही.
आता पहाच ना, इतक्या वर्षात तिच्या घरच्यांशी एका शब्दाने बोलला नाही हा पर्यावरणवादी.
सासरा चालायला लागला तर पर्यावरणाची हानी होते म्हणे

मला एक गोष्ट पटत नाही. लग्न झाल्यापासुन श्री बाळ आपल्या सासु-सासऱ्यांशी आणि जानु आपल्या सावत्र आई आणि सख्या वडिलांशी संबंध ठेवायला इतके का लाजतात/घाबरतात? हि कुठली नवी पध्दत!
आणखी एक, आपटे त्या जानूला भेटतो आहे हे मनिषला माहित असुनसुध्दा तो हे श्री बाळाला सांगुन त्या आपटयाचा बाहेर परस्पर बंदोबस्त का करत नाही?

>>>>>आपटे त्या जानूला भेटतो आहे हे मनिषला माहित असुनसुध्दा तो हे श्री बाळाला सांगुन त्या आपटयाचा बाहेर परस्पर बंदोबस्त का करत नाही?
.
असं कस करता येईल , गुलाबजामून श्री बाळाच्या मेंदूला धक्का नाही बसणार का
आधीच तो जानुपासून दूर राहून किती अपसेट आहे बघितलेस न
कित्ती काळजी घेतात न्हे एकमेकांची
जानुला एक वर्षाचा विचार करताना कसा विषय बदलला बघितलास का गुलाबजामून ने
ह्या गुलाबजामून बाबुला त्याच्या सर्व आया साबू लावून खुराड्यात कशा नाही झाकून ठेवत , रस्त्यावर एखाद्या गाडीखाली आला तर सर्वांनाच धक्का बसेल

डॉक्टंरांनी काउन्सेलिंग करुन सत्य न सांगताच तिला बाहेरच्या जगात मोकाट सोडल्याचे दाखवणे म्हणजे कहर आहे. त्यापेक्षा सगळा स्मृतीभ्रंश प्रकारच अवास्तव असला तरी सगळे समजावून घेऊन फक्त श्री आठवत नाही म्हणून ती स्वतःच्याच घरी पूर्वीचे आयुष्य जगत राहते असे दाखवले असते तर पटवून तरी घेता आले असते.
देवस्थळींचे जग करप्ट आठवणींवरच चालते. मॅरेज सर्टिफिकेट, फोटो, व्हिडियो ह्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत.

इतक्या सुमार दर्जाला आणून बसवतील मालिका असे वाटले नव्हते.

काहीही हां देवस्थळी Angry

जानूडीचा बॉस फारच भारी आहे. तिला मानसीक धक्का बसू नये म्हणून बँकेत कॅलेंडर, काँपुटरवर तारीख, वर्तमान पत्र, तिच्या मोबाईलची तारीख इत्यादी सर्व मॅनेज करतो.

नॉनसेन्स आहेत सगळे..... आणि मुख्य म्हणजे इतक मोठ्ठ ऑपरेशन, घरी इतके टेन्शन्स असुनही ती जान्हवी जाडी ती जाडीच.....जरा म्हणुन तब्येतीत फरक नाही....पोट सुटलय...डबल चिन आलीय....( माझ्या सासुला दाट शंका आहे की ती खरोखरीच गरोदर आहे ) जरी नसेल तरी हिरॉईन ना ही सिरीयल ची मग जरा मेन्टेन रहायला नको??
आणि ओव्हर अ‍ॅक्टिंग साठी तीला ऑस्कर च द्यायला हवा

तिला मानसीक धक्का बसू नये म्हणून बँकेत कॅलेंडर, काँपुटरवर तारीख, वर्तमान पत्र, तिच्या मोबाईलची तारीख इत्यादी सर्व मॅनेज करतो.>>> बघा नायतर आमचे बॉस. मानसिक धक्के बसावेत म्ह्णून संध्याकाळी साडेपाचनंतर कामं सांगाअला सुरूवात करणार!!!

>>>>>>>>> जान्हवी जाडी ती जाडीच.....जरा म्हणुन तब्येतीत फरक नाही....पोट सुटलय...डबल चिन आलीय..
.
अस कस हो म्हणता हो तुम्ही
एक वर्ष प्रोग्राम बघून काहीच कसे नाही शिकलात
जानवी नेहमी म्हणत असते ना , एखाद्याच्या शारीरिक व्यंगाबद्दल बोलू नये
आधीच बिचारी आजारी
असे डोक्यावर पडणे कोणाला सांगून येते का , शिकेल हळूहळू

तिला मानसीक धक्का बसू नये म्हणून बँकेत कॅलेंडर, काँपुटरवर तारीख, वर्तमान पत्र, तिच्या मोबाईलची तारीख इत्यादी सर्व मॅनेज करतो.

>>> त्यांच्या बँकेत तारखांना काही महत्व नाहीये का?

अत्यंत म्हणजे अत्यंत फालतू सिरियल.
तुमचे डोळे फार करूण आहेत. प्रेमभंग वगैरे झालाय का? असं तोंडावर विचारते ही जानी... Proud Rofl

तिला मानसीक धक्का बसू नये म्हणून बँकेत कॅलेंडर, काँपुटरवर तारीख, वर्तमान पत्र, तिच्या मोबाईलची तारीख इत्यादी सर्व मॅनेज करतो.>>>
मज्जा आहे. बँकेत एखादा ग्राहक गेल्या तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट मागायला आला तर ही जानू १ एप्रिल ते ३० जुन २०१४ ऐवजी २०१३ चे बँक स्टेटमेंट काढुन देणार आणि ग्राहक ते घेऊन आनंदाने घरी जाणार. चेकवरच्या तारखेपासुन फक्त ३ महिने चेक चालतो याची त्यांना कदाचित कल्पनादेखील नसावी.
असेच अकलेचे दिवाळे काढणे चालु राहिले तर कठिण आहे मालिकेचे.

तिला मानसीक धक्का बसू नये म्हणून बँकेत कॅलेंडर, काँपुटरवर तारीख, वर्तमान पत्र, तिच्या मोबाईलची तारीख इत्यादी सर्व मॅनेज करतो._____ हे खरच अस दाखवलाय का?

कॅलेंडर वरची तारीख मॅनेज केली म्हणजे काय केलं? Uhoh
मग घरचं ही मॅनेज करायला हवं कॅलेंडर, वर्तमान पत्र..... सावत्र आई ते करू देईल का?

असं तारखा वगैरे काहीही मॅनेज केलेलं नाहीये. इतके दिवस तिला वर्षापूर्वीच्या घटनाच आठवत होत्या पण गेल्या वर्षभरात काहीतरी घडून गेलं असेल असं तिच्या मनात येत नव्हतं. आता तिच्यात प्रगती असल्याने तिला टाईम आणि स्पेस ह्याबद्दल कोहेरंट प्रश्न पडू लागले आहेत इति डॉक्टर.
असे कोहेरंट प्रश्न पडण्याच्या आधीच किंवा त्या प्रश्नांकडे डॉक्टरांनी तिचं लक्ष वेधण्याआधी एकटं ऑफीसला जाणंयेणं, बँकेतली नोकरी आणि बसने एकटीने प्रवास करायची परवानगी डॉक्टरांनी कशी दिली असा प्रश्न पडतो.

अगो - Happy सहमत. आज नक्की तारीख काय आहे हे रेडिओ, टीव्ही, पेपर कशातूनच तिला कळणार नाही हे कसे गृहीत धरले आहे यांनी?

एक वर्ष आधीचा काळ आहे हे दाखवायचा अट्टाहास एवढा वाढणार आहे तिचे कन्फ्युझन व्हायला नको म्हणून एक वर्षापूर्वीचे एपिसोड्स पुन्हा दाखवतील अशीही मला एक शक्यता वाटते Happy

अरे, कालचा फुल बंडल एपिसोड आपल्यासारख्या भोचक प्रेक्शकांसाठी होता. सीडीवरची गाणी पुसली जातात तशी मेमरी गेली म्हणे! Lol एकदा गंडलेली सीडी पुन्हा होते का दुरूस्त? बिनडोक उदाहरण. जान्हवीला अपने हाल पे सोडावे लागेल म्हणावं. परत तिची " काहीही हां श्री! ! " रेकॉर्ड कधीही वाजणार नाही. थँक गॉड. Proud

अरे, कालचा फुल बंडल एपिसोड आपल्यासारख्या भोचक प्रेक्शकांसाठी होता. सीडीवरची गाणी पुसली जातात तशी मेमरी गेली म्हणे! Lol एकदा गंडलेली सीडी पुन्हा होते का दुरूस्त? बिनडोक उदाहरण. जान्हवीला अपने हाल पे सोडावे लागेल म्हणावं. परत तिची " काहीही हां श्री! ! " रेकॉर्ड कधीही वाजणार नाही. थँक गॉड. Proud

"एक वर्ष आधीचा काळ आहे हे दाखवायचा अट्टाहास एवढा वाढणार आहे तिचे कन्फ्युझन व्हायला नको म्हणून एक वर्षापूर्वीचे एपिसोड्स पुन्हा दाखवतील अशीही मला एक शक्यता वाटते "
बापरे... नको.. त्यापेक्षा.. जानु बाळ लवकर श्री बाळा कडे येउन हि मालिका सम्पवावी. Happy

आताच मिळालेल्या माहिती नुसार ... सीडी वरची काही गाणी पुसल्यास परत कशी टाकायची याची माहिती लवकरच ...गोखले नवीन उद्योग सुरु करनार... जुन्या सीडी जमा करणे सुरु आहे..... पाहात रहा होसुमीयाघ... .

जानवी नेहमी म्हणत असते ना , एखाद्याच्या शारीरिक व्यंगाबद्दल बोलू नये>>>>>>>>>>>. काहीही हा......मागे खुप आधीच्या एका एपी मधे पिंट्या आपट्याला टकल्या बोलतो तेव्हा फिदीफिदी करत बरी त्या श्री ला सांगत होती ते....तेव्हा ते व्यंग फंग चे आदर्श कुठे होते त्या जाडी चे???

आशूडी तुम्ही फार जस्त अपेक्षा ठेवताय होसुमीयाघकडून! जरा न्याय्य वागा की? आता त्यांना सुचून सुचून सीडी सुचली. Proud

काल एक वेडाबाई जानूबाळाला फोनवर 'मिस्टर जान्हवी' म्हणताना आढळली.

काल श्रीबाळाच्या टाळूवर गोखले गृहउद्योगातील कोणीही तिळाचे तेल थापले नाही.

काल कोणाच्यातरी सेलफोनवरचे गोखल्यांचे सर्व नंबर्स डिलीट केल्याचे जानूबाळाच्या वडिलांना समजले.

जानूने काल कणीक मळताना घातलेला गाऊन झिरझिरीत नव्हता.

एक डॉक्टर काल जे काही बोलला त्यावरून ह्या मालिकेला एक डॉक्टरही शोधता येत नाही असे स्पष्ट झाले.

Pages