होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुरुवार दि. ३ एप्रिल २०१४ : अपडेट्स

~ गोखले घरातील लक्ष्मीकांत शरयू भेट प्रकरणावरूनचा वाद आता अधिकच चिघळू लागला आहे आणि आजचा भाग पूर्णपणे या दोघांवरच केन्द्रीत होता. जान्हवी आपला राग शरयूसमोर व्यक्त तर करतेच पण शरयू तितक्याच शांतपणे मी जे करत आहे तेच बरोबर आहे. माझा नवरा कसाही असला तरी त्याला या जगात या क्षणी दुसरे कुणीही नसल्याने पत्नी या नात्याने मी त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्याला साथ दिलीच पाहिजे. तुझा प्रेमविवाह झाला आहे आणि तुमचे दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हे खरे, पण माझा ज्याच्याशी विवाह झाला आहे त्याच्यावर मला प्रेम करायचे आहे, तो कसाही असला तरी. शरयूच्या या युक्तिवादापुढे जान्हवीकडे कसलेही उत्तर नाही. पण माझा नवरा आणि आईआजी आता माझ्याकडे संशयाने पाहाण्याच्या अगोदर मलाही तुम्हा दोघांना जी काही मदत करता आली त्यापुढे आता काही करता येणार नाही, असे अत्यंत नाईलाजाने म्हणावे लागत आहे असे सांगून ती शरयूच्या खोलीतून निघून जाते.

दिवाणखान्यात आईआजी कोचवर पेपर वाचत बसल्या आहेत. तिथे बेबीआत्या, इंदूआई आणि सरूमावशी चहा घेऊन येतात आणि आजीना "आई, तुला काहीतरी सांगायचे आहे..." असे म्हणतात. "लक्ष्मीकांतने दुसरे लग्न केले" ही केवळ शरयूने सरूजवळ "सवत आली आहे ती माझ्या जीवनात" असे वैतागाने काढलेल्या उद्गारावरून अनुमान काढले गेले आहे, पक्की बातमी नाहीच यांच्याजवल. पण आजीला या बातमीवर विश्वास ठेवणे जड जात आहे. त्या आपल्याच नशिबाला बोल लावत तिथून निघून जातात.

श्री च्या खोलीत इंदूआई चहा घेऊन येतात आणि तिथेही आगाऊपणा करत, "लक्ष्मीकांतनी दुसरे लग्न केले म्हणे, श्री..." ही बातमी त्याला सांगून त्याचेही डोके फिरवितात. जान्हवी तिथे येते....तिला पाहून श्री ती बातमी तिच्याही कानावर घालतो. ती म्हणते, "माहीत आहे मला....छोटी आई सर्वांना हेच सांगत आहेत..." श्री म्हणतो, "तेव्हा अशा परिस्थितीतही छोटी आई त्याच्यासमवेत मी राहाणारच असे म्हणत असेल तर मग दोष तरी कुणाला द्यायचा ? आता मीच यातून काहीतरी मार्ग काढायला हवा...".

एकाच बिंदू भोवती कथानक ओढूनताणून फिरवित असल्याने मालिका पुढे सरकत नाही असेच दिसून येत आहे.

मामा, बोअरच चाललीय मालिका गेले कित्येक महिने. एकच दळण दळत राहतात, महिनोन्महिने त्यातून मार्गच नाही निघत, म्हणून म्हटलं निदान मनीष-गीताची लवस्टोरी दाखवा, तेवढेच वेगळेपण. असो.

होय अन्जू....अगदी बरोबर....फार बोअर करीत बसले आहेत हे लेखक आणि दिग्दर्शक. माझ्यासारख्या सर्वसामान्य गटातील दर्शकाला जर मालिका अशा झपाट्याने खालच्या स्तरावर येत चालली आहे असे वाटत आहे म्हणजे निर्मात्यांकडे किमाना काहीतरी क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज असणे आवश्यक आहेच, ज्यांच्याकडून केवळ एका दारुबाज पात्रावर किती तेल जाळायचे ? आणि कशासाठी ? अशा प्रश्नाची उत्तरे मिळू शकतील. त्या जान्हवीला तर रडण्याशिवाय आता कसला रोलच नाही की काय असे वाटते.

तू म्हणतेस तसा किमान बदल म्हणून तरी मनीष-गीता जोडगोळीचा प्रेमप्रवास पुढे जात असलेला दाखवावा ही अपेक्षा.

सोनाले : होय....सवत सवत म्हणून घरातील स्त्रिया जे बोलत आहेत...प्रत्यक्षात ती दारुच असणार....तीच त्याला सोडवेना झालीया.

परत सरळ स्पष्ट कोणी बोलणार नाही ती ती करत बसतील, मग गैरसमज वगैरे वगैरे. पुन्हा मालिका वाढवायला स्कोप.

भरत....

मला व्यक्तिगत पातळीवर काहीसा राग आला होता त्या शरा-लक्ष्मीकांत फोन संभाषणाचा....म्हणून मी त्याबद्दल काही लिहिणे त्याकडे दुर्लक्ष केले. वास्तविक त्या घरमालकाने असला दारुडा भाडेकरू आमच्याकडे नको म्हणून अगोदरच बाहेर काढायला हवे होते त्या लक्ष्मीकांतला. शिवाय त्याने बायकोला त्या घरात मारणे (हे दाखविले आहेच मालिकेत), आजूबाजूच्या रहिवाशांना शिवीगाळ करणे....असल्या कारणास्तव कोण शहाणा घरमालक असल्या भाडेकरूला घरी ठेवेल ? उलटून हा बायकोला फोनवरून मोठेपणा दाखवतोय, "काय वाट्टेल ते होऊ दे पण मी त्याच्या पाया पडायला जाणार नाही, शरा..." म्हणजे काय ? घरमालकाने काय निरोप पाठविला आहे ह्या बाब्याला की तू पाया पडायला ये, मी तुला घर देतो असा ?

असो....शेवटी असली कथानके काल्पनिक असतात. पण त्याबद्दल केलेल्या मांडणीचा समाजविचारावर परिणाम होतोच.

सगळा मुर्खांचा बाजार नुसता.
ती ती असं संबोधून त्या शराच्या अदृश्य सवतीला विनाकारण फुटेज मिळालंय.
आणि या सर्व बाया कोणतीही खातरजमा न करता परस्पर ती म्हणजे बाईच आहे हे धरून चालल्यात आणि वर जाऊन आईआजीला ही सांगितलंय. ती बाई धन्य तिने ही धाडकन विश्वास ठेवला. कधी कधी याच बाईने गोगृउ इतका वाढवला हे खरंच वाटत नाही.
त्या पाच आया मुर्खांच्या राण्या आणि आईआजीचं कॅरेक्टर पार शिरोमणीच.
तरी ती श्री ची खरी आई गायब आहे सध्या. तीर्थयत्रेला गेली का काय? Uhoh

दक्षिणा....

"...आईआजीचं कॅरेक्टर पार शिरोमणीच...." ~ मलाही आता असेच वाटू लागले आहे. तिघी बायका या आजीला येऊन सांगतात "शरयू म्हणते लक्ष्मीकांतने दुसरे लग्न केले आहे..." तर आजीला धक्का बसला....आणि ती आपल्या खोलीकडे गेली....इतका धक्का एका करारी कडक शिस्तीच्या बाईला बसला असेल तर ती शरयूला लागलीच वरच्या मजल्यावरून खाली बोलावून घेऊ शकत नाही का ? साधी एक हाक मारायची "शरयू...खाली ये !". आल्यावर "बघ, ह्या तिघी काय सांगत आहेत....लक्ष्मीकांतने दुसरे लग्न केले आहे ? सवत सवत म्हणजे काय ते सांग आत्ताच्या आता"....त्यावेळी तरी शरयूला कंठ फ़ुटेलच ना ? आणि येईल की सत्य बाहेर ते दारुचे.... पण नाही....अजून दहाबारा एपिसोड या घोळातच जाणार.

त्यावेळी तरी शरयूला कंठ फ़ुटेलच ना ? आणि येईल की सत्य बाहेर ते दारुचे>> सगळ्याच सिरियलीत लॅक ऑफ कम्युनिकेशन असतच.
ते नसेल तर गैस कसे होतील आणि पाल्हाळ कसे लावता येइल. Proud

मानिश आणि गीता ची lovestory दाखवण्याचे सन्केत आधीच दिलेत दिग्दर्शकाने. पर्वच्या एपिसोद मधे गीता च breakup होइल असे कहिसे सम्वान्द होते. तिच आणि तिच्या boyfriend चअ जमत नाहियी. म्हनून ति आज काल अप्सेट दाखव्लिय. आनी त्याला म्हाने कोनी दुसरी आवडाय्ला लाग्लीये. त्याला गीता फार बालिश वातते. असे सम्वाद होते गीत आणि जानु चे.

काल बऱ्याच दिवसांनी एक भाग बघितला. त्यातला शरयू आणि जान्हवीचा सीन कैच्या कै फालतू होता. शरयू म्हणते- माझा नवरा हेच माझं नशिब. मी आता यात अडकले आहे. आता मी थांबू शकत नाही. वगैरे.
हा काय मूर्खपणा आहे? झीला यातून नक्की काय सुचवायचे आहे? नवरा कसाही असला- दारुडा, बेजबाबदार, मारहाण करणारा, तरी नशिब म्हणून स्वीकारावं?

शुक्रवार दि. ४ एप्रिल २०१४ : अपडेट्स

~ छोट्या आईला जो त्रास होत आहे सध्या त्याबद्दल श्री आणि जान्हवी विचार करीत आहेत. एका माणसाच्या नकोशा वाटणार्‍या कृत्यामुळे सार्‍या घराला चिंता लागली आहे. जान्हवी श्री ला तडजोडीबाबत काही सांगू शकत नाही कारण ती जाणते की त्याच्या मनात लक्ष्मीकांत या व्यक्तीविषयी तिरस्कार भरलेला आहे. तो म्हणतो, "जान्हवी आता उलट आपण छोट्या आईला जास्तच जपायला हवे. त्या माणसापासून तिला दूर ठेवले पाहिजे." आजी जान्हवीने आणून दिलेली मराठी गाण्यांची सीडी ऐकते आहे. अरुण दाते यांचे "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..." गाणे मन लावून ऐकत आहेत...ते ऐकताना जणू काही समोर बसून लक्ष्मीकांतच ते म्हणत आहे असा त्याना भास होत आहे.

विजया बॅन्केत जान्हवी गीताकडे पाहून खूष होत आहे कारण ती आज हसर्‍या चेहर्‍याने काम करीत आहे. तिला कारण समजले आहे, तरीही गीताकडून ऐकण्यासाठी ती तिला "बरी आहेस ना ?" अशी सुरुवात करून हसण्यामागील घटना विचारते. गीता मनीषची आठवण काढते...."परवा त्याच्यासोबत बोलल्यापासून मला बरे वाटत आहे..." असे हसत हसत सांगते. जान्हवीलाही आनंद होतोय. ती मुद्दाम म्हणते, "मनीष....चांगला आहे ना?" गीता होकार देते..."येस, फनी....तो जर तुला भेटला तर तू त्याला माझ्यातर्फे थॅन्क्स सांग....माझा गेलेला मूड सुधारण्यासाठी त्याची खूप मदत झाली..." जान्हवीदेखील हसते, "नक्की सांगेन..." असे म्हणते.

गीता जाते...जान्हवीदेखील ऑफिसच्या बाहेर पडण्याची तयारी करीत आहे तोच तिला लक्ष्मीकांतच फोन येतो. जान्हवीला समजत नाही की आता या व्यक्तीबरोबर काय बोलावे, पण त्याच्याशी संबंध तोडायचे असेल तर फोन घेतला पाहिजेच या भूमिकेतून ती त्याला हॅल्लो करते. लक्ष्मीकांत "मी तुझे आभार मानावेत म्हणून फोन केला. बाकी काही कारण नाही. तुझ्यामुळे मला आईच्या चरणांना हात लावता आला...." वगैरे वगैरे बोलतो. जान्हवी आपल्याला त्यात काहीच रस नसल्यासारखे वर्तन करते. तरीही पुढे ती म्हणते, "काका, तुम्ही जी कामे मला सांगितलीत, ती मी शक्यतो पूर्ण केली...पण ती एक रिस्क होती, जी मी घ्यायला नको होती. कारण माझ्या नवर्‍याला तुमच्याविषयी खूप तिरस्कार वाटतो आणि त्याला जी गोष्ट आवडत नाही तीच मी करत आहे असे जर त्याला कळाले तर माझ्यावर कसला प्रसंग येईल हे तुम्ही जाणता....तरीही प्रत्येकवेळी मी तुमच्या वयाचा आणि नात्याचा मान ठेवला आणि तुम्हाला हो म्हणाले....पण मला हे नाही आवडत." लक्ष्मीकांत ऐकतो सारे आणि म्हणतो, "बरोबर आहे तुझे....तुला श्री काही बोलला का माझ्याविषयी ?" जान्हवी, "नाही, त्याला माहीत नाही, पण जरी माहीत असते तरी तुम्ही काय बोलला याला तो महत्त्व देत नाही. त्याच्या घरातील कुणाविषयी कुणीतरी वाईट बोलत असेल तर तो ते नाही ऐकून घेत." लक्ष्मीकांत घाईघाईने म्हणतो, "तू काळजी करू नकोस... तुमची वास्तू सुखरूप आहे. तुम्हा दोघांचा संसार सुखाने चालेल..." इथे जान्हवी त्याला थांबविते, "आमचा ? आणि मग तुमचा ? काका, छोट्या आई म्हणतात की तुम्ही घरात सवत आणली आहे...खरं आहे का हे ?" लक्ष्मीकांत म्हणतो, "मला त्याविषयीच बोलायचे होते आता...म्हणजे त्या दिवशी श्री अचानकच घरी आला आणि...." इथे लक्ष्मीकांतला "...आणि मी दारु पिऊन बेहोष झालो होतो..." असे म्हणायचे असेल, पण जान्हवी लागलीच म्हणते, "म्हणजे हे खरे आहे..." तिच्या डोळ्यात पाणी येते. "काका, इथून पुढे मला तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करणे नाही जमणार...आय अ‍ॅम सॉरी...आय होप यू अंडरस्टॅन्ड, प्लीज राग मानू नका..." लक्ष्मीकांत तिला समजावतो, "तसे काही मानू नकोस जान्हवी....उलट तुझ्यामुळे मला आईला भेटता आले....ते मी कधीच विसरणार नाही....आता मी मेलो तरी त्याचे मला दु:ख होणार नाही..." फोन बंद होतो.

बस स्टॉपवर आर.जी. या गूढ गृहस्थाला थांबलेले पाहून गाडीतून चाललेला श्री थांबतो आणि दार उघडून आर.जी.जवळ येऊन नमस्कार करतो. आर.जी.ना ओळख लागत नाही, पण श्री त्याना शंभर रुपयांची आठवण करून देतो...ओळख पटते...श्री मग जान्हवीचीदेखील आठवण करून देतो....आर.जी. तिला "जान्हवी सहस्त्रबुद्धे" या नावाने ओळखत असतात त्यामुळे त्याना वाटते की हा तरुण म्हणजे श्रीरंग सहस्त्रबुद्धे असणार. ते त्याला त्याच नावाने हाक मारतात. श्री त्याना आपले आडनाव गोखले आहे असे सांगत असतानाच आरजींचा फोन वाजतो व ते फोनवरील संभाषणात गुंतले जातात व श्री ला बाय करतात. वैतागलेला श्री घरी येतो आणि हा श्रीरंग सहस्त्रबुद्धेचा किस्सा जान्हवीला ऐकवितो...ती खो खो हसत सुटते...हा जास्तच चरफडतो. जान्हवी या संधीचा अचूक फायदा उचलते आणि नवर्‍याला आडनावावरून जास्तच चिडवायला सुरुवात करते. श्री म्हणतो, "बाकी जान्हवी एरव्ही आपल्याला लाखो लोक भेटत असतात पण हा माणूस का भेटतो याचे कारण काही कळत नाही. दिवसातून एकदा तरी त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही..." जान्हवी नवर्‍याकडे टक लावून पाहते, "असे का वाटावे तुला ?" विचारते. श्री जणू शून्यात नजर लावून म्हणतो, "मे बी मला माझ्या वडिलांची उणीव भासते... कुठेतरी, कुठेतरी ते स्थान रिकामेच राहिले आहे...."

मामा मस्त अपडेट्स. सवतीचा उलगडा आज झाला नाहीना. करतील सावकाश, गोगलगाय पुढे जाते तशी सिरीयल पुढे जातेय.

नाही केला गेला सवतीचा उलगडा.... उलट शरयूची आणि लक्ष्मीकांतची समोरासमोर भेट दाखविली आहे.... तो म्हणत आहे, "मी आता काहीही झाले तरी घरी परतणार आईकडे...." या निर्णयावर शरयू परत तेच कोड्यातील विचारते, "येताना तिलाही सोबत घेऊन येणार ?" ~ आता काय अंदाज करायचा पाहाणा-यांनी ?

वडिलांची आठवण येते आणि उणिव भासते म्हणे.....काका वर राग....आणि आई ला सोडुन परदेशात दुसरा संसार थाटणार्या वडिलांची उणिव आणि आठवण???? काही फालतू

शनिवार दि. ५ एप्रिल २०१४ : अपडेट्स

~ श्री आणि जान्हवी दोघेही त्या "फादर फिगर" बद्दल मजेत बोलत आहेत. श्री तर आता ह्या पातळीपर्यंत आला आहे की तो बायकोला म्हणतो, "त्याला काहीतरी कारण सांगून घरी घेऊन आले पाहिजे. मला काही दाद देणार नाही, पण तुला अगदी नावानिशी ओळखत असल्याने तू माझ्यावतीने त्याला निमंत्रण दे..." जान्हवी खूप हसत आहे. सकाळी श्री ऑफिसच्या तयारीत असताना शरयू त्याचा चहा घेऊन खोलीत येते. चहा घेताना ती त्याच्याशी बोलते आणि काहीही करून लक्ष्मीकांतला माफ करू शकणार नाहीस का ? असा प्रश्न विचारते. श्री तिला होकारार्थी उत्तर न देता "मी निघतो, मला ऑफिसला उशीर होत आहे....छोटी आई" असे म्हणून तिचा प्रश्न टाळतो.

जान्हवी किचनमध्ये आहे....आणि ती स्वतःशीच हसत आहे...हसण्यावर ताबा नाही तिचा. तिथे सरूमावशी येते. जान्हवी असे वेड्यासारखे का हसत आहे म्हणून चौकशी करते. जान्हवी सांगते, "श्री मध्यंतरी बसने प्रवास करायचा. त्यावेळी त्याला एक अनोळखी गृहस्थ भेटले. त्यांच्याकडून श्री ने पाकिट विसरले म्हणून शंभर रुपये घेतले. मग माझी आणि त्या गृहस्थांची गाठ पडली. मी त्याना त्या शंभर रुपयाची आठवण करून दिली. ते म्हणाले ज्याने घेतले त्यानेच परत द्यावेत. मग त्यानी माझे नाव विचारले व मी जुन्या सवयीमुळे जान्हवी सहस्त्रबुद्धे असे नाव सांगितले. पुढे श्री ची आणि त्यांची भेट झाल्यावर श्री ने माझाही उल्लेख केला. त्यामुळे त्या गृहस्थांनी त्याला श्रीरंग सहस्त्रबुद्धे असे संबोधिले....श्री काही दुरुस्ती करणार तोपर्यंत ते निघूनही गेले...त्यामुळे झालेल्या प्रसंगाचे हसू आवरत नाही...पण श्री ना ती व्यक्ती फार आवडली...इतकेच नव्हे तर तो म्हणतोय की फादर फिगर आहेत ते गृहस्थ म्हणजे..." जान्हवीला तिथेच थांबवून काहीशी अस्वस्थ झालेली सरू मावशी तिथून निघून जाते. तिला आपला नर्मदाबाईंशी नेमक्या ह्याच विषयावर काल झालेला संवाद आठवतो.

श्री ऑफिसमध्ये आहे आणि एका मित्रासोबत फोनवर बोलतोय. त्याला सांगतो की त्याच्या बेकरी प्रॉड्क्ट्स विभागात कामाला घे. त्याचे वेतन आणि राहण्यासाठी घर याचा खर्च मी उचलेन. व्यक्तीचे नाव लक्ष्मीकांत गोखले जरी असले तरी त्यांचा आणि आमचा कसला संबंध नाही. तो मित्र ह्या नेमणुकीला होकार देतो. श्री त्याचे आभार मानतो. मनिष आत आला आहे. तो श्री ला म्हणतो "मी विजया बॅन्केत जातो. अकांउंट्सची स्टेट्मेन्ट्स आणायची आहेत." श्री म्हणतो, "अरे ते तर किरकोळ काम आहे, त्यासाठी तू कशाला जायला पाहिजे ? दुसर्‍या कुणालातरी पाठवून दे..." श्री खाली मान घालून कामाला सुरुवात करतो. मनिष काहीच न बोलता उभा राहतो. एकदोन मिनिटानंतर श्री च्या डोक्यात जान्हवीने सांगितलेला मनिष-गीताचा किस्सा उमटतो व तो हसून मनिषला "अरे हो....ती स्टेट्मेन्ट्स आणायला तूच जा. तुलाही ही कामे कळायला हवीच..." मनिष खूष होऊन बॅन्केत जायला निघतो. बॅन्केत जान्हवी व गीता बोलत आहेत. गीता तिला सांगते "माझ्या त्या मित्राला माझ्याकडे असलेल्या त्याच्या सार्‍या वस्तू मी आज त्याला परत करणार आहे." जान्हवी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते "तू जाऊ नकोस गीता. त्याने तुला नकार दिला आहे ना...मग कशाला त्याच्या दारात जाऊन थांबतेस ? त्यापेक्षा कुरिअरने वस्तू पाठव आणि विषय बंद कर..." पण गीता म्हणते "मी त्यासाठीच आज अर्धा दिवस सुट्टी घेतली आहे....निघते मी..." असे म्हणून आपली पर्स घेऊन खुर्चीवरून उठते, तोच मनिष तिथे येतो...दोघीना "हॅल्लो..." म्हणतो. गीता हसते...आता तिचा पाय निघत नाही तिथून. तर जान्हवी खट्याळपणे दोघांच्याही चेहर्‍याकडे पाहात मिश्किल हसते. मनिषला ती हाक मारते पण त्याचे सारे लक्ष गीताच्या चेहर्‍याकडेच. "काही काम होते का ?" असे जान्हवी विचारते मुद्दाम, तर हा बॅन्क स्टेटमेन्टसचा उल्लेख करतो. गीता चटदिशी म्हणते "ओ हो....माझ्याकडे आहेत. मी देते...तुम्ही बसा ना...जान्हवी, तू म्हणतेस ते बरोबर आहे....मी नाही सुट्टी घेत..." असे म्हणत हसतमुखाने कॉम्प्युटरकडे आणि मनिषकडे बघत काम सुरू करते. ह्या दोन लवकरच होऊ घातलेल्या प्रेमिकांची गोंधळलेली स्थिती पाहून जान्हवीला हसू येत आहे, तरीही त्या दोघांना खाजगीपणा द्यावा म्हणून, "मनिष बस तू....मी एक फोन करून येते" असे म्हणते. गीताला तेच हवे असते...जान्हवी रेस्ट रूममध्ये जाताच दोघेही एकमेकासोबत बोलणी सुरू करतात. जान्हवी थेट श्री ला फोन करून आनंदाने मनिष-गीता किस्सा सांगत. त्यालाही आनंद होतो....मात्र तू मर्यादेपेक्षा त्यांच्यात जास्त लक्ष देऊ नकोस अशी सूचनाही देतो.

शरयू लक्ष्मीकांतच्या घरी आली आहे. लक्ष्मीकांत म्हणतो "आधी आईने मला तोंड दाखवू नकोस असे म्हटले, नंतर श्री माझा तिरस्कार करू लागला आणि काल जान्हवीने यापुढे आपण कसलीही मदत करू शकत नाही असे म्हटले....या सार्‍या गोष्टींचे मला फार वाईट वाटत आहे. शारा, आता मला या खोलीत राहायला नको वाटते. मी आईकडे, माझ्या घरच्या माणसांकडे येऊ इच्छितो..." शरयू म्हणते, "म्हणजे तिला घेऊन तुम्ही येणार ?" लक्ष्मीकांत उत्तर देतो..."नाही, मी तिला सोडून देणार. विश्वास ठेव तू माझ्यावर...."

पुढच्या भागात श्री पुन्हा त्या बसस्टॉपवर आला आहे. तिथे आर.जी. ऊर्फ ते गूढ गृहस्थ त्रासलेल्या चेहर्‍याने फोनवर कुणाशी तरी बोलत आहेत.

चला आज मनीष-गीता दाखवले, जरातरी वेगळे आणि मस्त आहेत दोघं. आता ते गोखले पुराण दळण्यापेक्षा हेच दाखवा. बाकी मामा तुम्ही मस्त लिवलं बरंका.

काल लक्ष्मीकांत आणि शरयुचे बराच वेळ बोलणे चालले होते. नेमके तेवढेच मी मिसले. लक्ष्मीकांत ला आत्ता घरी यायचे आहे का ? आणि मग शरयु त्याला काय उत्तर देते ?

सुजा...

लक्ष्मीकांतला आता आईची आणि घराची तीव्रतेने आठवण येऊ लागली आहे हे पाहून जवळ बसलेल्या शरयूच्या डोळ्यात पाणी येते. ती जास्त काही बोलत नाही, पण "तिला देखील सोबत आणणार का ?" असे कोड्यात बोलते. इथे तिला म्हणजे प्रत्यक्षात दारूचा संबंध आहे....लक्ष्मीकांत ठासून उत्तरतो, "नाही, तिला मी कायमचे सोडेन...". दारू की लग्नाची दुसरी बायको हा घोळ आहेच अजूनी अंधारात.....उद्या उलगडा होईल कदाचित.

हो दारूच आहे ती . नक्की. आज ती सरू मावशी किती तो आरडा ओरडी करत होती. तिच्या श्री ला बोलले ना ते अजून उलगडा न झालेले त्याचे ते वडील.मामा थान्क्स अपडेट्स दिल्याबद्दल.
आत्ता श्री आणि आजीच्या मनात एकच येतंय. काकाला घराबाहेर काढायचं . बघूया काय होतंय Happy

अनिश्का....

~ हो, माझाही तर्क शरयू सवत सवत म्हणून जे म्हणत आहे ते दारूबद्दलच असणार. आज त्याला दवाखान्यात नेल्याचा फोन कुणीतरी शेजार्‍याने केला आहे....तिथे दारुच्या दुष्परिणामामुळेच लक्ष्मीकांतला जावे लागले असेल असे दिसत्ये.

सुजा.... घर डोक्यावर घेतले त्या सरू मावशीने. जान्हवीने सहज बोलता बोलता सांगितलेली एक बातमी...तिचा गवगवा किती करावा ? पण, चालायचेच. मालिकेची २०-२२ मिनिटे कशीतरी व्हायला हवीतच.

सोमवार दि. ७ एप्रिल २०१४ : अपडेट्स

~ रात्रीची वेळ. काहीशा निर्जन रस्त्यावर आर.जी. फोन करण्याच्या प्रयत्नात आहे. बाजूने श्री जात आहे. तो आरजींना पाहतो आणि सहजपणे बोलतो, "हॅल्लो, कसे आहात तुम्ही ?" तसे पाहिले तर फार साधा, कॅज्युअल विचारणे; पण आरजी कसल्यातरी द्विधा मनःस्थितीत आहेत, ते वैतागून श्री कडे पाहतात, "आहे, अजूनी जिवंत आहे मी..." श्री चमकतो, "सॉरी ?" आरजी "का सॉरी ? मी जिवंत आहे म्हणून...?" श्री खुलासा करतो, "नाही, तसे काही नाही. तुम्ही दिसला म्हणून सहज बोलायला आलो." आरजी म्हणतात, "इथे सहज बोलायला वेळ आहे लोकांकडे, महत्त्वाचे बोलायला वेळ नाही." श्री विचारतो, "तुम्ही खूप अपसेट दिसता...तुम्हाला माझी काही मदत हवी का ?" आरजी अंतिम बोलल्यासारखे म्हणतात, "मदतच करणार असाल तर एकच करा...प्लीज लीव्ह मी अलोन"..आणि स्वतःच तिथून निघून जातात.

जान्हवी किचनमध्ये भाजी करण्याच्या तयारीत आहे आणि तिथे शरयू येते. आज प्रथमच असे घडले की एकटी शरयू बोलत आहे आणि जान्हवी मुकाटपणे ऐकत आहे. आपल्या नवर्‍याला जान्हवीने "आता तुम्ही माझ्याकडून कसल्याही कामाच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका" असे जे सांगितले ते तिला पसंत पडलेले नाही. ती म्हणते, "जान्हवी, असे त्याना तू बोललीस म्हणजे त्यानी काही गुन्हा केला आहे का ? शेवटी ते तुझे सासरे आहेत. किती माया करतात तुझ्यावर ते. मी गेले तिथे की तुझाच विषय असतो....आणि त्याना तू असे फटकारून आलीस. ते आता तुझ्यापासून दूर गेले आहेत....ते गेले म्हणजे मग मी देखील तुझ्यापासून दूर राहाणार..." इतके बोलून जान्हवीला काही खुलासा करण्याची संधी न देता शरयू तिथून निघून जाते. नंतर आईआजीच्या खोलीत शरयूला घेऊन बेबीआत्या येते. तिथे आईआजी शरयूच्या तब्येतीची त्या चौकशी करतात. शरयूला नीटपणे बोलता येत नाही. आजी तिला जेवणात मटाराच्या करंज्या करायला सांगतात....ते ऐकून शरयूचा जीव भांड्यात पडतो. करते असे म्हणते आणि तिथून खाली येते.

श्री जान्हवीला रस्त्यात आरजी समवेत झालेला संवाद सांगतो आणि तो माझ्या अंगावर ओरडला हेही सांगतो. जान्हवीला आरजी यांची ही वर्तणूक अपमानास्पद वाटते. ती म्हणते मला गाठ पडल्यावर मी जरूर जाब विचारणार. श्री तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. जान्हवी अस्वस्थ आहे. ती हा प्रकार नंतर सरू मावशीला सांगते. तीही चिडते कारण आम्ही इतक्या स्त्रिया या घरात आहोत पण एकदाही कोणत्याही कारणास्तव श्री बरोबर मोठ्या आवाजात बोललेलो नाही आणि हा कोण आरजी नावाचा गृहस्थ याच्या अंगावर ओरडतो. श्री त्या दोघीनाही समजावण्याचा प्रयत्न तर करतो पण स्वतःही हसत राहतो.

लक्ष्मीकांत ज्या भाड्याच्या घरात राहतोय तिथला मालक घरात आला आहे आणि लक्ष्मीकांतकडे गेल्या तीन महिन्याचे भाडे तुंबल्यामुळे ते लागलीच द्या अशी ताकीद देत आहे किंवा येत्या ३० तारखेला घर खाली करावे लागेल अशी दटावणीही देतो. लक्ष्मीकांत "मला आणखीन १५ दिवसांची मुदत द्या....मी काहीतरी व्यवस्था नक्की करीन..." अशी विनंती करतोय. या दोघांचा संवाद बाहेर उभा असलेला श्री ऐकत आहे, पण तो त्यांच्या बोलण्यात काही भाग घेत नाही. मालक गेल्यावर लक्ष्मीकांत त्याच्याकडे पाहतो....काही बोलू शकत नाही.

शरयूला एक फोन आला आहे. करणारी व्यक्ती लक्ष्मीकांतची शेजारी आहे. ती व्यक्ती सांगते, "लक्ष्मीकांत याना बरे नाही. आम्ही त्याना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले आहे..."

मामा गुड अपडेट्स. संथ चाललेल्या या मालिकेत आज मला काय आवडलं असेल तर मटारकरंज्यांचा उल्लेख, त्याच खाव्याशा वाटतायत.

मंगळवार दि. ८ एप्रिल २०१४ : अपडेट्स

~ घरमालक लक्ष्मीकांतला भाड्याबाबात ताकीद देवून गेल्यानंतर श्री आत येतो. लक्ष्मीकांतला माहीत आहे की पुतण्याने सारे पाहिले ऐकले आहे, त्यामुळे त्याच्या तोंडातून फक्त ये श्री इतकेच बाहेर पडते. श्री तिथे जास्त वेळ थांबत नाही, बसतही नाही. तो इतकेच म्हणतो, "माझ्या मित्राला त्याच्याकडील बेकरी कामासाठी विविध पदार्थ करणारी एक व्यक्ती हवी आहे. त्याला मी तुमचे नाव सुचविले आहे. पगार आणि राहाण्यासाठी जागा त्याच्याकडून मिळेल. फक्त कामाचे ठिकाण राजस्थान इथे आहे..." लक्ष्मीकांतला आपल्याला कुणीतरी नोकरी देत आहे याचाच जास्त आनंद होतो. तरीही तो म्हणतो, "पण मी जास्त शैक्षणिक पात्रतेचा नाही, अनुभव नाही नोकरीचा..." पण श्री म्हणतो, "ती काळजी करू नका. तुमच्या बेकरी कौशल्याकडे पाहून मित्र तुम्हाला नोकरी देत आहे. तर तुम्ही तयार राहा...विचार करा आणि माझ्या ऑफिसच्या फोनवर मला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या पॉझिटिव्ह उत्तराची मी वाट पाहतोय." इतके बोलून तो खोलीतून बाहेर पडतो.

"गोकुळ" वर आजी कॉम्प्युटरच्या मदतीने ऑनलाईन वर्तमानपत्र वाचत आहेत. जान्हवी तिथे येते. ती आजीना मदत करते. आजी म्हणतात "पेपर हातात घेऊन वाचण्यात जी मजा आहे ती अशी कॉम्प्युटरवर पाहून येत नाही." पण जान्हवी युक्तिवाद करते, "आईआजी, पर्यावरणाचा विचार करतात जंगलतोड थांबविली गेली पाहिजे. मग पेपरचा कमीतकमी वापर होईल...त्यामुळे कॉम्प्युटर मार्गाचे महत्त्व आहेच..." आजी हसून संमती देतात.

श्री मालपुरवठ्यासंदर्भात ऑफिसमध्ये मीटिंग घेत आहे. ती चालत असतानाच त्याला एकदोन फोन येतात. त्यावर लक्ष्मीकांतसंदर्भात कुणीतरी फोन करीत आहे, पण श्री ला त्याचा काही संदर्भ लागत आहे. तो मीटिंग पुढे ढकलतो आणि मोबाईल घेऊन फोनचा विचार करीत आहे. इकडे विजया बॅन्केत जान्हवी आणि गीता यांचा मॅनेजरसमवेत होणारा नेहमीचा ठरलेला विनोदाचा कार्यक्रम वैताग आणणारा. तो होतो.

शरयू आणि आईआजी घरी स्वयंपाकाबद्दल बोलत आहेत आणि शरयूला एक फोन येतो. त्या फोनवरील नंबरवरून तो कुणाचा हे तिला समजत नाही, पण ती घेते. फोन करणारी व्यक्ती लक्ष्मीकांत गोखले यांच्या शेजारच्या घरात राहाणारी असते. ते गृहस्थ शरयूला सांगतात "लक्ष्मीकांतना माईल्ड अटॅक आल्यामुळे आम्ही त्याना दवाखान्यात घेऊन गेलो आहे. तुम्ही तिथे या..." शरयूला धक्का बसतो. तिला जाता येत नाही म्हणून ती घाईघाईने बॅन्केत जान्हवीला फोन करून तिला जायाला सांगते. दुसरीकडे श्री ला देखील असाच फोन येतो म्हणून तोही थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचतो.

जान्हवी व लक्ष्मीकांत दवाख्यान्याच्या पॅसेजमधून बाहेर पडत आहेत तर बाजूला श्री फोनवर बोलत आहे.

Pages