Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उठसुठ जान्हवीच्या ऑफीसमधे
उठसुठ जान्हवीच्या ऑफीसमधे जातो. अर्थात तिली काही काम नसते ते सोडा
अन्जु जान्हवी आणि डायरेक्टर
अन्जु जान्हवी आणि डायरेक्टर बाबांना विसरुन गेले आहेत पण तु मात्र न चुकता चौकशी करतेस फिदीफिदी>>> ++++++++++ 1
हो ना मी मालिका बघत नाही तरी
हो ना मी मालिका बघत नाही तरी चौकशी करते बाबांची आणि आपले मामा, त्यांची जान्हवी काहीच चौकशी करत नाही बाबांची, तरी मामांची लाडकी.
अगं अन्जू..... ती जान्हवी
अगं अन्जू..... ती जान्हवी माझी चौकशी कशाला करेल ? तुम्ही करता ना....ते पुष्कळ झाले माझ्यासाठी. जान्हवी लाडकी आहे म्हणजे ती हसरी आहे म्हणून.
मामा, नीट वाचा, जान्हवी
मामा, नीट वाचा, जान्हवी तिच्या बाबांची नीट चौकशी करत नाही आणि मी बिचारी अधूनमधून करते असं म्हणायचं आहे मला.
ओ हो....नीट पढ्या मैने
ओ हो....नीट पढ्या मैने अन्जू...अभी समझमे आ गई बात.... सॉरी !
भरत मयेकर | 26 March, 2014 -
भरत मयेकर | 26 March, 2014 - 10:43
भरत,
बारकावे छान हेरता तुम्ही.
सिरिअलमधले आणि धाग्यातले देखील
गुरुवार दि. २७ मार्च २०१४ :
गुरुवार दि. २७ मार्च २०१४ : अपडेट्स
~ श्री च्या मनात काका लक्ष्मीकांत विषयी जे काही खदखदत आहे किंवा त्याचे या शहरातील अस्तित्व नाहीसे करून त्याला अन्यत्र जायला भाग पाडणे या संदर्भात तो आता मनीषची मदत घेऊ इच्छित आहे. पण मनीषची मदत हवीच असेल तर काही विशिष्ट पातळीपर्यंत याला सत्य सांगून टाकणे गरजेचे आहे. मनीषला गोखल्यांच्या घरातील या घटना माहीतच नसल्याने साहजिकच तोही चाचपडत काहीतरी विचारतो. तेव्हा श्री आपल्या काकाविषयी सांगतो, त्याच्याकडून शरयूला मिळणारी वागणूक, त्याचे नशापाणी वगैरे...पण त्याच्यासोबत तो एक चांगला गायक आहे हे देखील सांगितले जाते....त्याचे असणे म्हणजे गोखल्यांच्या घरातील स्त्रियांना कसे त्रासदायक होणारे आहे हाही खुलासा करतो. अर्थात हे सांगत असताना तो मनीषला यातील कोणतीही बाब जान्हवीसोबत चर्चेला घेऊ नकोस अशीही विनंती करतो.
इकडे बॅन्केच्या गेस्ट रूममध्ये जान्हवी ह्याच काकाबरोबर बोलत आहे. सध्या तो बराच खूष असल्याने जान्हवीशी मनमोकळेपणे तो बोलत आहे. शिवाय स्वतःबरोबर त्याने कूकीज आणि गाण्यांची एक सीडीही आणली आहे. ते पॅकिंग तो जान्हवीला देवू करतो पण ती ते घेत नाही. ती म्हणते, "मला माफ करा पण मी हे तुमच्याकडून नाही घेऊ शकत कारण माझ्या नवर्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्या मी घेऊन घरात जाणे हे योग्य होणार नाही." लक्ष्मीकांतला ते पटते. तो आग्रह करीत नाही..."मी चुकलो" असे म्हणतो आणि पार्सल घेऊन तो गेस्ट रूममधून बाहेर पडतो. जान्हवीला वाईट वाटते आणि ती "थांबा, थांबा" करत त्याच्या मागे जाते मुख्य हॉलमध्ये त्याला थांबविते आणि म्हणते, "द्या ते पाकिट....जाईन मी घेऊन घरी..." काकाला समाधान वाटते. तो काही बोलणार तोच तिथे मनीष पेढ्यांच्या बॉक्स घेऊन येतो. जान्हवी त्याला पाहून साहजिकच आनंदित होते. ती पेढे घेते....काकालाही द्यायला सांगते. काकाची ओळख करून देताना म्हणते, "मनीष, हे श्री चे सख्खे काका, माझे सासरे..." मनीष नमस्कार करतो आणि सहज बोलून जातो "तुम्ही गाता देखील ना ?" काका त्याच्याकडे पाहतो...म्हणतो, "हो, पण तुम्हाला कसे कळले ?"....मनीष गडबडतो आणि खुलासा करतो..."म्हणजे मी सहज एक अंदाज केला..." काकाला खुलासा पटत नाही, तरीही तो जास्त काही न बोलता दोघांचा निरोप घेतो. इकडे जान्हवीदेखील मनीषच्या प्रश्नाने गोंधळली आहे. बॅन्क संपल्यानंतर ती दोघे चालत फिरत गप्पा मारीत घराकडे चालले आहेत. ती त्याला म्हणते, "आज बॅन्केत तुझी श्री च्या काकांशी ओळख करून दिले होते, ते तुला भेटले होते...हे तू श्री ला नको सांगूस...एवढं करशील ना ?" मनीष कोड्यात पडतो, पण "ठीक आहे" असेही म्हणतो. "जान्हवी, खरं तर माझा हक्क नाही हे सारे विचारयचा....तरीही सांगतो...थांबव हे सगळे..." जान्हवी गोंधळते, "नेमके काय म्हणतो आहेस तू ?काय थांबव ?" मनीष "त्याना भेटणं, त्याना एंटरटेन करणं थांबव." जान्हवी वरच्या आवाजात विचारते, "श्री तुला काही बोलला आहे का ?" हा म्हणतो, "नाही, तो कशाला मला हे सांगेल ?" जान्हवीला आणखीन् एक गोष्ट आठवते, "एक मिनिट...ते गातात हे तुला कसं काय कळलं ?" "अगं अंदाजाने म्हटलो मी..." असे काहीबाही सांगून मनीष प्रसंग निभावून नेतो. जान्हवी ह्या मित्राला त्याच्या घरातील लोकांबाबत विचारते. तो सांगतो, पण ज्यावेळी मनीषला प्रेयसी शिवानीबद्दल ती विचारते, त्यावेळी तो कडवट स्वरात म्हणतो, "झाले तिचे लग्न....मी बेकार होतो, घरचे वातावरण तर तुला माहीतच आहे...शिवाय ती लक्झरी लाईफची स्वप्ने पाहाणारी....नोकरीनंतरदेखील तिच्याशी संसार शक्य झाला नसता मला...पण ते जाऊ दे..." असे म्हणत तो विषय बंद करून टाकतो.
घरी श्री ला जान्हवी "उद्या हाफ डे घेणार आहेस का ?" असे विचारते. श्री नाही असे म्हणत, "मी उद्या लवकर बाहेर पडणार आहे, ब्रेकफास्ट नकोय..." असे सांगतो, पण जान्हवीच्या नजरेला नजर मिळविणे टाळतो. जान्हवी चाणाक्षपणे त्याची चाल ओळखते, हसतेही....दुसर्या दिवशी श्री लक्ष्मीकांतच्या घरात प्रवेश करतो....तर तिथे तो दारू पिऊन जमिनीवर बेहोष होऊन पडला आहे. वासाने मस्तकी तिडिक उठल्याने श्री तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच लक्ष्मीकांत त्याचा हात धरतो....बरळत राहतो.
मामा गुड अपडेट्स.
मामा गुड अपडेट्स.
आज प्रसाद ओकने अतिशय अप्रतिम
आज प्रसाद ओकने अतिशय अप्रतिम अभिनय केला, खुपच सुंदर...
स्पेशली ''माझं खुप प्रेम खुप माया आहे रे बाळा" ह्या त्याच्या श्रीला उद्देशुन बोललेल्या वाक्यातला ओलावा खुप जाणवला!!!
मी आईला फोन केला होता तेव्हा
मी आईला फोन केला होता तेव्हा ती पण तेच म्हणत होती की आता कशाला फोन केलास प्रसाद ओक काय सुंदर काम करतोय मला बघू दे जरा
लिंक मिळवून बघायला पाहिजे!
शुक्रवार दि. २८ मार्च २०१४ :
शुक्रवार दि. २८ मार्च २०१४ : अपडेट्स
~ जान्हवी श्री ला तिने आणलेल्या कूकीज विषयी सांगते आणि त्याला चव बघण्यासाठीही देते. तो घेतो आणि खाताना कुणाकडून आणल्या हे विचारताच ती "गीताकडून आणल्या" हे उत्तर देतो. श्री खाताना म्हणतो "सेम चव अगदी..."...जान्हवी त्याला तिथेच सोडून आईआजीकडे येते आणि त्याना मराठी गाण्यांची ती सीडी देते शिवाय कूकीजची पिशवीदेखील. दोघी परत लक्ष्मीकांत याच विषयावर बोलत बसतात. जान्हवी विचारते "आईने चूक केलेल्या मुलाला क्षमा करणे योग्यच असते ना ?" आजी, "होय, आणि मी लक्ष्मीकांतला कधीच क्षमा केली आहे. पण मी आई म्हणून त्याच्यावर संस्कार करायला कमी पडले आणि तो व्यसनाच्याच आहारी गेला...त्यामुळे माझ्यापुढे दुसरा कुठला इलाज राहिला नव्हता...." जान्हवी म्हणते, "मग आता ?" आजी सहजी बोलून जातात, "आता काय ? तो कुठेही राहिला तर मानाने जगावा, त्याचं भलं व्हावं असंच वाटतं मला...पण लक्ष्मीकांत आणि माझ्यातील अंतर कमी होणे शक्य नाही....या घराची दारे ज्यांच्यासाठी बंद झाली आहेत ती त्यांच्यासाठी परत उघडली जाणार नाहीत. लक्ष्मीकांतला या घरात प्रवेश नाही ही काळ्या दगडावरील रेघ आहे हे लक्षात ठेव जान्हवी..." जान्हवी सुन्नपणे सारे ऐकत राहते.
स्वयंपाकघरात शरयू एकटीच जेवण करीत आहे आणि स्वतःशीच बडबडत आहे....नवर्याच्या हाताबाहेर गेलेल्या सवयींविषयी. जान्हवी तिथे येते, ती शरयूला मदत करायला जाते तर ती तिला तसे करू देत नाही. उलट परत मोठमोठ्याने नवर्याच्या फुटक्या नशिबाबद्दल बोलत राहते...."तिला ती जोपर्यंत सोडत नाही, तो पर्यंत हे असंच चालणार..." जान्हवीला काही कळत नाही, ती विचारते, "ती कोण ?" शरयू तात्काळ उदगारते "सवत माझी. दुसरी कोण ?" जान्हवीला हा मोठा धक्काच असतो. म्हणजे लक्ष्मीकांतच्या आयुष्यात आणखीन एक स्त्री असून ती शरयूच्या संसार सुखाच्या आड येत आहे. श्री तिथे येतो म्हणून दोघीही विषयाला बगल देतात. जान्हवी मोबाईल वाजला म्हणून वरच्या खोलीकडे जाते ती संधी साधून शरयू श्री ला लक्ष्मीकांतला भेटून येण्याची विनंती करते. श्री ती मानतो.
लक्ष्मीकांतच्या घरी श्री प्रवेश करतो तेव्हा आतील दृश्य पाहून त्याला किळसच येते. आत लक्ष्मीकांत दारू पिऊन बेहोष पडला आहे....आजुबाजूला रिकाम्या बाटल्या आहेत आणि खोलीत मद्याचा वासही सुटला आहे. श्री ला त्या वातावरणात थांबायची इच्छा होत नाही...तो तिथून फिरतो पण फिरताना त्याचा पाय तेथील तांब्यावाटीला लागून खोलीत आवाज होतो. त्या आवाजाने लक्ष्मीकांतला काहीशी शुद्ध येते आणि तो बरळतो, "कोण आहे..?" श्री चिडीने काकाकडे पाहतो...आपली ओळख करून देतो. लक्ष्मीकांत धडपडत उठण्याचा प्रयत्न करीत श्री चा हात आपल्या हातात घेण्याचा प्रयत्नही करतो पण श्री तो प्रयत्न झिडकारून लावतो. मग कसाबसा लक्ष्मीकांत त्याच नशेच्या तालात श्री ला त्याच्या लहानपणाचे वर्ण ऐकवितो....स्वतः मी कसे तुझ्या बापाला तुझ्याकरीता बोललो होतो....तुझे बालपण कशापद्धतीने माझ्यासोबतीने घडले...इत्यादी आठवणी सांगून तो श्री चे मन जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे....पण श्री म्हणतो, "मी तुमच्याशी काही महत्वाच्या गोष्टी बोलण्यासाठी आलो होतो पण आता तुम्हाला ज्या स्थितीत मी पाहात आहे ते बघता आता ते शक्य नाही..." असे म्हणत तो तिथून झटक्यात निघून जातो.
श्री ऑफिसमध्ये आला आहे आणि तो मनीषसोबत याच विषयाशी बोलत आहे. "आज मला पटते की आईआजीचा निर्णय किती योग्य होता....मनीष, आपण असे काही केले पाहिजे जेणेकरून तो या शहरातून निघून गेला पाहिजे. त्याला आपण घर घेऊन देवू.... योग्य ते पैसे देवू.....मनीष तो माणूस आपल्या घरापासून कायमचा दूर गेला पाहिजे..." मनीष त्याच्याकडे पाहात राहतो.
गुढीपाडवा आला आहे आणि आईआजी जान्हवीला "तुला मी काय घेऊ ?" असे विचारत आहेत तर जान्हवी "तुम्ही जे काही दिले आहे तेच मला पुरेसे आहे..." असे आदराने सांगत आहे. मात्र याच दिवशी आईआजी विघ्नेश्वराच्या देवळात देवदर्शनासाठी आल्या असता समोर लक्ष्मीकांत आला आहे....दोघेही एकमेकाकडे पाहात आहेत.
मामा मस्त अपडेट्स. श्री का
मामा मस्त अपडेट्स. श्री का नाही प्रयत्न करत आता वेगवेगळ्या उपचारपद्धत्तीची मदत घेऊन काकाची दारू सोडवायला.
अन्जू.... सध्या तर श्री
अन्जू....
सध्या तर श्री पूर्णपणे आईआजीच्या मताशी सहमत आहे आणि त्यामुळेच तो कोणताही जादाचा कलह निर्माण न करता लक्ष्मीकांतला त्या शहरातून अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न करणार आहे....त्यामुळे वेगवेगळ्या उपचार पद्धतीकडे तो पाहणार नाही हे उघडच आहे. कदाचित लक्ष्मीकांतला स्वत:लाच बदलावे असे वाटू लागेल.
बाकी प्रसाद ओक यानी आजच्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकले असे म्हणावे लागेल.
मामा श्री-जान्हवीसारख्या
मामा श्री-जान्हवीसारख्या सुशिक्षित मुलांनी, काकांची दारू सोडवायला प्रयत्न नको का करायला. इथेच तर मालिका हरतात ना, अशा positive गोष्टी दाखवत नाहीत. टीव्ही मालिकांचा उपयोग मनोरंजन आणि हसत खेळत प्रबोधन असा दुहेरी व्हायला हवा. माध्यमांची हीच तर ताकद असते जी आपण ओळखत नाही. हुश्श. (आपण ओळखतो पण सिरीयलवाले दुर्लक्ष करतात).
>>आईआजी विघ्नेश्वराच्या
>>आईआजी विघ्नेश्वराच्या देवळात देवदर्शनासाठी आल्या असता समोर लक्ष्मीकांत आला आह>>>>>
हा लक्ष्मीकांत इतके दिवस कुठे दुसर्या गावी रहात होता का? कारण हल्ली-हल्लीच तो त्याच्या कुटुंबीयांना दिसायला लागला आहे असे दाखवत आहेत.
कारण हल्ली-हल्लीच तो त्याच्या
कारण हल्ली-हल्लीच तो त्याच्या कुटुंबीयांना दिसायला लागला आहे असे दाखवत आहेत.
शनिवार दि. २९ मार्च २०१४ :
शनिवार दि. २९ मार्च २०१४ : अपडेट्स
~ श्री मनीषला सूचना करीत आहे "तो माणूस आमच्या घरापासून जास्तीतजास्त दूर जायला हवाय." मनीष त्याला सरळ सांगतो, "पण श्री तू ठरवून काहीच होणार नाही. ते तयार होतील का ?" "काय करायचे आहे ते आपल्याला माहीत आहे, कसे करायचे ते ठरवावे लागेल." बोलणे चालू असताना शिपाई आत येऊन दोन चेक श्री ला आणून देतो. ते बॅन्केत भरायचे आहेत. मनीष श्रीला म्हणतो "मी चाललोच आहे तिकडे तर मी भरतो बॅन्केत हे चेक्स." तो निघतो तिथून आणि विजया बॅन्केत येतो. जान्हवी तिच्या खुर्चीवर नसते पण गीता असते....डोळे पुशीत बसली आहे, विमनस्कपणे कॉम्प्युटर स्क्रीनकडे बघत. मनीष तिच्यासमोर जाऊन हॅल्लो वगैरे म्हणत तिला ओळख दाखवितो, पण ती ब्लॅन्क आहे. ओळखत नाही. मनीष जान्हवीची चौकशी करतो. गीता म्हणते, "येतील त्या थोड्या वेळात. तुम्ही बसा" पण हा तिच्याच समोरच्या खुर्चीत बसतो...तिला निरखत...."आपली जान्हवीच्या लग्नात भेट झाली होती..." असे सांगून ओळख पटवितो तरीही गीता त्या स्थितीत नाही. मनीष तिचे अश्रूने भरलेले डोळे पाहून जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो पण गीता त्याला प्रतिसाद देत नाही. "काही प्रॉब्लेम झाला आहे का ? मी मनापासून विचारतो आहे...आय कॅन हेल्प यू..." असेही मनीष म्हणतो. "हेल्प" वरून गीता काम थांबविते आणि त्याला सरळ विचारते, "काय मदत करणार आहात तुम्ही माझी ? माझ्या बॉयफ्रेन्डशी आत्ताच माझे ब्रेक अप झालं आहे. त्याने आत्ताच मला म्हटले आहे की यू आर गुड फॉर नथिंग. आणि त्याला दुसरी कुणीतरी मिळाली आहे. या सगळ्यात तुम्ही माझी काय मदत करू शकता ?" असे म्हणत त्याच्याकडे वैतागून पाहते....ते ऐकून मनीषला हसू फुटते...तो हसतच राहतो. त्याला हसताना पाहून गीता चिडते "तुम्ही हसताय ?" मनीष कसेबसे आपले हसू दाबतो, "आय अॅम सॉरी....मी तुम्हाला हसत नाही." गीता त्याला चिडीच्याच स्वरात म्हणते, "तुम्ही कुणालाही हसत असला तरी ही हसण्याची वेळ नाही. मी तुम्हाला गंभीर काहीतरी सांगत्ये आहे." मनीष तिच्याकडे पाहात म्हणतो, "मी हसलो, म्हणजे माझेही ब्रेक अप झाले त्यावेळी माझ्याही गर्ल फ्रेन्डने एक्झॅक्टली हेच शब्द वापरले होते त्याची आठवण आली. ब्रेक अप करण्याची ही फेवरिट लाईन आहे असेच मला वाटते...." गीतालाही आपली चूक कळते म्हणते "आय अॅम सॉरी..." दोघेही एकमेकाकडे पाहात बसतात....आणि त्यांचा हा संवाद आणि हसरे चेहरे दुरून जान्हवी पाहात आहे. तिला अर्थातच आनंद झाला आहे. रात्री घरात ती हा प्रसंग अगदी हसत खुलवत श्री ला सांगते आणि मनीष व गीताचे जमले तर किती बहार उडेल त्यांच्या जीवनात याचे स्वप्न रंगविते....श्री तिला आवर घालतो...एकदम निर्णयावर येऊ नकोस असे सांगतो.....हे सांगत असतानाच "मी तुझ्यापासून एक गोष्ट लपविली आहे..." असे जान्हवीला सांगतो. जान्हवीला ती गोष्ट अर्थातच माहीत आहे म्हणून ती जास्त उत्सुकता दाखवित नाही...उलट "मला माहीत आहे...मनीषकडून समजले आहे.." असे नवर्याला सांगते आणि हसून तो विषय बाजूला ठेवते...दोघे बोलत असतानाच सरू मावशी आत येते...तिला शरयूविषयी काहीतरी सांगायचे आहे....शरयूच्या डोक्यात लक्ष्मीकांतने सवत ठेवली आहे हा किडा वळवळत आहे...त्याबद्दल श्री ला माहिती देणे गरजेचे आहे असे सरूमावशीला वाटते...पण आता श्री आणि जान्हवींचे हसरे चेहरे पाहून आता त्यांच्या आनंदात मीठ टाकायला नको म्हणून "मी तुम्हाला उद्या जेवणासाठी काय करू हे विचारायला आले होते..." असे कारण देवून निघून जाते.
जान्हवी पाणी आणण्यासाठी खाली आली आहे....आईआजी तिला दिवाणखान्यात दिसतात. त्या त्यांच्या सासूबाईंच्या फोटोकडे पाहात उभ्या आहेत. जान्हवी त्याना हाक मारते. आजी म्हणतात, "पाडव्याला आक्कांचा वाढदिवस असतो. आक्का म्हणजे माझ्या सासूबाई.".... मग आजी त्यांच्या लग्नापासूनच्या आठवणीत गुंतून जातात. पाडव्याच्या आदल्या दिवशी विघ्नेश्वराच्या देवळात जाऊन आशीर्वाद घेऊन यायचा आहे हेही जान्हवीला सांगतात.
दुसर्या दिवशी विघ्नेश्वराच्या मंदिरात त्यांच्याही अगोदर तिथे लक्ष्मीकांत आलेला आहे. तो गणेशाला वंदन करून मागे वळतो तो त्याला आई दिसते. आई आपल्या मुलाला पाहते....दोघांच्याही डोळ्यांत पाणी येते. लक्ष्मीकांत खाली वाकून आईला नमस्कार करतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी समस्त गोखले कुटुंबिय विघ्नेश्वराच्या देवळात आले आहे....त्याना पाहात बाजूला लक्ष्मीकांत उभा आहे. जान्हवीचे त्याच्याकडे लक्ष गेले आहे.
मामा गुड नेहेमीप्रमाणे. आता
मामा गुड नेहेमीप्रमाणे. आता मनीष-गीताची जोडी जमणार.
हो मनीष- गीता, छान आहे जोडी..
हो मनीष- गीता, छान आहे जोडी..
सोमवार दि. ३१ मार्च २०१४ :
सोमवार दि. ३१ मार्च २०१४ : अपडेट्स
~ "हे स्वप्न होतं ? होय ते स्वप्नच होतं...." असे म्हणत अंथरुणावर पडलेला लक्ष्मीकांत उठतो. काल विघ्नेश्वराच्या देवळात त्याला आई भेटली असा प्रसंग होतो...पण ते सत्य नसून त्याला स्वप्न पडले होते.
इकडे "गोकुळ" मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरची अगदी हसतखेळत साफसफाई चालू आहे पण त्यात जान्हवीला सामील करून घेतले जात नाही....तिची सासू म्हणते, "उद्या आमच्या जान्हवीचा या घरातील पहिला गुढीपाडवा असल्याने तिला साफसफाईच्या कामातून सुट्टी दिली आहे आम्ही..." सार्या हसून तिला संमती देतात अगदी आईआजीसुद्धा. आजी म्हणतात, "उद्या श्री आणि जान्हवी जोडीने विघ्नेश्वराला जातील." ठराव मंजूर होतो. जान्हवी त्यातून म्हणते, "पण आईआजी तुम्हीही आमच्यासोबत विघ्नेश्वराला आला असता तर बरे झाले असते..." पण आजी नकार देतात "आता तुम्ही तरुणांनी ही जबाबदारी घ्यायची..." आणि विषय संपतो.
बॅन्केत जान्हवीला लक्ष्मीकांतचा फोन येतो. तो आपल्याला रात्री पडलेले स्वप्न सांगतो आणि तिला विनंती करतो की उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने तू आणि श्री दोघांनी मिळून आईआजीला मंदिरात घेऊन या म्हणजे मी तिला फक्त नमस्कार करीन दुरून. जान्हवी सुरुवातीला अर्थातच ह्या योजनेला नकार देते, पण लक्ष्मीकांत "जान्हवी, मी हात जोडतो तुझ्यापुढे, एवढी एकच विनंती तू मान्य कर माझी....मी जगेन किंवा मरेन अशी स्थिती झाली आहे माझी, त्यामुळेच आईला एकदा नमस्कार करू दे मला....तेही दुरून...मी ओळखही दाखविणार नाही....ती जबाबदारी माझी...तुझाही कसला संबंध येऊ देणार नाही याची खात्री बाळग..." जान्हवीला कोड्यात पडल्यासारखे झाले आहे, पण ती कसाबसा होकार देते. रात्री आजी आणि श्री खोलीत बसले असताना जान्हवी तिथे जाते आणि परत एकदा आजीना "तुम्हीही आमच्यासमवेत उद्या विघ्नेश्वराला चला आजी..." असा आग्रह धरते. श्री ला जान्हवीने असे आग्रहाने बोलणे खटकते, तो कोड्यातही पडल्यासारखा चेहरा करतो. आजी बर्याच वेळा नकार देतात, पण जान्हवी "माझी ती इच्छा आहे असे समजा..." म्हणून परत विनंती करते, तेव्हा अगदी नाईलाजास्तव त्या तयार होतात.
गुढीपाडव्याचा दिवस. समस्त गोखले कुटुंबिय नवीन साड्या नेसून गुढीची पूजा करण्यात गुंतले आहे. शरयू व जान्हवी आत आहेत आणि त्यातच शरयू तिला सांगते की आता आईआजी विघ्नेश्वराच्या देवळात जाणार असल्याने लक्ष्मीकांत तिथे जाऊन आजीना भेटून त्यांच्या पाया पडेल. शरयूचे विचार ऐकून जान्हवी कोड्यात पडते. आता त्या दोघांची समोरासमोर भेट हा योगायोग मानला जाणार नाही तर ते कुणीतरी ठरवून केलेला कार्यक्रम आहे...आणि ठरविणारी व्यक्ती जान्हवी असे सिद्ध झाले म्हणजे सारे आपल्यालाच दोष देणार. जान्हवी आता अस्वस्थ झाली आहे. पूजा आटोपून ती श्री आणि आईआजी विघ्नेश्वराच्या मंदिराकडे निघतात. मंदिरात प्रवेश करताना जान्हवी बाजूच्या हारतुर्याच्या गाड्याकडे पाहते तर तिला लक्ष्मीकांत चेहरा शालीने झाकून घेतलेला दिसतो. आजी आणि श्री ला ती आत मंदिरात पाठविते आणि हाराचे कारण सांगून बाहेर थांबते व लक्ष्मीकांतजवळ जाऊन "तुम्ही आज ही भेटण्याचा धोका पत्करू नका...यात सार्यांचेच नुकसान होईल, जर आजी आणि श्री ला शंका आली तर...." पण लक्ष्मीकांत आता काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. त्याने आईला पाहिले आहे आणि तो आता "मी आईला न कळता भेटतो, पदस्पर्श करतो आणि बाहेर पडतो..." असे सांगून जान्हवीला आत मंदिरात जायाला सांगतो. आत रितसर पूजाअर्चना चालू आहे....तिघेही डोळे मिटून गणपतीपुढे भक्तीभावाने उभे आहेत आणि पाठीमागून चेहरा शालीने लपटलेला लक्ष्मीकांत आला आहे. तो खाली वाकून पडलेला हातरुमाल उचलण्याच्या बहाण्याने आईच्या पायाला नमस्कार करतो आणि वळतो...पण आईआजी त्या चेहरा झाकलेल्या व पाठ दाखविणार्या भक्ताला थांबवितात.
मामा गुड. तुमचा पाडवा मजेत
मामा गुड. तुमचा पाडवा मजेत गेला असणार, दोन तास एक्स्ट्रा तुमची जान्हवी तुम्हाला भेटली.
त्या आदेश भाउजीच्या सिरीयल
त्या आदेश भाउजीच्या सिरीयल मधे ती जान्हवी रडत का होती??
तिचे आईवडील तिच्याबद्दल
तिचे आईवडील तिच्याबद्दल बोलतानाच्या क्लिप्स बघून !
ओह....म्हणुन ईतकं रडत होती???
ओह....म्हणुन ईतकं रडत होती???
मी पण रडले असते मला आवडला
मी पण रडले असते
मला आवडला होममिनिस्टरचा तो एपिसोड!
उखाणे मस्त घेतले दोघींनीही काही काही!
शशांकच्या कविताही मस्त!
दोघंही उगाच माठ नाहीयेतः)
तेजश्री खरंच रडत होती.....आणि
तेजश्री खरंच रडत होती.....आणि मुलगी जेव्हा लग्न होऊन सासरी येते त्यावेळी तिला आईबाबांना पाहता येत नाही हे तर सर्वमान्यच. पण आदेश बांदेकरांच्या टीमने तेजश्रीच्या नकळत आईबाबांच्या भावना चित्रबद्ध केल्या आणि एक सरप्राईज़ म्हणून तिला केतकरांच्या घरातच टीव्हीवर दाखविल्या. आईपेक्षा तिचे वडील आणि मावशी जेव्हा तिच्याविषयीच बोलू लागले त्यावेळी तेजश्रीला त्यांची माया पाहून रडू आवरले नाही.
एकूणच "होम मिनिस्टर" च्या या खास भागाने छान रंगत आणली. "स" वरून घरातील वस्तू शोधायच्या हा भाग तर सून आणि सासू या दोेघीनींही मस्तच रंगविला. प्रथमच घरात आलेल्या तेजश्रीला तेवढ्या दोन मिनिटात समई सापडली हे विशेष.
तरीही सासर्यांचा टाय हे
तरीही सासर्यांचा टाय हे काहीही होतं हां

आणि शेकर, सॅक हे कसं चाल्ललं?
अन्याय केला हो सासू वर सुनेने
"सासर्याचा टाय" ही एक गंमतच
"सासर्याचा टाय" ही एक गंमतच होती तशी....जी हसतखेळत सर्वांनी घेतली, तरीही अंतिम मोजणीच्या वेळी तो आयटम बाजूला ठेवला गेला...सासुबाईंनी खेळीमेळीत त्याला योग्य तो विरोध केल्यामुळे.
एक मजा म्हणून छान आहे हा घरगुती खेळ.... दोन मिनिटात "अक्षरांवरून वस्तू" शोधून आणणे.
सासर्यांचा टाय धरलं
सासर्यांचा टाय धरलं मामा!

तुम्ही मिसलत वाटत
बिचार्या सासूबाई म्हणत होत्या की नाही चालणार तर भाऊजी म्हणाले हे झी वाली आहेत
Pages