Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामा खर्र म्हणजे सासुच जिंकली
मामा खर्र म्हणजे सासुच जिंकली होती हा, तुमच्या जान्हवीला घरात नवीन म्हणून सूट दिली सासऱ्यानी आणि देवाची समई घेऊन कोणी टोयलेटमध्ये जातं का? तुमची जान्हवी गेली समई घेऊन साबण शोधायला.
अग अन्जू.....ती बिच्चारी
अग अन्जू.....ती बिच्चारी केतकरांच्या घरात प्रथमच गेली होती.....तिला विजेचे बटन्स कुठे आहेत तेही माहीत नव्हते, मग ’स’ च्या वस्तू तरी कशा शोधणार नाही....साबण आठवला...आता त्यापूर्वीच तिला समई सापडली होती. साबण तर असणार बाथरूममध्ये म्हणून तिकडे गेली होती ती....टॉयलेटमध्ये गेली नव्हती....!
आणि समई ही देवापुढचीच होती कशावरून ? स्पेअरची पण असू शकतेच ना ? उगाच आमच्या भोळ्या जान्हवीच्या मागे लागतेस तू.
रिया.... सास-यांचा टाय "स" मिळकतीमध्ये धरला होता तेजश्रीच्या? आय मिस्ड इट देन.
मामा त्यांचे बाथरूम आणि कमोड
मामा त्यांचे बाथरूम आणि कमोड एकत्रच होते.
सासऱ्यान्चा टाय धरला म्हणूनच जान्हवी जिंकली ना, खरं नियमानुसार सासूबाई जिंकल्या होत्या, खरं म्हणजे जान्हवीने आमच्या डोंबिवलीचा बाणा दाखवून, माझ्या सासूबाई जिंकल्या मी नाही, असं बोलायला हवं होतं तर ती खूप उंचावर गेली असती आणि दुसरी पैठणी तिला मिळाली असतीच.
अंजू अगदी खरं पण ती तेजश्री
अंजू अगदी खरं


पण ती तेजश्री आहे जान्हवी नाही
जान्हवी असती तर म्हणाली असती ,' खरं म्हणजे हा मान माझ्या आईंचा आहे.त्यांनाच द्या. मी पैठणी नेसण्यापेक्षा त्यांना पैठणी नेसलेली पाहून मला जास्त आनंद होईल. तसही मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं "
पण ती तेजश्री आहे जान्हवी
पण ती तेजश्री आहे जान्हवी नाही डोळा मारा>>> ++++++++++++++ 1

रिया
रिया
वेल सेड रिया, आवडलं. तेजश्री
वेल सेड रिया, आवडलं. तेजश्री डोंबिवलीची आहे म्हणून तिने तसं म्हणायला हवं होतं असं मला वाटलं.
मस्तच होता होम मिनिस्टरचा
मस्तच होता होम मिनिस्टरचा तेजू शशांक एपिसोड. श्री खर्या जीवनात पण एकदम प्रेमळ आहे दिसते.
ओये अन्जू...."तेजश्री
ओये अन्जू...."तेजश्री डोंबिवलीची आहे..." हा वर्तमानकाळ झाला...."होती..." असा भूतकाळ वापर ना... आता ती धायरी, जि.पुणे येथील झाली आहे.
धायरीत राहते ती?
धायरीत राहते ती? अॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅअॅ
इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
जाऊदे मामा, माहेर
जाऊदे मामा, माहेर डोंबिवलीचंना म्हणून म्हटलं की मोठे मन दाखवून सासूबाई जिंकल्या म्हणायला हवं होतं. जाऊदे तुम्ही दुर्लक्षच करणार ह्या गोष्टीकडे. असो.
दक्षे काय झालं?
दक्षे काय झालं?
हे काय आणखीन दक्षे ? धायरीत
हे काय आणखीन दक्षे ? धायरीत ती
राहिल्याने आता त्या भागाला विलक्षण असे वजन प्राप्त झाले आहे, समजलीस ?
खरेतर ते दोघे मुंबईत राहतात.
खरेतर ते दोघे मुंबईत राहतात.
हो मंजूडी, ते दोघेही मुंबईत
हो मंजूडी, ते दोघेही मुंबईत राहतात हा उल्लेख होता कालच्या भागात.
मला आवडला होम मिनिस्टरचा तेजू
मला आवडला होम मिनिस्टरचा तेजू शशांक एपिसोड. सासू सुनेने कसले धडा धड उखाणे घेतलेत. छान होता
हो....मालिका आणि हाती असलेले
हो....मालिका आणि हाती असलेले चित्रपट यामुळे दोघांनाही सध्या मुंबईत राहावे लागते. काल धायरी इथे तेजश्री आली होती, पण तिने स्वत:च प्रेक्षकांना तसेच आदेश याना सांगितले की लग्नानंतर आज प्रथमच ती सासुरवाडी पाहाणार आहे.... इतकेच नव्हे तर घरात कुठे काय आहे हे खुद्द शशांक तिला सर्वत्र फ़िरून दाखवत होता.
फ़ार लोकप्रिय झाल्याचे दिसत आहे ही अभिनेत्री.
मंगळवार दि. १ एप्रिल २०१४ :
मंगळवार दि. १ एप्रिल २०१४ : अपडेट्स
~ कालचाच विघ्नेश्वर मंदिरात लक्ष्मीकांतने गुपचूप येऊन आईच्या पाया पडणे या घटनेने आजच्या भागाची सुरुवात झाली. जान्हवीकडे कृतज्ञतापूर्वक नजर टाकून तो आपला रुमाल आईच्या पायाजवळ टाकतो, त्यासोबत २० रुपयाची एक नोटही. रुमाल उचलण्याच्या बहाण्याने तो आईंच्या पायाला स्पर्श करतो. शाल तोंडाभोवती लपेटून लगबगीने बाहेर पडत असतानाच आईआजी त्याला देवळात आलेला एक भक्त या नात्याने हाक मारून "तुमचे पैसे पडले आहेत" असे सांगतात. सारे काही मनासारखे घडत असल्याने मनी आनंदलेली जान्हवी "मी देऊन येते त्याना ते पैसे..." असे म्हणत घाईघाईने ती नोट घेऊन लक्ष्मीकांतकडे जात....मागून तिला व त्याला आईआजी व श्री पाहात आहेत, पण दोघापैकी कुणीच बोलत नाही. लक्ष्मीकांत नोट घेतो व दबक्या आवाजात जान्हवीचे आभार मानतो. तीही त्याच्याइतकीच खूष झाली आहे. लक्ष्मीकांत आपल्या घरी येऊन शरयूला फोन करतो आणि अत्यंत आनंदाने आपण आईच्या पायाला स्पर्श केल्याचे बायकोला सांगतो. शरयूलादेखील या गोष्टीचा आनंद होतो. आज गुढीपाडवा असल्याने घरी काय केले आहे असे लक्ष्मीकांत तिला विचारतो तेव्हा ही म्हणते, "पुरणपोळ्या केल्या आहेत..." "पण पुरणपोळ्या तर होळी दिवशी करतात ना ? मग आज का ?" तर या प्रश्नाला शरयूच म्हणते "त्यावेळी मी आजारी होते म्हणून सार्या म्हणाल्या आज पुरणपोळ्या करू या..." शरयूला माहीत आहे आपला नवरा तिकडे खोलीवर काहीही न खातापिता गप्प बसला असणार, म्हणून कुणाला न कळत ती त्याच्यासाठी चार पुरणपोळ्या डब्यात भरून घेत आहे....तेवढ्यात तिथे सरूमावशी येते आणि "कुणाला ह्या पोळ्या घेऊन चालली आहेस...?" हा प्रश्न विचारते....त्यावर नेहमीप्रमाणे शरयूची उत्तर देताना सर्कस सुरू होते.
घरी श्री समोर जान्हवी एका लहान मुलीसारखी हर्षोत्फुल्ल होऊन जणू काही नाचतच आहे. श्री ला लक्षात येत नाही की आपली बायको आज इतकी आनंदी का झाली आहे. वरवर जान्हवी "अरे आज पहिला गुढीपाडवा ना आपला म्हणून मी इतकी मोकळी वागत आहे....अशाप्रसंगी आपल्यापासून दूर गेलेले सारे लोक यायला हवे असे मला वाटते...." या वाक्याबरोबर श्री चा सारा उत्साह शून्य होतो आणि तो म्हणतो "जान्हवी मी जे काही म्हणतो त्यामुळे खरेतर तुला त्रास होतो, ते मला पाह्यचे नाही. आमच्या घरात जो काही कारभार चालत आलेला आहे त्या मागे केवळ घरातील स्त्रिया आहेत आणि त्याना पाठबळ द्यायला एकही पुरुष नव्हता....सारे इथून निघून गेले. सहा स्त्रिया ज्या घरात आहेत त्या ठिकाणी फक्त मी एक मुलगा....मला माझ्या वडिलांनी व काकांनी मोठे केले नाही, शिक्षण दिले नाही, वाढविले नाही....तर ते काम केले आहे माझ्या सहा आयांनी...त्यामुळे आता ह्या भरल्या घरात त्या पुरुषांपैकी कुणीही आलेले मला अजिबात चालणार नाही..." श्री चा हा उद्रेक पाहून जान्हवी कावरीबावरी होते. आपल्या नवर्याच्या मनात नसलेल्या गोष्टी आपण त्याच्या माघारी करत आहोत हे जर त्याला कधी समजले तर काय गहजब होईल या विचाराने तिलाही धास्ती बसते. श्री ची समजूत काढण्याचा ती प्रयत्न करते. तोही शांत होतो आणि "मी ऑफिसला जाऊन येतो..." असे सांगून बाहेर पडण्याच्या तयारी करू लागतो, तोच तिथे बेबीआत्या येते. ती देखील आजच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घर इतके गजबजले आहे ते पाहून आनंदी झाली आहे. जान्हवीला "तुझी आई खोलीत वाट पाहात आहेत..." असे सांगून तिला तिकडे पाठविते आणि श्री ला विचारते, "तू खूष आहेस ना श्री ?" तो म्हणतो "होय, बेबीआत्या....मला काहीच झालेले नाही."
जान्हवी आईआजींच्या खोलीत आली आहे. दोघी बोलत बसल्या आहेत. अचानकच आजीना एक प्रश्न सुचतो. त्या जान्हवीला विचारतात, "तू लक्ष्मीकांतला पाहिले आहेस का ?" जान्हवी चिंतेत पडते....ती काही उत्तर देण्यापूर्वीच आईआजी पुढे म्हणतात, "विघ्नेश्वराच्या मंदिरात असताना मला का कोण जाणे लक्ष्मीकांतची आठवण आली."
श्री आणि सौ केतकरांचा पहिला
श्री आणि सौ केतकरांचा पहिला पाडवा झी च्या खर्चाने जोरात चाललाय.
त्या होम मिनिस्टरच्या
त्या होम मिनिस्टरच्या एपिसोडची लिंक द्या ना कोणीतरी. मला सापडली नाही.
.
.
सानुली, हि घे
सानुली,
हि घे लिंक.
http://www.youtube.com/watch?v=FeArwvAljuQ
बुधवार दि. २ एप्रिल २०१४ :
बुधवार दि. २ एप्रिल २०१४ : अपडेट्स
~ आईआजी प्रो.जान्हवी श्री गोखले यांच्याकडून कॉम्प्युटरमधील त्यांच्या मजकुरांची पीडीएफ मध्ये कसे रुपांतर करून घ्यायचे ही शिकवण घेत आहेत....नातसूनेला त्यात आनंद आहेच. आजीने ती प्रक्रिया समजते. जान्हवी त्याना विचारते "तुम्हाला आता इतके सारे येते तर कॉम्प्युटरवर तुम्ही आत्मचरित्र लिहा ना...शीर्षकही माहीत आहे - असामान्य कर्तृत्व असलेल्या स्त्रीची कहाणी." आजी हसतात, म्हणतात, "नको गं बाई, घडून गेलेल्या गोष्टींच्या आठवणींचा छळ नुसता...." जान्हवीही हसते...बोलणे चालू असतानाच आजी एकदम विचारतात, "जान्हवी, तू कधी लक्ष्मीकांतला बघितले आहेस का ?" जान्हवी चपापते, खरे तर बोलता येत नाही...ततपप करत म्हणते, "नाही, नाही पाहिलं मी....फोटो पाहिला, नाही फोटोही नाही पाहिला मी...पण तुम्ही असं का विचारता ?" आजी म्हणतात, "खास काही नाही, पण आज विघ्नेश्वराच्या देवळात मला सारखा कांता आजुबाजूला आहे असंच वाटत होतं....त्याला परफ्यूम लावायची सवय आहे....तसला सुगंध मंदिरात आला आणि मला त्याची आठवण आली...." जान्हवीला आता तिथे बसणे अवघडल्यासारखे होते व ती "आईआजी श्री ऑफिसला चालला आहे....मी जाऊन येते त्याच्याकडे..." आणि आजीच्या खोलीतून बाहेर पडते.
श्री आणि मनीष ऑफिसमध्ये कामासंदर्भात बोलत आहेत. श्री चे लक्ष काहीसे विचलित झाल्याचे पाहून मनिष त्याला त्या मागील कारण विचारतो. श्री काकाविषयी बोलतो....त्या परिस्थितीतून नेमका कसा मार्ग काढावा याचे चित्र माझ्या नजरेसमोर काही येईनासे झाले. मनिष त्याला आपल्याकडून सर्व प्रकारच्या मदतीची खात्री देत आहे.
किचनमध्ये जान्हवी भाजी करीत आहे आणि त्याचवेळी सरूमावशी तिथे येते आणि काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे म्हणून जान्हवीला सांगते की ती लक्ष्मीकांतसाठी डब्यातून पुरणपोळ्या घेऊन गेली आहे. हे तिने योग्य केले नाही. आजीना समजले तर किती राग येईल त्याना ? जान्हवी समजुतीच्या सूरात म्हणते, "अहो, आज गुढीपाडवा आहे, म्हणून कदाचित त्याना वाटले असेल की काकांनीही गोडधोड खावे..." पण सरू उलट म्हणते, "अगं अशा माणसाला ही पुरणपोळ्या घेऊन जाते ज्याने हिची सवत घरात आणली आहे...." जान्हवी सुन्न होऊन उभी राहते...तिला काय बोलायचे हे समजत नाही. इकडे पोळ्यांचा डबा घेऊन शरयू नवर्याशेजारी बसली आहे आणि त्याला पुरणपोळीचा तुकडा मोडून खायाला सांगत आहे....तो खात नाही...संतापून "बाजूला ठेव तुझ्या पोळ्या.." असे बडबडतो. शरयूला रडे आवरत नाही. तो फक्त "श्री ला एकदा घेऊन ये इकडे....तो परवा आला होता आणि मी नशेत इथे पडलो होतो. त्याच्याशी काय बोललो हे मला आता आठवत नाही....पण जे काही बोललो असेन ते कदाचित चुकीचे असू शकेल...तेव्हा तू काहीही कर आणि त्याला एकदा इथे घेऊन ये..." शरयू काही न बोलता नवर्याने हातही न लावता परत केलेला पोळ्यांचा डबा घेऊन बाहेर पडते.
घरी येते. दार उघडते तो तिला धक्का बसतो. समोरच आईआजी कॉम्प्युटरवर काही काम करीत आहेत आणि शेजारी जान्हवी त्याना सूचना करीत आहे....आईआजी आपल्याला आता पाहाणार या कल्पनेने शरयूला घाम फुटतो. जान्हवीदेखील अस्वस्थ होते. आजींचे लक्ष मॉनिटरकडे असल्याने "आईआजी तुम्ही डोळे बंद करा, मी तुम्हाला काहीतरी गंमत दाखविणार आहे..." आजी डोळे मिटून घेतात आणि जान्हवी किचनमध्ये भिंतीच्या आड लपलेल्या शरयूला खूण करते. शरयू लगबगीने बाहेर येते आणि जिन्याकडे धावते...तिची जणूकाही सुटकाच होते. इकडे जान्हवी आजीच्या डोळ्यावरून हात काढते. आजी "कसली गंमत ?" असे विचारताच जान्हवीला आपण आजीला फसविल्याबाबतची जाणीव होते आणि तिला रडू फुटते. आजी आश्चर्याने कारण विचारतात तर आता त्यासाठीही खोटे बोलायला हवे म्हणून मोबाईलवर श्री चा फोटो होता तो माझ्याकडून डीलिट झाला, त्याचे वाईट वाटत आहे, असे ती खोटे कारण सांगते. आजी तिला धीर देतात...पुन्हा नवीन फोटो घे त्याच्यावर असे हसत सांगतात.
जान्हवी चिडून शरयूच्या रूममध्ये येते....तिथे शरयू आनंदाने तिचे आभार मानते, पण जान्हवी ते स्वीकारत नाही कारण आज आपण आजीच्या संतापापासून केवळ नशिबाने वाचलो आहोत याची तिला जाणीव आहे. जान्हवीचे ते रुप पाहून शरयू खाली मान घालते. पण जान्हवी म्हणते, "आता मान खाली घालून काय उपयोग ? मुळात मान खाली घालायला लागेल असे काम आपण का करावे ?" शरयू काहीही उत्तर देत नाही.
श्री आणि सौ केतकरांचा पहिला
श्री आणि सौ केतकरांचा पहिला पाडवा झी च्या खर्चाने जोरात चाललाय. फिदीफिदी >>>

दक्षे पाड्व्याबद्दल वेल सेड
दक्षे पाड्व्याबद्दल वेल सेड काल म्हटलं होतं आणि मामांना पण काल गुड अपडेट्स लिहिलं होतं. आज माझी पोस्ट गायब.
मामा त्या काकाने पोळ्या नाही
मामा त्या काकाने पोळ्या नाही खाल्ल्या तर ठेऊन यायच्याना शरयूने, नंतर खाल्ल्या असत्या.
आता मनीष आणि गीताची लवस्टोरी दाखवा, जरातरी रंगत येईल सिरीयलमध्ये, किती बोअर चाललीय.
बाकी मामा गुड अपडेट्स.
धन्यवाद सारिका! इथे दाखवत
धन्यवाद सारिका! इथे दाखवत नाहीयेत, ति लिंक.
अन्जू.... खरं सांगायचं तर
अन्जू....
खरं सांगायचं तर मलाही त्या काकाबुवाचा फ़ार संताप आला होता, पोळ्या नाकारण्याबाबत. त्या बिचा-या शरयूने एकटी जान्हवी वगळता सार्यांचा नजरा चुकवून तसेच वेळप्रसंगी शिव्या खाऊन जोखमीने त्या पुरणपोळ्यांचा डबा त्या नशेबाज दहा रुपयाला महाग असलेल्या नवर्यासाठी आणल्या आहेत....चांगला वर्षातील एक महत्त्वाचा सण आहे....आई सकाळी देवळात भेटली आहे. मग आता कशाला नखरे त्याने दाखवायचे ? किमान बायकोचे मन राखण्यासाठी तरी एखादी पोळी खातो असे म्हणायचे. पण नाही, तिच्यावरच वस्सदिशी ओरडून तिला रडायला लावले.
खरं तर तुम्हा समस्त स्त्री सदस्यांनी निर्माता आणि दिग्दर्शकांचा तीव्र भाषेत निषेध तिकडे पोच केला पाहिजे... स्त्री ला असे दुय्यम स्थान एका दारुबाज पात्राकडून दिले जात असल्याबद्दल....किमान आजच्या युगात तरी स्त्री ला दाखवा ना पुरुषांच्या बरोबरीने.
मामा स्त्रीकडे असलेली अज्ञात
मामा स्त्रीकडे असलेली अज्ञात ताकद, ह्या मालिकावाल्यांना दाखवायची नसते. तसं असतं तर शरयू, आजी आणि इतरजणींनी मिळून त्या काकाला दारूच्या व्यसनातून बाहेर काढलं आणि मार्गाला लावलं असं दाखवलं नसतं का? त्याऐवजी त्याला घरातून बाहेर काढले आणि बायकोने या ना त्या मार्गाने पैसे दिले व्यसनं करण्यासाठी असं दाखवलं.
अत्यंत फालतूपणा दाखवतायत
अत्यंत फालतूपणा दाखवतायत सध्या.
Pages