सोनाक्षी सिन्हा फॅन क्लब

Submitted by बेफ़िकीर on 24 January, 2014 - 11:00

sonakshi.jpg

चित्र आंतरजालावरून!

एनी बायर्स ऑफ धिस आयडिया?

सोनाक्षी सिन्हा ही 'सौंदर्याची व्याख्या' बदलत आहे.

(व्यक्तीशः) डिंपल, मनीषा कोईराला आणि बिपाशा बसूनंतर जिच्या प्रेमात पडावे असे वाटले अशी ही नायिका!

-'बेफिकीर'!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<बेफि जी - तुमच्या लिखाणावरुन तुमची जी इमेज तयार झाली होती ती सोनाक्षी फॅन आहात ऐकुन जरा डागाळली. >> Happy

सोनाक्षी !!
मला आवडते ती
तिच्यात मला सर्वाधिक आवडतं ते तिचं व्यक्तिमत्व ...तिच्या व्यक्तिमत्त्वात तिचं व्यक्तित्व ओसंडून वाहत असतं बाकी शारीरीक मोजमापेही अत्यंत उन्मादक दिसतात तिची
डोळ्यांत निरखून पाहवं तर आत्मा दिसतो म्हणे.. काही जणांचे डोळे असे असतात ...मीनाक्षीचे असे आहेत (माझ्या दृटीने बेफीजींचेही डोळे त्याच टाईपचे आहेत )

काही असो नसो पण आपल्यालातर ब्वॉ सोनक्षी एक नंबर आयटम वाटते

मधुबालेनंतर सुचित्रा सेन,वहिदा रेहमान आणि थेट माधुरी दिक्षीत.
बाकी सर्वजण पानीकम्

सुरवातीला मला आवडत नव्ह्ती, मी तिला लेडी सनी देओल , स्टोनाक्षी अस काही तरी म्हणायचो....
पण आता लूटेरा आणी राऊडी नंतर खरच आवडू लागली आहे. कुठलाही अवतार सही दिसतो तिला. वेस्टर्न किंवा भारतीय. ती मस्तच दिसते.तिला चांगले चित्रपट मिळोत... ही सदीच्छा. !

अहो बेफि तीचे अनेक फोटो असताना तो बिछान्यावरचाच काय धड नाय

बाकी तशी छान शोभेल तुम्हाला !

मलाही सोनाक्षी आवडत नाही .... बोरिंग ...मॅनली ...फॅटअ@$ ....
आणि अभिनयही काही खास वाटत नाही सुमारच आहे ...

सोनाक्षी माधुरी श्रीदेवी उर्मिला आणि रेखा ह्या लिस्ट मधेही सोनाक्षी पाचवीच येईल ...:फिदी:

रेखाला लाम्ब लाम्ब लाम्ब टाका. मला अज्याब्बात म्हणजे अज्याब्बात आवडत न्हाई.( तुम्हाला कश्शी सोनाक्षी आवडत न्हाय ना, तशी रेखा बी मला नाय आवडत.) फकस्त चान्गली कलाकार हाये. दिसायला नाय ओ आवडत.

आधी मधुबाला मग बीना रॉय, नलिनी जयवन्त, पद्मिनी, माला सिन्हा, हेमामालिनी मग जयाप्रदा, माधुरी, दिपीका पदुकोण ( अरे वागायला कशी का असेना, झक मारो) मग त्या..... नन्तर श्रीदेवी. मग सोना आक्षी, मग रेखा. उर्मिला मातोन्डकरान्ची की ( कानेटकरान्ची) कोठारेन्ची?

अजून कोण सौन्दर्यवत्या राहील्या असतील तर त्या बी टाका हिथ.:फिदी:

हो ते रीना रॉयचे जिन्दगी इम्तिहान लेती है माझे पण आवडते आहे.:स्मित:

अरे हो की ऐश माझ्या लय आवडीची. तिला कशी विसरले?:अओ:

तशी रवीना पण भारी होती. अक्षय आणी गोविन्दाबरोबर मस्त गाणी होती तिची.

तशी रवीना पण भारी होती. अक्षय आणी गोविन्दाबरोबर मस्त गाणी होती तिची.
>>
रवीनाला मी भेटले होते २० वर्षापुर्वी, सुरेख दिसायची ती, तिची भावजय पण बरोबर होती ती हम पान्च मधली.

रवीना मॉडेल म्हणून मला वाटत विमल साडीच्या जाहीरातीत पहिल्यान्दा आली, तेव्हाच खूप आवडली होती. त्या जाही. चे टायटल सॉन्ग पण भारी होते.

निलीमा लकी आहेस तू.:स्मित: हम पान्च मधली ती स्विटी ना.

सावनका पहला बादल उसका काजल बनजाये
मौज उठे जैसे सागरपे वैसे कदम उठाये

sonakshi 3.jpg

रबने जाने किस मिट्टीसे उसके अंग बनाये
छमसे काश कहींसे मेरे सामने वो आजाये

sonakshi 4.jpg

लक्ष्मी रस्त्यावर एका दुकानावर लिहीलंय "दणकट पायजमा". ! पायजमा घेताना पण आपण दणकट बघून घेतो, तर हिरॉईन दणकट असली तर बिघडली कुठं ? ती तरी कुठं लव्ह स्टोरीज वाले पिक्चर करतेय ? दबंग - १/२, राऊडी राठोड असे सगळे तडाखेबंद हांणमारपट तिच्या नावावर आहेत. कुठं हिरो कमी पडला तर ही पण दोन चार जणांना लोळवू शकते. बाकीच्या हिरविनीत आहे का दम ?

एकच वादा सोनाक्षी दादा

अजून कोण सौन्दर्यवत्या राहील्या असतील तर त्या बी टाका हिथ.>>
पूनम पांडे, नर्गिस फाक्री, योगिता दांडेकर, मेघना पटेल, सन्नी लहाने, तनिशा सिंह, आलिया भट्ट, शेर्लिन चोप्रा, मल्लिका शेरावत .....

लोकांना जिमी शेरगील पण आवडतो, त्यामानाने सोनाक्षी सिन्हा नक्कीच छान ..

ती चुकीच्या काळात जन्माला आली अन्यथा धर्मेंद्रची नायिका म्हणून शोभली असती..

मला सुरुवातीला ती स्टारकन्या आहे हे समजले होते तेव्हा मला तिच्याकडे पाहून ती हेमा मालिनीची आणखी एखादी मुलगीच वाटली होती..

पुढे ती शत्रुघ्न सिन्हांसारखी राजकारणाच्या वाटेवर गेली तर स्पोर्टस मिनिस्टर म्हणून संधी आहे, किमान खो-खो कबड्डी सारख्या आपल्या मातीतल्या खेळांची ब्रांड अँबासिडर बनू शकते..

तिचे डोळे मात्र विलक्षण बोलके आहेत.. दहातले आठ मार्क मी त्यालाच देईन आणि एकूण मार्क दहात साडेआठ !

तिचा पुर्ण चित्रपट एकही पाहिला नाही, हो, अगदी दबंगही नाही, पण यात तिचा काही दोष नाही. तिचा त्यातला तो डायलॉग, "थप्पड से डर नही लगता साबजी, प्यार से लगता है" हा अगदी भिडला होता, आपले पण काही असेच आहे..

राहता राहिला तिचा अभिनय,, तर तो शिकेल कधीही.. कतरीना नाही का शिकली.... अभिनय नाही हं, तर हिंदी बोलायला.. तर हि पण अनुभवातून शिकत जाईलच ..

ती चुकीच्या काळात जन्माला आली अन्यथा धर्मेंद्रची नायिका म्हणून शोभली असती..>>> अभिषेक, लोकांची आवड बदलली म्हणून, की हीरोज तिला न शोभणारे चिपाड्स आले म्हणून? Happy

जिमी शेरगिल खरे चांगला आहे. सिरीयस रोल्स मधे मला आवडतो (मोहब्बते ई. सोडून द्या :)). साहिब बीबी और गँगस्टर, स्पेशल २६ ई. मधले रोल्स मस्त आहेत त्याचे.

फारएण्डदा,
ती पुर्ण पोस्टच हलके घ्या, सोनाक्षी सिन्हावर पाचसहा वाक्यात निबंध लिहिल्यासारखे. त्यात काहीच गंभीर परीक्षण आहे तर काही असेच गंमतीने, काही उपहासात्मक तर काही फिल्मी सितार्‍यांना खाजगी आयुष्य नसल्याने त्यांच्यावर वैयक्तिक टिका करणे हा आपला हक्कच असतो तो बजावयच्या हेतूने लिव्हलेय.

तरी उत्तरे द्यायचे झाल्यास येस्स, लोकांची पिढीदरनुसार सौंदर्याची आवड बदलत जातेच. खास करून हिरोईनींच्या फिगरबाबत, ज्याला हल्ली पूर्वीच्या तुलनेत जास्त वेटेज दिले जाते. जे आधी नव्हते. असले तर ठिक नसले तर नसले. वर जसे हेमामालिनीचे नाव घेतले तसेच वैजयंतीमालाचेही नाव घेऊ शकतो. आकर्षक आणि लोभसवाणा चेहरा आणि हेल्दी फिगर. सोनाक्षी सिन्हाला या गटात टाकू शकतो. काळाचे म्हणाल तर, सोनाक्षी सिन्हा ज्या ठराविक कपड्यांमध्ये वा गेटअपमध्ये छान दिसते ते तिला आजच्या काळात प्रत्येक सिनेमात, प्रत्येक भुमिकेत नाही मिळणार.

हिरोजना बाकी काही आजच्या चिपाड म्हणायचे नव्हते, पण त्यांच्याही शरीरसौष्टवाच्या व्याख्या बदलल्या आहेत. उघडे पीळदार शरीर अन डोल्लेशोले. जुने अ‍ॅक्शन हिरोज धर्मेंद्र वा विनोद खन्ना म्हणा, त्यांना कुठे काय हे तेव्हा लागायचे. म्हणून हिरोंमध्ये पण जर कोणाला बॉडी कट्स आणि सिक्स पॅक्स न दाखवता हॅंडसम म्हणून गणले जायचे असेल तर धर्मेंद्रच्याच काळात जन्माला यायला हवे.

@ जिमी शेरगील, हो आहे खरा तसा तो चांगला, वरच्या आपल्या लिस्टमध्ये वेडनसडे पण टाकू शकता, आणि मुन्नाभाई सिरीज मधले इमोशनल रोल मध्ये पण तो भावला होता.. आणि त्या त्या वेळी तो मला स्वताला फार आवडला होता.. म्हणून माझ्या त्या वरच्या वाक्यातले "लोकांना जिमी शेरगील पण आवडतो" हे बोलताना त्यावेळचा मीच माझ्या डोळ्यासमोर होतो Happy

Pages