आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते

-शाम

व्वा. सुंदर शेर आहे.

काय अफलातून धागा काढला आहे डॉक.

इथे हजेरी लावल्यावर प्रत्येक दिवस मस्त जाईल Happy

धन्यवाद !

(आता एकेका शेराचा अस्वाद घ्यावा )

-सुप्रिया.

'नमस्ते' 'हाय' पेक्षा वेगळे बोलू
जरासा मोकळा हो मोकळे बोलू......वाह ! मस्त मस्त

हासू नकोस बघुनी रस्त्यावरील वेडा
गेला असेल त्याच्या शेतामधून रस्ता..

-तिलकधारी......कायम स्मरणात राहणारा शेर

आपल्या मतभिन्नतेमध्ये असे सातत्य आहे
आपले जमणार नाही हेच अंतिम सत्य आहे.........क्या बात !

नुसती ढिगार्‍यातून वरती मान केली
कोणीतरी आला फुले टाकून गेला........सहीय !

देखण्या गावास देहाची सहल ठरली
पाहतो येतात सोबत कोणत्या व्याधी......वा वा

पाट्या टाकत ये जा करतो कायम एकच रस्त्याने
पूर्वी पायी आता गाडी हेच काय ते न्यारेपण...........खरेय !

शाम यांची आख्खी गझल अफलातून

वेळ तुझी ठरलेली आहे अमकीतमकी
रोज सकाळी नवी वेदना देते धमकी.............आह !

ह्या जगण्याशी लढण्याचे भय कुणास आहे
माझ्यापेक्षा आहे माझी व्याधी खमकी...........स ला म !

=============================

आक्रंदुनी मी घेतली प्रतिभेत जास्तीची उचल
आता तुझ्यावाचूनही होते तुझ्यावरती गझल.........क्या बात !

आज इतकेच वाचणार उगाच आजिर्ण नको Happy

मनःपुर्वक धन्यवाद !

-सुप्रिया.

यंदाच्या जनगणनेमध्ये हे ही मोजून टाका की
किती अडाणी लोक शहाणे,शिकलेले बिनडोक किती

--ज्ञानेश

जबरी धागा तयार झालाय.....मज्जा येतेय Happy

एक नवा शेरः

वागवून दिवसाचे ओझे शिणून जातो
रात्रीच्या ओच्यात तोंड खुपसून रहावे

समीर चव्हाण

जगावेगळा मृत्यू दे
जगावेगळा जन्म नको >>>

फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते>>>>

मला भेटायला आले,मला भेटून जाताना
मला भेटायचे नाही,असे ठरवून गेलेले.>>>>

कागदाचे ढीग संपावे तरी उरते कधी
अन कधी आयुष्य हे ओळीत एका मावते>>>

हुंदका ऐकून माझा ते म्हणाले..
छान आहे, पण तरी ती बात नाही...>>>>

इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे>>>>

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कुणीतरी ह्या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे>>>>>

माझा नि वेदनेचा,झाला असा घरोबा
तीही मजेत आहे,मीही मजेत आहे>>>>>

अपराधांची शिक्षा हे पाहुन दे तू
कितीक घडले नकळत अन मुद्दाम किती ?>>>>>

क्या बात है । !!!!!!!!!!!!!

रोज एक एक शेर स्टेटस म्हणून ठेवासा वाटतोय.

वैभवजी......

खूप आवडला शेर...

>>

नको आज आणूस डोळ्यात पाणी
मला आजही पोहता येत नाही
जयदीप

मस्त धागा आहे.

भिडे काकांच्या सूचनेला अनुमोदन.

इतके शेर वाचून सुचलंय काही तरी-

अर्धवटाने अर्धवटाला दिला दुजोरा
आसपास मी असंख्य बघतो असे शहाणे |

भिडे काकांच्या सूचनेला अनुमोदन.

इतके शेर वाचून सुचलंय काही तरी-

अर्धवटाने अर्धवटाला दिला दुजोरा
आसपास मी असंख्य बघतो असे शहाणे | >>>>

चैतन्य, शेर मस्तच आहे.

माझ्या सूचनेला तू अनुमोदन देऊन हा शेर उद्धृत केलास .....
आपल्या दोघांना लागू होतो असं तर नाही ना !!! Wink Proud

असल्यास माझी काहीच हरकत नाही. Happy

माझ्या सूचनेला तू अनुमोदन देऊन हा शेर उद्धृत केलास .....
आपल्या दोघांना लागू होतो असं तर नाही ना !!! >>
नाही नाही....अरेच्या हे भलतेच पताकास्थान झाले Proud
अहो जे सुचले मला ते लगेचच लिहिले

फिरस्त्यास का असतो पत्ता
मद्यपीस का परका गुत्ता
हळ्वे आणि माणुसघाणे
यांनी वर्ज्य करावी सत्ता

रमा..

ह्या जगण्याशी लढण्याचे भय कुणास आहे
माझ्यापेक्षा आहे माझी व्याधी खमकी

अप्रतिम शेर झालाय, भूषण.
धन्यवाद.

Pages