आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा नि वेदनेचा,झाला असा घरोबा
तीही मजेत आहे,मीही मजेत आहे

--प्रमोद खराडे

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कोण इथे या तिन्हीसांजेला विस्कटलेले आहे

--चित्तरंजन भट

तैलथेंबासम आयुष्य, पाण्यावर तरंगत आहे,
होत नाही एकजीव, वेगळे होणे अशक्य आहे

कल्पना छान आहे.

भूषणः मतमतांतरे बद्दल सहमत आहे.

एक माझा शेरः

गप्पांगप्पांमधे तिचे भरले की डोळे
गप्पांगप्पांमधे किती मी वाहत गेलो

सुपाएवढे काळिज केले,जिला रहाण्यासाठी
मिटून घेतो डोळे हल्ली,तिला पहाण्यासाठी

--डॉ.कैलास गायकवाड

वेदनेचे माझिया मी फार करतो भांडवल
भेटल्यावर वेदना झटक्यामधे करतो गझल.

--डॉ.कैलास गायकवाड

पापण्यांची कड पुन्हा ओलावलेली
भान नाही आसवांना साठल्याचे

--डॉ .कैलास गायकवाड

==============================

पाहिले माझ्याकडे,हसली जणू
वादळाची लक्षणे दिसली जणू

-- डॉ .कैलास गायकवाड

========================
विचारवंत लोक बोलतील पण तुझा
जरा तरी विचारमग्न चेहरा हवा

--डॉ.कैलास गायकवाड

========================

हीच तर अवघ्या जगाची बोच आहे
तोच होतो आजही मी तोच आहे

खंत नाही मी अडाणी राहिल्याची
चेहरे वाचायला शिकलोच आहे

-- डॉ .कैलास गायकवाड

माझे दोन पैसे

कुवत केवढी आहे ! करतो काम किती ?
मिळवण्यास मी दमडी, गाळू घाम किती ?

अपराधांची शिक्षा हे पाहुन दे तू
कितीक घडले नकळत अन मुद्दाम किती ?

वैभव फाटक.

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कोण इथे या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे

(इतरांचे शेर कोट करताना अचूकतेचे भान असणे योग्य होईल, ज्यायोगे काही गैरसमज व्हायला नकोत)

शेर सुरेखच!
================

गप्पांगप्पांमधे तिचे भरले की डोळे
गप्पांगप्पांमधे किती मी वाहत गेलो<<< व्वा

पापण्यांची कड पुन्हा ओलावलेली
भान नाही आसवांना साठल्याचे <<< सुरेख शेर

अपराधांची शिक्षा हे पाहुन दे तू
कितीक घडले नकळत अन मुद्दाम किती ?<<< अगदी खरे!

तो शेर असा आहे

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कुणीतरी ह्या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे

या गझलेतील सर्वच शेर सुरेख आहेत , विशेष आवडलेले अजून दोन

इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे

कुठे न माझा मागमूस मी कसा पोचलो इथवर
मला कोणत्या जनावराने फरफटलेले आहे

चित्तरंजन भट

इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे<<< वा

व्वा ! या धाग्याची संकल्पना छान आहे.
एकाच धाग्यावर अनेक छान शेर वाचायला मिळाले.
विशेष उल्लेख आणि अनुल्लेख याबाबत समज/गैरसमज होऊ नयेत याकरता "अमुक अधिक आवडला/ले" असा प्रतिसाद मुद्दाम टाळतो आहे.

पोस्ट करण्याचा वेग आणि वाचकांच्या वाचनाचा वेग यात समन्वय साधता आल्यास हा धागा यशस्वी होईल.
या दृष्टिकोनातून एक सूचना/विनंती करू इच्छितो :
शेर पोस्ट करण्याच्या वेगावर नियंत्रण असावे.
त्यासाठी एकाने एका वेळी/एका दिवशी किती शेर पोस्ट करावेत यावर स्वत:च नियंत्रण घालणे आवश्यक वाटते.

गुंतत गेलो दोघे आपण, तुला न कळले मला न कळले
कसा उन्हाळा झाला श्रावण, तुला न कळले मला न कळले

प्रदीप निफाडकर.

पुन्हा ती नदीसारखी दूर गेली...
पुन्हा राहिलो मी किनारी वगैरे...

वैभव जोशी
(शेर लिहिण्यात चूक झाली असल्यास दर्शवावी...मला १००% खात्री नाही आहे की हा शेर असाच आहे)

आणखी एक विनंती :
प्रथितयश शायरांचे शेर देत असताना
प्रताधिकाराचा मुद्दा ध्यानात घेणे गरजेचे आहे का
याबाबत कृपया विचार केला जावा.

धन्यवाद पोरे साहेब माझा शेर शेअर केल्याबद्दल
तुमच्या लेखी असलेले ह्या शेराचे महत्त्व मी जाणून आहे
पण बेफीजी म्हणताय्त ते लक्षात घ्या की...>>>इतरांचे शेर कोट करताना अचूकतेचे भान असणे योग्य होईल, ज्यायोगे काही गैरसमज व्हायला नकोत<<<

आपण दिलेल्या माझ्या दोन ओळीत जरासाच फरक पडला

संद्याकाळी तुळशीपाशी आई पणती लावत असते
तशीच माझ्या दु:खांना माझ्या गझलांची सोबत असते

पुनश्च धन्स पोरे

>>
संद्याकाळी तुळशीपाशी आई पणती लावत असते
तशीच माझ्या दु:खांना माझ्या गझलांची सोबत असते
>>
मस्त शेर आहे...खूप आवडला.. सगळेच शेर सही आहेत या धाग्यावर!

असाच एक शेर आठवला

गावातिल सगळ्या शाळा आहेत मुलींच्या शाळा
हे सांगुन माझा मुलगा शाळेला जातच नाही

~वैवकु

कितीदा मनाला दटावून झाले
दिलासा दिला ते तरीही हसेना

तुझ्या हासण्याने कळाली खुशाली
असे हास्य खोटे मला का जमेना

देव सरांची ओळ थोडी बदलून घेतली होती. पण गझल पूर्ण करता आली नाही.

काळ नाही वेळ नाही वाट नुसती चालतो.
जिंदगी सरली तरी कबरीत स्वप्ने पाहतो.

( देव सरांची ओळ : काळ नाही वेळ नाही वाट नुसती पाहतो. )

Pages