'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

प्राचीन धार्मिक वाङ्मयातील उदाहरणं आधीच्या पोस्टींमध्ये उल्लेख आले म्हणून दिली आहेत. कृपया ती आधीच्या पोस्टींसंदर्भाने वाचावीत.

.ड्रग्स, समलैङ्गिकता आणि त्या अनुषंगाने येणार्या कितीतरी जीवघेण्या गोष्टी आपण कश्या निस्तरणार आहोत? >> तुम्ही दिलेले सर्व आजार इ इ लक्षात घेतले तरी एक गोष्ट लक्षात येते का बघा : समलिंगी काय भिन्नलिंगी काय माणसाला सगळ्यात जीव प्यारा. जर खरच असले तोटे होत असतील तर समलिंगी लोक आपणहून सगळ थांबवतील नाहीतर सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट प्रमाणे नाश पावतील. त्यात उगीच भिन्नलिंगी लोकांनी कशाला काही म्हणायचं? जे काही होणार आहे त्यात भिन्नलिंगी भरडले जाण्याची शक्यता फार कमी आहे. मग तोवर त्यांना समानता द्यायला काय हरकत आहे, उदो उदो केला तरी काय बिघडल?

सिमन्तिनी ,

>> जर खरच असले तोटे होत असतील तर समलिंगी लोक आपणहून सगळ थांबवतील नाहीतर
>> सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट प्रमाणे नाश पावतील.

आपला प्रतिसाद 'अत्यन्त असंवेदनाशील' या वर्गात मोडू शकतो. एकीकडे समरतींना समजून घ्यायच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे नाश पावू द्यायचं स्वातंत्र्य द्यायचं?

तुम्हाला माहीती आहे का समरतींच्या गोटात (पक्षी:आनंदीवनात) पौगंडी वयाच्या 'नव्या मालाची' भरती सतत चालू ठेवावी लागते ते? तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर नवयुवकांची आयुष्यं उद्ध्वस्त होतांना पाहायची आहेत का?

आ.न.,
-गा.पै.

आपला प्रतिसाद 'अत्यन्त असंवेदनाशील' या वर्गात मोडू शकतो. एकीकडे समरतींना समजून घ्यायच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे नाश पावू द्यायचं स्वातंत्र्य द्यायचं? >> उगीच माझ्या म्हणण्याचा विपर्यास करू नका. नाश करण्याचे (म्हणजे आत्महत्या नाही, गीता यांनी दिलेल्या यादीतील आजार स्वतःला जडवून घेण्याचे) स्वातंत्र्य जितके भिन्नलिंगी व्यक्तीला तितकेच समलिंगी व्यक्तीला. फुलण्याचे स्वातंत्र्य जितके समलिंगी व्यक्तीला तितकेच भिन्नलिंगी व्यक्तीला.

जगात फक्त शाकाहारी लोक ५% आहेत. त्यांना प्रथिने-आयर्न कमी पडते पण म्हणून कुणी त्यांना सांगत नाही कि शाकाहार हा गुन्हा आहे. जे काही होणार आहे, आजार मागे लागणार आहेत त्याची जबाबदारी त्यांची स्वतःची असते. जी गोष्ट शाकाहारीची तीच मांसाहारीची. जे काही होणार - स्थूलपणा, मधुमेह इ इ - आहे ती जबाबदारी त्यांनी त्यांची त्यांची घ्यायची आहे.

सिमन्तिनी,

१.
>> नाश करण्याचे (म्हणजे आत्महत्या नाही, गीता यांनी दिलेल्या यादीतील आजार स्वतःला जडवून घेण्याचे)
>> स्वातंत्र्य जितके भिन्नलिंगी व्यक्तीला तितकेच समलिंगी व्यक्तीला.

असहमत. समरतींना आजारी पाडवून घेण्याच्या जास्त सुविधा उपलब्ध होतात.

२.
>> फुलण्याचे स्वातंत्र्य जितके समलिंगी व्यक्तीला तितकेच भिन्नलिंगी व्यक्तीला.

समलिंगी व्यक्तींनी हवं तेव्हढं फुलावं. पण फुलण्याआधी कोमेजण्याची सांख्यिकीय शक्यता या आजारांपायी जास्त आहे.

आ.न.,
-गा.पै.

हे पण वाचा, खुद्द "मान्यताप्राप्त संशोधक" म्हणत आहेत की आपल्याकडे गणित, विज्ञान, इ. मधे खुप आधी पासुन संशोधन झालेले आहे. आणि अनेक भाषांमधे अनुवाद होऊन इतर देशांमधे पण ज्ञान गेले होते. याचप्रमाणे वैद्यकीय शाखेचे सुद्धा नक्कीच असणार. असो याचा खल अन्यत्र करूयात.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=y4R5Z

काही महत्वाचे मुद्दे,

१. समलैंगिता किंवा अन्य वेगळे सज्ञान लोकांमधे केले जाणारे, प्रचलित असणारे "वेगळे" प्रकार हे आधी होते, अजुनही आहेत आणि पुढेही असतील, कारण पिंडे पिंडे मतिर्भिन्नः ते तसे नसावेत असे कोणाचे (निदान माझे तरी) म्हणणे नाही.

२. असे प्रकार गुन्हा होऊ शकत नाहीत, अशा लोकांना समानतेने वागवले जावे, इ.बाबतीत देखील दुमत नाही. निदान मी तरी सहमत आहे, आणि आधी लिहिलेल्या कोणत्याही प्रतिसादात "गुन्हा" आहे असे मी लिहिल्याचे मला तरी आठवत नाही.

३. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर येथे जी चर्चा झाली त्यामधे प्रामुख्याने २ मुद्दे येतात. एक म्हणजे कायद्याच्या भाषेत हे प्रकार गुन्हा ठरतात आणि दोन कायदा काहीही असो, समाजात मोठ्या प्रमाणावर लोकांचे मत काय आहे. यापैकी पहिल्या मुद्द्याबाबत दुमत नसल्याने निदान हे प्रकार दोन सज्ञान व्यक्तींनी (दोनच ना ?) परस्पर संमतीने केल्यास गुन्हा ठरू नयेत. जर जबरदस्ती होत असेल तर कोणत्याही प्रकारात तो गुन्हाच असावा. हे साधे लॉजिक आहे.

४. वरील दुसर्‍या मुद्द्याबाबत असे आहे की फार मोठ्या प्रमाणावर समाजमन या असल्या गोष्टी मानायला तयार नाही. कारणे अनेक असतील, धार्मिकता,नैतिकता, वैद्यकीय, इ. इ. पण असंख्य लोकांना हे चुकीचे वाटते. आता त्यांना हे असे वाटूच नये हा हेका धरणे आणि त्याप्रमाणे बहुसंख्य लोकांची मानसिकता बदलवणे हे तसे जिकिरीचे आणि वेळखाऊ काम आहे, तसेच यामधे यश येण्याची शक्यता पण फार कमी आहे.

५. पुन्हा पुन्हा हेच सांगावेसे वाटत आहे की पुर्वी आपल्याकडे होते, सद्ध्या अनेक देशांमधे आहे म्हणुन आपल्याकडे पण लोकांनी या प्रकारांना सहज मान्यता द्यावी असे वाटत असेल तर तसे होणे नाही. त्यामुळे इतर अनेक गोष्टी जशा चोरी छुपे वेगळ्या लेबल्स खाली चालतात तसे हे पण चालेल. उदा. हुंडा - कायद्याने बंदी आहे तरी अनेक प्रकार देव घेव होतेच. तसेच हे पण होऊ शकते.

समलैंगिक आणि त्यांना पाठिंबा देणारे यांना नक्की काय अपेक्षित आहे ?
कायद्याने गुन्हेगार ठरवू नये असे असेल तर योग्य मागणी आहे,
सर्वसामान्य लोकांनी सहजा सहजी मान्यता देऊन नाके मुरडू नयेत असे असेल तर अवघड आहे.
मी केवळ नाके मुरडणे म्हणत आहे,
जर कोणी त्रास देत असेल (मारहाण, सामाजिक लाभांपासुन वंचित ठेवणे, इ.) तर ते नक्कीच चुकीचे आहे,
अशा स्थितीत जो कोणी त्रास देत असेल त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.

मी जरी विरोधी लिहित असलो तरी याचा अर्थ असा नाही की सर्व "वेगळ्या" लोकांना हाकून लावा असे मत आहे. तसे तर इतर वादाच्या विषयांवर पण अनेकवेळा "सामाजिक एकी" बद्दल लिहिलेले आहे.
माझ्या अनेक प्रतिसादांवर फार जहरी प्रतिसाद आलेले आहेत, त्यामुळे माझे वैयक्तिक मत सारांश स्वरूपात लिहिण्याचा हा प्रयत्न होता.

याउपर फार काही लिहिण्यासारखे आहे असे वाटत नाही. जर अगदीच तल्लफ आली लिहिण्याची तरच. Happy

महेश,

१. समलैंगिता किंवा अन्य वेगळे सज्ञान लोकांमधे केले जाणारे, प्रचलित असणारे "वेगळे" प्रकार हे आधी होते, अजुनही आहेत आणि पुढेही असतील, कारण पिंडे पिंडे मतिर्भिन्नः ते तसे नसावेत असे कोणाचे (निदान माझे तरी) म्हणणे नाही.>>>> बरोबर.

२. असे प्रकार गुन्हा होऊ शकत नाहीत, अशा लोकांना समानतेने वागवले जावे, इ.बाबतीत देखील दुमत नाही. निदान मी तरी सहमत आहे, आणि आधी लिहिलेल्या कोणत्याही प्रतिसादात "गुन्हा" आहे असे मी लिहिल्याचे मला तरी आठवत नाही. >>> बरोबर. तुमचं आत्ताचं मत हे असेल तर आधीच्या प्रतिसादात तुम्ही 'गुन्हा' म्हटलं आहे का हे पडताळून बघायची काहीच गरज नाही Happy

३. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर येथे जी चर्चा झाली त्यामधे प्रामुख्याने २ मुद्दे येतात. एक म्हणजे कायद्याच्या भाषेत हे प्रकार गुन्हा ठरतात आणि दोन कायदा काहीही असो, समाजात मोठ्या प्रमाणावर लोकांचे मत काय आहे. यापैकी पहिल्या मुद्द्याबाबत दुमत नसल्याने निदान हे प्रकार दोन सज्ञान व्यक्तींनी (दोनच ना ?) परस्पर संमतीने केल्यास गुन्हा ठरू नयेत. जर जबरदस्ती होत असेल तर कोणत्याही प्रकारात तो गुन्हाच असावा. हे साधे लॉजिक आहे.>>>> बरोबर

४. वरील दुसर्‍या मुद्द्याबाबत असे आहे की फार मोठ्या प्रमाणावर समाजमन या असल्या गोष्टी मानायला तयार नाही. कारणे अनेक असतील, धार्मिकता,नैतिकता, वैद्यकीय, इ. इ. पण असंख्य लोकांना हे चुकीचे वाटते. आता त्यांना हे असे वाटूच नये हा हेका धरणे आणि त्याप्रमाणे बहुसंख्य लोकांची मानसिकता बदलवणे हे तसे जिकिरीचे आणि वेळखाऊ काम आहे, तसेच यामधे यश येण्याची शक्यता पण फार कमी आहे. >>>> जगात अनेक गोष्टींबद्दल प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतच, गोष्टी मान्य अमान्य असू शकतातच. मानसिकता फक्त मानवतेच्या दृष्टीने बदलावी इतकीच अपेक्षा आहे इथल्या सगळ्यांची. मी देखिल ह्याच धाग्याच्या निमित्ताने ह्या गोष्टीचा विचार केला...चर्चेच्या निमित्ताने अजून खोलवर विचार केला. पण पहिल्याच फटक्यात 'मानवता' हीच गोष्ट माझ्याही नकळत माझ्यावर डॉमिनेट करते आहे हे माझ्या ताबडतोब लक्षात आले. आणि तिथे निदान माझ्यापुरतं तरी कसलंही कॉम्प्रमाईझ नाही त्यामुळे मी इथे कुठल्याही कन्फुजनशिवाय लिहू शकतेय.

५. पुन्हा पुन्हा हेच सांगावेसे वाटत आहे की पुर्वी आपल्याकडे होते, सद्ध्या अनेक देशांमधे आहे म्हणुन आपल्याकडे पण लोकांनी या प्रकारांना सहज मान्यता द्यावी असे वाटत असेल तर तसे होणे नाही. त्यामुळे इतर अनेक गोष्टी जशा चोरी छुपे वेगळ्या लेबल्स खाली चालतात तसे हे पण चालेल. उदा. हुंडा - कायद्याने बंदी आहे तरी अनेक प्रकार देव घेव होतेच. तसेच हे पण होऊ शकते.>>>> चोरी, हुंडा घेणे हा गुन्हा आहे. ही गोष्ट गुन्हा नाही. त्यामुळे गुन्हेगारांप्रमाणे त्यांना चोरी छुपे त्यांची आयडेंटिटी ठेवावी लागू नये.

सर्वसामान्य लोकांनी सहजा सहजी मान्यता देऊन नाके मुरडू नयेत असे असेल तर अवघड आहे.
मी केवळ नाके मुरडणे म्हणत आहे, जर कोणी त्रास देत असेल (मारहाण, सामाजिक लाभांपासुन वंचित ठेवणे, इ.) तर ते नक्कीच चुकीचे आहे, अशा स्थितीत जो कोणी त्रास देत असेल त्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. >>> बरोबर. नाक मुरडणे हे काही नविन नसते. प्रत्येक जण कश्या ना कश्याला तरी नाकं मुरडतच असतो.

नेहमीच्या जीवनातही दोन सर्व दृष्टीने सज्जन/ नॉर्मल माणसं असतील पण त्यांच्यातल्या एकाने दुसर्‍याबद्दल कुठल्यातरी क्षुल्लक गोष्टीवरुन गैरसमज करुन घेतला आणि तो तसाच ठेवायचा हेका धरला तर त्यापायी दुसर्‍याचं नाक कापायलाही पहिली व्यक्ती मागे पुढे पहात नाही. अश्या अनेक गोष्टी आपण सो कॉल्ड नॉर्मल माणसं डे टू डे लाईफमध्ये झेलत असतो, तर समलैंगिकांबद्दल (ते इतर बाबतीत मेजॉरिटीसारखे असले तरी) नाकं मुरडणं हे काहीच नाही. ऑलरेडी ते वाळीत टाकल्यासारखी वागणूक झेलतायत. त्यांना टोचायला कितीतरी गिधाडं टपलेलीच असतील.

मी जरी विरोधी लिहित असलो तरी याचा अर्थ असा नाही की सर्व "वेगळ्या" लोकांना हाकून लावा असे मत आहे. >>> एवढं मत असलं तरी पुरे आहे की! वर काही लोकांनी त्यांना गावकुसाबाहेर काढा टाईप पोस्ट्स टाकल्या आहेत. मग पुर्वीच्या अस्पृश्यांच्या गावाबाहेरच्या वस्त्या असलेला लांच्छनास्पद समाज आणि आताचा समाज ह्यात काय अंतर?

महेश, काही मुद्दे सोडता मी खरंच अ‍ॅप्रिशियेट करते तुमचा हा प्रतिसाद. धन्यवाद.

अश्विनी के,

>> वर काही लोकांनी त्यांना गावकुसाबाहेर काढा टाईप पोस्ट्स टाकल्या आहेत.

मला वाटतं असं कोणी सुचवलं नाहीये. मात्र गे लोकांची एक स्वतंत्र वस्ती (=आनंदीवन) आपोआप बनत जाते.

आ.न.,
-गा.पै.

गापै, येस मी आधी जे लिहिले होते त्याचा अर्थ असा नाही की वेगळ्या लोकांना मुद्दाम बाहेर काढा,
पण जर असे काही आपोआप झाले किंवा त्यांच्यासाठी कोणी केले तर त्याचा त्यांना फायदाच होईल ना,
पण अनेक गैरसमज करून घेतले गेले Sad

हो ना!

कुष्ठरोग्यांना कुणी स्वीकारलंच नाही की आपोआप जगण्यासाठी त्यांची एक वेगळी वस्ती बनते आणि आम्ही म्हणतो की त्याने त्यांचाच फायदा झाला. स्वतःची लाज वाटली पाहिजे आपल्याला आपल्या मनात असे विचार आले तर! खरंतर तेव्हा मनाचा कुष्ठरोग आम्हाला झालेला असतो. पांगळेपणा आपल्या मनाला आलेला असतो.

अस्पृष्यांना नाही का, तुमच्या आमच्यासारखेच हाडामांसाचे माणूस असूनही जनावरांपेक्षाही......(बोलवत नाहिये मला....) नाईलाजाने वेशीबाहेर वेगळा समुह करुन रहायला भाग पाडलं गेलं.... फायदा त्यांचाच झाला नाही का! वाह! त्यांना हौस होती मुख्य प्रवाहापासून वेगळं रहायची! त्यांना हौस होती वेगळं राहून फक्त मैला वाहण्यापुरतं गावात यायची, सटीसामाशी मेलेली ढोरं ओढून नेऊन त्यांच्या मांसावर अख्ख्या वस्तीची सामिष घासाची इच्छा पुर्ण करायची.

माहित नाही कुठे आणि कशी फेडणार आहोत ही पापं. जो पर्यंत 'आपण' आणि 'ते' अशी दूर लोटायची वृत्ती आपण मनात बाळगून आहोत तोपर्यंत 'आपण'ही कुणाचे होऊ शकत नाही खर्‍या अर्थाने. कुणाचे असूच तर तो दुवा फक्त स्वार्थाचा असेल. सगळी परमेश्वराचीच लेकरं आहेत असं मानत असाल तर 'ते'ही माझेच कुणीतरी लागतातच, असं का मनात येत नाही कुणाला दूर लोटताना? (इथे 'ते' म्हणजे असे कुणीही जे कुठल्या कारणाने 'आपल्या' पेक्षा इन्फिरिअर मानले जातात माणसाच्या हातात नसलेल्या कारणासाठी).

इति लेखन सीमा......

केश्वे किती तळमळीनं लिहित आहेस. शब्दनशब्द खरा आहे तुझ्या सगळ्या पोस्टीतला. पण पोहोचायचे तेथवर विचार पोहोचत नाहीयेत.

अरेरे माझा मुद्दाच कळत नाहीये तुम्हाला Sad
तुम्ही एवढ्या तळमळीने लिहिताय आणि मी किंवा कोणी लिहित नाहीये म्हणुन आमच्या मनात केवळ आणि केवळ भेद आहे दुही आहे असे होत नाही. आणि कशा कशाचा पार कुठच्या कुठे संबंध का जोडताय हेच कळत नाही.
हा आनंदवनाचा मुद्दा येथे सारखा आणू नका कोणीच कृपया. हवे तर वेगळ्या धाग्यावर चर्चा करूयात. प्लिज,

इतर धाग्यांच्या मानाने अतिशय संयतपणे चर्चा सुरू आहे हे पाहून बर वाटल .
हे वाचून स्वतःशी विचार केल्यावर Confusion झाल . मला तरी चिनूक्स आणी इब्लिस , साती दोघांचीही मत काही अंशी पटली .

१. समलिंगीना समलिंगी म्हणून वेगळी वागणूक नसावी .
२ आणी केवळ समलिंगी असणे हा गुन्हा नसावा
यावर वरच्या चर्चेत अनेकांच एकमत आहे अस दिसत .
वादाचा मुद्दा आहे तो या संबंधाना समाजमान्यता , कायदेशीर मान्यता (लग्न इ. बाबत ) असावी का नको हा .
आता यावर प्रत्येकाची आपापली मत असण स्वाभाविक आहे . वर वर पाहता ती असावी अस वाटण हेही स्वाभाविक आहे (जे चर्चा वाचण्याआधी माझही मत होत आणी केवळ एक मत म्हणून आत्ताही तसच आहे )

पण थोडा जास्त विचार केला तर जे लोक हे कायदे करतात त्याना अनेक गोष्टीचा , परिणामांचा विचार करावा लागत असणार अस वाटत . वर साती आणि गीता यानी सांगितलेल्या गोष्टींपैकी काही सत्य असल्या तरी त्याच्या परिणामाचा विचार करावा लागणारच ना ? (साती यांच्या मताला किंमत यासाठीही की त्याना Hands on Experience असल्याच दिसतय बाकी काही नाही , हा विषय पानिपतची लढाई असता तर इतिहासकाराच्या मताला जास्त किंमत असती , अन VLSI design असता तर माझ्या Happy )
त्यामुळे दुसरी बाजूही काही अंशी पटते .

तेव्हा आधी लिहिल्याप्रमाणे आपण स्वतः समलिंगी लोकांशी वागताना कसलाही किंतू न बाळगणे एवढ तरी सामान्य माणूस करू शकतो अस मला वाटत. बाकी ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर आहे .

समलैंगिकतेच्या सामाजिक प्रश्नावर या मिसळपाव वर झालेली चर्चा देखील वाचनीय आहे
कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे हा धनंजय यांचा लेख
'न येती उत्तरे' काही अनुभव हा नाट्य दिग्दर्शक व लेखक प्रमोद काळे यांचा लेख

छान

प्रकाश घाटपांडे,

धनंजय यांचा लेख वाचला नव्हता. त्याची लिंक दिल्याबद्दल आभार.
'न येती उत्तरे'मधला मंदार माझा मित्र आहे, त्यामुळे त्याच्याकडून या नाटकाची निर्मितीप्रक्रिया ऐकली होती.

घाटपांडे, लिंक्स दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

धनंजय यांचा लेख पूर्वी वाचला होता. आताही तितकाच आतपर्यंत पोचला. इतक्या सुस्पष्ट, नेटकेपणे, कुठलाही भावनातिरेक न करता, सहानुभूतीची अप्रत्यक्षही कुठे अपेक्षा आहे असे वाटू नये पण अतिशय प्रांजळपणे असं लिहिलेलं फार क्वचित वाचलंय. हॅट्स ऑफ टू हिम!

नाटकाविषयी माहित नव्हते. कधी योग आला तर जरूर बघेन.

अश्विनी, मामी, थोडं न राहवून लिहितो आहे.
तुम्ही जे सांगताहात ना, ते समजते अन त्यापलिकडे माझे अनुभव आहेत. पुन्हा ढोल पिटत नाही, पण तुमच्या कल्पनेच्या पलिकडले दु:ख मी पाहून चुकलो आहे. मुद्दा तो नाहिये.

पेडो, एकपत्निव्रती इ. उदाहरणे आल्यावर भल्या मोठ्या पोस्टी पडतात. कुष्ठ, अस्पृश्य इ. लिहिले की केश्विनीला मामी शाबसकी देते.

आता,द

कुष्ठरोगी असणे, हा आजार आहे. याला ट्रीटमेंट आहे. बोटे झडण्यापर्यंत वेळ येईतो तो आजार लपवून ठेवणे, हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे दिसायला विचित्र अशा शारीरिक बदला़ंना सामोरे जावे लागते. अन्यथा, 'दिसता चट्टा, डॉ.ना भेटा' स्टेजला व त्याच्याही कित्येक पुढे या आजाराला उपचार आहेत. --> याची तुलना समलैंगिकतेशी कशी??

अस्पृश्य, हरिजन इत्यादी असणे हे पूर्ण 'नॉर्मल' लोकांवर लादला गेलेला जातीसंस्थेचा अत्याचार आहे. हा समाजाच्या एका 'स्वत:स श्रेष्ठ समजणार्‍या' कंपूने इतरांवर केलेला अन्याय आहे, यासाठी कायदे आहेत.
-->याची तुलना समलैंगिकांशी कशी?

आता मला एक समवावून सांगा, डावखुर्‍या लोकांवर समाजाने कोणते असे असह्य अत्याचार केलेत? किंवा घारे डोळे असणार्‍यांवर?

एकीकडे म्हणायचे, की समलिंगी असणे हे डावरे असण्याइतकेच जेनेटिक आहे. अन वर लगेच कुष्ठरोगी वा गावकुसाबाहेर फेकलेल्या हरिजनांशी तुलना करायची, हे कोणत्या लॉजिकमधे बसते आहे?

याच वेळी मी जेव्हा पुरुष व स्त्री अशा दोन प्रकारच्या जन्मजात मानवी जातींबद्दल बोलतो, तेव्हा मला भारतीय डॉक्टर स्वयंभू आहेत की नाहीत, अमकी आजारांची यादी, तमक्या लिंका इत्यादी संशोधन करकरून शिकविल्या जाताहेत. किस खुशी मे भो???

वेड पांघरून पेडगावी जायचे तर जा बापडे. पण मला हे सांगाच, की जस्ट नॅचरल व्हेरिएशन. जस्ट अनदर वे ऑफ एन्जॉईंग सेक्सुअल प्लेझर. जस्ट अनदर लाईफस्टाईल (जणू नास्तिकतेचे पालन करणे) असे जर आहे, तर वेगळे 'रिझर्वेशन' कशाला हवे?

अन ते रिझर्वेशन हवेच, तर go and move your legislator. That is exactly what your Supreme Court is asking you to do. Gather that much number, Come out of closet, and do it. Who will resist you after that?

Happy

>>एकीकडे म्हणायचे, की समलिंगी असणे हे डावरे असण्याइतकेच जेनेटिक आहे. अन वर लगेच कुष्ठरोगी वा गावकुसाबाहेर फेकलेल्या हरिजनांशी तुलना करायची, हे कोणत्या लॉजिकमधे बसते आहे?<<
इब्लिस,तुलना सामाजिक अस्विकृतीशी असावी. डावखुर्‍या लोकांना सामाजिक अस्वीकृती नाहीये. तशी ती समलैंगिकतेबाबत मात्र आहे

<वेड पांघरून पेडगावी जायचे तर जा बापडे. पण मला हे सांगाच, की जस्ट नॅचरल व्हेरिएशन. जस्ट अनदर वे ऑफ एन्जॉईंग सेक्सुअल प्लेझर. जस्ट अनदर लाईफस्टाईल (जणू नास्तिकतेचे पालन करणे) असे जर आहे, तर वेगळे 'रिझर्वेशन' कशाला हवे? >

तुम्ही लेख वाचला नसावा. 'रिझर्वेशन' नव्हे, गुन्हा नसावा, ही मागणी आहे.

दुसरं असं की, स्कॅट, नेक्रोफिलीया, फिटीश हे तुमच्या पोस्टींमध्ये होतं. त्यामुळे त्याला दिलेलं ते उत्तर आहे. तेव्हा कृपया पोस्टी संदर्भासह वाचाव्यात, ही विनंती.

<याच वेळी मी जेव्हा पुरुष व स्त्री अशा दोन प्रकारच्या जन्मजात मानवी जातींबद्दल बोलतो, तेव्हा मला भारतीय डॉक्टर स्वयंभू आहेत की नाहीत, अमकी आजारांची यादी, तमक्या लिंका इत्यादी संशोधन करकरून शिकविल्या जाताहेत. किस खुशी मे भो???>

तुम्हांला उद्देशून ज्या पोस्टी आहेत, त्याच संदर्भात 'मला' हे सर्वनाम कृपया वापरा. तुमच्यासाठी खास मी इथे शिकवणीवर्ग उघडलेला नाही.

आणि सर्वांत महत्त्वाचं, निकोप चर्चा व्हावी यासाठी हा धागा आहे. तुम्हांला तशी करता येत नसेल, तर कृपया या धाग्याकडे दुर्लक्ष करा.

गुन्हा नसावा याबद्दल मीदेखिल सहमत आहेच.
हे तर पहिल्या पोस्टी पासून साम्गतोय. ती न वाचताच खाली लिंका तुम्हीच लिहिल्यात. Happy वाचणार नाही हे त्यामुळेच सांगितले होते, की तुम्ही मी काय म्हणतोय ते वाचले नाहीच्चेय.

मीही तुमच्याशी वैयक्तिक वाद घालतोय अशी समजूत करून घेऊ नका. कृपया. धन्यवाद.

दुसरे,
शिकवणी वर्गा बद्दल.
महोदय,
मला, साती, बेफिकिर यांना, हा धागा 'इग्नोर करा' 'इथे लिहू नका' इ. जे "संयत" भाषेत सांगितले गेले, त्याचा अर्थ, 'आम्हाला अपेक्षित अशा प्रकारचे मुद्दे नस्तील तर लिहू नका' असाच होतो, नाही का?
दोन दिवसांपासून हाच संयत रिस्पॉन्स वाचतोय मी. Happy

>>निकोप चर्चा व्हावी यासाठी हा धागा आहे. तुम्हांला तशी करता येत नसेल, तर कृपया या धाग्याकडे दुर्लक्ष करा.<<
निकोप चर्चा शब्दाची व्याख्या कृपया करा Happy आम्ही म्हणतो त्याने तुम्हास कोप येत असेल तर कृपया आम्हालाच कायमचे इग्नोर करून टाका की एकदाचे!

<याच वेळी मी जेव्हा पुरुष व स्त्री अशा दोन प्रकारच्या जन्मजात मानवी जातींबद्दल बोलतो, तेव्हा मला भारतीय डॉक्टर स्वयंभू आहेत की नाहीत, अमकी आजारांची यादी, तमक्या लिंका इत्यादी संशोधन करकरून शिकविल्या जाताहेत. किस खुशी मे भो???>

तुम्हांला उद्देशून ज्या पोस्टी आहेत, त्याच संदर्भात 'मला' हे सर्वनाम कृपया वापरा. तुमच्यासाठी खास मी इथे शिकवणीवर्ग उघडलेला नाही.

<<

मला हे सर्वनाम वापरूनच वरचे वाक्य आहे, हो की नाही???
कम ऑन मॅन!

**

(अधिक वाचनाअंती, 'स्वयंभू' पोस्ट मला पर्सनली उद्देशून नव्हती हे मान्य. त्याबद्दल दिलगिरी. पण आजार आहे/नाही बद्दल नव्हे. ते मलाच उद्देशून होते.)

***

आता कंटाळा आला इथे लिहिण्याचा. पुन्हा लिहिनच असे नाही.

<मला, साती, बेफिकिर यांना, हा धागा 'इग्नोर करा' 'इथे लिहू नका' इ. जे "संयत" भाषेत सांगितले गेले, त्याचा अर्थ, 'आम्हाला अपेक्षित अशा प्रकारचे मुद्दे नस्तील तर लिहू नका' असाच होतो, नाही का?>

हा धागा चर्चेसाठी सुरू केला आहे. तो माझ्या रंगीबेरंगी पानावर आहे. त्यामुळे 'धागा बंद करा', 'चर्चा करू नका' इत्यादी सल्ल्यांचा उपयोग नाही. तुम्हांला विरोधी मुद्दे मांडायचे असतील, जरूर मांडा. तसे ते अनेकांनी मांडले आहेत. त्यांना उत्तरंही दिली आहेत. मात्र जर या चर्चेचा त्रास होत असेल, उबग येत असेल, तर दुर्लक्ष करणंच उत्तम नाही का?

धाग्याशी अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!

पण मलाही हेच लिहायची आतून इच्छा होती, केवळ वादविवादास कारणीभूत ठरू नये म्हणून लिहीत नव्हतो.

'धाग्याकडे कृपया दुर्लक्ष करा किंवा ते करण्याचे स्वातंत्र्य आहे' हे प्रतिसाद फक्त या धाग्यातील मूळ विषयाला विरोध असणार्‍यांनाच का? येथे धाग्याच्या बाजूने बोलणर्‍या किमान पाचजणांची मी नांवे लिहू शकतो ज्यांनी वैयक्तीक रोख असलेले प्रतिसाद दिलेले आहेत. इतरांना उद्देशून काही टर्म्स वापरलेल्या आहेत.

कृपया सर्वांना एक न्याय असावा ही विनंती!

अवांतर समाप्त -

इब्लिसांच्या आजच्या पहिल्या पोस्टशी सहमत आहे.

<'धाग्याकडे कृपया दुर्लक्ष करा किंवा ते करण्याचे स्वातंत्र्य आहे' हे प्रतिसाद फक्त या धाग्यातील मूळ विषयाला विरोध असणार्‍यांनाच का?>

गैरसमज होतोय. 'चर्चा पुरे' असं म्हटल्यावर दिलेलं उत्तर आहे ते. यापूर्वीही तुम्ही 'हा धागा का काढला?' या अर्थाचं लिहिलं आहेच. Happy

गापै, महेश यांना 'दुर्लक्ष करा' असं सांगितलेलं नाही.

तुलना सामाजिक अस्विकृतीशी असावी. >>> exactly. धन्यवाद प्रकाश घाटपांडे.

इब्लिस, माझा ह्या समस्येशी काडीचाही संबंध नाही. पण आपण समाजाचा एक घटक म्हणून स्वतःपलिकडेही विचार करतोच ना? तसाच विचार मी करतेय. कुणी शाबासकी दिली किंवा कुणी निंदा केली तरी स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहता येतंच ना? मी अस्पृश्यता पाहिली नाही पण वाचनातून जी जाणवली ती देखिल दुखवून गेली. मी वर जी उदाहरणं दिली आहेत ती दोन्ही अस्विकृतीची आहेत आणि ती अस्विकृतीची वेदना त्यांच्यावर समाजाने लादून त्यांना वेगळं पाडलं होतं.

Pages