'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर
भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.
काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.
उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.
२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'
एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.
त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.
''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्या डावर्या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''
''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''
वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.
''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.
काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''
उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!
समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.
माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.
समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्चात्त्य आहे!
समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.
इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!
आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?
लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.
आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.
आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.
आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्चित होते.' जन्मतः निश्चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.
याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.
समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.
थोडेसे अवांतर, आचार्य
थोडेसे अवांतर,
आचार्य अत्र्यांमुळे यशवंतराव चव्हाण यांना च चे महत्व कळले त्याची आठवण झाली आणि हसू आले.
असे लेख सातत्याने समोर आणणे
असे लेख सातत्याने समोर आणणे ही 'समाजाची' गरज असूच शकत नाही, ती त्या घटकाची गरज असू शकते. >>>> हीच मानसिकता बदलण्याकरता तर अशा लेखांची गरज आहे.
>>> अल्पसंख्य असलेल्या, वंचित असलेल्या घटकांबद्दल जाणीव निर्माण होणं, ही समाजाचीच गरज आहे. तुम्ही एका सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या संपन्न घरात जन्म घेतला, तो केवळ एक अपघात. उद्या तुम्ही फासेपारधी असता, आणि पोलिसांनी तुम्हांला पकडून नेलं असतं, केवळ संशयावरून, तरी हीच भूमिका राहिली असती का?
समाजाचा एक मोठा वर्ग आज या ना त्या प्रकारे अन्यायग्रस्त आहे. त्यांच्यावर नक्की काय अन्याय होतो आहे, जाणता किंवा अजाणता, हे सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. >>>> चिनूक्स + १.
अर्थशास्त्रात ज्याप्रमाणे मायक्रो आणि मॅक्रो असे दोन भाग असतात तद्वत समाजाकडे बघण्याचे समाजातील लोकांचेही दोन दृष्टीकोन असतात असं लक्षात आलं आहे : मायक्रो आणि मॅक्रो.
मायक्रो द्रुष्टीकोनातून पाहिल्यास मी-माझे कुटुंब-माझे नातेवाईक-माझं सर्कल-माझे कम्फर्ट झोन या क्रमाने (आणि इतपतच) समाजाकडे बघितले जाते. केंद्रबिंदु स्वतःच असल्याने आतून बाहेर बघताना आपल्या समजूतीच्या/ अनुभवाच्या/परिस्थितीच्या ठराविक वर्तुळाबाहेरून येणारी लाट आपला कम्फर्ट झोन उध्वस्त करेल की काय याची धास्ती असते.
मॅक्रो दृष्टीकोनातून संपूर्ण समाजाकडे एकसंधपणे बघता येते. त्याकरता स्वतःच्या विचारसरणीत, आतापर्यंतच्या बाळगलेल्या संकल्पनांमध्ये बदल करण्याची इच्छाशक्ती असते. निदान प्रयत्न करून बघण्याची, नविन संकल्पना लगेच न नाकारता निदान त्यावर विचार करून त्या जोखण्याची मानसिक तयारी असते.
जसं जमिनीवरून बघितल्यावर आपल्या आजूबाजूचा परिसर फारतर दिसू शकतो पण तेच जरा उंचीवर गेलं की आपल्या परस्पेक्टीव मध्ये बराच फरक पडतो. विमानातून एकाचवेळी अनेक मोठा भूभाग नजरेस पडतो तेच रॉकेटमध्ये बसून अंतराळात गेलात तर सबंध पृथ्वी एकाचवेळी दिसू लागते तसं....
मानसिकता हा शब्द वापरला की
मानसिकता हा शब्द वापरला की कसे मस्त, पुरोगामी, प्रगल्भ वाटत असेल नाही?
महान संशोधक आहेत ते.<< दर
महान संशोधक आहेत ते.<< दर वेळेला दुसर्याच्या कार्यक्षेत्राब्द्दल, व्यवसायाबद्दल असे तुच्छतादर्शक उद्गार काढायलाच हवेत का?
चिन्मय दामले संशोधक असतील अथवा महान असतील; त्याचा इथे मांडलेल्या मुद्द्यांशी काय संबंध येतोय?
महान संशोधक आहेत ते<<<
महान संशोधक आहेत ते<<< इब्लिस, हा रोख नाही आवडला. तुमच्याकडे मुद्दे आहेत असे मला तरी नक्की वाटत आहे, पण मला वाटण्याचे काय विशेष? पण तुम्ही ते मुद्दे थेटपणे मांडू शकताच की? मी तर म्हणतो मांडावेतच! पण चिनूक्स ह्यांना उद्देशून असा उपरोधिक उल्लेख आणि कोणीतरी या धाग्यावरील विरोधकांना रिकामे दगड म्हणून संबोधणे ह्यात विशेष फरक नाही.
कुणी 'महान' आहे असे
कुणी 'महान' आहे असे म्हटल्याने तुच्छता कशी काय दिसली?
"तिकडचेच ज्ञान आम्ही डॉक्टर लोक इकडे विकतो" , हे महान संशोधन नव्हे काय?
तुच्छता दाखविण्याची सुरुवात कुणी केली तर जशास तसेच उत्तर मी देतो. याच धाग्यावर आधी माझी डॉक्टरकी काढणार्यांनाही उत्तर दिले, व अॅडमिन यांनी मला तंबी देखिल दिलेली आहे. पण 'ब्रिटन मधे अमुक डॉक्टरांवर बंदी' 'भारतीय डॉक्टर काय स्वयंभू आहेत का' इत्यादी डायलॉग कशाच्या बळावर मारले जात आहेत?
कालच्या चर्चेत ११ वी बायको करण्याच्या कायदेशीर तरतूदीबद्द्लचे संशोधन हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे, त्याला उत्तर अजूनही आलेले नाहीच.
'सगळ्यांनी आता समलिंगी व्हा,
'सगळ्यांनी आता समलिंगी व्हा, सर्व समलिंगी लोकांचा हार-तुरे देऊन सत्कार करा, समलिंगी असणे हेच ध्येय ठेवा, पोराबाळांना समलिंगी व्हायला शिकवा' वगैरे असे काहीच कोणीच म्हणत नाहीये, म्हणणार नाहीये. लोक फक्त 'समलिंगी लोकांकडेही एक माणूस म्हणून पहा, त्यांना गुन्हेगार असा शिक्का लावू नका' इतकेच काय ते म्हणत आहेत.
नक्की कसली भिती/शंका आहे ?
फक्त 'माझे' प्रतिसाद शोधलेत
फक्त 'माझे' प्रतिसाद शोधलेत तर किमान चार ठिकाणी मी म्हणालेलो आहे की व्यक्तीशः मी अश्यांना वेगळे समजणारच नाही, समानच मानेन (किंबहुना, मी त्यांना समान मानेन ह्यात मला काही फार अभिमानास्पद वाटण्याचेही कारण नाही कारण मी किंवा ते ह्यात श्रेष्ठ कनिष्ठ असे काही नाहीच). >>>
म्हणजे आपल्यासारख्या ( ह्यात माझ्यासकट सगळे आले
) काही टक्के 'सुजाण' लोकांच्या उदार दृष्टिकोनावर समाधान मानून त्यांनी राहावं. आपण कोण ही कृपादृष्टी दाखवणारे ? एखाद्या व्यक्तीने दुसर्या व्यक्तीला मनाप्रमाणे वागायची मुभा देणे ह्याला समानता म्हणता येत नाही. समाजव्यवस्थेने समाजातील सगळ्याच घटकांना अमूक एक आचरण करण्याचे स्वातंत्र्य बहाल करणे ह्याला समानता म्हणता येईल.
* ह्या समानतेत अर्थातच दोन कायदेशीर सज्ञान व्यक्तींनी परस्पर संमतीने संबंध ठेवणे गृहित धरलेले आहे. तसे नसेल तर तो गुन्हा. त्यात समलिंगी/ भिन्नलिंगी असा भेदभाव नाही
Iblis, Jagatala kuthlach
Iblis,
Jagatala kuthlach doctor ani sanshodhak ha swayambhu nasato. Ya mazya matawar mee Thaam aahe.
The move to ban doctors advising therapy to cure homosexuality was conceived a couple of years back and you can get multiple references for those online. The move gained momentum after several doctors from NHS were found adhering to such practices.
As far as multiple marriages
As far as multiple marriages with consent of wives is concerned, i am sure everybody knows of such examples. I would provide adequate references once i am online. In the meantime i would really like you to give me references which state that homosexuality is a disease.
सजीव व निर्जीवांत फरक
सजीव व निर्जीवांत फरक सांगताना 'स्वतःची प्रत काढणे' उर्फ पुनरुत्पादन क्षमता, हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला जातो.
आजतागायत तरी, स्वतःची प्रत काढण्यासाठी लैंगिक पुनरुत्पादन (सेक्सुअल रिप्रॉडक्शन) हा मार्ग मनुष्यप्राण्यांत वापरला जातो. याच अनुषंगाने मानवात स्त्री व पुरुष अशा दोन लिंगांची / लिंगधारी शरीरांची निर्मीती झालेली आहे.
प्रजोत्पादन करण्याची उर्मी सजीवांत यावी, या दृष्टीने प्रणयक्रीडेशी 'आनंद' जोडला गेलेला आहे, असे मानतात. सेक्सुअल प्लेझर हे 'सटायटी' अथवा पोट भरल्याचा आनंद, यापेक्षाही थोड्या जास्त तीव्रतेचे आहे.
हा आनंद कसा मिळेल याचे समलिंगी संभोगक्रीडेव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत. नुसत्या कल्पनेने, स्वयंउद्दीपनाने, कथा, चित्र, चित्रपट, ध्वनी, गंधी इ.च्या माध्यमातून(ही) 'सेक्सुअल प्लेझर' मिळते. /मिळू शकते.
हे प्लेझर कुणी कसे किती मिळवावे ही ज्याचीत्याची वैयक्तिक बाब असते. ती तशी असावी, कायद्याने त्याला सांगितलेली शिक्षा अवास्तव आहे, हे माझे मत मी प्रथम पोस्टमधेच सांगितलेली आहे.
त्याच बरोबर, दोन भिन्न लिंगधारी शरीरे ज्या प्राण्यांत असतात, त्यांतील 'सामान्य' 'फलदायी' व 'अपेक्षित' अशी प्रणयक्रीडा ही भिन्नलिंगीच असते, हे देखिल म्हणतो आहे.
तरीही, जणू असे म्हणणे म्हणजे, समलिंगी व्यक्तींना मी अंधारकोठडीत टाकून केशवपन करायला भाग पाडतो आहे, या स्टायलीत संयत विरोध सुरू आहे.
समलिंगी असल्यामुळेच अमुक विद्वान किंवा तमुक लेखक किवा फलाण्या शास्त्रज्ञास शोध लावता आले अशाप्रकारची वाक्ये लिहिली जात आहेत.
बेफी यांनी म्हटल्या प्रमाणे केवळ चर्चा करता येते म्हणून पोकळ मुद्दा दामटवणे सुरु आहे, असे मला वाटले म्हणून पुरे करा ही पोस्ट लिहिली.
अमुक शास्त्रज्ञाच्या शोधामुळे जगाला अपरिमित फायदा झाला.
तो शास्त्रज्ञ समलिंगी होता.
समलिंगी असण्याने जगाचा अपरिमित फायदा होतो.
अशा प्रकारची स्टेटमेंट्स व आर्ग्युमेंट्स दिसायला लागल्याने, केवळ होमोफोबिया दूर करणे हा हेतू आहे, की दुसरेच काही, अशी शंका आली. कारण वरील आर्ग्यूमेंट काय आहे ते लक्षात आले नसेल तर :
Nobody is perfect
I am nobody
therefore, I am perfect.
हे लॉजिक लावलेले आहे. विधाने करताना व्यत्यास सिद्ध होत नसला तरी सुचवला जातोय.
जसे: 'विरोध नोंदविणारे भारतीय डॉक्टर्स स्वयंभू नाहीत' म्हणजे, 'विरोध न करणारे पाश्चात्य डॉक्टर्स स्वयंभू आहेत' असे असते काय?
समलैंगिकता हा आजार आहे, असे
समलैंगिकता हा आजार आहे, असे मी कुठे म्हटले आहे हे मला कुणी दाखवेल काय?
समलिंगी असल्यामुळेच अमुक
समलिंगी असल्यामुळेच अमुक विद्वान किंवा तमुक लेखक किवा फलाण्या शास्त्रज्ञास शोध लावता आले >>>> असं कुठे म्हणलेलं दिसलं ?
इब्लिस, समलिंगींमुळे समाजाचा
इब्लिस, समलिंगींमुळे समाजाचा काय फायदा असा प्रश्न विचारला गेलेला दिसला नाही का?
तुम्ही दिलेली विधाने जरा वेगळी वाचूया. मी आधीही लिहिली आहेत. समलिंगी व्यक्तींना नाकारल्याने समाजाचे नुकसान होते असा अर्थ त्यातून निघतो.
<त्याच बरोबर, दोन भिन्न लिंगधारी शरीरे ज्या प्राण्यांत असतात, त्यांतील 'सामान्य' 'फलदायी' व 'अपेक्षित' अशी प्रणयक्रीडा ही भिन्नलिंगीच असते, हे देखिल म्हणतो आहे.>
फलदायी नाही अश्या प्रणयक्रीडेचा आनंद लुटण्यात समाज माणवजात फार पुढे निघून आली आहे असे नाही का वाटत? ज्या मानसिकतेने समलिंगी संबंधांना अनैसर्गिक आणि म्हणून गुन्हा ठरवले त्याच मानसिकतेतून बलात्कारित स्त्रीला गर्भ राहिला म्हणजे तिने बलात्कार एन्जॉय केला असला पाहिजे अशी मुक्ताफळे पुढे निघतात.
<<तरीही, जणू असे म्हणणे म्हणजे, समलिंगी व्यक्तींना मी अंधारकोठडीत टाकून केशवपन करायला भाग पाडतो आहे, या स्टायलीत संयत विरोध सुरू आहे.>> : प्रत्येक विधान तुम्हाला वैयक्तिक रीत्या उद्देशून केले आहे असे घेण्याचे कारण नाही. इथे एकास एक चर्चा चाललेली नाही. समलिंगींनी समाजात वावरताना आपले समलिंगीपण दडवून ठेवावे असा एक विचारप्रवाह दिसतो. तुम्ही तसे म्हणत नसालही.
१. भारतीय डॉक्टर, शास्त्रज्ञ
१. भारतीय डॉक्टर, शास्त्रज्ञ स्वयंभू नाहीत. तिकडचंच ज्ञान आपण इकडे वापरतो. ...>>>>>
ज्ञान देशांच्या सीमा पाळत नाही. जगभरात सगळं सारखंच<<<<<<
२. http://www.freerepublic.com/focus/fr/1034938/posts
कृपयाच हे वाचाच !!
समलैंगिकतेमुळे समाजाला होणरे संभव्य धोके :
(वरिल लिंक मधीलच आहेत, कुणाला लिंक वाचायला वेळ, ईच्छा, असेल नसेल म्हणुन परत कोपी-पेस्ट करत आहे...)
१.The rate of new HIV infections among men who have sex with men is nine times higher than among women and heterosexual men...
२.The risk of contracting AIDS from a single act of unprotected heterosexual intercourse is 1 in 715,000. The risk of contracting AIDS from a single act of unprotected homosexual intercourse is 1 in 165.
३.The bacteria contacted during anal intercourse include Shigella, Entamoeba, Giardia (causes chronic diarrhea), and the bacteria that cause hepatitis A (severe liver damage which can kill), and hepatitis B. Of course, the mostly deadly of all, HIV, is more easily transmitted through anal sex.
४.A study revealed a dramatic increase in anal cancer among homosexual men. This increase is traced to the Human Papillomavirus (HPV), a sexually-transmitted virus that causes cervical cancer in women and is found in almost all HIV-positive homosexual men.
५.Homosexuality correlates with higher alcohol use, frequency of intoxication, marijuana use, cocaine use, and other drug problems. There is a higher incidence for males than females
६.Unstable Relationships
७.मल्टिपल पार्टनर्स..
८. Gay Bowel Syndrome (GBS):[32] The Journal of the American Medical Association refers to GBS problems such as proctitis, proctocolitis, and enteritis as "sexually transmitted gastrointestinal syndromes."[33] Many of the bacterial and protozoa pathogens that cause gbs are found in feces and transmitted to the digestive system: According to the pro-homosexual text Anal Pleasure and Health, "[s]exual activities provide many opportunities for tiny amounts of contaminated feces to find their way into the mouth of a sexual partner . . . The most direct rou te is oral-anal contact."[34]
Proctitis and Proctocolitis are inflammations of the rectum and colon that cause pain, bloody rectal discharge and rectal spasms. Proctitis is associated with STDs such as gonorrhea, chlamydia, herpes, and syphilis that are widespread among homosexuals.[35] The Sexually Transmitted Disease Information Center of the Journal of the American Medical Association reports that "[p]roctitis occurs predominantly among persons who participate in anal intercourse."
Enteritis is inflammation of the small intestine. According to the Sexually Transmitted Disease Information Center of the Journal of the American Medical Association, "enteritis occurs among those whose sexual practices include oral-fecal contact."[36] Enteritis can cause abdominal pain, severe cramping, intense diarrhea, fever, malabsorption of nutrients, weight loss.[37] According to a report in The Health Implications of Homosexuality by the Medical Institute for Sexual Health, some pathogens associated with enteritis and proctocolitis [see below] "appear only to be sexually transmitted among men who have sex with men." >>>> http://www.frc.org/get.cfm?i=Is01B1
अजून काही संभाव्य धोके, याहून भयावह धोके असू शकतील का? असावेत का?
(होमोसेक्ष्युआलिटी मुळे होणारे होर्मोनल बदल याबद्दल काही अभ्यास झाला आहे का? कराल का एखादा कोहोर्ट स्टडी?)
फक्त आपल्याला हवय म्हणुन एखादी गोष्ट करणं.. आणि ती योग्य आहे का नाही हे बघुन करणं यात फरक आहे का नाही?
कायदेशीर मान्यता मिळवुन जर वरील परिणाम होणार असतील तर काय?
लक्शात घ्या, माणुस म्हणुन समजुन घेणे, कुणीही नाकरत नाहिये.. पण त्याचा नको इतका उदो-उदो करणे हे हितावह नाही..
या आधीच्या माझ्या प्रतिसादात मी म्हणलं होतं , तेच परत म्हणावसं वाटतय:
मास mentality ही नवीन फॅड आलं की त्यामागे धावणारी आहे.. समाजात कितीतरी असे लोकं आहेत की जे सहज भुलवले जातात..ड्रग्स, समलैङ्गिकता आणि त्या अनुषंगाने येणार्या कितीतरी जीवघेण्या गोष्टी आपण कश्या निस्तरणार आहोत?
ज्या मानसिकतेने समलिंगी
ज्या मानसिकतेने समलिंगी संबंधांना अनैसर्गिक आणि म्हणून गुन्हा ठरवले त्याच मानसिकतेतून बलात्कारित स्त्रीला गर्भ राहिला म्हणजे तिने बलात्कार एन्जॉय केला असला पाहिजे अशी मुक्ताफळे पुढे निघतात. <<<
असहमत! 'त्याच मानसिकतेतून' हा शब्दप्रयोग पटलेला नाही. दोन्ही मानसिकता भिन्न आहेत, असणार!
म्हणूनच म्हणतो, अॅपल्स विथ......
दोन समलिंगी जीव असू शकतात हे मान्य आहे, फक्त त्यांचे 'तसे' असणे अनैसर्गीक वाटणे नैसर्गीक आहे इतके मान्य व्हावे हा आग्रह आहे.
< Welcome to Free
< Welcome to Free Republic!
Free Republic is the premier online gathering place for independent, grass-roots conservatism on the web. We're working to roll back decades of governmental largesse, to root out political fraud and corruption, and to champion causes which further conservatism in America. And we always have fun doing it. Hoo-yah! >
अॅलन ट्युरिंग समलैंगिक होता,
अॅलन ट्युरिंग समलैंगिक होता, आणि त्याला आता माफी देण्यात आली, म्हणुन(च) आपणही लगेच असं काही करावं, हे पटलं नाही. समलैंगिकांना समानतेने वागवणे इतपत ठीक, पण त्यांनी केलं म्हणुन आपणही केलच पाहिजे, यात अनेक मुद्दे अजुन आपण केले नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. उदा. समान नागरी कायदा.
अॅलन ट्युरिंगचे उदाहरण
अॅलन ट्युरिंगचे उदाहरण कशासाठी दिले? समलिंगींचे समाजासाठी योगदान काय? त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का लागल्याने समाजाचेच नुकसान कसे होते हे सांगण्यासाठी.
आपणही लगेच असं करावं ? त्यांनी केलं म्हणून आपण करावे असे नाही : काय करावं (रादर करू नये) ते कळले नाही.
समानतेने वागवणे इतपत ठीक : आणखी काहीच नकोय.
लेख आवडला. त्याखालचे शेकडो
लेख आवडला. त्याखालचे शेकडो प्रतिसादही सलग वाचले. त्यातल्या टोकाच्या प्रतिसादांवरून आणि त्यापेक्षाही, आपलं मतपरिवर्तन झाल्याचं मान्य करणार्या काही प्रतिसादांवरून अशा स्वरूपाच्या चर्चा होत राहणं, आवश्यक वाटतं.
एका प्रतिसादात कुणीतरी (बहुधा हर्पेन यांनी) ३७७ कलमाच्या गैरवापराबद्दल विचारलं आहे. 'माटुंगा रॅकेट' नावाने रचले गेलेले सापळे हे त्याचं उदाहरण म्हणता येईल.
थोडे अवांतर -
तुला पुराणातील संदर्भ हवे असतील, तर तेही देऊ शकतो. भागवतपुराणात शिव आणि विष्णू एकरूप कसे, ते आलं आहे. स्कंदपुराणात सुमेध आणि सोमवान आहेत.कथासरित्सागरात कलिंगसेन आहे. अय्यप्पा कोण होता? बौद्ध वाङ्मयात मित्राबरोबर जंगलात राहणारा सुदन्त आहे. ठरलेलं लग्न होऊ नये म्हणून स्वतःचे केस कापून टाकणारी, मैत्रिणीबरोबर पळून जाणारी सुमेधा आहे. सलग दोन जन्म एकमेकांचे मित्र म्हणून जन्माला येणारे सारिपुत्त आणि मोग्गल्लण आहेत.
राजतरंगिणीत आपल्या सेवकांबरोबर गुदसंभोग करणारा राजा आहे. 'शीलपडिक्कम्' या काव्यात राजाला नजराणा म्हणून मिळणार्या कंजुक म्हणजे पुरुष वेश्यांचा उल्लेख आहे. वात्स्यायन, माधवाचार्य यांनी केलेली समलिंगी संभोगाची वर्णनं तर वेगळीच. एकुणात प्राचीन वाङ्मयात जी जेंडर फ्लुइडिटी आढळते, ती अवाक करणारी आहे.
-- चिनूक्स, शक्य झालं तर या पौराणिक संदर्भांबद्दल एखादा लेख वाचायला आवडेल. "हे पाश्चात्य फॅड आहे, आपल्याकडे हे प्रकार नव्हते." असं बर्याचदा कानी पडतं. त्यांचा प्रतिवाद करायला अतिशय उपयुक्त ठरेल हा लेख.
आणि जगातला कुठलाच डॉक्टर,
आणि जगातला कुठलाच डॉक्टर, कुठलाच शास्त्रज्ञ स्वयंभू नसतो.>>अगदी बरोबर !
माझ्या वैद्यकीय व्यवसायामध्ये एकही स्वयंभू व्यक्तीची मलाही माहिती नाही. हिप्पोक्रतिस, चरक, सुश्रुत, जगदीशचंद्र बसू, सी. व्ही. रमणन, हरगोबिंद खुराणा, to name a few , हेदेखील स्वयंभू नव्हते, तुमच्या माझ्यासारखेच सामान्य माणसे पण असामान्य कर्तुत्व असणारे होते. कृपया आपल्या व्यवसायातील एखाद्या 'स्वयंभू' व्यक्तीचे, भारतीय किंवा परदेशीय, नाव सांगाल काय ? नाही न? कृपया भविष्यकाळात काळजी घ्या, शब्द हे शस्त्र आहे. वादविवाद जरूर करा पण इतरांना दुखवू नका. सब घोडे बारा टक्के नसतात. आणि हो, आपली प्रतिक्रिया अपेक्षित नाही. धन्यवाद !
Sureshshinde, Thanks for
Sureshshinde,
Thanks for reiterating my point.
चिनुक्स, हा लेख इथे शेयर
चिनुक्स, हा लेख इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद.
दाद, +१००!
माझ्या अतिशय जवळच्या ओळखीत एक गे कपल आहे. दोघेही भारतीय वंशाचे (एक भारतीय आणि पार्टनर श्रीलंकन पण इथे मोठा झालेला) आहेत. मागच्या वर्षी त्यांना सरोगसीच्या माध्यमातून २ बाळं झाली आहेत - एक मुलगा आणि एक मुलगी! त्यांच्याकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांचे बाळांची काळजी घेणे कोणत्याही इतर कपलपेक्षा वेगळी आहे हे जाणवले नाही. किंबहुना, काकणभर सरसच वाटले . घर एकदम व्यवस्थित, बाळांच्या खोल्या, वॉर्डरोब, स्वच्छता (दुधाच्या बाटल्या उकळणे इत्यादी) अगदी नीटनेटके. सुरुवातीला ती व्यक्ति गे आहे हे जेव्हा समजले तेव्हा थोडे आश्चर्य आणि धक्का बसला होता कारण हा विषय फारसा चर्चिला गेला नव्हता. काही लोकांचा असा प्रेफरन्स असतो एव्हढेच ऐकुन ठावूक होते.
वरील उदाहरण द्यायचे प्रयोजन एव्हढेच की वर कोणीतरी म्हटलय की समलिंगी लोक समाजाला काय देणार? यांच्यामुळे महागाई वाढणार कारण यांना मुलं होणार नाहीत म्हणजे पैसा कसाही वापरणार वगैरे तर त्यात काही तथ्य नाही. वरील उदाहरणातील गे कपल प्रमाणे अनेक जबाबदार नागरिक असतात. ते व्यवस्थित जॉब करतात, टॅक्स भरतात आणि मुलांचे संगोपनही करतात! भिन्नलिंगी लोकांसारखेच! अजून काय करायला हवे त्यांनी समाजासाठी?
अजून काय करायला हवे त्यांनी
अजून काय करायला हवे त्यांनी समाजासाठी?<<<
त्यांनी काहीच करायला नको आहे. त्यांच्यासाठी भिन्नलिंगींनी भिन्नलिंगींशी जिवाची बाजी लागल्यासारखे वाद घालू नयेत अशी अपेक्षा आहे.
बेफिकीर, अगोदर अनेकदा
बेफिकीर,
अगोदर अनेकदा लिहिल्याप्रमाणे तुम्हांला या धाग्याकडे दुर्लक्ष करण्याचं स्वातंत्र्य आहे.
होय, मीही अनेकांप्रमाणेच एक
होय, मीही अनेकांप्रमाणेच एक प्रतिसाददाता असल्याने मलाही ते स्वातंत्र्य आहे हे एक बरे आहे.
धन्यवाद. चर्चा व्हावी यासाठीच
धन्यवाद.
चर्चा व्हावी यासाठीच हा धागा उघडला आहे. त्यामुळे चर्चा नको असेल, तर कृपया दुर्लक्ष करा.
<न दिलेला प्रतिसाद>
<न दिलेला प्रतिसाद>
>>-- चिनूक्स, शक्य झालं तर या
>>-- चिनूक्स, शक्य झालं तर या पौराणिक संदर्भांबद्दल एखादा लेख वाचायला आवडेल. "हे पाश्चात्य फॅड आहे, आपल्याकडे हे प्रकार नव्हते." असं बर्याचदा कानी पडतं. त्यांचा प्रतिवाद करायला अतिशय उपयुक्त ठरेल हा लेख.
एरवी रामजन्मभूमी, सोमनाथ, हिंदू-मुस्लीम धागे, शिवाजी महाराज, पुराणकाळात विमान होते की नव्हते इत्यादी विषयांत वाद सुरू झाला की विमान वगैरे कसे थोतांड, हिंदुत्ववादी वगैरे कसे सगळे मूर्ख, पुराण-वेद-गीता-रामायण-महाभारत वगैरें मधले उल्लेख कसे भोंदू अशा प्रकारचे प्रतिसाद असतात अनेक धाग्यांवर
आणि येथे वेद, पुराणातले दाखले ??
जे दाखले दिले आहेत, ते प्रसिद्ध पुरुष/स्त्री झाले का? जे जे नॉर्मल आणि चांगले आहे तेच सर्वमान्य झाले ना ?
कोणी स्वयंभू नसतात या मुद्द्याबाबत जे लिहिले आहे ते पण पुर्णपणे नाही पटले.
जेव्हा इतर देशांमधे वैद्यकीय बाबींमधे काही माहित पण नव्हते त्या आधीपासुन आपल्याकडे आयुर्वेद आहे.
या अशा बाबतीत पुराणे, वेद, इ. मधे काय आहे हे पण कळू शकेल काय ?
अर्थात या धाग्यावर नकाच लिहू, कारण विषय भरकटला जाईल.
अजुन काही लिहायचे आहे, पण जरा वेळ लागेल.
सर्वांच्याच अतिरेकी धैर्याला सलाम !
एकुणात प्राचीन वाङ्मयात जी
एकुणात प्राचीन वाङ्मयात जी जेंडर फ्लुइडिटी आढळते, ती अवाक करणारी आहे.>> मुद्दा आपल्याकडे होत का नव्हत हा नाहीये. भारतात लैंगिक जीवनात प्रतिष्ठीत काय आहे हे विविध ग्रंथात सांगितले गेले आहे. पत्नीबरोबर हि सम्बन्ध अपत्यजनन ह्याच उद्देशाने करावा असे "आदर्श" घातले गेले आहेत. हे असले आदर्श आणि जुन्या प्रतिष्ठेच्या कल्पना काय आजही धरून बसायच्या का हा मुद्दा आहे.
Pages