..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव, बरोबर

७/१८५:

त्या आदिवासी टोळीत नाग, सर्प हे सर्व पूजनीय होते. अगदी सापाची कात, सापळा, मृत साप, नाग इ. ची विधीवत पूजा करून त्यांना नदीत सोडलं जाई. हे काम टोळीची पुजारीण करत असे. पुजारीण आता खूप म्हातारी होत चालली होती. हे सर्व विधी आता आपल्या मुलाला शिकवून या कामातून रिटायर होण्याचं तिनं ठरवलं आणि तसं आपल्या मुलाला सांगितलं. मुलगाही तयार झाला.

एके दिवशी मुलगा कामासाठी जवळच्या शहरात गेला होता. जाताना त्यानं आईला सांगितलं की जर गरज लागली तर मी येईन चटकन. तू जस्ट मला मोबाईलवर फोन कर. नेमकं तसंच झालं. त्या दिवशी एका आदिवासीला जंगलात एक सापाची कात मिळाली. त्याने ते पुजारणीच्या कानी घातलं. तिनं विधीसाठी मुलाला बोलवण्यासाठी त्याला फोन लावला आणि एक गाणं म्हटलं........

उत्तर (मानव)

ये मुला, कात एक (एक कात) 'बहाना' (नदीत सोडणे) है

७/१८३

बरोबर उत्तर, श्रद्धा.
'पू'रब से सूर'य' उगा

अँड्रॉइड मधेही 'ऽ' आहे. ‌‍ ¤ॐ卐☪✝या चिन्हांच्या वरती. >> ही चिन्हे कुठल्या कीबोर्डवर आहेत? गुगल इंडिक मध्ये दिसली नाहीत.

७/१८६
रिया तिच्या वाढदिवशी शाळेतील गरीब मुलींना कपडे वाटण्याचे ठरवते. दर वर्षी एकेका वर्गातील काही गरीब मुलींना द्यावे असे ती ठरवते आणि आदल्या दिवशी एक वर्ग निवडून त्याच्या वर्ग शिक्षकांना सांगते उद्या मी येईन, कोणकोणत्या मुलीला कपडे द्यायचे ते तुम्ही मला तेव्हा सांगा. वर्ग शिक्षक तिला एक वेळ देतात.
ठरल्या वेळी रिया त्या वर्गा समोर जाते. वर्ग शिक्षक तिला म्हणतात थोडावेळ थांब, मी तुला बोलावेन. रिया दारा बाहेर थांबते.
सुरू असलेले पाठांतर संपताच वर्ग शिक्षक तिला हाक मारून कपडे कुणा कुणाला द्यायचे ते गाण्यातून सांगू लागतात.

७/१८६
कमरिया हिला दे हिला दे
????

बिंगो झिलमील, सहीच.

उत्तर: कमरिया (Come रिया), हीला दे, हीला दे, हीला दे, हीला दे.

एक सोपं

७/१८७

फार फार वर्षांपूर्वी जेव्हा मनुष्य, पर्‍या, राक्षस, भूतं सर्व एकत्र एकमेकांना धरून रहात होते, तेव्हा एका गावालगतच्या एका जंगलात पाच टुथफेअरी रहात होत्या - तन, मन, धन, नन आणि बन. गावातील लहान मुलांचा दात पडला की या पाचपैकी कोणीतरी एक त्या रात्री तो दात न्यायला घरी येत असे. मग घरातल्यांशी गप्पा, चहा पाणी करून, बाळाच्या उशीखाली दाताच्याजागी एखादी गिफ्ट ठेऊन जात.

एकदा एका घरातल्या बाळाचा दात पडतो. दुसर्‍या दिवशी तिची आई आपल्या मैत्रीणींना तिच्या घरी आलेल्या टुथफेअरीबद्दल गाण्यातून सांगते .....

कर्रेक्ट, वावे.

उत्तर : (वावे)

मेरे घर आयी एक 'नन' ही परी

७/१८८
ती चण्डिगढ हुन रात्रीची मनालीची बस पकडते जी पहाटे पोचणार असते. बस मध्ये बसल्यावर खिडकीतून एक पेरू विकणारी तिच्या मागे लागते पेरू घे म्हणुन. शेवटी ती किलोभर पेरू घेते आणि पेरूची पिशवी वरच्या जाळीच्या रॅक मध्ये ठेवते.
बस सुटते. थोड्यावेळाने ती सहज वर पहाते, रॅक मधील थरथरणारी पेरूची पिशवी दिसते.
ते बघून तिला एक गाणं सुचतं. कुठलं?

(मी या गाण्यावर असंच कोडं कुठेतरी दिलं होतं, माबो वर शोधलं सापडलं नाही.)

बिंगो श्रद्धा!

७/१८८
ती चण्डिगढ हुन रात्रीची मनालीची बस पकडते जी पहाटे पोचणार असते. बस मध्ये बसल्यावर खिडकीतून एक पेरू विकणारी तिच्या मागे लागते पेरू घे म्हणुन. शेवटी ती किलोभर पेरू घेते आणि पेरूची पिशवी वरच्या जाळीच्या रॅक मध्ये ठेवते.
बस सुटते. थोड्यावेळाने ती सहज वर पहाते, रॅक मधील थरथरणारी पेरूची पिशवी दिसते.
ते बघून तिला एक गाणं सुचतं. कुठलं?

उत्तर: रातभर जाम से जाम टकराएगा.

मस्त श्रद्धा.
पण जाम म्हणजे पेरू? अमरूद म्हणतात ना पेरूला?

पण जाम म्हणजे पेरू? >> मलाही हे नवीन आहे. माहीत असतं तरी गाणं ओळखता आलं असतं असं नाही. तरी, म्हटलं विचारून घ्यावं.

Uhoh
आता मी पेचात पडलो.
तुम्हा कुणालाच माहीत नाही, मग श्रद्धालाच कसं माहीत पेरू म्हणजे जाम?

मग श्रद्धालाच कसं माहीत>>> त्यांना सगळं माहीत असतं Happy आणि नसेल तर कोडे वाचता वाचताच त्यांना आपोआप गाणे सुचत असेल. जादू!

Pages