..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय होय तेच कि
७/१४२
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडल
...........(हि ओळ आठवत नाही)
दिस जातील दिस येतील
भोग सरल सुख येईल

बरोब्बर मृणाली.... तुम्हाला नवीकोरी पैठणी.... अभिनंदन
७/१४२
विजय आणि त्याची बायको वनिता यांनी , खूप कष्ट आणि काटकसर करून संसार उभा केला असतो. त्यांच्या एकुलत्या एक मुलावर म्हणजेच विराजवर त्यांचं खूप प्रेम असतं. ते त्याला काहीच कमी पडू देत नाहीत. पण अतिलाडामुळे, विराजला त्यांच्या कष्टाची किंमत नसते. यथातथा शिक्षण घेऊन तो जेमतेम नोकरी मिळवतो. लगेचच ऑफिसातील कोमलच्या प्रेमात पडतो. विजय आणि वनिता, विराजसाठी लग्न करून देतात दोघांचं.
आता विराजने नीट अर्थार्जन करुन संसाराची जबाबदारी उचलावी, अशी त्या दोघांची अपेक्षा असते. मात्र कोमलला सासू-सासऱ्यांसोबत लहान घरात रहायला आवडत नसतं. पण गाठीशी पुरेसे पैसे नसल्याने, वेगळं राहणं विराजला शक्य नसतं. तो कोमलला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती ऐकत नाही.
शेवटी कोमल धमकी देते, की जोपर्यंत ते दोघे नवीन घरी रहायला जाणार नाहीत, तोपर्यंत ती मूल होऊ देणार नाही.
हे ऐकून विजय आणि वनिता पुन्हा एकदा मुलाच्या सुखासाठी त्याग करायला तयार होतात. आपल्या म्हातारपणीसाठी राखून ठेवलेल्या बचतीतून विराजला वेगळी रुम घेऊन देण्याचं ते ठरवतात.
हे सगळं आपल्या मुलासाठी, चांगल्या भविष्यासाठी, असं ते एकमेकांना समजवतात. मग ते दोघं कोणतं गाणं म्हणतील?

उत्तर :
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडंल
घरासंगं समदं येगळं होईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल

7/143
घर बांधायचं काम चाललय. पण पैशाची मधेच जरा तंगी आली. आता सध्या दरवाजा बनवायचा विषय चाललाय. नवरा म्हणतोय की स्वस्तातला घेऊया. पण बायकोच्या मनात एक डिझाईन फिट्ट बसलय आणि ती हट्ट करतेय त्याचसाठी. वर ब्लॅकमेल करतेय की माझ्यावर प्रेम असेल तर तर तू हेच्च डिझाईन घेऊन देशील. ती हे कोणत्या गाण्यात सांगेल?

143 - 'दस'मधलं
'दी'दार दे, 'दी'दार दे, 'दी'दार दे, 'दी'दार दे... आहे का? The दार!!

श्रद्धा, बरोबर!
7/143
घर बांधायचं काम चाललय. पण पैशाची मधेच जरा तंगी आली. आता सध्या दरवाजा बनवायचा विषय चाललाय. नवरा म्हणतोय की स्वस्तातला घेऊया. पण बायकोच्या मनात एक डिझाईन फिट्ट बसलय आणि ती हट्ट करतेय त्याचसाठी. वर ब्लॅकमेल करतेय की माझ्यावर प्रेम असेल तर तर तू हेच्च डिझाईन घेऊन देशील. ती हे कोणत्या गाण्यात सांगेल?

उत्तर:

है इश्क तो इश्क तो
दीदार दे दीदार दे

तुम्हा सगळ्यांचं श्रद्धा शी काहीतरी सेटिंग आहे!
अन्यथा.... अशी कल्पनातीत कोडी तिने लीलया कशी सोडविली असती बरे?
हॅट्स ऑफ टु हर!

7/144
कूर्ग चा सुब्बय्या नाना मोकळ्या स्वभावाचा माणूस. त्याची भली मोठी कॉफी इस्टेट आहे. रोबस्टा, ॲरॅबिका कॉफीची लागवड, प्रक्रिया, विक्री सगळंच तो बघतो. कूर्गच्या जंगलातून शुद्ध मध गोळा करायला माणसं आहेत, तोही व्यवसाय त्याने अलिकडे सुरू केलाय. मुंबईतल्या शंतनुची सुब्बयाशी जुनी ओळख. सुब्बयाकडून माल घ्यायचा आणि मुंबईत विकायचा असं त्या दोघांचं बरेच वर्ष चाललय. मागच्या वर्षी सुब्बया मुंबई त आला असताना शंतनू ने मधाची ऑर्डर दिली आणि त्याची आगाऊ रोख रक्कम सुब्बयाकडे दिली. दोघांत विश्वास होता, चिठ्ठी कपाटी काही घेतली नाही.. पुढच्याच महिन्यात सुब्बया डिलिवरी देणार होता. पण मग कोविड आला, सगळं जग ठप्प झालं, घाबरून घरातच बसलं.. पहिली लाट मग दुसरी.. ती ओसरू लागल्यावर शंतनूला आपल्या ऑर्डरची आठवण आली. त्याने सुब्बय्या ला फोन केला. सुब्बया म्हणाला, "वा वा! शंतनू! किती दिवसांनी फोन केलास! सगळं ठीक ना? कॉफीची आठवण आली वाटतं माझ्या!" तर शंतनू म्हणाला, " कॉफी बद्दल नाही, सुब्बया, मी तुझ्या आणि माझ्या मधाच्या व्यवहारा बद्दल फोन केलाय. मी पेमेंट केलय पण माल नाही आला या महामारीमुळे." सुब्बयाला रक्कम दिल्याचं काही आठवेना, शंतनुकडे काही चिठ्ठी नव्हती. सुब्बया फसवणार्यातला नाही हे शंतनूला पक्कं ठाऊक होतं.. पण सुब्बय्याला काही केल्या आपण पैसे घेऊन ठेवल्याचं आठवेच ना, तो मानेचना.. आता आली का पंचाईत! शेवटी शंतनु म्हणला, "केवढं दूर आहे गाव तुमचं.. तुम्ही इथे येऊन समक्ष भेटा म्हणजे काय तो व्यवहार बोलता येईल"
शंतनू ने फोनवर जे काही बोललं ते सगळं गाणच होतं.. कोणतं बरं?

Its not about a coffee
its about you and me honey
तुम मिलो तो सही
हैं मीलोकी दूरी
तुम मिलो तो सही
??

झिलमिल बरोब्बर!!
फारसं कोणाला माहित नसलेलं गाणं आहे. मला फार आवडतं! ओळखल्याबद्दल धन्यवाद! ज्यांनी कधी ऐकलं नाहीये त्यांच्यासाठी https://youtu.be/smtV4z5wUZs
शाननी म्हणलय आणि मूवीचा हीरो नाना पाटेकर.

7/144
कूर्ग चा सुब्बय्या नाना मोकळ्या स्वभावाचा माणूस. त्याची भली मोठी कॉफी इस्टेट आहे. रोबस्टा, ॲरॅबिका कॉफीची लागवड, प्रक्रिया, विक्री सगळंच तो बघतो. कूर्गच्या जंगलातून शुद्ध मध गोळा करायला माणसं आहेत, तोही व्यवसाय त्याने अलिकडे सुरू केलाय. मुंबईतल्या शंतनुची सुब्बयाशी जुनी ओळख. सुब्बयाकडून माल घ्यायचा आणि मुंबईत विकायचा असं त्या दोघांचं बरेच वर्ष चाललय. मागच्या वर्षी सुब्बया मुंबई त आला असताना शंतनू ने मधाची ऑर्डर दिली आणि त्याची आगाऊ रोख रक्कम सुब्बयाकडे दिली. दोघांत विश्वास होता, चिठ्ठी चपाटी काही घेतली नाही.. पुढच्याच महिन्यात सुब्बया डिलिवरी देणार होता. पण मग कोविड आला, सगळं जग ठप्प झालं, घाबरून घरातच बसलं.. पहिली लाट मग दुसरी.. ती ओसरू लागल्यावर शंतनूला आपल्या ऑर्डरची आठवण आली. त्याने सुब्बय्या ला फोन केला. सुब्बया म्हणाला, "वा वा! शंतनू! किती दिवसांनी फोन केलास! सगळं ठीक ना? कॉफीची आठवण आली वाटतं माझ्या!" तर शंतनू म्हणाला, " कॉफी बद्दल नाही, सुब्बया, मी तुझ्या आणि माझ्या मधाच्या व्यवहारा बद्दल फोन केलाय. मी पेमेंट केलय पण माल नाही आला या महामारीमुळे." सुब्बयाला रक्कम दिल्याचं काही आठवेना, शंतनुकडे काही चिठ्ठी नव्हती. सुब्बया फसवणार्यातला नाही हे शंतनूला पक्कं ठाऊक होतं.. पण सुब्बय्याला काही केल्या आपण पैसे घेऊन ठेवल्याचं आठवेच ना, तो मानेचना.. आता आली का पंचाईत! शेवटी शंतनु म्हणला, "केवढं दूर आहे गाव तुमचं.. तुम्ही इथे येऊन समक्ष भेटा म्हणजे काय तो व्यवहार बोलता येईल"
शंतनू ने फोनवर जे काही बोललं ते सगळं गाणच होतं.. कोणतं बरं?

उत्तर:
It's not about a coffee
it's about you and me honey
तुम मिलो तो सही
हैं मीलोकी दूरी
तुम मिलो तो सही

माहिती नव्हतं गाणं >>+१

कोडं ७/१४५
रामपूर गावात एक हुशार दुकानदार होता. दिवाळी जवळ आली होती. सगळी दुकानं दिवाळीच्या सामानाने भरली होती. याच्याकडेही नवीन सामान आलं होतं. यावर्षी प्रथमच त्याने बल्बऐवजी एलईडीच्या माळा आणल्या होत्या. गावात त्याच्या एकट्याकडेच त्या माळा होत्या. त्यामुळे त्याला त्यांची जाहिरात करायची होती. नुसतं एलईडीची माळ म्हणणं म्हणजे नीरस वाटलं असतं, म्हणून त्याने डोकं चालवून एका गाण्याचा वापर करून जाहिरात केली. कुठलं गाणं?

Pages