..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सपा,

ये रात भीगी भीगी
ये मस्त नजारे
उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा
क्यू आग सी लगा के गुमसुम है चांदनी
सोने भी नही देता मौसम का ये इशारा

पण नवरोबा भारी रोमॅन्टिक! <<<<< नो वंडर, पाच मुलं झाली. Lol

वावे, नाही.
सपा - श्रद्धा भारीच!

बिंगो मामी.
त्या टोकाला दिवे नसतात ना, म्हणुन

न दिया किनारे हेरा ये, आई कंगना.

७/१४०
धनराज शेठचं किराणा मालाचं दुकान असतं. ग्राहकांना घरपोच सामान पोचवणे, ही त्याच्या दुकानाची खासियत. गोविंद त्याच्याकडे सामानाची होम डिलिव्हरी करण्यासाठी कामाला असतो. अधूनमधून वेळ मिळाला की, जवळच्या देशी दारूच्या दुकानात जाऊन घसा ओला करणे, हा त्याचा छंद.
एकदा असच संध्याकाळी काम आटोपून, गोविंदची पावले दारूच्या दुकानाकडे वळलेली असतात. तेवढ्यात धनराज शेठला, मोहन देशमुखचा फोन येतो. त्यांनी घरी सामान हवं असतं. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या गोविंदला, धनराज शेठ थांबवतो. पण गोविंदला परत फिरायची इच्छा नसते.
तो शेठला सांगतो, तुम्ही सामान भरून ठेवा ; मी आलोच थोड्या वेळात. पण दारू ईतकी चढते गोविंदला की तो चालता चालता रस्त्याच्या कडेला पडतो.
इकडे धनराज शेठ, त्याची वाट बघून वैतागतो. त्याला आजूबाजूला शोधूनही येतो. शेवटी मोहनला फोन करुन सामान उद्या पोहचेल, असं सांगून दुकान बंद करतो.
गोविंद पूर्ण भानावर येऊन दुकानात पोचायला दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होते. त्याला बघून धनराज शेठ चांगलाच चिडतो आणि म्हणतो, " हे सामान घेऊन जा लगेच. किती शोधायचं तुला?"
हे तो गाण्यातून कसं सांगेल?

हिंदी गाणं आहे.
पण पहिला शब्द फोडून मराठीत बोलायचा.

७/१४०
धनराज शेठचं किराणा मालाचं दुकान असतं. ग्राहकांना घरपोच सामान पोचवणे, ही त्याच्या दुकानाची खासियत. गोविंद त्याच्याकडे सामानाची होम डिलिव्हरी करण्यासाठी कामाला असतो. अधूनमधून वेळ मिळाला की, जवळच्या देशी दारूच्या दुकानात जाऊन घसा ओला करणे, हा त्याचा छंद.
एकदा असच संध्याकाळी काम आटोपून, गोविंदची पावले दारूच्या दुकानाकडे वळलेली असतात. तेवढ्यात धनराज शेठला, मोहन देशमुखचा फोन येतो. त्यांनी घरी सामान हवं असतं. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या गोविंदला, धनराज शेठ थांबवतो. पण गोविंदला परत फिरायची इच्छा नसते.
तो शेठला सांगतो, तुम्ही सामान भरून ठेवा ; मी आलोच थोड्या वेळात. पण दारू ईतकी चढते गोविंदला की तो चालता चालता रस्त्याच्या कडेला पडतो.
इकडे धनराज शेठ, त्याची वाट बघून वैतागतो. त्याला आजूबाजूला शोधूनही येतो. शेवटी मोहनला फोन करुन सामान उद्या पोहचेल, असं सांगून दुकान बंद करतो.
गोविंद पूर्ण भानावर येऊन दुकानात पोचायला दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ होते. त्याला बघून धनराज शेठ चांगलाच चिडतो आणि म्हणतो, " हे सामान घेऊन जा लगेच. किती शोधायचं तुला?"
हे तो गाण्यातून कसं सांगेल?

उत्तर :-
जा- ने- जा (सामान)
ढूँढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन ( एक रात्र आणि दुसरा दिवस)
मै यहाँ से वहाँ.....

अभिनंदन श्रद्धा...

७/१४१, सोपं पण काहीही कोडं:

मोहन , शालिनी (दोघांची नावे महत्वाची नाहीत)यांचं लग्न ठरतं, ते ही फक्त ऑनलाईन भेटून, व्हिडीओ कॉल्स वगैरे करून. दोघे वेगवेगळ्या शहरात असतात त्यामुळे भेट झाली नसते. मोहन एकदा झूम मिटिंग करून शालिनीची ओळख त्याची आई सारिका (नाव महत्वाचे पण पूर्ण नाही) हिची ओळख करून देतो. सारिका, शालिनीच्याच शहरात असते.
दोघी भेटतात, सारिका तशी दिलखुलास असते शालिनीला म्हणते मला नावानेच हाक मारत जा.
आता दोघीही मायबोलीकर असतात तेव्हा मायबोली स्टाईलने एकमेकांना संबोधु लागतात.
सारिका कितीही दिलखुलास असली तरी मुलगा दूर असल्याने त्याची जास्तच काळजी, ओढ आणि त्याला हेच आवडतं, ते आवडत नाही वगैरे सांगून शालिनीला कधी कधी बोअरही करत असते. सारिकाला नट्टा पट्टा करायची भारी हौस असते, शालिनीला नसते. एवढं सोडून दोघींचं मस्त सूत जमतं.
मध्येच एकदा सारिका मुलाच्या गावी जाऊन त्याला भेटून येते.
त्यानंतर काहीच दिवसांनी मोहनला यांच्या शहरात कामा निमित्त यावे लागते. तो रविवारी येणार असतो आणि त्याच्या आईला सांगतो मी सरळ शालिनी कडे जाणार, तिच्या सोबत दिवस घालवणार आणि मग घरी येणार. मला तिला एकटीला भेटायचं आहे तू येऊ नकोस तिकडे.
शालिनी अर्थात आनंदून गेली असते, केव्हा येतो मोहन तिला वाटत असते.

पण सारिका रविवारी सकाळी शालिनीच्या घरी टपकतेच.
तिला म्हणते हे बघ मोहनला "अमुक" मराठी पारंपरिक डिश खूप आवडते, ती ही तीन प्रकारे. मी करते त्याचे तीन प्रकार आणि जाते परत मोहन जायच्या आत.

पण शालिनीला स्वतःच त्या डिशेस करायच्या असतात.
ती म्हणते मला सांगा कुठल्या कुठक्या प्रकारे करायच्या त्या मी करेन. तू जा. सारिका म्हणते बरं. आणि तिला सांगते तीन वेगळे प्रकार त्या डिशचे. आणि म्हणते मी थकलेय गं मी जरा पडते मग फ्रेश होऊन तुझा ड्रेसिंग टेबल वापरेन जरा, आणि जाईन.

शालिनीला सारिकाला हुकवायचं असतं. तीन पटापट त्या डिशचे ते तीन प्रकार करते, सारिकाला उठवते आणि आपलं आटपून निघायला सांगते. हे ती गाण्यात कसं सांगेल?

झाल्या 'तिन्ही' सांजा
करून शिनगार 'सा' (सारिका) जा
वाट पाहते मी गं, येणार साजण माझा

श्रद्धा Light 1 बरोब्बर!
7/139
एका नवरा बायकोला पाच अपत्ये असतात (असतात आता, काय करणार? का वगैरे विचारू नका). बायको गृहिणी, एक दिवस खूप कंटाळून थकून आणि वैतागून जाते. मग नवरा तिला तिच्या मैत्रिणींबरोबर चार दिवस फिरायला जायला सांगतो. स्वतः ऑफिसातून सुट्टी घेऊन मुलांना सांभाळायचं ठरवतो. ती निघताना तिला सांगतो आता चार दिवस इथला विचार सुद्धा करू नकोस, मस्त मजा कर.. पण ती कसली विसरतेय, दोन दिवसात सगळ्यांची चौकशी करायला फोन करते. नवरोबा बऱ्यापैकी 'भिन' झालेला वाटतो तिला.. एकेला मुला-मलीचं नाव घेऊन त्यांच्या दोन दिवसातल्या करामती तिला सांगत असतो.. "पहिली काल पावसात भिजून घरभर ओल्या कपड्यातच फिरत बसली, दुसरा छान राहिला, पण तिसरा इतका आरामात उठला की ऑनलाईन शाळेचा पहिला तास गेलाच जवळ जवळ. चौथीने तर कमालच केली, आजोबांचं भिंग घेऊन त्यातून किरणांचा कसलासा प्रयोग करून पडदा जाळून नामानिराळी झाली. पाचवं शेंडेफळ पावसाळी हवेत रात्रभर सुसू करत होतं.. त्याचं लंगोट बदलण्यात माझ्या झोपेचं पार खोबरं झालं.. " पण नवरोबा भारी रोमॅन्टिक! या प्रापंचिक गोष्टीही तिला गाण्यातून सांगितोय..

उत्तर:
ये रात भीगी भीगी
ये मस्त फिज़ाएं
उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा
क्यू आग सी लगा के गुमसुम है चांदनी
सोने भी नही देता मौसम का ये इशारा

मृणालीसाठी...
७/१४२
विजय आणि त्याची बायको वनिता यांनी , खूप कष्ट आणि काटकसर करून संसार उभा केला असतो. त्यांच्या एकुलत्या एक मुलावर म्हणजेच विराजवर त्यांचं खूप प्रेम असतं. ते त्याला काहीच कमी पडू देत नाहीत. पण अतिलाडामुळे, विराजला त्यांच्या कष्टाची किंमत नसते. यथातथा शिक्षण घेऊन तो जेमतेम नोकरी मिळवतो. लगेचच ऑफिसातील कोमलच्या प्रेमात पडतो. विजय आणि वनिता, विराजसाठी लग्न करून देतात दोघांचं.
आता विराजने नीट अर्थार्जन करुन संसाराची जबाबदारी उचलावी, अशी त्या दोघांची अपेक्षा असते. मात्र कोमलला सासू-सासऱ्यांसोबत लहान घरात रहायला आवडत नसतं. पण गाठीशी पुरेसे पैसे नसल्याने, वेगळं राहणं विराजला शक्य नसतं. तो कोमलला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती ऐकत नाही.
शेवटी कोमल धमकी देते, की जोपर्यंत ते दोघे नवीन घरी रहायला जाणार नाहीत, तोपर्यंत ती मूल होऊ देणार नाही.
हे ऐकून विजय आणि वनिता पुन्हा एकदा मुलाच्या सुखासाठी त्याग करायला तयार होतात. आपल्या म्हातारपणीसाठी राखून ठेवलेल्या बचतीतून विराजला वेगळी रुम घेऊन देण्याचं ते ठरवतात.
हे सगळं आपल्या मुलासाठी, चांगल्या भविष्यासाठी, असं ते एकमेकांना समजवतात. मग ते दोघं कोणतं गाणं म्हणतील?

अय्या माझ्या साठी? >>>> हो...... Lol

गाणं बरोबर वाटतंय. "तुझ्या माझ्या संसाराला " हेच लिहिलंत ना?

Pages