..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस्स वावे आणि मानव. बरोबर उत्तर.

७/१३१

एका माणसानं खूप खूप उंदिर पाळलेले असतात. त्याचा त्या सर्वच उंदरांवर खूप जीव असतो. एकदा त्यातील एक सर्वात म्हातारी घूस आजारी पडते. तर तो प्राण्यांच्या डॉक्टरला फोन करून हे कसं कळवेल?

उत्तर
बडी मूषक ill है

7/132
दोन उंदिर रुममेट असतात. त्यातला एक आजारी पडतो. तर दुसरा उंदीर डॉक्टरला फोन करून हे कसं कळवेल?

बरोबर उत्तर मानव.

7/132
दोन उंदिर रुममेट असतात. त्यातला एक आजारी पडतो. तर दुसरा उंदीर डॉक्टरला फोन करून हे कसं कळवेल?

उत्तर
Buddy मूषक ill है

बरोबर माऊ मैय्या आनि मृणाली...दोघींचीही गाणी बरोबर!
७/१२९
करार मदार झाले, त्यावर स्वाक्षर्‍या झाल्या व रणबीर- अर्जुन तिथून निघाले. कंपनी चा माणूसही फायली सांभाळत गाडीत बसला. घर बरेच दूर होते त्याचे..उशीरही झालेला...
घरी पोहोचल्यावर आधी सर्व फायली व्यवस्थित ठेवाव्या म्हणून त्याने पाहिले ...तर काय!
मुख्य कंत्राट च गायब! तो हबकलाच बिचारा! ज्युनियर होता तसा!
कासावीस होऊन तो पेपर्स शोधू लागला.......
मृणाली - ना जाने कहा deal खो गया
माऊ मैया - बडी मुश्कील है, खोया मेरा deal है

Happy

बापरे !! Deal ने तर पार राडा केलाय दोन दिवसात. सगळे पोस्ट्स वाचून 'Deal गार्डन गार्डन हो गया'

७/१३३

वाल्मिकी ऋषी आज लव आणि कुशावर प्रसन्न होते. आज आश्रमाची खुप कामं केली होती त्या दोघांनी. दोघेही दमले असणार आणि त्यांना भूकही लागली असणार म्हणून स्वहस्ते रांधलेली खिचडी द्रोणात काढून त्यांनी कुशास हाक मारली. "हे भोजन तुम्हां दोघांसाठी. दोघेही मिळून खा बरं." "होय गुरुजी. आईस स्मरून आपल्याला वचन देतो की मी आणि लव मिळूनच भोजन करू." कुश हे गाण्यातून कसे सांगेल?

१३३
'जानकी' कसम
(सच केहते है हम
खुशी हो या गम)
बांट लेंगे हम आधा आधा

बरोबर श्रद्धा आणि मानव.

७/१३३

वाल्मिकी ऋषी आज लव आणि कुशावर प्रसन्न होते. आज आश्रमाची खुप कामं केली होती त्या दोघांनी. दोघेही दमले असणार आणि त्यांना भूकही लागली असणार म्हणून स्वहस्ते रांधलेली खिचडी द्रोणात काढून त्यांनी कुशास हाक मारली. "हे भोजन तुम्हां दोघांसाठी. दोघेही मिळून खा बरं." "होय गुरुजी. आईस स्मरून आपल्याला वचन देतो की मी आणि लव मिळूनच भोजन करू." कुश हे गाण्यातून कसे सांगेल?

उत्तर
'जानकी' कसम, सच कहते है हम
(खुशी हो या गम)
बांट लेंगे हम आधा आधा

7/134
सुनिल पाल लहान असताना परीक्षा नापास झाला होता. अगदी भोपळा मार्क पडले. त्यामुळे हिंमत हरून, निराश होऊन जीव द्यायला निघाला. आपल्या अतरंगी मित्राचं मन वळवायला त्याचे मित्र कुठलं गाणं म्हणले असतील?

बरोबर वावे!

7/134
सुनिल पाल लहान असताना परीक्षा नापास झाला होता. अगदी भोपळा मार्क पडले. त्यामुळे हिंमत हरून, निराश होऊन जीव द्यायला निघाला. आपल्या अतरंगी मित्राचं मन वळवायला त्याचे मित्र कुठलं गाणं म्हणले असतील?

उत्तरः (वावे)
ओ पाल न हारे निर्गुण और न्यारे
तुमरे बिन हमरा कोन नाही

बहुदा झालंय हे गाणं ..म्हणून delete karti aahe

मस्त कोडी आणि डिकोडिंग......

काल डोक्यात अगदी डील डील वाजत होतं. त्यामुळे नंतर विश्रांतीच दिली डोक्याला.

एक सोप्पं कोडं... झी मराठीवरील 'देवमाणूस' पाहणाऱ्यांसाठी.
७/१३५ -
सरुआजी देवीसिंगला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?

७/१३६
धाकटा अनिल आणि थोरला सुनील एका गावात एकाच घरात रहात असतात. त्यांच्या घराला तळमजला असतो, तिथे त्यांची स्टोअर रूम असते.
त्यांच्या गावात विजेचा सारखा लपंडाव सुरू असतो (जुनी गोष्ट आहे ही, त्यावेळी युपीएस/इन्व्हर्टर अजून एवढे वापरात नव्हते.)
एकदा रात्री सुनीलला मॅगी खावीशी वाटते, अनिल पण खाईन म्हणतो. पण स्वयंपाक घरातले मॅगीचे पाकीट संपले असतात.
सुनील म्हणतो मी खालच्या स्टोअर मधनं घेऊन येतो आणि जायला लागतो. तेवढयात अनिलला आठवतं की तळघरात कालच काही वायरिंग प्रॉब्लेम झाल्याने तिथले लाईट लागत नाहीयेत.

तर तो सुनीलला काय सांगेल आणि त्यासाठी कुठलं गाणं म्हणेल?

Pages