..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव, त्रिवार म्हणतात हे बरोबर आहे. Happy पण डील ला काहीही उपमा वगैरे देत नाहीत. अजून थोडा त्याच ट्रॅकवर विचार करा.

७/१२७

'तुम्ही दोघे कामात चांगले आहात. आता तर तुमचं भांडणही मिटलंय. मग हे कंत्राट तुम्ही दोघे का घेत नाही मिळून?' त्या कंपनीच्या माणसाने अर्जुन रणवीरला विचारलं. त्या दोघांच्या डोक्यात हे आलंच नव्हतं. अर्थातच, तो प्रस्ताव ऐकून दोघे खुश झाले आणि हस्तांदोलन करत म्हणाले....?

डील बरं का.. डील बरं का.. डील बरं का...
Proud आता मी पळते इथून.

अरे खरंच की ..cheating आहे ही : हाहा:
आम्ही इमाने इतबारे एक दिल, दो दिल,आणि किती दीलाची गाणी यूट्यूब वर बघितली Biggrin
पण भारी होत कोड..

७/१२९
करार मदार झाले, त्यावर स्वाक्षर्‍या झाल्या व रणबीर- अर्जुन तिथून निघाले. कंपनी चा माणूसही फायली सांभाळत गाडीत बसला. घर बरेच दूर होते त्याचे..उशीरही झालेला...
घरी पोहोचल्यावर आधी सर्व फायली व्यवस्थित ठेवाव्या म्हणून त्याने पाहिले ...तर काय!
मुख्य कंत्राट च गायब! तो हबकलाच बिचारा! ज्युनियर होता तसा!
कासावीस होऊन तो पेपर्स शोधू लागला.......

आत्ता माझ्या डोक्यात ' दिलबर दिलबर दिलबर, हां दिलबर दिलबर दिलबर ' हे गाणं आलं.... म्हणून लिहायला धावत आले आणि बघते तर डील झालं बरं का.....
Wink

७/१२९
बडी मुश्कील है, खोया मेरा deal है

7/130
अर्जुन रणवीरचं डील प्रकरण चाललेलं होतं त्या दरम्यान रणवीर आणि प्रियांकाची मुलगी फार दुःखी होती. तिच्या कॉनवेन्ट शाळेच्या गॅदरिंगमधे येशूवर एक नाटक बसवणार होते. त्यात तिला प्रमुख पात्र मिळता मिळता निसटलं होतं. तरी तिनी बिचारीनी पात्राचे सगळे संवादही पाठ केले होते. त्यामुळे ती हिरमुसली होती. आज संध्याकाळी गॅदरिंग बघायला रणवीर अन प्रियांका पहिल्या रांगेत जाऊन बसले. समोर स्टेजवर बघतात तो काय! त्यांची मुलगी प्रमुख भूमिकेत आलेली!! हे पाहून त्यांचा आनंदातिशयाने विश्वासच बसेना, वेळेवर हा रोल आपल्या मुलीला कसा काय मिळाला हे त्यांना कळेना .. तिची भूमिका बघावी का प्रेमाने तिचं कौतुक करावं, आनंद कसा व्यक्त करावा, काय करू न काय नको, अगदी असं त्यांना झालं. आणि चक्क दोघं या अर्थाचं गाणंच तिथे म्हणायला लागले!

7/130
Lol खतरनाक कोडे सपा!!!

तू मेरे सामने, मै तेरे सामने
तुझे देखू के प्यार करू
ये कैसे हो गया
तू मेरी हो गई
कैसे मै ऐतबार करू?

सही जवाब, श्रद्धा!!

7/130
अर्जुन रणवीरचं डील प्रकरण चाललेलं होतं त्या दरम्यान रणवीर आणि प्रियांकाची मुलगी फार दुःखी होती. तिच्या कॉनवेन्ट शाळेच्या गॅदरिंगमधे येशूवर एक नाटक बसवणार होते. त्यात तिला प्रमुख पात्र मिळता मिळता निसटलं होतं. तरी तिनी बिचारीनी पात्राचे सगळे संवादही पाठ केले होते. त्यामुळे ती हिरमुसली होती. आज संध्याकाळी गॅदरिंग बघायला रणवीर अन प्रियांका पहिल्या रांगेत जाऊन बसले. समोर स्टेजवर बघतात तो काय! त्यांची मुलगी प्रमुख भूमिकेत आलेली!! हे पाहून त्यांचा आनंदातिशयाने विश्वासच बसेना, वेळेवर हा रोल आपल्या मुलीला कसा काय मिळाला हे त्यांना कळेना .. तिची भूमिका बघावी का प्रेमाने तिचं कौतुक करावं, आनंद कसा व्यक्त करावा, काय करू न काय नको, अगदी असं त्यांना झालं. आणि चक्क दोघं या अर्थाचं गाणंच तिथे म्हणायला लागले!

उत्तर: (श्रद्धा)
तू मेरे सामने, मै तेरे सामने
तुझे देखू के प्यार करू
ये कैसे हो गया
तू 'मेरी' हो गई
कैसे मै ऐतबार करू?

७/१३१

एका माणसानं खूप खूप उंदिर पाळलेले असतात. त्याचा त्या सर्वच उंदरांवर खूप जीव असतो. एकदा त्यातील एक सर्वात म्हातारी घूस आजारी पडते. तर तो प्राण्यांच्या डॉक्टरला फोन करून हे कसं कळवेल?

क्ल्यू 1 : एका फेमस गाण्याची तीन शब्दांची केवळ पहिली ओळ आहे.

क्ल्यू 2 : त्यातील मधला शब्द फोडून हा अर्थ निघतो. सर्व भारतीय भाषांची जननी आणि सायबाच्या भाषेचा खेळ आहे सगळा.

७/१३१ -
आ जाओ तडपते है अरमां..
अब रॅट गुजरनेवाली है..

वावे बरोबर.

बडी मूषक इल है असे असावे.

पण हार्ट अ‍ॅटक नसणार त्या घूशीला नाहीतर घाबरं-घाबरं होत "बडी मूषक इल बाबा बडी मूषक इल" सांगितलं असतं....

Pages