..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७/१२२ -

'गुंडे' सिनेमातले घनिष्ठ गुंडे मित्र रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर चुकीचा मार्ग सोडून देऊन सचोटीने बिझनेस करायचं ठरवतात. सुरुवातीला एकत्र बिझनेस असतो त्यांचा, मात्र दोघेही प्रियांका चोप्राच्याच प्रेमात पडल्याने त्यांच्यात वितुष्ट येतं आणि ते प्रतिस्पर्धी होतात. रणवीर सिंग प्रियांकाशी लग्न करतो. काही वर्षांनी त्याचा बिझनेस जरा अडचणीत येतो. तेव्हाच त्याला एका मोठ्या कंत्राटाबद्दल समजतं. त्यामुळे त्याचा बिझनेस सावरणार असल्याने तो ते मिळवायचा पूर्ण प्रयत्न करायचं ठरवतो. फक्त अडचण ही असते की अर्जुन कपूरही त्याचसाठी प्रयत्न करत असतो. ते त्याला अलमोस्ट मिळणारच असतं, पण ऐनवेळी त्याला मैत्रीची आठवण येते आणि तो स्वतःऐवजी ते रणवीरला मिळावं असा प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी त्या कंपनीच्या ऑफिसात तो रणवीरला भेटायला बोलावतो. मीटिंग रूममध्ये ती कागदपत्रं ठेवलेली असतात. ती रणवीरसाठीच आहेत, हे अर्जुन त्याला कसं सांगेल?
टीप - गाण्याच्या मुखड्यातल्या दोनच ओळी वापरायच्या आहेत. (सलग दोन असतील वा नसतीलही!)

उत्तर -
और इस deal मे क्या रखा है...
... तेरा ही नाम लिखा रखा है..

७/१२३
७/१२२ पासून पुढे….. मग तो ते कागदपत्रे उघडून बघतो. तर ते रणवीरला न मिळता अर्जूनच्याच नावावर असते. पण अर्जूनचे ठरलेले असते कि हे रणवीरलाच मिळायला हवे. म्हणून ते बदलण्यासाठी अर्जून त्याला काय सांगेल?

७/१२३
Deal तो deal
Deal का ऐतबार क्या कि जे

Deal देके deal लिया है, सौदा प्यार का किया है
छे, हे नाही जुळत.

Deal मेरा मैने फेका, तुने झट से पकडा.
मैने प्यार तुम्ही से किया है, मैने deal भी तुम्ही को दिया है.

अजून एक क्लू हवा होता, तो म्हणजे
ते एकच गाणं अर्जुन कपूर रणवीर आणि प्रियंका दोघांना ही बघून बोलू शकतो Lol

७/१२४

वेताळ विक्रमाला विचारतो की ज्यू दाईचं ज्याच्याशी लग्न होतं, त्याचं नाव काय बरं असेल? मुळातली शपथ विसरून विक्रम राजा म्हणतो -
"ती ज्यू दाई ज्याची बायको असेल, त्याचं नाव 'प्रभाकर श्रीपालवर्धन अटापट्टू जयसूर्या लक्ष्मणश्रीरामकृष्ण शिववेंकट राजशेखर श्रीनिवासन त्रिचिपल्ली येक्यपरमपील पेरंबतूर चिन्नस्वामी मुत्थुस्वामी वेणूगोपाल अय्यर' असण्याची शक्यता आहे."

वेताळ इझ कन्फ्यूजड! तो म्हणतो की ह्याला काही ठोस पुरावा किंवा दाखला आहे का? नाही सांगितलंस तर तुझ्या डोक्याची सहस्र शकलं होतील. विक्रम त्याला २ गाण्यांचा दाखला देतो. ती गाणी कोणती?

(मी आधी उत्तर फोडलं होतं, त्याबद्दल क्षमस्व! वावे आणि अजून कुणी वाचलं असल्यास बाकीच्यांना कृपया वेळ द्या)

मी आधी ते कोडं, नवरा खूप उंच इस्रायली आया आणतो असंच केलं होतं. पण मौत न आई तेरी याद क्यू आई, हे ओलांडून उत्तर द्यावं लागतं म्हणुन सामान्य उंचीची आया ठेवून तिला मुस्काटात मारायला लावलं.

"ती ज्यू दाई ज्याची बायको असेल, त्याचं नाव 'प्रभाकर श्रीपालवर्धन अटापट्टू जयसूर्या लक्ष्मणश्रीरामकृष्ण शिववेंकट राजशेखर श्रीनिवासन त्रिचिपल्ली येक्यपरमपील पेरंबतूर चिन्नस्वामी मुत्थुस्वामी वेणूगोपाल अय्यर' असण्याची शक्यता आहे."

>> यावरून सारखं लंबी जुदाईच आठवतंय.

नाही.
क्लू: पहिल्या गाण्याचं तात्पर्य दुसऱ्या गाण्याकडे घेऊन जातं आणि दुसऱ्या गाण्याचं तात्पर्य वेताळाच्या प्रश्नाचं उत्तर देतं.

नवरा खूप उंच इस्रायली आया आणतो असंच केलं हो>>>>>>> मी पण लंबी जुदाई साठी अशीच सिच्युएशन सांगायचा विचार करत होते....

७/१२५
७/१२३ पासून पुढे..... अर्जुनचं हे मित्रप्रेम बघून रणवीरला भरून येतं. आता मैत्रीपुढे हे करार, कागदपत्रे सगळं झूठ.असं त्याला वाटतं. त्यामुळे तो ' कागज, कलम ' काही न आणता, खड्ड्यात गेलं हे डील, असा विचार करून ती कागदपत्रे उचलून, तावातावाने गाडीत बसून निघून जातो. अर्जुनाला काहीच कळत नाही. थोड्या वेळाने, ती कागदपत्रं रस्त्यावर फेकून, रणवीर परत येतो. तेव्हा अर्जुन त्याला कुठे गेला होतास, असं विचारतो.. आता रणवीर कोणतं गाणं म्हणेल?

क्लू: पहिल्या गाण्याचं तात्पर्य दुसऱ्या गाण्याकडे घेऊन जातं आणि दुसऱ्या गाण्याचं तात्पर्य वेताळाच्या प्रश्नाचं उत्तर देतं. >>>

मुझे तुमसे हैं कितने गिले
तुम कितने दिन बाद मिले
बोलो इतने दिन क्या किया क्या किया
तेरा नाम लिया हो तुझे याद किया हो
तेरा नाम लिया तुझे याद किया
तुझे याद किया तेरा नाम लिया

कारण इतकं मोठं नाव याद करायला लंबी जुदाईच लागणार.

केया, हे आधीच झालं. आता डिलाचं प्रकरण लै कॉम्प्लिकेटेड झालंय कारण त्यागावर त्याग सुरू आहेत दोन्ही मित्रांचे. Lol

Pages