..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol कमाल आहे!
बगदाद काय, आनंदी मुलगी काय, वाघिण काय.... !! मी त्या डोईवर त्रिकोणी टोपी घातलेल्या , झगमग कपडे घालून, हात हलवत नाचतात ना...तशा इराणी मुली असलेलं गाणं आठवत होते...
आणि हे गाणं पुरुषाच्या आवाजात आहे ना?
आपण लिंग सापेक्षता ठेवायला हवी....!!

आणि हे गाणं पुरुषाच्या आवाजात आहे ना?<<<<
हे बाईच्याच आवाजात आहे. पुरुषाच्या आवाजात 'रंग और नूर की बारात किसे पेश करू' आहे. बाकी कोड्यांना सरसकट लिंगसापेक्षतेचा वगैरे नियम लावायचा म्हटला तर कठीण होईल कोडे रचणे!

'शेर की सौ' टोटल rofl आहे. मंगळसूत्र घातलेली वाघीण आली डोळ्यांसमोर! Lol

उद्या पुन्हा पोस्ट करेन कोडे.

७/१२१

धावतपळत राजेश बसस्टॉपवर पोहोचला. बघतो तर नेहमीप्रमाणेच तिथे आधीच ब्रूस ली आणि जोनाथन हजर होते. हे दोघे त्याला रोज त्रास देत. बसमध्ये चढताना धक्काबुक्की करून त्याला चढूच देत नसत. मग राजेशला नेहमी नंतरची बस पकडून कॉलेजात जावं लागे. पण कधीतरी त्यांचं हे बुलींग थांबवायलाच हवं. कधीतरी त्यांना विरोध करायलाच हवा. राजेश आज मनाशी पक्कं ठरवूनच आला होता. बस आली आणि हे दोघे गुंड आले राजेशला त्रास द्यायला. तर राजेश कोणतं गाणं म्हणेल?

हेच लिहायला आले होते पण श्रद्धाने आधीच लिहिलंय Happy
श्रद्धा, तुझं कालचं कोडं वाचलं होतं. सोडवता नाही आलं पण. परत टाक ना.

बरोबर उत्तर श्रद्धा.

७/१२१

धावतपळत राजेश बसस्टॉपवर पोहोचला. बघतो तर नेहमीप्रमाणेच तिथे आधीच ब्रूस ली आणि जोनाथन हजर होते. हे दोघे त्याला रोज त्रास देत. बसमध्ये चढताना धक्काबुक्की करून त्याला चढूच देत नसत. मग राजेशला नेहमी नंतरची बस पकडून कॉलेजात जावं लागे. पण कधीतरी त्यांचं हे बुलींग थांबवायलाच हवं. कधीतरी त्यांना विरोध करायलाच हवा. राजेश आज मनाशी पक्कं ठरवूनच आला होता. बस आली आणि हे दोघे गुंड आले राजेशला त्रास द्यायला. तर राजेश कोणतं गाणं म्हणेल?

उत्तर :
आज ना छोडेंगे 'बस' हम 'जो', 'ली'..

वावे, ते कोडं जरा एडिट करावं लागेल कारण उत्तराच्या गाण्यापर्यंत पोचणे ओढून ताणून वाटू शकेल. मी एडिट करून टाकते थोड्या वेळात. तोवर येउद्या बाकी कोडी. Happy

न गमा (दु:खाची छायाही न पडलेली) ओ 'शेर की सौ' ( वाघिण) गात ( मी गाणे म्हणत) किसे पेश करूं? >> मी वेडा झालो हे वाचून. हे कोडं तयार करणारे आणि सोडवणारे, दोघींनी आता इतरांना पार्टी द्या!

मी पण हरचंद Lol कसलं decoding करतात एकेक ..hats off _/\_
माझ्या आवाक्या बाहेरची कोडी आहेत ही:(
वाचून मजा घेते झालं Happy

७/१२२ -

'गुंडे' सिनेमातले घनिष्ठ गुंडे मित्र रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर चुकीचा मार्ग सोडून देऊन सचोटीने बिझनेस करायचं ठरवतात. सुरुवातीला एकत्र बिझनेस असतो त्यांचा, मात्र दोघेही प्रियांका चोप्राच्याच प्रेमात पडल्याने त्यांच्यात वितुष्ट येतं आणि ते प्रतिस्पर्धी होतात. रणवीर सिंग प्रियांकाशी लग्न करतो. काही वर्षांनी त्याचा बिझनेस जरा अडचणीत येतो. तेव्हाच त्याला एका मोठ्या कंत्राटाबद्दल समजतं. त्यामुळे त्याचा बिझनेस सावरणार असल्याने तो ते मिळवायचा पूर्ण प्रयत्न करायचं ठरवतो. फक्त अडचण ही असते की अर्जुन कपूरही त्याचसाठी प्रयत्न करत असतो. ते त्याला अलमोस्ट मिळणारच असतं, पण ऐनवेळी त्याला मैत्रीची आठवण येते आणि तो स्वतःऐवजी ते रणवीरला मिळावं असा प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी त्या कंपनीच्या ऑफिसात तो रणवीरला भेटायला बोलावतो. मीटिंग रूममध्ये ती कागदपत्रं ठेवलेली असतात. ती रणवीरसाठीच आहेत, हे अर्जुन त्याला कसं सांगेल?
टीप - गाण्याच्या मुखड्यातल्या दोनच ओळी वापरायच्या आहेत. (सलग दोन असतील वा नसतीलही!)
टीपटीप* - कोडं सोडवने हा माजा मेण प्रांत असल्याणे कोडे रचने कितपत जमले म्हाइत न्हाई.
* बरसा पानी.. नव्हे! दुसरी टीप असल्याने एक टीप जास्तीचा लिव्हला आहे.

नाही. कंत्राट रणवीरलाच मिळालंय हे अर्जुनला सांगायचं आहे.

Pages