..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७/११७ >>
जुम्मा चुम्मा दे दे
Lol

बरोबर उत्तर श्रद्धा, झिलमिल

७/११७
घटस्फोटानंतर वडिलांनी एका इस्त्राईली स्त्रीशी लग्नं केलं हे लहानग्या चिंटूला अजिबात झेपलं नव्हतं. तो तिला आई मानायलाच तयार नव्हता. पण चिंटूच्या एका मोठ्या आजारात नव्या आईनं त्याची खूप काळजी घेतली आणि त्याला या आईबद्दल प्रेम वाटू लागलं. आपण तिला इतके दिवस आई म्हणून हाक मारायलाही तयार नव्हतो याची त्याला लाज वाटायला लागली. म्हणून त्यानं ठरवलं की आपण ही चूक सुधारायचीच. आई हाक मारून तिची छानपैकी पापी घ्यायची आणि तिला खूष करायचं. तर आई आल्यावर तो कोणतं गाणं म्हणेल?

उत्तर :
ज्यू माँ चुम्मा दे दे
ज्यू माँ चुम्मा दे दे चुम्मा

७/११८

ती जपानी तरुणी त्या तळ्यावर तिच्या लाडक्या माश्याचं काचेचं भांडं धुवायला घेऊन येते. मासा एका छोट्या वाटीत काढून ती ते भांडं धुवत असताना कधीतरी तो मासा तळ्यात उडी मारतो. लक्षात आल्यावर ती शोध शोध शोधते. फार लाडका मासा असतो तो तिचा- चकचकीत पांढरा आणि त्यावर केशरी नक्षी. तिनं तर त्याला बोलायलाही शिकवलेलं असतं आणि तो तिचं नाव उच्चारायला शिकलेला असतो. म्हणून तर स्पेशल असतो तो अगदी तिच्यासाठी. तेवढ्यात तिला कोणी तिच्या नावानं हाक मारतंय असा भास होतो - अग्गबाई हा तर आपलाच लाडका मासा, त्याचाच हा आवाज ..... ती तळ्यात पुन्हा शोधू लागते पण तिला तो दिसत नाही. तर ती कोणतं गाणं म्हणेल?

118 -
लुका छुपी बहुत हुई salmon ए आजा ना..
कहां कहां ढुंढा तुझे
थक गई अब तेरी मां..

माशाच्या रूपाचे वर्णन जुळत नाहीये पण.

नाही श्र.

क्ल्यु १ : तरुणीच्ं आणि माश्याच्ं वर्णन महत्त्त्वाच्ं. शिवाय माश्यानं तिला हाक मारलीये.

छुप गया कोई रे, दूर से पुकार के?

मासा कोई आहे हे नक्की. पण यात तरुणी जपानी असो की भारतीय फरक पडत नाहीये त्यामुळे हेही नसावे.

येस्स्स. बरोबर उत्तर श्रद्धा.

जपानी लोकांना कोई माश्यांचं विशेष कौतुक म्हणून ती तरुणी जपानी आहे ही जास्तीची माहिती.

७/११८

ती जपानी तरुणी त्या तळ्यावर तिच्या लाडक्या माश्याचं काचेचं भांडं धुवायला घेऊन येते. मासा एका छोट्या वाटीत काढून ती ते भांडं धुवत असताना कधीतरी तो मासा तळ्यात उडी मारतो. लक्षात आल्यावर ती शोध शोध शोधते. फार लाडका मासा असतो तो तिचा- चकचकीत पांढरा आणि त्यावर केशरी नक्षी. तिनं तर त्याला बोलायलाही शिकवलेलं असतं आणि तो तिचं नाव उच्चारायला शिकलेला असतो. म्हणून तर स्पेशल असतो तो अगदी तिच्यासाठी. तेवढ्यात तिला कोणी तिच्या नावानं हाक मारतंय असा भास होतो - अग्गबाई हा तर आपलाच लाडका मासा, त्याचाच हा आवाज ..... ती तळ्यात पुन्हा शोधू लागते पण तिला तो दिसत नाही. तर ती कोणतं गाणं म्हणेल?

उत्तर :
छुप गया Koi रे दूर से पुकार के

जपानी लोकांना कोई माश्यांचं विशेष कौतुक म्हणून ती तरुणी जपानी आहे ही जास्तीची माहिती.<<<<<< ओहह हां, बरोबर! Happy

हे कोई माशाचं माहिती नव्हतं. मी आधी काही तरी केसरिया बालम वगैरेवालं गाणं असेल असं समजून सोडून दिलं होतं. श्रद्धाने लिहिल्यावर गूगल केला कोई मासा.

७/११९

एक लहान मुलगी समुद्रावर खेळायला गेली असताना समुद्रात बुडायला लागते. पण एक पाकटमासा तिला वाचवतो आणि किनार्‍यावर आणून सोडतो. त्यांची मैत्री होते आणि ती रक्षाबंधनाला त्याच्या कल्ल्याला राखीही बांधते. ती त्याला आपला भाऊ मानते. पुढे ती मोठी होते, लग्नं होतं, मुलं होतात. त्यांना अर्थातच ही सर्व गोष्ट तिनं एकदा नव्हे अनेकदा सांगितलेली असते. एकदा ती आपल्या मुलांना घेऊन पुन्हा त्या समुद्रावर येते माश्याला भेटायला. तो ही तिला आणि तिच्या मुलांना भेटायला पोहत येतो. तर त्याला पाहून तिची मुलं कोणतं गाणं म्हणतील?

बरोबर उत्तर श्रद्धा.

Ray मामा, Ray मामा Ray

त्याच्या कल्ल्याला राखीही बांधते >> हे वाक्य मला दोनदा वाचावं लागलं. आधी चुकून वेगळंच वाचलं. दुसऱ्यांदा वाचताना कल्ला काय झोल झाला ते.

७/१२०

फार फार वर्षांपूर्वी बगदाद शहरात एक स्त्री रहात असे. तिला एक मुलगी होती. ती मुलगी नेहमी खूप आनंदी असे. जणू दु:ख तिला कधी शिवलेच नाही. त्यामुळे या मुलीला सगळे 'दु:खाची छायाही न पडलेली' अश्या नावानं ओळखत. या स्त्रीकडे एक वाघ आणि वाघिण होते त्याने पाळलेले आणि त्यातील वाघिण आणि ही मुलगी यांची खूप छान मैत्री होती.

त्यांच्या या मैत्रीची कथा बगदादच्या बादशहापर्यंत पोहोचली. त्याने या दोघींना दरबारात बोलावलं. बादशहाकडून आमंत्रण आलं म्हणजे नुसतंच दोघींना त्याच्यासमोर हजर न करता त्यांचा काही एक विशेष कार्यक्रम तयार करायचा असं त्या स्त्रीनं ठरवलं आणि त्याप्रमाणे एक छोटासा कार्यक्रम बनवला - ज्यात मुलगी आणि वाघिण दरबाराच्या एका टोकानं प्रवेश करून एकत्र चालत, नाचत, कोलांट्या उड्या मारत समोर बसलेल्या बादशहाच्या सिंहासनाजवळ जाऊन त्याला कुर्निसात करतात असा आयटेम तिनं बसवला. या कार्यक्रमाला बॅकग्राउंड म्युझिक म्हणून त्या स्त्रीनं स्वतःच गाणं म्हणायचं ठरवलं - चांगलं गायची ती.

ठरल्या दिवशी ती, तिची मुलगी आणि वाघिण दरबारात पोहोचून बादशहाची वाट बघत बसतात. पण आयत्यावेळी काही काम निघाल्यानं बादशहा दरबारात येण्याचं कॅन्सल करतो. आता कोणापुढे कार्यक्रम सादर करणार? निराशेनं ती स्त्री कोणतं गाणं म्हणेल?

बरोबर उत्तर श्रद्धा. आणि मानवलाही क्रेडिट द्यायलाच हवं.

उत्तरः
न गमा (दु:खाची छायाही न पडलेली) ओ 'शेर की सौ' ( वाघिण) गात ( मी गाणे म्हणत) किसे पेश करूं?

Pages