..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७/११२ - >>
तुझे जीवन की डोर से बाँध लिया है
??

झिलमिल..... Happy येस!
तुम्हाला डॉमिनोज चे दोन झिंगी पार्सल्स !

७/१११

आंबटगोड, रानभुली, mrunali.samad, नाही. रानभुली, तुम्ही सुचवलेली गाणी भारी आहेत! पण इथे गाणं वेगळं आहे. पण असंच आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग लागणार आहे.

क्लू क्र १: गाणं मराठी आहे
क्लू क्र २: तो स्वतः 'सीरिअल किलर' असल्याचं सांगतो. हे महत्त्वाचं आहे. नुसतं मारणं नाही.

7/111

Kill Bill, Kill Bill पक्षी बोलती

किलरचं नाव बिल आणि त्याच्या डोक्यात पक्षी येऊन लोकांना मारायला सांगतात

बापरे ! मामी..... Happy फारच आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग..!

वावे, तू काय दिलं होतंस वर्णन?.............. लगेच ओळखलं का लोकान्नी? Happy

अजून एक क्लू
सिरियल किलरला नवीन मराठी शब्द शोधून काढा. तो जमला की गाणं सापडेल.

मी "ओळ खून" आहे सारे तुझे बहाणे.... लाजून हासणे अन हासून ते पहाणे... >> क्या बात है सी! भन्नाट!

मस्त कोडं आणि डिकोडं!

मस्त! 'ओळखुनी' असतं तर परफेक्ट झालं असतं Happy
आंबटगोड, माझं कोडं नव्हतं अगदी लगेच ओळखलं गेलं! १९ व्या पानावर आहे.

७/११३:
एकदम सोप्प.
एक व्यक्ती Gay आहे आणि ती गाण्यातून ते सांगते आहे.

113 -
आदमी हूं आदमी से प्यार करता हूं?

सीमंतिनी, 'ओळ खून' खतरनाक भारी! :टाळ्या:

सीमंतिनी, जबरा! पैठणी घ्या.

ओळखुनी' असतं तर परफेक्ट झालं असतं >> हो. पण इथे आपण हा समास तत्पुरुष न सोडवता बहुव्रीही सोडवू; ओळीने खून करणारा असा तो. (जरा ओढून ताणूनच आहे, पण एवढ्यावरही ओळखता आलं ही कमाल आहे!)

७/११३ -
अजून काही उत्तरे:

१. दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तडपाओ गे! (आणि पुढच्या आणखी काही गेकारान्त ओळी)
२. गे मायभू तुझे मी

7/114
बंटी त्या लक्झुरी रिझोर्ट मधे housekeeping supervisor म्हणून नोकरी धरतो आणि योग्य संधी पाहून बबली रिझोर्टमधे 11 नंबरच्या स्वीटमधे रहायला येते. आज रात्री शेजारच्या स्वीटवर डल्ला मारून तिथे राहणार्या अतिश्रीमंत स्त्रीचे दागिने लुटण्याचा दोघांचा बेत असतो. आज त्या रिझोर्टवर रात्रीची रंग होळी आयोजित केली असते त्यामुळे सगळे गेस्ट्स त्यात गुंतलेले असणार. शिवाय बंटीजवळ मास्टर की होतीच.

रात्री होळी सुरु झाल्यावर शेजारच्या स्वीटसमोर उभी राहून बंटीची वाट बघत बबली कोणतं गाणं म्हणेल?

नाही.

क्ल्यु १: हिंदी गाणे
क्ल्यु २: मास्टरकी ला काय नाव असू शकतं ( कोडं क्र. ७/१११ च्या धर्तीवर) हे शोधलं की लग्गेच उत्तर येईल. यातल्या केवळ पहिल्या शब्दालाच पर्यायी शब्द शोधायचा आहे आणि हा शब्द हिंदी-मराठी दोन्ही भाषेत आहे.
क्ल्यु ३: क्ल्यु २ वरून शब्द मिळाला की लगेच उत्तर येणारच. पण ज्या स्वीटमधे चोरी होणार आहे त्याचा नंबरही गाण्यात आहे. किंबहुना मास्टरकी आली की ती घेऊन या स्वीटमध्ये जाण्याची मनिषा बबली गाण्यातून बोलून दाखवत आहे.

Pages