..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७/९५ :
तेरी दुनियासे होके मजबूर चला
मै बहोत दूर बहोत दूर चला

रानभुली ने जिंकले आहेत बास्केट भरून सिंधुरा आंबे..
अग वर आहेत..घे पटकन Lol
प्रयत्न करणार्यांना पण दोन दोन आंबे बक्षीस. Lol

७/९५ उत्तर-
सांडलेल्या कचर्याच्या ओळी- बीन तेरे सनम मर मिटेंगे हम आ मेरी जिंदगी
मग घंटागाडी च्या ओळी- आना हि पडा सजना जालीम है दिल कि लगी

Happy
एक्च्युली हे कोडे सत्य घटनेवर आधारित होते.
बाल्कनीतून समोरच्या घरातला त्यांच्या दारात ठेवलेला डस्टबीन नेहमी भटकी कुत्री पाडतात,ते दिसते त्यावरून प्रेरित Lol

द्या आता कुणी पुढचे कोडे.

मी कोडं घालतो, पण बाकीच्या कुठल्याच कोड्याचं उत्तर देता आलं नाही म्हणून नामुष्की वाटून घेतली आहे. असो, मी कोडं घालण्याचं कर्म करतो, दुसर्‍या कोड्यावर फळाची अपेक्षा नाही (तसे वरती प्रयत्नाबद्दल दोन आंबे मिळालेच आहेत म्हणा! पुढच्या वेळी अजून प्रयत्न करेन) :

७/९६
किस्सा छूनेवाले माशी का
ए सी पी प्रद्युम्नाकडे एक विचित्र केस येते. एका माणसाचा नर माशी (माशा/मासा - काय म्हणतात त्याला) चाऊन मृत्यू झाला. चावणार्‍या माशीने कुठलाही मागमूस ठेवला नव्हता. असे अनेक खून ती करत सुटली होती. ह्यावर उत्तर फक्त सी आय डी कडेच सापडणार होतं.

ए सी पी प्रद्युम्न त्याच्या टीमसकट खुनी/चावर्‍या माशीचा माग काढायला जातो. त्या मेलेल्या माणसाच्या घराचा दरवाजा बंद असतो. नेहमीप्रमाणे ए सी पी प्रद्युम्न ओरडतो, 'दया, दरवाजा तोड दो'. दया दार एका लाथेत तोडून आत घुसतो आणि समोर पाहतो तर एक मुलगी मरणासन्न अवस्थेत पडलेली असते. तिच्या अंगावर ती नर माशी चढलेली असते. 'अनेकांच्या हत्येचं पातक शिरावर घेतलेली ही माशी बघ माझ्या अंगावर चढली आहे आणि मला स्पर्श करते आहे', ती मुलगी त्याला हे गाण्यात सांगते. तर त्यावर दयासकट बाकीचे सगळे 'असा कसा त्या माशीने स्पर्श केला?' असं गाण्यात तिला विचारतात.

7/96
दया रे दया (दैया रे दैया) चढ गयो पापी बिछुआ

तशी बिच्छू वर बरीच गाणी आहेत. पण इथे माशी आहे.>> इथे ते बिछुवा म्हणजे बि bee अंगावर चढून स्पर्श केला अस आहे. आणि हे ती दयाला सांगतेय म्हणून दया रे दया (दैया रे दैया) चढ गयो बि छुवा

मला श्र च गाणं बरोबर वाटतय

श्रद्धा - परफेक्ट! कविन, बरोबर. बी छुवा ही फोड केली आहे.

दोघांना माझ्यातर्फे काटेवाडी म्हशी बक्षीस! (आंबे दोनच होते माझ्याकडे, म्हशी चिकार आहेत)

मुलगी - दया रे दया रे चढ गयो पापी बी छुवा
सगळे - कैसो रे पापी बी छुवा?

अरे त्या शैलेंद्र चा आत्मा काय म्हणेल वरुन. माझ्या क्लासिक गाण्याची अशी तोडफोड.(हलकेच घ्या लोक्स)

पब्लिक थंडावलेले दिसते. मग हे घ्या नवीन

७/९७ - एक माणूस एका पार्कात रोज जात असतो. तेथे अनेक फॅन्सी बाकडी असतात बसायला. पण त्याला एक अत्यंत साधा बाक आवडत असतो. तो नेहमी तेथेच बसतो. एकदा वसंत ऋतूत आजूबाजूला सगळी फुले फुललेली असताना तेथे असलेल्या या बाकाकडे बघून तो कोणते गाणे म्हणेल?

हे उत्तर नाहीये मला माहितीये पण 'बाक' वाचून हीच ओळ आठवली.

ये शोखियां, ये 'बाक'पन, जो तुझमे है...
कही नही.. Proud

बाक pun चा मोह अगदीच आवरला नाही.

Pages