..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निकलेंगे मैदान मे जिस दिन झुमके,
धरती बोलेगी ये कदम चुमके
नहीं समझे है वो हमे तो क्या जाता है
हारी बाजी को जितना हमे आता है
याहांके हम सिकंदर
चाहे तो रख ले सबको अपने जेब के अंदर.

Are मृणाली अक्का,
लिहिले आता उत्तर.
बक्षीस तुम्हीही घ्या.
Happy

७/१०३

ती परगावाहून परत येऊन स्टेशन वर वाट बघत असते. तो तिला घ्यायला येणार असं ठरलं असून तो मात्र आलेला नसतो. तिचं टाळकं सटकतं. ती त्याला फोन लावते.
"अरे मला घ्यायला आला नाहीस तू. मी फार थकले आहे आणि टॅक्सी साठी माझ्याकड़े पैसे पण नाहीत." - ती
"अगं, एक तातडीचं काम निघालं म्हणून येऊ शकलो नाही. पण मी एक 'प्री-पेड' टॅक्सी ठरवून स्टेशन ला पाठवली आहे. तीत बसून घरी ये." - तो
"बरं" - (शांत होत) ती
अश्या रीतीने त्या टॅक्सीने ती घरी येऊन त्याला उद्देशून कुठले गाणे म्हणेल ?

तरी मी " कोई हसीना कदम पहले उठाती नही, मजबुरी दिलकी ना हो तो पास आती नहीं" ह्या राम तेरी गंगा मैली गाण्यावर हसीना कदम यांची आंतरधर्मीय लव्ह स्टोरी टाकणार होतो.
हसीना कदम पेक्षा धरती कदम दिले मग. Wink

७/१०३
तेरे दर पर सनम चले आये,
तू ना आया तो हम चले आये

७/१०४
अनिताला रात्री अचानक झोपेतून जाग आली. तिला जाणवलं, की ह्रदयाची धडधड वाढलीय आणि श्वास घ्यायलाही त्रास होतोय. इतक्या जणांचे अनुभव ऐकून आणि माहिती वाचलेली असल्याने आपल्याला हार्ट अटॅक येतोय, अशी तिला शंका आली. मग नवऱ्याला उठवून तिने अँब्युलन्स बोलवायला सांगितली. असा पहिलावहिला हार्ट अटॅक अनुभवताना अनिताला कोणतं गाणं आठवेल?

बरोबर सोनाली

७/१०३

ती परगावाहून परत येऊन स्टेशन वर वाट बघत असते. तो तिला घ्यायला येणार असं ठरलं असून तो मात्र आलेला नसतो. तिचं टाळकं सटकतं. ती त्याला फोन लावते.
"अरे मला घ्यायला आला नाहीस तू. मी फार थकले आहे आणि टॅक्सी साठी माझ्याकड़े पैसे पण नाहीत." - ती
"अगं, एक तातडीचं काम निघालं म्हणून येऊ शकलो नाही. पण मी एक 'प्री-पेड' टॅक्सी ठरवून स्टेशन ला पाठवली आहे. तीत बसून घरी ये." - तो
"बरं" - (शांत होत) ती
अश्या रीतीने त्या टॅक्सीने ती घरी येऊन त्याला उद्देशून कुठले गाणे म्हणेल ?

उत्तर - तेरे दर (म्हणजे rate - त्याने ठरवलेला प्री-पेड rate) पर सनम चले आए; तू न आया तो हम चले आए

असिडीटीचे गाणे
सीने मे जलन आंखोंमे तुफान सां क्यू है

दोन्ही नाही.
ती तिला काय वाटतंय, काय असू शकेल ते गाण्यातून सांगतेय.

क्लू नं. १
नायक - नायिका दोघांचाही पहिला चित्रपट.

Pages