..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजकपूरचं जोश ए जवानी हाए रे हाए आहे का?
त्यात
'दुनिया का मेला, मै हूं अकेला
कितना अकेला हूं मै...'
अशा ओळी आहेत.

जुनं गाणं नाही.
Submitted by mrunali.samad >>>>> ८०-२००० मधले आहे की त्यानंतरचे?

७/१०२
मैदानाशेजारी एक वसाहत आहे, तेथील खेळात मग्न धरती शिंदे मैत्रिणीला तिच्या प्रेमाविषयी आणि घरातील लोकांच्या विरोधाविषयी सांगतेय. तिच्या प्रियकराला आकाश कदमाला प्रेमाची कबुली ह्याच जागी देणार असेही सांगतेय. कसे सांगेल?

आहधी माझे कोडे, अभ्या सर Lol

नायकाच्या सगळ्या सिनेमातील गाणी हिट असतात,सिनेमा फ्लॉप असला तरी.. सरळ क्लु उत्तराकडे घेऊन जाईल. Happy
तो गर्दीत, एकटा, दु:खात कसाही असला तरी त्याला घरचे आठवताएत.

७/1०२

ये धरती ये अंबर जब से तेरा मेरा प्यार है तबसे

७/१०१
दोन >२००० मिळाली

भीड़ में तनहाई में; प्यास की गहराई में
दर्द में रुसवाई में; मुझे तुम याद आते हो (२)
----- यात वडील, बहीण, मैत्रीण, ड्रायवर (= नाती) दिसतात. कोडे-शब्द नीटसे जुळत नाहीत.

रिश्ते तो नही रिश्तों की, परछाईयाँ मिले
ये कैसी भीड़ है बस यहाँ, तनहाईयाँ मिले
----- यात कोडे-शब्द जुळतात. पण नातेवाईक दिसत नाहीत. कोणीतरी ओले केस झटकत गातायत + जनरल गर्दी

येस्स.. मला विश्वास होता उत्तर तुच घेऊन येशील Wink
तुला अर्धा किलो आणि बाकी सगळ्यांना चार चार रसगुल्ले बक्षीस. Lol
आता अभ्या सरांच्या कोड्यावर फोकस करते.

७/१०२
नीले गगन के तले धरती का प्यार पले?

कलू: षोडश वयीन प्रेम आणि क्रीडा.
हिरोचे नाव लहान कलावांताशी तर हिरोईन चे नाव मोठ्या कलावंताशी जोडले गेले ( वयाने अनुभवाने लहान मोठे नाव)

तू तो महात्मा गांधी है टून्ना.
तू तो सरोजिनी नायडू है टून्ना.
.
पिक्चर ओळखाल, गाणे नाही हे शुअर.
पुढच्या प्रतिसादात गाणे द्यावेच लागणार.

Pages