..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्र आणि रानभुली यांची पण जमतील पण sonalisl यांचे उत्तर बरोबर आहे, तेच गाणे डोक्यात ठेवून तो प्रश्न लिहीला होता Happy

आणि बाकपन ची पन तीच आहे Happy

७/९८
वैवाहिक आयुष्यातली सुरुवातीची बरीच वर्षे काबाडकष्ट केल्यावर अखेर कोकणात घर घेण्याचं सुनील-सुनीता ह्यांचं स्वप्न पूर्ण होतं. सुंदर बैठं घर, त्याला लागूनच छोटीशी पोफळीची बाग आणि लगेच मागे समुद्रकिनारा; जणूकाही प्रायव्हेट प्रॉपर्टीच !
त्या घरी राहायला आल्यावर एका पहाटेच ते दोघं समुद्रकिनाऱ्यावर walk ला जातात. थोडंसंच दूर गेल्यावर त्यांना एक कुत्रा वाळूतून एका मोठी suitcase उकरून काढतो आहे असं दिसतं. सुनील ने तरुणपणी अनेक crime, suspense, murder mystery नॉव्हेल्स वाचलेल्या असल्याने त्याला भलतीच शंका येते. कुत्र्याला हाकलून देऊन तो जोर लावून ती suitcase बाहेर काढतो आणि थरथरत्या हाताने उघडतो. पाहतो तर काय ! ती suitcase पाचेकशे ताज्या पावांनी भरलेली असते. ते बघून सुनील सुनीताला उद्देशून कुठलं गाणं म्हणेल ?

एका सुटकेसमध्ये 500 वगैरे पाव म्हणजे 'दबे पांव' असू शकतात. शिवाय 'सुनि(ता) ये' वगैरे देखील. Lol पण आत्ता गाणं सोडवायला अगदीच वेळ नाही. येते थोड्या वेळाने.

फार जुने नाही हे गाणे. श्रद्धाताई साधारण योग्य दिशेनी विचार करत आहेत. पण त्या दोघांच्या नावाचं काही कनेक्शन नाहीये.

क्लू - 'पाव' चा इथला प्रचलित प्रतिशब्द वापरून बघा

७/९८
दर्या किनारे एक बंगलो गो पोरी
दर्या किनारे एक बंगलो >>>> कोकणात घर + लगेच मागे समुद्रकिनारा

बंगलो >>>> bungalow >>>> कोड्यासाठी bun + gallo = पावांनी भरलेली सूटकेस
bun >>>>>> पाव +
gallo >>>> Gabbiano चे suitcase brand

गो पोरी >>>> बायकोला उद्देशून ( अगं हे बघ काय सापडलं)

नाय ओ. एवढं क्लिष्ट नाहीये ते. एवढा कॉम्प्लेक्स विचार नाही झेपत मला :).
अजून एक क्लू - समुद्र किनारा इन इंग्लिश. खूप सारे आणि ताजे बन.

७/९८
वैवाहिक आयुष्यातली सुरुवातीची बरीच वर्षे काबाडकष्ट केल्यावर अखेर कोकणात घर घेण्याचं सुनील-सुनीता ह्यांचं स्वप्न पूर्ण होतं. सुंदर बैठं घर, त्याला लागूनच छोटीशी पोफळीची बाग आणि लगेच मागे समुद्रकिनारा; जणूकाही प्रायव्हेट प्रॉपर्टीच !
त्या घरी राहायला आल्यावर एका पहाटेच ते दोघं समुद्रकिनाऱ्यावर walk ला जातात. थोडंसंच दूर गेल्यावर त्यांना एक कुत्रा वाळूतून एका मोठी suitcase उकरून काढतो आहे असं दिसतं. सुनील ने तरुणपणी अनेक crime, suspense, murder mystery नॉव्हेल्स वाचलेल्या असल्याने त्याला भलतीच शंका येते. कुत्र्याला हाकलून देऊन तो जोर लावून ती suitcase बाहेर काढतो आणि थरथरत्या हाताने उघडतो. पाहतो तर काय ! ती suitcase पाचेकशे ताज्या पावांनी भरलेली असते. ते बघून सुनील सुनीताला उद्देशून कुठलं गाणं म्हणेल ?

उत्तर - तेरे मेरे बीच (समुद्र किनारा) मे (बीच मे - कारण पुरून ठेवलं होतं) कैसा है ये बंधन (bun धन - खूप सारे आणि ताजे; जणू धनच) अंजाना...

७/९९
राजेश आणि भाग्येश दोघे मित्र असतात.भाग्येश तिसर्या मजल्यावर राहतो आणि राजेश ग्राउंड फ्लोअर वर.
एके संध्याकाळी दोघे मिळून राजेशच्या अंगणात रांगोळी काढत असतात, गप्पा टप्पा मारत.कुठल्या तरी गोष्टीवरून भाग्येश चिडतो आणि छान काढलेली रांगोळी खराब करून तावातावाने घरी निघून जातो.त्याला उद्देशून कोणते गाणं म्हणेल बरं राजेश??

7/99
बना के क्यू बिगाडा रे, बिगाडा रे नसिबा...
उपरवाले..

@ ऋष्या, ७/९८
मला बन धन च्या पुढे-मागे काही सुचले नाही म्हणून मारून मुटकून glow /glo/galo शोधले. Happy तर सूटकेस सापडली. म्हटले कुत्रा ओढतोय वगैरे तर महत्त्वाचा आयटेम आहे कोड्यातला. पण कोडे छान होते.

७/१०० शतक पूर्ण करूया

खूप दिवसांपासून रश्मी मागे लागलेली असती म्हणून राज तिला एकदा cocktail drinks प्यायला हॉटेल मध्ये घेऊन जातो..तिथे गेल्यावर ती इतकी खुश होते की तिचे डोळे आनंदाने चमकायला लागतात....गाण्यात कशी व्यक्त करेल रश्मी आपल्या भावना?

जर्रासा झूम लू मै
किंवा
दो घूंट मुझेभी पिला दे शराबी
किंवा
ला पिला दे साकिया

Pages