..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)

Submitted by मामी on 9 January, 2014 - 01:01

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

**********************************************************************************************************

पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.

पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.

स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.

स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.

सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.

श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).

कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.

धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.

धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.

या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन माणसाचा आनंद टिकुच देत नाही तुम्ही

कोडे क्र.: ०७/३३
1.jpg

ये दिन क्या आये लगे फूल हसने
देखो बसंती बसंती होने लगे मेरे सपने

जिप्सी, तुमचे बक्षिस : वसंतात फुलणारी हजारो फुलं Happy

नविन माणसाचा आनंद टिकुच देत नाही तुम्ही>>>>:फिदी:

जिप्सी, तुमचे बक्षिस : वसंतात फुलणारी हजारो फुलं>>>>>धन्यवाद!!! Happy

७/३१:
जलता है बदन हो जलता है बदन
प्यास भड़की है सरे शाम से जलता है बदन
इश्क़ से कह दो कि ले आए कहीं से सावन
जलता है बदन

बरोबर झिलमिल Happy

कोडे क्र.: ७/३१:
जलता है बदन हो जलता है बदन
प्यास भड़की है सरे शाम से जलता है बदन
इश्क़ से कह दो कि ले आए कहीं से सावन
जलता है बदन

तुम्हाला गरमागरम कॉफी आणि मावा केक. Happy

लोक्स, माझं एक कोडं पेन्डींग आहे

कोडे क्र.: ०७/२७:

जगजीतची जाम गोची झाली होती. मनमीत सिंग त्याचा जानी दोस्त. सुखबीर ही मनमीतची गर्लफ्रेंड. ती मनमीतची जीव की प्राण. पण तिच्या ऐश्वर्या रायसारख्या डोळ्यांत पाहिल्यापासून जगजीतला सुध्दा ती आवडायला लागली होती. एकीकडे दोस्ती आणि दुसरीकडे प्रेम अश्या कात्रीत तो सापडला होता. काही बोललं तर मित्र दुखावणार आणि नाही बोललं तर स्वत:लाच त्रास. शेवटी मनमीत आणि सुखबीर दोघे आसपास असताना त्याने एक गाणं म्हणून टाकलं. त्यांना कळलं तर सोन्याहून पिवळं. नाही कळलं तरी आपण सांगून टाकल्याचं समाधान. जगजीतने कोणतं गाणं म्हटलं असेल?

०७/२७

तु प्यार है किसी और का
तुझे चाहता कोई और है
तु पसंद है किसी और की
तुझे मानता कोई और है

रिया. | 15 January, 2014 - 14:21
स्वप्ना,
तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है?>>>

इथे रियाने हेच गाणं दिलय उदयन. पण प्रश्नकर्तीचा रि नाहीये त्यावर म्हणून आपलं मी दुसरं गाणं पण देऊन ठेवलं Proud

अच्छा...........जुने आदिम काळातले गाणे असतील हे ........... मे बनका पंछी बनके डोलु रे टाईप

श्रध्दा, रिया, कविन, उदयन नाही.

"ती मनमीतची जीव की प्राण" ही ओळ क्लू आहे. हा चित्रपट ८० च्या दशकाच्या आधीचा आहे. गाणं हिन्दी असलं तरी त्यात एक मराठी तरुण हिरो आहे.

०७/२७:
जानेमन (जान-ए-मन : मनमीतची जीव की प्राण) जानेमन तेरे दो नयन (ऐश्वर्यासारखे डोळे!)
चोरी चोरी लेके गये देखो मेरा मन..

कोडे क्र.: ०७/२७:

जगजीतची जाम गोची झाली होती. मनमीत सिंग त्याचा जानी दोस्त. सुखबीर ही मनमीतची गर्लफ्रेंड. ती मनमीतची जीव की प्राण. पण तिच्या ऐश्वर्या रायसारख्या डोळ्यांत पाहिल्यापासून जगजीतला सुध्दा ती आवडायला लागली होती. एकीकडे दोस्ती आणि दुसरीकडे प्रेम अश्या कात्रीत तो सापडला होता. काही बोललं तर मित्र दुखावणार आणि नाही बोललं तर स्वत:लाच त्रास. शेवटी मनमीत आणि सुखबीर दोघे आसपास असताना त्याने एक गाणं म्हणून टाकलं. त्यांना कळलं तर सोन्याहून पिवळं. नाही कळलं तरी आपण सांगून टाकल्याचं समाधान. जगजीतने कोणतं गाणं म्हटलं असेल?

"ती मनमीतची जीव की प्राण" ही ओळ क्लू आहे. हा चित्रपट ८० च्या दशकाच्या आधीचा आहे. गाणं हिन्दी असलं तरी त्यात एक मराठी तरुण हिरो आहे.

उत्तर:
जान-ए-मन जान-ए-मन तेरे दो नयन
चोरी चोरी लेके गये देखो मेरा मन

श्रध्दा, तुला मनमीत आणि सुखबीरच्या लग्नाची आमंत्रणपत्रिका. लग्न अमृतसरला आहे बरं का. आणि हो, Radisson Blu Hotel च्या Premier Suite चं ३ दिवस २ रात्रीचं पॅकेज. सुध्दा Happy

०७/३२:

सात समुंदर पार से, गुडियों के बाजार से
अच्छी सी गुडिया लाना...
गुडिया चाहे ना लाना
पापा जल्दी आ जाना

Pages