शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

आई स्मार्ट नाही असं कुठे म्हणतं कोण ? (परत बघणे आले!) एस३ ए१ मधे पेरेन्ट्स ना बघून जॉन म्हणतो "दे आर जस्ट ... ... ऑर्डिनरी" तेवढं आठवतंय.

सि३ए२ मध्ये मिसेस हडसन तिच्या लग्नात तिची मैत्रिण कशी लव्कर गेली सांगताना शेरलॉक तिला बिस्किट्स आणायला पिटाळतो तेव्हा ती वैतागून म्हणते की आय अ‍ॅम रियली गोइंग टो हॅव अ वर्ड विथ युर मदर. त्यावर तो आई स्मार्ट नाही अशा अर्थाचा काही डायलॉग म्हणतो असं मला वाटतय. पण मी पाहिलं तेव्हा कॅप्शन ऑन नव्हत्या.

ओके ओके. मी आई का कोण जाणे इन्टरनेट एक्स्प्लोअरर समजले Lol

अगं E2मधे मिसेस हडसन म्हणते की मी तुझ्या आईशी बोलणार आहे, तेव्हा शेरलॉक अशा अर्थाचं बोलतो काहीतरी. आय हॅव अ लिस्ट - मायक्रॉफ्ट हॅज अ फाइल Lol

आणि आईवडील भेटायला येतात तेव्हाही अगदी वैतागून जवळपास हाकलून लावतो.
बाय द वे, ते कम्बरपेरेन्ट्स आहेत म्हणे खरे.

कॅप्शन ऑन करून बघणे म्हणजे शेरलॉकचा अपमान आहे. बाणेदारपणे पुन्हा पुन्हा बघा. जे ऐकु येत नाही ते लॅपटॉपवर इयरफोन्स लावून बघा पण कॅप्शन्स ऑफ ठेवा. Happy

अरे तुमचं बरोबर आहे बाई. ते त्याचे रियल लाइफ पेरेंट्स आहेत.

आणि छोटा शेरलॉक स्टीव्ह मोफॅटचा मुलगा आहे Happy

कम्बरपेरेन्ट्स ? त्याची आई तर १९७०- ८० मधली हॉट अ‍ॅक्ट्रेस वगैरे होती आणि लोक त्याला आताही युअर मॉम वॉज हॉट हे सांगून एम्बरॅस करतात असं म्ह्णाला होता एका इन्टरव्यूत! आता एस३ नीट पहायला हवा!
काही म्हणा, त्या ब्रिट अ‍ॅक्सेन्टमुळेच तर मजा आहे.त्यात कम्बरनाथाचा आवाज Happy मॉरिआर्टी पण म्हणतो "गॉट टु अ‍ॅड्मिट, यु से इट मच सेक्सिअर " Lol

>> आय हॅव अ लिस्ट - मायक्रॉफ्ट हॅज अ फाइल
अगं ती म्हणते की युअर मॉम हॅज अ लॉट टु आन्सर फॉर. त्यावर. Proud

>> आणि छोटा शेरलॉक स्टीव्ह मोफॅटचा मुलगा आहे
ओह हो का! त्याला बिचार्‍याला मायक्रॉफ्ट किती छळतो! Happy

सिंडरेला....कॅप्शन वाल्या पोस्टला +१.... Happy पण पहिल्यांदा एखादी ब्रिटिश सीरीज पाहताना तो अ‍ॅक्सेंट समजत नाही पटकन....ते अतिशय फास्ट बोलतात....मी MI 5 कॅप्शनच्या मदतीनेच पाहू शकले....त्याचे बरेच एपि पाहिल्याने हळूहळू ब्रिटिश अ‍ॅक्सेंट 'गमू' लागला....आता नाही वापरत कॅप्शन..शेरलॉकमधे पण एखाद- दुसरा संवाद निसटून जातो आधीच्या वाक्याचा विचार करेपर्यंत....मग फिरून पाहणे आलेच....कारणच हवं असतं पुनरावलोकनासाठी.... हे हे....:)

>कॅप्शन ऑन करून बघणे म्हणजे शेरलॉकचा अपमान आहे. बाणेदारपणे पुन्हा पुन्हा बघा. जे ऐकु येत नाही ते लॅपटॉपवर इयरफोन्स लावून बघा पण कॅप्शन्स ऑफ ठेवा.
सिंडरेला, १००० मोदक !!!

अजून एक आठवलं. मायक्रॉफ्ट शरलॉक ला फोन वर "रिमेम्बर रेडबिअर्ड?!" असं म्हणतो (जॉन च्या वेडिंग च्या वेळी - "डोन्ट गेट इन्वॉल्व्ड" सांगताना) त्याचा काय संदर्भ आहे ? शरलॉक म्हणतो " आय अ‍ॅम नॉट अ चाइल्ड अनीमोर" ... रेडबिअर्ड त्यांच्या डॉगीचं नाव असतं हे ए३ मधून आठवतंय पण हा संदर्भ काही लक्षात आला नाही.

अरारा आता संध्याकाळपर्यन्त थांबावं लागणार त्या प्रोमोसाठी Sad असा कसा असेल पण, अजून फिल्मिंग पण सुरु झालं नाहिये ना ? फॅन फिक्शन आहे का?

Pages