शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

!! हे गृहस्थ क्रश मटेरिअल असतील असं अजिबात वाटलं नसतं मला. Happy असो. पण कोणाला कोणाची कुठली अदा घायळ करेल काही नेम नसतो Lol

कॅप्शन ऑफ करवत कसं म्हणते मी तुम्हाला. शेर्लूचा , एकन एक शब्द कळला पाहिजे बाई. सांडून चालणार नाही. Wink
कित्ती भरभर बघताय गं . मी काल डोळे भरून परत एकदा सीझन दोनच बघितला. सीझन ३ बघ्णार आता या वीकेंडात.
मला ते बॅस्करव्हिला लयच आवडत. अगदी टिपिकल पुस्तकात वाचल्यासारख इंग्लिश कंट्रीसाईड.
BTW , इन दि स्पिरिट, मी यावेळी इंग्लिश कंट्री गार्डन सीड मिक्स आनलय. इंग्लिश फुले येणार. मी तिथे बसूनच चहा पीणार. Proud

कम्बरबॅच पंख्यांसाठी स्टार ट्रेक :जर्नी इन्टू डार्कनेस चे ट्रेलर....
http://youtu.be/yhz4A5BCMAA

हा सिनेमा मुलासाठी पाहिला तेव्हा शेरलॉक चा एक एपिसोड पाहिला होता. तरीही मज पामराला हे चमकले नव्हते हा 'खान' म्हंजे शेरलॉक म्हणून ( तुझ्या मेंदूतील फेशियल रेकग्निशन सॉफ्टवेअर फॉल्टी असून त्यामध्ये अनेक जेनेटिक 'बग्ज' आहेत असं चिरंजीवांचे म्हणणे आहे)....ह्याचा चेहरा लईच ओळखीचा वाटला असं एका मैत्रिणीला म्हटले तर ती कम्बरपंखा निघाली आणि तिने ' मूर्ख मुली, व्यर्थ आहे तुझा जन्म' असा तुच्छ कटाक्ष टाकून माझं शंकानिरसन केलं, वर बेनेडिक्ट कम्बरबॅच यांचे चरित्रही ऐकवलं. 'द होबिट' मधल्या smaug ड्रॅगनचा आवाजही ह्याचाच म्हणे.

"आय अ‍ॅम बेटर दॅन यू . अ‍ॅट एवरीथिंग" ...... Happy कम्बरबाबूला ++ १००० . तो लीड अ‍ॅक्टर चम्या दिसतोय अगदीच त्याच्यापुढे

तो क्रिस पाइन आहे ना?

मै, डेव्हिड लेटरमन शो मध्ये कम्बरबॅच आला होता तो एपिसोड बघितलास का? त्यात स्टार ट्रेकचे ट्रेलर बघितल्यावर लेटरमनने एकदम उस्फूर्तपणे फार भारी प्रतिक्रिया दिली आहे.

ओ बडी! वोss!! मॅन!!! नो ऑफेन्स टु द रेस्ट ऑफ द कॅस्ट बट यु रियली डोन्ट नीड मच मोअर दॅन यु Happy

कसला कोल्ड चिलिंग आवाज आहे खानाचा ' यु थिन्क युअर वर्ल्ड इज सेफ. इट इज अ‍ॅन इल्युजन. एन्जॉय दीज फायनल मोमेन्ट्स ऑफ पीस'.... थिएटरमध्ये एकदम इफेक्टिव्ह....

मी फायनली माझ्या कडून जॉन- शरलॉक ब्रोमान्स शंकेला ला पूर्णविराम देत आहे Happy
दोन्ही बाजूचे लेख आणि व्हिडिओ पाहिलेयत . पण मुख्य कारण http://www.youtube.com/watch?v=piZdrK-858Q इथे कम्बरनाथच म्हणाला म्हणून Happy
बायदवे जॉन- मेरी रियल लाइफ मधेही पार्टनर्स आहेत हे मला माहितच नव्हतं!

मी फायनली माझ्या कडून जॉन- शरलॉक ब्रोमान्स शंकेला ला पूर्णविराम देत आहे>> मी ओ व्हिडिओ नाही पाहिला. घरी गेल्यावरच बघेन. पण कधी कधी मला वाटतं की सध्याच्या जमान्यात २ बाप्यांची घट्ट(?) मैत्री संशयानेच बघितली जाते. नशिबाने २ बायांची दाट मैत्री अजून तरी तितक्या संशयाने नाही पाहिली जात.

साइड नोटः संशय सोशल कंडिशनिंगमुळे इतका बळावतो की आता ते बॉलिवुडी मैत्रीची गाणी बघताना पण कसतरी होतं जे पूर्वी अजिबात व्हायचं नाही. उदा. ये दोस्ती हम नही छोडेंगे..

मेरी रियल लाइफ मधेही पार्टनर्स आहेत हे मला माहितच नव्हतं!>> हे मला पण नव्हतं माहिती.

सिंडे, हो कालची लिन्क आहे ती. शूम्पे, बीबीसीच्या पण एका लिन्क वर होतं की सर डॉयलच्या जुन्या काळात दोन पुरुषांच्या घट्ट मैत्रीचे इसेन्शियली तसेच अर्थ निघत नव्हते. आता कंडीशनिंग बदलले आहे वगैरे.
(गा. पै. अँड कंपनी फ्रेन्डशिप मागतील का आता मला Wink )

पण एका लिन्क वर होतं की सर डॉयलच्या जुन्या काळात दोन पुरुषांच्या घट्ट मैत्रीचे इसेन्शियली तसेच अर्थ निघत नव्हते. >> डॉयल चा काल सोड, आपल्या लहानपणी पण असे अर्थ निघत नव्हते. ही प्रगती गेल्या १२-१५ वर्षातली... आता फ्रेंडशिप पक्की Wink

Pages