शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

अनुमोदन. मुळात शरलॉकला 'फ्रेन्ड' होता, तोही बेस्ट फ्रेन्ड, हेच जरा पचायला जड गेलं. आमचा हाय फन्क्शनिंग सोशिओपाथ कुठे गेला? Proud
मेरीचा लास्ट व्हीडिओ मेसेजही हिंदी 'कुछ कुछ होता है'मधल्या पत्रांइतका चीजी!! का ते?!

शरलॉक बहिणीला, बेस्ट फ्रेन्ड ला पूर्ण विसरतो?>>>>>> लहान असतानाच्या ट्रॉमा ला असं नाव देऊन पुर्णपणे मुद्दाम विसरणे शक्य आहे (त्याला काहीतरी नाव पण आहे सायकॉलॉजी मध्ये). त्यात हे होम्स बंधू भगिनी कमालीचे अ‍ॅडवानस्ड आहेत हे विसरायला नको.

युरॉस कितीही हुषार असली तरी आख्खा प्रिझन कुणाला काही न कळता लोकंच्या मान्ड्स वर कन्ट्रोल करून (?)ताब्यात घेते? मायक्रॉफ्ट, शरलॉक आणि जॉन तिघे तिच्या हातातले असहाय बाहुले बनून डोके न वापरता कसली डिडक्शन्स न करता कसलेही चॅलेन्ज वा फाइट न देता कुठल्यातरी विमानातल्या मुलीकरता अनेक लोकांचे जीव धोक्यात घालतात ते झेपले नाही. विशेषतः शरलॉक अणि मायक्रॉफ्ट अगदीच आउट ऑफ कॅरेक्टर वागत होते पूर्ण वेळ.>>>>>>>>>>> मायक्रॉफ्ट जेव्हा युरॉस विषयी सांगतो तेव्हा तो म्हणतो की ती न्युटन नंतर पहिलीच इरा डिफाईनिंग टाईप हुशार आहे. ते बाहुले बनतात कारण तिचा प्लॅनच तसा जबरी असतो. दे जस्ट डिडंट हॅव एनि अदर ऑप्शन्स. ह्याच बरोबर अजून काही उलगडलं असेल तर स्वतःला हाय फंकशनिंग सोसियोपॅथ म्हणणारा शरलॉक आणि अत्यंत प्रॅक्टिकल आणि डिस्टंट वाटणार्या मायक्रॉफ्ट ह्या दोघांमध्ये सुद्धा डीप डाऊन का असेना इमोशन्स आहेत हे उघडकीस आलं. का? तर त्यांच्यापेक्षाही हुशार आणि आजिबातच इमोशन्स नसलेली त्यांची सख्खी बहिण शेजारी काँट्रास्ट म्हणून (मुद्दाम) उभी केली . १) मायक्रॉफ्ट ला माहित असतं की आपल्या चुकीमुळे हे सगळं होतय ह्या करता आणि २) शरलॉक ला रेडबेअर्ड च्या व्युतपत्तीचा सुगावा लागल्यामुळे ओल्ड इमोशन्स रिसरफेस होतात ह्या मुळे त्यांची हुशारी कॉम्प्रमाईज्ड असते. बेसिकली त्यांची हुशारी कॉम्प्रमाईज होऊ शकते हेच एरवी अवघड जातं आपल्याला पचायला पण इतकं जास्त पुश करते युरॉस (जे फक्त तिलाच, जी त्यांच्या पेक्षाही हुशार आहे तिलाच शक्य आहे). इट मेक्स टोटल सेन्स.
फायनली, युरॉस. अत्यंत हुशार असली तरी सायकॉलॉजिकली तिला सुद्धा डिमन्स आहेत (डीप डाऊन तिला पण कुठेतरी गिल्ट आहे जो रिसरफेस होत राहतो) आणि त्यावरच कॅपिटलाईज करुन शरलॉक तिला सेफली "लँड" करु शकतो.
ती त्यांना प्रचंड त्रास देते पण टोकाचं काहीतरी करण्या पासून वाचवायला (स्वतःला आणि त्यांना) प्लेन च्या इन्सिडंटचा इनलेट पण देते पण खुफिया रितीनी. So it might feel like a very cruel game (the addition of the plane) but its more of a cry for help by the bit of self that feels guilty for what she has done.
Brilliant brilliant writing!!!

मेरीचा मेसेज म्हणाल तर तो तिच्या बाजूनी दोघांना त्यांची जी फ्युचर स्टेट असेल (तिच्या हिशोबानी) ती वाईट असेल असं गृहित धरुन तिनी त्यांना दिलेला रिमाईंडर "Why you need to continue to do what you do" म्हणून शोभतो. जॉन तर अर्थात इमोशनल आहेच आणि शरलॉकला जॉनची गरज आहे ह्या कनेक्शन्मुळे पुढे ह्या (मेरीच्या मृत्यु नंतर जे काही ओढावेल त्या) रिंगर मधून जाताना शरलॉक आणि जॉनला ह्याचा उपयोग होईल म्हणून त्या मेसेजची मॅरीनी सोय केली असावी. टोटली बिलिवेबल आहे कारण Who other than Mary knows these two blokes well? Remember Mary is the one who told John how he admires Sherlock and also told Sherlock you need John Watson.

मला तर शेवटी शरलॉक (व्हायोलिनवर!) 'फूलों का तारों का' गातो की काय आता अशी भीती वाटली! Proud

'फूलों का तारों का' गातो की काय >> Lol

शेवटचा इपिसोड म्हणजे अगदीच हिंदी सिनेमा आहे. माईंड कंट्रोल काय नि काय ? न्यूटन नंतर इरा डीफायनिंग पहिलीच म्हणजे नक्की काय ? न्यूटन माईंड कंट्रोल करत होता ? काहीच्या काहि वाटला बेस एपिसोडचा. emotional context दाखवायला अजून वेगळे काहितरी विश्वास बसेल असे काहीच नाहि करता आले असते का ? गेला बाजार हे सगळे मॉरीआर्‍टीचे रचलेले कारस्थान होते असे दिले असते तरी पटले असते. नक्की शेरलॉक होते कि लॉस्ट असे वाटले.

गेल्या आठवड्यात शेरलॉकचे चारही सीझन आणि अबोमीनेबल ब्राईड पाहिले.
मजा आली एकंदर.

आताच हा बाफ पूर्ण वाचला
Dedicated fans ना सीझन 4 आवडणार नाही असा अंदाज होता तसंच झालेलं दिसतंय.

कम्बरबॅचमात्र फॅन वगैरे होण्यासारखा अजिबात वाटला नाही. चौथ्या सिझनमधे टॅन लुक दिलाय तेव्हा जरा बरा दिसतो.

कालच चारही सीझन पाहून संपले आणि प्रचंड आवडले. लास्ट एपिसोड जरा कैच्या कै टाईप्स वाटला .. पण शेरलॉक साठी म्हणून चलता है Happy
तर मस्त झालेत सगळे भाग...सगळेच characters आवडले ...उत्तम अभिनय, उत्तम बॅक ग्राउंड म्युसिक .
शेरलॉक - आधीच attachment आहे या पात्राशी. जेरेमी ब्रेट नंतर कोणी शेरॉलक होम्स म्हणून आवडेल असे वाटले नव्हते पण ... कम्बरबॅच ; प्रचंड अडिक्टिव्ह आहे हा माणूस !! त्याच दिसणं , बोलणं , अभिनय सगळंच आवडलं . त्याच्या बद्दल काही बोलूच नये ...त्याला फक्त बघत राहावं ..ऐकत राहावं Happy
वॉटसन - खूप आवडला. या दोघांची chemistry superb जमलीये. they are made for each other आहेत असच वाटतं Lol . फ्रीमन चा अभिनय सुरेख आहे . अतिशय mature , कमालीचा बोलका अन तेव्हडाच शांत चेहरा , शेरलॉक सोबत असलेले इमोशनल चढ उतार सगळंच छान उतरवलंय त्याने. बाकी पात्रे सुद्धा आपापल्या जागी छान. मजा आली एकंदर . रच्याकने - याचे चार काय कितीही सीझन आले तरी
मन भरणार नाही आता Happy

Pages