शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

थांबा थांबा, मला अजून वाचायचेत ते अ‍ॅनलिसिस.

लाझरस बरोबर ना? आता का ते गूगल केलं तर चालेल ना? मला वाटतं काहीतरी बिब्लिकल रेफरन्स आहे.

लझारस. नवर्‍याच्या एका कोवर्करचे लास्ट नेम होते. गॉड हेज हेल्प्ड असा अर्थ सांगतय विकी...

होय Lazarus - the one brought back to life from his grave by god himself (Jesus)
हिब्रू शब्दाचा शब्द्शः अर्थ helped by God असाच काहीतरी आहे. गोष्टीत जीझस ने त्याला हाक मारली आणि तो थडग्यातून उठून बाहेर आला असे आहे.

Lazarus is the man Jesus brought back to life, which is a bible story foreshadowing Jesus's own death and resurrection.

Lazarus चा अर्थ माहित नव्हता MT ? Dan Brown च्या पुस्तकांमधे आहे कि.

मला series ४ कुठे दिसेल ? कोतबो.

शेरलॉक आणि जॉन यांचीच केमिस्ट्री जास्त लोकप्रिय आहे इथे उसगावात....:)
मला त्यांचं कॉमिक टायमिंग आवडलं....आयरिन अ‍ॅड्लर वाल्या एपिसोडमध्ये दोघंही वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन बकिंगहॅम पॅलेसमध्ये एका खोलीत भेटतात तेव्हाचा प्रसंग धमाल आहे....
वॉटसनः हिअर टू सी द क्वीन?
शेरलॉक आजूबाजूला पाहतो तेव्हढ्यात मायक्रॉफ्ट तिथे एंट्री मारतो,
शेरलॉकः अओऊह....अ‍ॅपॅरंटली येस

आणि मग दोघंही जोरात खिदळतात तेव्हा मायक्रॉफ्टच्या चेहर्यावरचे भाव केवळ प्राईसलेस....धमाल एंजॉय केला हा सीन....
वॉटसन मधून मधून शेरलॉक ला सही गप्प करतो.... तिथेही मजा येते....
१.वॉटसनः आय नो यू फॉर रिअल
शेरलॉकः आर यू शुअर? १००%?
वॉटसनः नोबडी कुड फेक बीईंग सच अ‍ॅन अ‍ॅनॉयिंग डिक ऑल द टाईम.
२. शेरलॉकः पंच मी इन द फेस, डिडन्ट यू हिअर मी?
वॉटसनः आय ऑलवेज हिअर 'पंच मी' व्हेन यू आर स्पीकिन्ग, बट युज्वली अ‍ॅज सबटेक्स्ट.
Wink

उसगावात नव्हे तर बर्‍याच फॅन फिक्शन्स आणि इतर फॅन ब्लॉग्ज वर तेच आहे Happy
कॅरेक्टर अनालिसिस च्य पेज ची लिन्क काल वाचत होते. बराच अभ्यास झाला Happy जॉन - शरलॉक बद्दल पेजेस च्या पेजेस आहेत.
काल अजून कुठेतरी मॉलीबद्दल वाचत होते. तिची एंगेजमेन्ट झालेली दखवलीय एस३ मधे, शी सेज शी हॅज मूव्ड ऑन वगैरे. पण जेव्हा ती तिच्या त्या बॉफ्रे ला घेऊन भेटायला येते तेव्हा त्याला पाहून शरलॉकसकट सगळ्यांना लक्षात येतं म्हणे, की तो दिसण्यात आणि ड्रेसिंग इ मधे बराच शरलॉक सारखा असतो .... मला काही तो भाग बघताना हे लक्षात आले नव्हते. तो कोण टॉम आहे त्याचे कपडे होते तसे, पण बाकी काहीच तसं नाहिये.
आणि लिस्ट्राड ला मॉली वर क्रश म्हणे! हेही माझ्या काही लक्षात आलं नव्हतं Happy (कम्बरनाथावरून दुसरीकडे लक्ष जाईल तर ना )

@ मैत्रेयी....मॉलीचा भावी नवरा शेरलॉकसारखा दिसतो ही गोष्ट मला जॉन वॉटसन च्या त्याला भेटल्यावरच्या रिअ‍ॅक्शन नंतर चमकली....वॉटसन त्याच्याकडे दोन मिनिटे पाहतच थांबला नसता तर नसतं लक्षात आलं माझ्या.....;)
लेस्ट्राडचा मॉलीवर क्रश? हे नवीनच आहे मला....लेस्ट्राड जनरलीच डिप्रेस्ड वाटला पहिल्या एपिसोड पासून....
कम्बरनाथ......हाहा.....:) त्याच्या फीमेल पंखकुमारींना कम्बरबिचेस असं नाव आहे म्हणे....इथे जराअ अतीच करतात....माझी इथली एक मैत्रीण ह्या कम्बरबॅचची पंखा आहे....
मी पूर्ण मालिकेची पंखा आहे..शेरलॉकची वॉटसन/ मॉली/ लेस्ट्राड/ अ‍ॅडलरबाई कुण्णाशीही जोडी जमली काय किंवा नाही काय, इससे कुछ् फरक नही पडता...
त्याचा स्टारट्रेक जर्नी इन्टू डार्कनेस मधला 'खान' पण कॅप्टन कर्क पेक्षा जास्त भाव खाऊन जातो..
एनीवेज आज रात्री सीजन ३ एपिसोड २ पाहणार....

लेस्ट्राडचा मॉलीवर क्रश असण्याची शक्यता आहे. स्कँडल ऑफ... एपिसोडमध्ये मॉली क्रिसमस डिनरला एकदम ढिंच्याक ड्रेस घालून येते तेव्हा लेस्ट्राड तिच्याकडे बघतोय ते हिलॅरियस आणि ऑब्व्हियस आहे.

हो तो सीन. आणि मॉली नंतर सि३ ए१ मधे बॉफ्रेला घेऊन येते तेव्हा लेस्ट्राड विचारतो आर यू टू सिरियस? आणि मॉलीने हो म्हटल्यावर निराश होतो Happy नंतर साइन ऑफ ३ मधे लग्नात मॉली आणि टॉम लाडिक फोटो सेशन करताना त्यांच्याकडे बघत दारू ढोसत असतो Happy बिचारा! त्याने एकट्यानेच शरलॉक परत आल्यावर त्याला मनापासून बिग हग केल्याने माझं लिस्ट्राडबद्दल फार अनुकूल मत झालेलं आहे Happy मॉली टू डीझर्व्स टु बी हॅपी. होऊ दे खर्च !
बायदवे ते स्वातीने दिलेलं इन्सल्ट्स चं पेज पाहिले की तिथे साइड ला अजून बरेच फनी व्हिडिओज च्या लिन्क्स आहेत. माझा बराच वेळ टिपी झाला!

होऊ दे खर्च >>>> Biggrin

आयरिन अ‍ॅडलरच्या घरी शेरलॉक काही तरी चाचपडत बोलतो आणि लगेच सावरतो ते काय म्हणतो? तीन वेळा ऐकलं तरी कळलं नाही Sad

कालचा एपिसोड.. परत एकदा पाहिलाच... ऑऑ मोमेन्ट्स ... एका फॅन साइट वर तर लिहिलेय की शरलॉक "अनऑफिशियली गॉट मॅरीड" टु जॉन Lol
मिस्टरी पार्ट फार्सा नव्हताच. शरलॉकची जॉन च्या एक्स बॉसबद्दल जेलसी Lol
मेरी शरलॉक ला म्हणते सॉल्व द केस , तेव्हा शरलॉक वैतागून " जॉन व्हॉट इज शी टॉकिंग अबाउट, गेट युअर वाइफ अन्डर कन्ट्रोल " Lol बाकी खरी मिस्टरी अ‍ॅक्चुअली त्या छोट्या मुलाने सॉल्व केली Happy
शेवट जरा सॅड आहे, शरलॉक ऑल अलोन ... Sad ती टवळी जेनिन पण त्या चष्मेवाल्याबरोबर नाचत होती. ...
तिसर्‍या सीझन मधे जॉन चा मला सारखा रागच येतो आहे..... ही इज बिइंग मीन!

>>ती टवळी जेनिन पण त्या चष्मेवाल्याबरोबर नाचत होती. ... Biggrin

या वाक्यात, असामी आसामीमधल्या 'आणि ती कवटाळीण दात काढून हसली'चा सात्त्विक संताप आहे. Proud

एम्टी Lol

एपिसोडच्या सुरुवातीला मिसेस हडसन तिची बेस्ट फ्रेन्ड कशी तिच्या लग्नातून लवकर निघून गेली त्याबद्दल बोलते ना? (मग शरलॉक तिला बिस्किट्स आणायला पिटाळतो.) तसाच शरलॉक शेवटी लवकर निघतो जॉनच्या लग्नातून. Happy

तो जॉनचा एक्स बॉस आल्यावर मेरी म्हणते 'जॉन सेज ही इज द मोस्ट अनसोशिएबल पर्सन ही हॅज एव्हर मेट'. त्यावर शरलॉक चिडून 'ही?? ही इज द मोस्ट अनसोशिएबल पर्सन?!!' म्हणतो. ते भारी! आणि तिला 'डोन्ट स्माइल' म्हणून ओरडतो. Happy

ती म्युझियममधली बाई शेरलॉकदेखत कुणाला तरी स्मार्टेस्ट म्हणते त्या सीनमध्ये शेरलॉकचे एक्प्रेशन्स आणि त्यानंतर दिलेला नुसता हुंकार एकदम जबरी.

काल झोपच येत होती तेव्हा सि ३ ए२ आज बघणार रेकॉर्ड केला आहे. म्हणजे ऑनलाइन बघून झाला आहेच ऑलरेडी. नाहीतर कुठलं राहवतय..

शेरलॉकचं नाव घेताच अबोल जान्हवींना चांगलाच कंठ फुटला आहे की Proud Light 1 लगे रहो...

शरलॉक चिडून 'ही?? ही इज द मोस्ट अनसोशिएबल पर्सन?!!' म्हणतो. >> आणि वर " जॉन इज जपिंग ऑन हिम लाइक अ पप्पी" असा टिपिकल जेलस रिमार्क पण . इट वॉज सो क्यूट! Happy

बायदवे ओरिजिनल सिरीज मधे सर कॉनन सायबांनी इव्हेन्चुअली मेरी लवकरच मरते असे दाखवून तिचा काटा काढलाय म्हणे ! जॉन क्विकली मूव्हज बॅक विथ शरलॉक पण नंतर कधीतरी पुन्हा अजून एक लग्न पण झालेलं दाखवलंय असंही वाचलं.

Pages