शेरलॉक!

Submitted by तृप्ती आवटी on 8 January, 2014 - 13:54

वॉर्निंग भारी आहे. Proud

त्याचा आणि अ‍ॅरन पॉलचा फोटो बघितला की नाही? दॅट्स रीअल कंबरफुल्ली! Proud

कठीण पझलमधला एक शब्द नाइट (knight) असेल की काय असं मला फार्फार वाटतंय. दोनच वॉवेल्स म्हटलं तर कायतरी असंच लंबंचौडं हवं ना?

मी ते विसरूनच गेले पझलचं. ट्राय करते.

सायन्स ऑफ डिडक्शनवर पण आहेत तीन पझल्स. मी पहिलं घेतलं करायला. भली मोठी हिंट आहे प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्येच Happy

सी३ए३ बघितला. दोनदा पूर्ण बघितला आणि तिसर्‍यांदा फाफॉ करून. धन्यवाद बाई आणि माळी लिंक दिल्याबद्दल Happy

तुम्ही कुणी या लिंक टिव्हीवर बघितल्या का? मी काल ट्राय केलं पण १५-२० मिनिट नुसतंच लोडिंग... असं आलं आणि मग हँग झाला. लॅपटॉपवर बघितला मग.

सीझन ४ लवकर येणार म्हणे. लवकर म्हणजे २०१४ ख्रिसमस.
आणि सीझन ५ सुद्धा काढणार आहेत.

(कम्बर म्हातारा दिसायला लागायच्या आत काढा म्हणावं काय ते! :P)

शेरलॉकचे खरे पंखे असता तर व्यवस्थित टीवीवर प्रसारित होईल तेव्हाच बघितलं असतंत. Wink
मला आता खात्री पटायला लागली आहे की तुम्ही शेरलॉकचे पंखे नसून फक्त कंबरबॅचचेच चाहते आहात, बाकी आयक्यू वगैरे सगळं झूठ. Proud 'कम ऑन नाऊ (से ईट) डोन्ट बी शाय'

हॉबिटमधल्या स्मॉगचा आवाज ऐकलाय का?

चमनला गोणत्यात घाला.

टीवीवर प्रसारित होईल तेव्हा परत बघणारच. नंतर नेटफ्लिक्सवर येइल तेव्हा पण परत-परत बघणार Happy

हॉबिटमधल्या स्मॉगचा आवाज ऐकलाय का >>> त्याने एका डेली शो (कॉनर?) मध्ये अ‍ॅक्ट करत एक डायलॉग म्हंटलेला पण ऐकला/बघितला आहे. आहेस कुठे? Proud

काल सांगायचं राहिलं. बाईंच्या ल्हान्याने दिलेली लिंक माझ्याकडे चालत नाही. त्याच्या एका मैत्रिणीने फेबुवर दिली आहे ती चालतेय.

तिथे लोकांनी सि३ ला शिव्या घातल्यात. पहिल्या २ पेक्षा हा थोडा वेगळा आहे. नविन कॅरेक्टर एस्टॅब्लिश करायला वेळ घेतलाय पण ठीके. आलाउडे.

सि ३ बद्दल वाचले स्पॉयलर ची रिस्क घेऊन. घाबरू का आता Uhoh गिमिक्स च्या मागे लागून खत्रुड आणि सारकॅस्टिक शेरलॉक चा चार्म नका घालवू म्हणावे. सि३ ए१ मधे मॉलीला किस करतो ते आठवलं आता ( तेव्हा बघायला ग्वाड वाटले पण Happy )

ते वरच्या गेम एपिसोड मधलं सगळ्यात क्युट , "राउंड अँड राउंड " आहे.
खर सांगते ओल्ड नेव्हीत जा. तिथला एक मॅनेक्विन शेरलॉक वरून केलाय. You can touch Sherlock , you know. with ur own hands. Proud

अमेरिकेत पिबिएस वर या रविवारी सुरू होतोय सीझन ३!! रात्री १० -१२ , चॅनल १३. येस्स! Happy मी रेकॉर्ड करून ठेवणार .. पुन्हा पुन्हा बघायला बरं!! Happy
सि२ चे री रन्स पण चालू आहेत. (मला नव्हते माहित हे आधी) आज रात्री रायकनबॅक फॉल ..... टायमिंग विसरले आता.

http://www.pbs.org/wgbh/masterpiece/schedule/ १९ जाने, २६ जाने आणि २ फेब असे तीन एपिसोड्स आहेत.

अर्र रीरनचं मला पण माहिती नव्हतं. तरी सीझन २ नेटफ्लिक्सवर आहे त्यामुळे टिव्हीवर बघता येतो.

तुला सी३ए३ची लिंक पाठवायची विसरले. आज पाठवते.

Pages