जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे स्वप्न आहे की सत्य

मेघना आदे ला आय लव्ह यू म्हटली
भोचक/ढालगज भवानी/आगाऊ/चोंबडी/फाजील लाडावलेल्या अर्चूने चक्क ज्वेलरी बॉक्स बघितला नाही?

Proud

भोचक/ढालगज भवानी/आगाऊ/चोंबडी/फाजील लाडावलेल्या अर्चूने चक्क ज्वेलरी बॉक्स बघितला नाही?

फिदीफिदी<<<

अर्चू बिच्चारी सेक्सी आहे. तिला असे काहीबाही नका हो म्हणू!

मेघना आदेला आय लव्ह यू वगैरे म्हणाली नाही. तिने आणि त्यानेही आपापल्या भावना डोळ्यांमधून व्यक्त केल्या. त्यांचे अजून लग्न व्हायचे आहे ना?

Happy

अरे 'I love आन' असं म्हणाली असती तर 'सुटलो एकदाचा' म्हणाला असता देसाई ... म्हणजे आदित्य दे... Happy

पण आजच्या एपी मध्ये लय भारी expressions दिले आदित्य ने. मेघन निर्णय सान्गत असते तेवा. जाम आवडला मला तर. मी तर टोट्टल फीदा त्याच्यवर!!!

आजच्या एपिसोडात आदित्यने सांगावे की बाई, मी तुमच्या आंगाला हात लावला नाही कारण मी गे आहे, सॉलीड ट्विस्ट असेल तो Proud

आणि ती गिटार वाजवण्याची तिची अ‍ॅक्शन राग डोस्क्यात गेली माझ्या. >> प्रचंड अनुमोदन.

आणि तिचा तो गाऊन चांगला होता जरा.. पम त्यावर गळ्यात जे काही घातल होत ते अगदीच धन्य होतं रे देवा...

पण आजच्या एपी मध्ये लय भारी expressions दिले आदित्य ने. मेघन निर्णय सान्गत असते तेवा. जाम आवडला मला तर. मी तर टोट्टल फीदा त्याच्यवर!!! >>>>>> मी पण..दिवसेंदिवस जाम आवडायला लागलाय यार तो...!

काल मेघीन प्रेमाची कबुली दिली. अर्चुन "त्या" बॉक्स वरच जाजम उचलल पण तिला काही तो दिसला नाही Uhoh
आता हा टाइमबॉम्ब किती दिवस जवळ बाळगणार आहे मेघना कुणास ठाऊक ??

गुळाची ढेप गुलाबी कापडात गुंडाळून पायर्‍यांवरून हळूहळू गडगडत येतेय अशी दिसत होती >>
उरलेल्या भागात काय तो धिंगाणा घालून घेऊयात मग नंतर एखादी सिरीयल मिळतेय किनाई कोणास ठाऊक!!>>>
Rofl

काल मेघीन प्रेमाची कबुली दिली. >>
अरे वा ! गंगेत घोडं न्हायलं एकदाचं.

काल आय लव्ह यु म्हणताना तोन्ड तुरट आम्बट खाल्यासारखं का होतं की त्या पात्राच नेहमी तसचं असतं>>>>>>>>>>> ते तसच आहे....

Rofl

ते झाडाला लोंबकळुन पोझ देणं, गिटार वाजवण्याची अ‍ॅक्शन अशक्य बावळटपणा होता...

नेहमी असतं तसच होतं तोंड त्या पात्राचं....

कालचे आदित्यचे प्रेमकबुलीनंतचे हावभाव आणि जान्हवीबद्दल डॉ. श्री ला सांगत असतात तेव्हा त्याचे हावभाव यात काहीही फरक वाटला नाही. मेघनाताई तर आपण आदेला खटल्यातून बाईज्जत बरी केल्याच्या निर्विकार थाटात सुनावणी करत होत्या. "अखेर तो क्शण आला.." या वाक्याने सुरू झालेल्या संवादाचा शेवट एखाद्याला 'पहिल्यांदा' आय लव्ह यू म्हणून करणारी जगात एकमेव मेघनाच असू शकते.

मेल्यांनो, आय लव्ह यु म्हणायचेच होते तर मला तरी तो एपिसोड लिहायला द्यायचा ना. छान लिहून दिला असता. Proud

हाहाहा! मेले हसून हसून!

त्या दिवशी मेदेचा परकर पोलका आणि मॅक्सी बघून आ वासला होता. आणि नंतर काल तिने आय लव्ह यू म्हटल्यावर आदेची एक्सप्रेशन्स बघून "हे बया आता आयुष्यभर माझ्या घरात रहाणार" या भीतीने तो थिजल्यासारखा वाटत होता! तिचं ते 'निवाडा सांगेन' वगैरे तर जामच डॉक्यात गेलेलं. +१०० आशूडी.

ए अस्स कॉय्य गं दक्षिणे, गुळाची ढेप वगैरे म्हणून कोणाच्या जाडीवरून बोलु नये.. Wink

-------------------------

मेदेबाई म्हणाल्या 'आय यव्यु'. त्याआधी सुरुवार अशी केली की, की हा ओढला दोर आणि आदित्य लटकला.. अश्या थाटात , तो क्षण जवळ आला म्हणून आदित्यला पुर्णपणे गॅसवर बसवलं... Proud
मग ते तुझी मैत्री परत बिरत डायलॉग एकून आदित्य बिचारा मटकन खाली बसेल की काय असे वाटले.
पण आता मेदेने रंगाचं मनावर घेतलय. थोडं आणखी फिटींग आणि स्टाईलचे मनावर घेइल तर बरं.

आता तो बॉक्सला पूजेत ठेवणार की पुरणार हे बाकीय....

ते तसच आहे..>> ओह ओके.
माझ्यासारखा दगड देखील आवडत्या व्यक्तीला आय लव्ह यु ते ही अगदी पहिल्यांदाच म्हणताना ह्यापेक्षा चांगलं स्माइल देत असेल.
असो.

या भीतीने तो थिजल्यासारखा वाटत होता! >> Lol

हो खरंच मेघनेने आय लव यू म्हटल्यावर आदित्यचा चेहरा काळ्या पाण्याची शिक्षा/ जन्मठेप झाल्यासारखा दिसत होता....

>>>>>>> हो खरंच मेघनेने आय लव यू म्हटल्यावर आदित्यचा चेहरा काळ्या पाण्याची शिक्षा/ जन्मठेप झाल्यासारखा दिसत होता....

कौल लावून बसलेला तो
समजून घ्यायला पाहिजे प्रेक्षकांनी
कसले काय भाव असुना चेहऱ्यावर …। भावना पोहोचल्या म्हणजे झाले

काल एपिसोडभर वडाची पूजा दाखवुन शेवटी काय ते आळणी चेहर्‍याने आय लव्ह यू म्हंटल एकदाचं मेघनानं पण चेहर्‍यावर असे भात जस्काय बाबांचे बाबाजी बाबाजी गेलेत ढगात.

नंदे, आय मिस्ड यू देअर. प्रपोज करण्याचे एपिसोड तुझ्याचकडुन लिहून घ्यावेत शहाणे असतील तर मालिकावाले Happy

पण आजच्या एपी मध्ये लय भारी expressions दिले आदित्य ने. मेघन निर्णय सान्गत असते तेवा. जाम आवडला मला तर. मी तर टोट्टल फीदा त्याच्यवर!!!>>>>>++++++++++++++११११११११११

नंदे, आय मिस्ड यू देअर. प्रपोज करण्याचे एपिसोड तुझ्याचकडुन लिहून घ्यावेत शहाणे असतील तर मालिकावाले >>+१११११

नंदिनी असल्या भंगार सिरियल साठी लिहून का उगिच शिव्यांची धनीण व्हायचंय तुला? त्यापेक्षा तु कथा लिही आम्ही त्याच एन्जॉय करू.

Pages