जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजया आणि अर्चूला कोणीतरी या नस्त्या उठाठेवीबद्दल आणि चोंबडेपणाबद्दल जबरदस्त झापावं
>>>> सहमत.

अर्चु तर किती बालीश दाखवली आहे Angry

ड्रिमे Rofl

अगं त्यांना व्हिलन नाही केलं तर मेघनाची दया कशी येणार लोकांना? ? Lol
आधीच तिच्यात दया येण्यासारखं दुसरं काही नाहीये Proud
आलाच तर रागच येतो.

ती मूळ हिरोईन आहे गं.... तिच्या बद्दल दया, माया,ममता, आदर, अभिमान एवढं सगळं वाटायलाच हवं ना.
पण ते तिच्याच्याने जमत नाहीये म्हणून यांना वाईट दाखवावचं लागणार ना.....................

भूषणदादा, अनू Lol

नाही मला या जन्मी तर मेघनाची दया बिया येणं शक्य नाहीये Happy पण तिचा एवढे दिवस राग येत होता आता या दोघींचाही यायला लागलाय हळूहळू...

मेघना हळूहळू सुधारतेय (तब्बेतीनी नव्हे, तर वागणं बोलणं चालणं) आणि नंतर थेट अर्चूसारखी फाटकन बोलायला शिकलीये अस्लं काहीतरी भव्य दिव्य पाहायची जबरदस्त इच्छा आहे... पण छे!! दिग्दर्शकाला तेवढं कुठलं सुचायला? आणि सुचलं तरी आपल्या सुशील सद्गुणी भित्र्या सशीणीसारख्या हिरवीणीला तो प्रवाहाविरूद्ध पोहायला लावून उगाच व्हिलन बनवे असं वाटत नाहीये... सो चाललेय ते चालूदेत... Happy

ड्रीमे +१ .मला पण काल मेघनाच चक्क पटल. पुतणी बिचारी रडत आली काकू काकू करत आली आणि मेघनाने फुकटचा मनस्ताप ओढवून घेतला. आत्ता मला अस वाटतंय . आत्ता लवकरच ती आदित्यला सांगणारच आहे मी तुला निवडलाय इत्यादी इत्यादी त्यात आणखीन एक -दोन भाग घालवतील . साईड बाय साईड अर्चू आणि विजयाची मेघानावर चिडचिड आणि मग माई , तो नानांच्या मित्राचा फलाट रिकामा आहेच (मागेच त्यांनी एकदा सुतोवाच केल होतच) तिथे जाऊन राहा अस मेघनाला आणि आदित्यला सुचवतील . तो पर्यंत ८-१० एपिसोड खर्ची घालतील .

मग आदित्य आणि मेघनाच्या संसारातल्या गोष्टी/ घटना आणि या घरातल्य नवीन नवीन घडणाऱ्या गोष्टी यात मालीकेच गाड पुढे सुरु करतील. माईंची आणि नानाची दोन्ही घरात होणारी रस्सीखेच.. मेघनाचे बाबाजी वडील .बराच मालमसाला आहे Happy

मेघनाला आलेलं पार्सल विसरलतं का ? ते दोघं फिरायला जातील आणि चोंबडी अर्चू ते उघडून बघेल, ते आन कडून असेलं, इथे मेघनाचा आदेकडे प्यार का इजहार आणि देसाईंना आन बद्दल कळणार.........

घातलं खाली मेघनाने आपलं अंथरूण

पण तेवढ्यात जाऊ आली, आता भयानक अवस्था आलेली आहे. जाऊने जर अंथरूण पाहिले तर??????

ह्यॅ! तिला शंकाही आली नाही. कथाकाराने मोठ्ठी संधी घालवली नाट्यमयता आणायची.

मी असतो तर ह्या प्रसंगावर अख्खी मालिका फिरवली असती.

पण मी नाहीच आहे ना!

खाली झोपायच्या एपिसोडपेक्षा ते हनिमून ला गेल्यावर पार्सल आणि ज्वेलरी बॉक्स उघडण्याचा कार्येक्रम महत्वाचा आहे. त्यामुळे सध्या छोटे छोटे एपिसोड पळवतील Proud

मेघनाची भूमिका सई ताम्हणकरांना दिली असती तर?

"ए आदे, चल्ल टायमपास्स करू नकोस, ही मी झोपलीय शेजारी, हिम्मत असली तर हात लाव, माझं प्रेम आदूवर आहे"

============

निरूपा रॉयः

(आक्रोशत)

:मी तुमची पत्नी असल्यामुळे तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे, भले माझ्या मनात काहीही असो, पण मी तनमनधनाने तुम्हाला तात्पुरती तरी अर्पण होईन"

============

राखी सावंतः

"तेरेको सुहागरात मनानी है? तो शरमाता क्यूं है? लडकीवडकी तो नही है तू???"
============

उमा भारती:

"सुहागरात? और गंगा कौन साफ करेगा? तेरा बाप?"
============

खाली झोपायच्या एपिसोडपेक्षा ते हनिमून ला गेल्यावर पार्सल आणि ज्वेलरी बॉक्स उघडण्याचा कार्येक्रम महत्वाचा आहे<<<

ट्रीप रद्द झाली बाळा

कधी?????????????????????????????????????????????

पण ती आज आईला नव्हती का सांगत की आम्ही मुंबई बाहेर जातोय ? Uhoh

बाकी वरची पोस्ट Rofl

१२ जून २०१४ ला मालिका संपतीय. वडाला दोरा बांधताना 'इजहार-ए-मुहोब्बत' होणार आहे. Happy

(अशी आत्ता जाहिरात दाखवली).

१२ जूनला संपणार....व्हेरी गुड.फाटके चड्डीवाले आ.न. यांनी मालिकेतून एक्झिट मारलेली दिसतेय. लगे हाथों त्या भोचकभवानी नणंदबाईला पण 'ज्ञानामृत' पाजून 'कोल्ह्याला द्राक्षं आंबट' मोडमधून बाहेर आणा म्हणावं....

वडाला दोरा बांधताना>> वडाला तरी सोड म्हणावं!!!
बेफी लगेहात एखादा प्रोग्रॅम काढाच!! त्या ढाबळीची वाट लागलीये!!! तुम्ही काढा सेपरेट ढाबळ तुफान चालेल.

१२ जुनला वटपौर्णिमेच्या दिवशी मालिका संपवणार आहेत हे अशक्य आहे. मालिका आत्ता सुरु झाली आहे. पुढली काही वर्ष (जोपर्यंत टीआरपी रसातळाला जात नाही/दुसरी मालिका मिळत नाही) तोपर्यंत हि मालिका अशीच चालु रहाणार आहे. Sad

'रिसिटा' म्हणजे काय??? आज सुमो त्या आदित्यला विचारत होति...मला पावति हा शब्द माहित होता.

वरचा शब्द समजण्यासाठि आणखिन काहि उदाहरणे : इड्ल्या,प्लेटा किवा प्लटी (एकापेक्षा जास्त असल्य तरी त्या इडलीच असतात)

'रिसिटा' म्हणजे काय??? आज सुमो त्या आदित्यला विचारत होति...मला पावति हा शब्द माहित होता.

वरचा शब्द समजण्यासाठि आणखिन काहि उदाहरणे : इड्ल्या,प्लेटा किवा प्लटी (एकापेक्षा जास्त असल्य तरी त्या इडलीच असतात)

>>>>>

गोपिका, ही लिंक वाचून काढा.. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.. Happy

http://www.maayboli.com/node/6028

ते माझा लक्षात आले होते.मि इथे सार्कॅस्टिकलि (तिरकस भवनेने) लिहिले होते.म्हणून काहि गमतीशीर उदाहरणे हि दिलि आहेत जी मि प्रत्यक्ष लोकांचा तोंडुन बोलताना ऐकली आहेत...

पराग्,ति लिंक थोडि वाचलि.काम आटोपली कि सगळी वाचून काढते

चला 12 जुनला आदेचा भ्रमाचा भोपळा फुटणार तर. मेदे थोड्याच दिवसांसाठी आहे अस समजुन बिचारा लाड करत होता... आता पर्मनंट आहे म्हटल्यावर लाड बंद होतील... Happy

Pages