जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार मधे शेजारी बसून रिअर व्ह्यू मिरर मधे कसं काय एकमेकांना बघतात ब्वॉ... काही झेपलं नाही.>>+१

मागे दिग्दर्शक बसलेला ना त्याच्याकडे बघत असतील.

हॅलो..मला मेघनाचे सासरेबुवा तिला कुठलं पुस्तकं गिफ्ट देतात? मला त्या पुस्तकाचं नाव हवं आहे. कुणाला माहिती असेल तर सांगा प्लीज..

चला आता मेघना पुस्तक वाचणार , आणि तिला दृष्टांत होनर. वट पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर मधुचंद्र साजरा होणार . हसत खेळत मधु चंद्राचे पुस्तक कोणाकडे असल्यास द्यावे . मेघनाला पुस्तक वाचल्या शिवाय काही समजतच नाही

तो आदित्य मेघनाला गिटार शिकवत असतो त्यावेळी शोले मध्ये धर्मेंद्र जसा हेमा मालिनीला कैर्या पाडण्याकरता पिस्तुल कस मारायचं ते शिकवत असतो त्याची आठवण झाली Happy फक्त मेघना युकी हम सिख तो रहे है गिटार चलाना अस म्हणाली नाही इतकच Happy

शेजारी बसून रिअर व्ह्यू मिरर मध्ये एकमेकांना कसं काय बघतात ब्वॉ >>>> Lol
रच्याकने आदेबुवांनी नुकताच 'जोधा अकबर' पाहिलेला दिसताँय....;)

गुलाबी गाउनचं फिटिंग बरोबर नाय. त्यावर ते मंगळसुत्र कशाला? फारच म.म. फ्याशन.

पुस्तकाचं नाव आमचं पण मिस झालं. धन्यवाद अगो सांगितल्याबद्दल.

रच्याकने आदेबुवांनी नुकताच 'जोधा अकबर' पाहिलेला दिसताँय.... >>>> आमचंही अगदी हेच बोलणं झालं.. Proud

आदेने येतील त्या सर्व कला पेश करायचं ठरवलं होतं बहूतेक... फोटोग्राफी, गिटारवादन, पोहोणं, व्यायाम वगैरे.. !

आणि मेदे पाण्यात पडून बुडू नये म्हणून आदे स्विमिंग शिकणार म्हणे.. मग त्यापेक्षा मेदेलाच शिकवायचं ना !! Proud

जिन्स मधली मेघना नाय झेपत हो... काल आदे चा यायाम पण उगाच... मेदे चे गाल दिवसेंदिवस मेदाने भरत चाल्ले आहेत

जाजमाच्या निमित्ताने ज्वेलरी बोक्सातला बाॅम्ब फुटणार बहुतेक

हो तो जोधा अकबर सीन कायच्याकाय कॉपी केलाय Sad
कुठे तो पिळदार शरिरयष्टीचा, तलवारबाजी करणारा हृतिक आणि कुठे हा लाकडी पुलावर झोका झोका खेळणारा आदित्य Lol

मला वाटलेलं काल मेघना मागुन येवुन त्याला भॉक करते की काय आणि हा पाण्यात पडतोय. Wink

जितनी तुम घबराओगी उतना तुम्हाला गर्म खून पिनेमें मुझे मजा आयेगा >>>
इथे मॅडमचं सिरेलीत फिट आहेत का नाहीत ही शंका आहे आणि तुम्हाला गाऊनच पडलय >>>
कमाल...
बेफि : सविस्तर वृत्तांता बद्दल धन्यवाद. जमेल तेव्हा असे अपडेट्स देत रहा. फार भारी.

ही मालिका पहायची हिंमत नाही माझ्यात पण सगळ्यांच्या टिप्पण्या वाचायाला जाम मजा येते. १२ जून ला मलिका संपू नये नाहितर हा बिबि वाचण्याचा निर्मळ आनंद घेता येणार नाही ना Happy

आता चिपोका शॉर्ट अपडेटस देत नाही म्हणून ..

अपडेटसः
-कालचा आदेचा व्यायम उगीचच. चेडू उगाच लाईन मारततं.
-मेदे भयानक सैल फिकट टॉप आणि जीन्स घालून त्यावर आपण लग्न झालेले संस्कारी भारतीय स्त्री आहोत दाखवायला कुंकू आणि मं.सू.
-दुसर्‍या दिवशी मद्रासी पोरी घालतात तसा पट्टी पोवाडा टाईप(आणि भयानक रंगाचा व कडा सोनेरी का चंदेरी असलेला) पायघोळ स्कर्ट. त्यावर परत आणखी एक विचित्र टॉप. बाई अंगाने गुटगुटीत असल्याने चुडीदारच बरा. ते पाहून फिकट रंगाचा असला तरी बरा असे मनात आले चुकून. Proud
-गिटारीच्या निमित्ताने आदेचा स्पर्श झाल्याने मोहोरलेली मेदे. (पुढे काहिच नाही झाले तेव्हा उगाच ताण नको).
- आदेला पण अजून स्विमींग येत नाही.
---
---
-------------

सणसणी:जाजमाच्या निमित्ताने चोमडी नणंद कांड करणार का?. मेदेचे पुढे काय होणार? ..चुकवू नका हा भाग. Proud

ड्रेसिंग सेन्स बद्दल शुन्य मार्क माझ्याकडुन Lol

झंपी Lol तो आहे श्वास रोखुन पाण्याखाली होता तेंव्हा वाटले की नविन ट्वीस्ट की काय मालिकेला १२ ला संपवायची म्हणुन. हॉटेलातील तीन फुटी स्वीमिंग पुलमधे पाण्यात बुडुन आदे जाणार आणि मेदे +आन मिलनावर ही मालिका संपणार.

हो काल तिनेच कबुल केलं की गाणी फक्त गुणगुणते पण डांस ती शिकलिये आणि तिला मनापासुन आवडतं डांस करायला ते Happy

आदित्य श्वास रोखून पाण्यात पडला होता ही नुसती हाका मारत होती. जवळ जाऊन पण २ हाका मारल्या बयेनं मग त्याला हात लावला. आता तो जर समजा मेला असेल तर हिला काय ओ देत बसणार आहे का? Uhoh

आदित्य श्वास रोखून पाण्यात पडला होता ही नुसती हाका मारत होती. जवळ जाऊन पण २ हाका मारल्या बयेनं मग त्याला हात लावला. आता तो जर समजा मेला असेल तर हिला काय ओ देत बसणार आहे का? Uhoh

आदे उणापुर्‍या २-३ दिवसात त्या पूलमधे पोहायला शिकणार होता - ती मेघना कशाला कुठे पाण्यात पडत्ये की ह्याला वाचवायची वेळ येईल Lol

Pages