जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा, तुमच्या भावनेची तीव्रता समजु शकते.(दोनदा सेमच पोस्ट टाकलीय म्हणजेच खूपच तीव्रता जाणवतेय). Wink

बरं, वरती एक अपडेट राहिलच, माझी फिकट रंगाची तक्रार मेदेने वाचली की काय अशी शंका आली... ती लाल रंगाचा पण बर्‍यापैकी पॅटर्न असलेला ड्रेस घालून एकाच झाडाला पकडून फोटो काढून घेत होती तर आदे लाळ गाळत बघत होता.
मग नंतर पुन्हा लालच रंगाचा(बहुधा प्रेक्षकांवर ह्या रंगाचा मारा होइल आता) गाउन घालून आली आणि आदेने पुन्हा लाळ गाळली. Proud

प्रोमो मध्ये साडी सुद्धा लालच आहे. बहुधा माझी तक्रारीची तीव्रता पोचली.

देसाइकांडाला सुरुवात होइलच चोमड्या, आगाउ, फाजिल , आणि बालिश नणंदेमुळे. बहुधा माईंनी सर्व समज आदेला दिली, त्यातली उरलेली वेळ मिळाल्यावर त्या विजयाच्या नवर्‍याला मग उरले काहिच नाही म्हणून अर्चु अशी असावी.

झंपे त्यातही युक्तिवादाला वाव आहे. की तो फाच आदि म्हण्जे हाच आदू आहे असं सांगून देसायांना उल्लू बनवेल. (आणि ते चक्क बनतील)

सुमो मोड ऑन - अग्गंबाई हो का? लब्बाड मुलगी आम्हाला कधी कळूच दिलं नाही तुम्ही प्रेम प्रकरण. रागवू का तुला? वॉ! चला आता दडपे पोहे खाऊ आणि हे प्रेप्र दडपून टाकू.
सुमोमोऑफ्फ

दक्षुतै, पण त्या आदेचा फोटो आहे ना त्या पेटीत.

आता अर्चू झाझ्म शोधयला आदेच्या रूममध्ये जाणार.
इकडे कबुली तिकडे धमाका

इकडे काबुली चणे तिकडे धमाका असं लिहिलं असतं पण ते लैच व्याक वाटतय Proud

अरे कुणी अपडेट्स देईल का ह्या जाजम कान्डाचे? मला बघायला मिळाले नाही. मेघनाने कपाटात लपवुन ठेवलेली फाच आन चा फोटो असलेली नक्षीदार पेटी त्या महा ढालगज, भोचक आगलाव्या अर्चुला सापडली का? Uhoh

वर रिया आणी दक्षिणाच्या पोस्टवरुन तसे वाटत आहे. आणी तसे असेल तर झाले, वाजले मेघना आणी आदे चे तीन तेरा-चार बारा.

सापडेल असा माझा अंदाज आहे गं.

अमित, सतिश,माई आणि नाना काही भोचकसारखं काही दिसलं की उघडून बघायला जाणार नाहीत.
त्यात माईंनी झाझम शोधायचं काम अर्चूला दिलय म्हणून तिच ती!

बरं आता मेघनाने कबुली दिली तर मालिकेत आणखी काही दाखवायला नको?
म्हणून तांडव दाखवतीलच.

पण तरीही तांडव दाखवला तर देसाई घराण्याला शोभणार नाही ते Uhoh

का माईला मिळेल ती पेटी. चुकुन हातातून पडेल आणि फोटो दिसतील. ती नानांना सांगेल. नाना म्हणतील आय न्यू..... डॉकने सांगितलं होतं त्या (आठवा बाबाजी प्रकरणातला डॉक) ते येतील तेंव्ह अतेच सांगतील काय ते.

इकडे आदे आणि मेघनाचं गुलूगुलू चालू असेल... विजया अरुचु खुष होतील सगळं नीट झालं म्हणून.... माई सटकतील खोट खोट दाखवतायेत म्हणून.
माईंना वाटेल (म्हणजे खर तर फायनली कळेल) की ही मेघना किती आतल्या गाठीची आहे. मग त्या वाईट वागतील.
मग आदे तिला सॉरी म्हणेल.
मग मेदे म्हणेल , आदित्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य! इतके दिवस माईंनी नाही का सांभाळून घेतलं मला? आता मीही घ्यायलाच हवं... मी खरच् खूऊऊऊऊप त्रास दिलाय त्यांना... मी कित्त्त्त्त्त्त्त्त्त्ती वाईईईईईईईईईईईईट आहे ना Sad

भारी लिहीलायस रिया.:फिदी: बहुतेक अर्चुच्याच भोचकपणात २ आठवड्याचे एपिसोड घालवतील आणी मग वरतुन माईन्चे लेक्चर.

रिया इथे मोठ्ठा घोळ आहे. तुझ्या लक्षात असेल तर फाच आणि मेदे चा फोटो आदित्य देसाईला बाबाजी च्या घरी दिसतो. चोरी होते तेव्हा ते सगळं सामान विखुरलेलं असतं तिथे.
मग तो फोटो पुन्हा सासरी घेऊन आली का ती? कधी?

दक्षुतै, चोरी झाली तो एपिसोड मिसलाय मी (थँक गॉड)

मला त्या पेटीत २ दिलं आणि त्यातल्या एका आन आणि दुसर्‍या दिलात मेदे चा फोटो असलं काही पाहिल्याचं आठवतय Uhoh

तसं नसतं तर तीने ती पेटी दाखवायला एवढी रडारड कशाला केली असती? Uhoh

काहीतरी चुकतंय वाटतं माझं Uhoh

कालच्या एपिमध्ये मेघनाला स्कर्टमध्ये बघुन मला जुन्या काळातल्या उपवर मुली आठवल्या. खणाच परकर पोलक, तेल चोपडुन घट्ट बांधलेल्या लाल रिबीनीवाल्या वेण्या, कपाळाला कुंकु, गळ्यात ती मोठ्या मण्यांची माळ (त्या मण्यांच विशिष्ट नाव नाही आठवत)

दक्षे Rofl
पण गुळाची ढेप काय सिलेंडरसारखी सरळसोट थोडीच असतेय? लोणच्याची बरणी म्हण हवतर. एक मुरांबा दुसर कायम मुरत ठेवलेलं लोणचं. Wink

कॅरी करता येत नसतील तर कश्याला देतात हिरविणींना असले वेस्टर्न आउटफिटस काय माहित? उगा ते कमळीने मॉडर्न दिसायच्या नादात राखी सावंतला खुन्नस दिल्यासारख दिसत मग. Sad

प्रतिक्रिया ___/\___
Rofl

त्या तुनळी तल्या नृत्य परीचयात माळीबाईंनी बरे(च) हावभाव विविधता दाखवलीये... त्यातले एक दोन इथेही दाखवा म्हणावं!!

ड्रेसेस महान... रोमॅन्स त्याहून भयाण!!
आणि गिटार वाजवण्याची अ‍ॅक्शन, ते लाडे लाडे जीभ बाहेर काढून हसणे... तिरपी नजर मिरर मधून टाकणे, झाडाला लोंबकाळणे... अगागा... जाम धम्माल करून घेताहेत दोघं!! उरलेल्या भागात काय तो धिंगाणा घालून घेऊयात मग नंतर एखादी सिरीयल मिळतेय किनाई कोणास ठाऊक!! असं परस्पर संमतीने ठरवलं असणारेय या जोडगोळीने!!

Rofl

अरे सिरीयसली ह्या प्रतीक्रियानची लिन्क त्या रेशीमगाठीवाल्याना पाठवा कुणीतरी. वाचुन चक्कर अशी येईल की उठण्याचे नाव नसेल.:खोखो:

गुळाची ढेप गुलाबी कापडात गुंडाळून पायर्‍यांवरून हळूहळू गडगडत येतेय अशी दिसत होती >>>>>:हहगलो:

वर दोन रिबीनीचे गुच्चे घालुन आखुड फ्रॉक मध्ये याहल्ला याहल्ला या मुकद्दर का सिकन्दर मधल्या गाण्यावर राखीला नाचताना पाहुन माझ्या मैत्रिणीचा लहान भाऊ म्हणाला होता, गाठोड कस फुदकतय. याची आठवण झाली.:फिदी:

Pages