जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकताच असा खुलासा (विश्वसनीय सूत्रांकडून) करण्यात आलेला आहे की, आदेभाऊ हा हो.सू.मी.या.घ. फेम जाह्नवी सहस्रबुद्धे-गोखले ऊर्फ जानू चा रेशीमगाठीतील अवतार आहे.

=)) =))

काल ठाण्क्यू ठाण्क्यू ठाण्क्यू सो मच (डोळे मिटून , मन झुकवून मानेच्या खाली,हात ठेऊन ह) झालं

डॉक्याला शॉट! आता खरंच भयानक राग येतो आहे त्या माठीचा. हे सगळे देसायांची सून आणि आदित्य देसाईची बायको म्हणून एवढं करत आहेत हे तिला समजत नाही? कसलं बिनडोक पात्र तयार केलंय!

काल फक्त थांक्यू , थांक्यू सो मच
परत थांक्यू , थांक्यू सो मच
परत परत थांक्यू , थांक्यू सो मच एवढेच झाले Happy

बर्‍याच दिवसांनी आले इथे...

१) त्या दोन आगाउ म्हातार्‍या(अर्चू , विजया) अजून ज्वेलरी बॉक्स घ्यायच्या बाकी होत्या? आमच्याकडे कधीचाच होता, Wink
२) ते पैसे कोणाकडेच नसणे म्हणजे उगाच ओढून ताणून केलेला भाग. लहान मुलं घरात असून सुद्धा पैसे नाहीत हे अति आहे? ते हि आजच्या काळात पावली पचास एटीम असताना.... मग कितने आदमी थे पद्धतीने मादे ने झोडपायचे सर्वांना.
३) मेदेचे उगाच लाजणे आदेने हात धरल्यावर, ते शहारल्यासारखे करणे जरा विचित्रच वाटले.

--------
हुस्श, बरं वाटले.

काआआआआअय गं झंपे, आजकाल मेदे काय आदे पण शहारतो.

ह्म्म्म, उठ सुठ हात धरतात आणि शहारत बसतात.
बर त्या मेघनाबाईंचे सगळे एक्स्प्रेशन सेमच....... Uhoh

कधी कधी मला वाटतं माईंनी हात धरला तर चुकून आदित्य नाही माई आहेत हे विसरून मेदे शहारेल की काय Uhoh

ड्रिमे, खरच् विसरलेच मी ते..... रिइइइइइइअली सॉरी गं

Proud

हुश्श! ट्रस्ट मी, मेदे मोड लैच अवघड आहे Uhoh
किती प्रयत्न करावे लागतात तसं बोलायला.
खरी कसलेली कलाकार बरं ती प्राजक्ता माळी Proud

ती मेदे एक मूर्ख, तिची आई सात मूर्ख आणि ले. दिग्द. दहा मूर्ख आहेत...

अरेंज मॅरेज केलेल्या मुलीच्या टाळक्यात "माझा वाढदिवस घरात कोणालाच माहीत नाही" हा विचार कसा येउ शकतो? वर तिची आई तिला विचारते की "आदीत्यरावांनाही माहीत नाही?" मेदेच्या वडीलांच बाबाजी वेड बघता विदाउट जन्मपत्रिका, गुणमिलन त्यांनी हे लग्न होउच दिल नसत... उगीच आपल हिला सरप्राईज दिलेल दाखवायच म्हणुन कैच्याकै दाखवतात...

!! चला सुटतोय बुवा एकदाचे मेघना वटपोर्णिमा दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे आजच प्रोमो दाखवला !!>>>>>
नक्की ते मेघनाला पडलेलं स्वप्न असणार. हि बया "नाही नाही हे शक्य नाही" किंचाळत जागी होणार आणि तिचा भाऊराया तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरून विचारणार, "काय गं ताई, काय झालं?"

नैतर काय ग दक्षे, वर ही लै शाणी मेदे आदेला विचारते की तुला माझा वादी कसा समजला... तर तो धन्य प्राणी तिच्या कॉलेजच्या आयकार्डाचा रेफरन्स देतो.... ___/\___ कोपरापासुन आहे हा...

Rofl

केवढ सगळे चिढलात तिचावर....

त्या अर्चु मात्र मला राग आला काल.बाकि काहि असेना,नवर्याने बायको ला गिफ्ट दिले,त्यात हिने टोमणा मारायचि काहि गरज नव्हति.ही हिचा सासरि किती जाते म्हणे ते???? 'घरचि काम हि असतात' अस टोमणा मारलि

मागे तिने एक डायलॉग बोलला होता 'माझि सासर चि माणस जवळ नाहियेत ते बरच आहे' अस

ति मेघना काम करून डान्स करेल किवा डान्स करत काम करेल म्हणे...हिला काय करायच.आयत गिळायला मिळत ना...बास कि.कुणीतरी तिला एकदा सणसणीत ऐकव्ली पाहिजे

रिया तुझा सेन्स ऑफ ह्युमर भलताच बहरतोय आजकाल<<<

बहिण कोणाचीय>>>>>>>>>>>>> हा काय प्रश्न झाला?? अर्थात अनिश्का ची Rofl

मी बर्‍याच दिवसांनी काल बघीतली जुयेरेगा आणि मला काल पहिल्यांदाच चक्क चक्क मेघनाची बाजू घ्यावीशी वाटतेय... Proud

जर विजयाला वाटतेय ना आपली मुलगी केस कापायचे नाहीत म्हणून हट्ट करतेय, तर तिने त्याचं कारण तरी विचारून घ्यायला हवं होतं. बरं ठीकेय तिने जर ठरवलंच आहे ना की केस कापायचेच मुलीचे तर हट्ट करणार्‍या मुलीला काकूसोबत का पाठवा? दुसर्‍याच्या मुलीला असं जबरदस्ती करू शकतो का? आणि मेघनाला ते जमेल का? तरी मेघनाने सासरी आल्यापासून बर्‍याचदा मुलांची समजूत घातली आहे. एवढं फडाफडा बोलायला नको होतं विजयाने. आणि जेव्हा या दोघी म्हणतात ना की तू तुझं बघ, आम्ही ठरवू आमच्या मुलांचं काय करायचं ते तेव्हा त्या नाकं खुपसत असतात की हेच गिफ्ट का दिलं? अशीच का वागली? हाच नक्षीदार बॉक्स का? कुठून घेतला? दगडं नी धोंडं तेव्हा मेघनाने फाडकन बोललेलं चालणारेय का त्यांना की तुम्ही कशाला चोंबडेपणा करताय? माझा नवरा नी मी बघून घेऊ काय ते! ती तशी बोलत नाही ही वेगळी गोष्ट! पण आता मला खरंच वाटायला लागलेय की विजया आणि अर्चूला कोणीतरी या नस्त्या उठाठेवीबद्दल आणि चोंबडेपणाबद्दल जबरदस्त झापावं

Pages