होणार सून मी या घरची" -१

Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15

नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया Proud

Honar-Sun-Mee-Hya-Gharchi.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संत जाह्नवीबाई....:हाहा:
अगदी बरोब्बर....त्याच आविर्भावात वावरते ती.... गोखलेकुटुम्बातील पुरातन आणि भविष्यकालीन सर्व समस्यांच्या निराकरणार्थ 'निर्मिलेली गंगा'....आज्जीबाई 'भागिरथी', ही जाह्नवी....या दोन्ही गंगा नद्याच उद्धार करु शकतात गोखल्यांचा....घरातील बाकीच्या नद्यांना अश्रूंचे पूर आलेले असतात तिन्ही त्रिकाळ....;)
असो. काही प्रश्न पडलेले आहेत.
१. बेबी आत्याचे खरे नाव काय असेल? एक अंदाजः चंबळ देवी
२. श्री आणि जाह्नवीला मुलगी झाली तर तिचे नाव काय ठेवायचे बरं? यमुना/गोदावरी/ चंद्रभागा/ ब्रह्मपुत्रा /कावेरी / इरावती/ परुष्णि/ गोमती का आणखी काही ?

बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ श्री व जान्हवी फ्लॅटमध्ये बोलत आहेत. विषय तोच....शरयूच्या वर्तनाचा आणि ती ज्याच्याबरोबर आनंदात ती रस्त्यात बोलत होती त्या व्यक्तीसंदर्भात. जान्हवी आता या मतापर्यंत आली आहे की ती व्यक्ती जर श्री चे काका असतील तर एका पत्नीने घराबाहेर काढलेल्या पतीला भेटायला जाणे काही गैर नाही. ती आपले मत स्पष्टपणे व्यक्त करत आहे; पण इथे श्री चिडतो. "तू बोल, पण छोट्या आईने असे भेटायला जाणे ही गोष्ट मला आवडलेली नाही." जान्हवीलाहे पसंत पडत नाही..."अरे, श्री तो नवरा आहे त्यांचा..." इथे श्री बाजूला जाऊन म्हणतो, "दुर्दैवाने !" जान्हवीला हा एक धक्काच असतो. "श्री असे तू काय बोलतोस ? आणि एवढा त्रास करून घेण्यासारखे काय आहे त्यात ?" आता संतापाची पाळी श्री ची. तो उलट जान्हवीवरच चिडतोय..."एवढा त्रास? अगं जान्हवी....शरयू मला आईसारखी आहे...आणि त्या माणसाने माझ्या आईला कधीकाळी खूप छळलेय." जान्हवी, "कबूल, त्या आई आहेत ना तुझ्या....मग आज जे त्या वागत आहेत त्याबाबतचे भलेबुरे त्याना कळत असणार ना." "नाही कळत जान्हवी....छोट्या आईसारख्या बायकांना आपले भलेबुरे नाहीच कळत. फक्त लग्न झालंय म्हणून नवर्‍याकडून नेहमी मार खाणार्‍या स्त्रियांच्या कॅटेगरीतील आहे ती. माझ्या काकाने तिला खूप छळलंय तिला. माझ्या आईला आणि त्याच्या आईलासुद्धा." जान्हवी समजूतदारपणे म्हणते, "हे बघ श्री. तूच म्हणतोस की तू लहान असल्यामुळे तुला काका आठवत नाही. मग त्यांच्या छळाची जी बात तू करतो आहेस, ह्या सार्‍या ऐकीव गोष्टीही असू शकतील ना ? प्रत्यक्षात काय घडले आहे हे आपल्याला माहीत नाही." श्री खुलासा करतो, "अगं जान्हवी, मला हे सारे ज्यांच्याकडून कळले त्या सार्‍या घरातीलच आहेत ना ? त्या कशाला चुकीचे सांगतील ?" जान्हवी पुन्हा समजाविण्याचा स्वरात बोलते, "श्री, चुकीचे नाही सांगणार कुणीच. पण कित्येकवेळा असेही होऊ शकते की जी गोष्ट आपल्याला गंभीर वाटते, प्रत्यक्षात ती तितकी नसतेही." श्री प्रत्युत्तर देतो, "जान्हवी, प्रॉब्लेम गंभीर नसता तर आईआजीने स्वतःच्या पोराला घराबाहेर काढलंच नसतं ! त्यामुळे काका जरी मला आठवत नसला तरी अंधार्‍या खोलीत रडत बसलेली छोटी आई मला आठवते. माझा काका जे काही वागत होता ते चुकीचे होते, वाईट होते, हे कळण्याइतपत सेन्स मला होता. त्या माणसामुळे घराचे वातावरण बिघडते हे मला कळत होते. आईआजीने ज्यावेळी त्याला घराबाहेर काढला आणि त्या दिवसापासून तो या घरात नसेल असे जेव्हा आजीने जाहीर केले होते, त्यावेळी मला आनंदच झाला होता." जान्हवी आवाज कमी करत म्हणते, "या सगळ्यानंतरही छोटी आई आणि तुझे काका एकमेकाना भेटत असतील तर त्यांच्यातील नाते अजूनही टिकून आहे हे मानले पाहिजे." श्री निर्वाणीचे सांगतो, "ते काही असो. पण उद्या यात वाद निर्माण झाला तर काहीही झाले तर मी कायम आईआजीच्या बाजूने उभा राहीन." आता इथे जान्हवी स्मित करत नवर्‍याकडे पाहून त्याच्या गळ्यात आपला हात घालते...."आईआजीच्या बरोबर राह्यचे असेल तर तुला त्या घरी यावे लागेल...." ओळखीचे हसू पाहून श्री सुखावतो....बायकोच्या चेहर्‍याकडे पाहात म्हणतो, "वेल, इफ इट कम्स टु दॅट, आय वुईल".... जान्हवी, "यू वुईल व्हॉट ?" "येस, जान्हवी, तसे घडले तर घरातील एकमेव कर्ता पुरुष म्हणून मी घरी परत येईन." डोळ्यात आनंदाश्रू आणत जान्हवी हसते....श्री तिला तशीच हसर्‍या चेहर्‍याची साथ देतो.

या दरम्यान घरी पुन्हा शरयू नसल्याचे बेबी आणि नर्मदाबाई याना जाणीव होते. कालचा प्रसंग अद्यापि ताजा असूनही ही परत न सांगता बाहेर गेल्याचे पाहून बेबी संतापाने लाल होते. नर्मदाबाईनाही आता शरयूची बाजू कशी घ्यायची ते समजत नाही. दोघी बोलत असतानाच भाजीची जड पिशवी घेऊन शरयू आत येते. तिला पाहताच जाब विचारायाला बेबी तिच्याजवळ जाते....पण शरयू नेहमीप्रमाणे "मी भाजी आणायला गेले होते.." असे घाबरत सांगते...."पण कालच आठवड्याची भाजी आणलीस ना तू ?" असे बेबी म्हणताच, "हो का ? माझ्या लक्षातच नाही...बेबीवन्स.." असा खुलासा शरयू करते....चोरट्यासारखे एकदा नर्मदाबाईकडे तर एकदा बेबीआत्या यांच्याकडे ती पाहत राहते. बेबीआत्या "हे जे तू सांगत आहेस त्यातील एक शब्द पटत नाही. तुझ्या लक्षात राहाण्यासाठी ज्या काही युक्त्या करायच्या आहेत त्या कर, पण तुझ्याबाबतीत आता आम्ही इथे काळजी करत बसायचे हे आम्हाला नाही जमणार. ....आणि जर तू हे जाणूनबुजून विसरत असशील, तर याचा आम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार." शरयू चिंतेत पडते, काळजीने विचारते, "वेगळा म्हणजे ?" त्याला उत्तर न देता बेबीआत्या तिथून तिच्याकडे पाहात फणकार्‍याने निघून जाते. इथे शरयूला रडू कोसळते...नर्मदाबाई तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात; पण हातातील भाजीची पिशवी कशीबशी टेबलवर ठेवून शरयू हुंदके देत जिन्याकडे जाते.

[या प्रसंगी एरव्ही नेहमी खेळकरवृत्तीने काम करणार्‍या लीना भागवत यानी आपल्या अभिनयातील हा पैलूही फार सुरेखरित्या सादर केल्याचे जाणवते. पतीपासून दूर तरीही त्याला चोरून भेटायचे आणि इकडे सासुरवाडीत परतल्यावर ठरलेल्या भीतीने चिंब व्हायचे...या दोन्ही व्यक्तीरेखा लीना यानी ताकदीने उभ्या केल्या आहेत.]

जान्हवी आणि गीता बॅन्केत नित्याचे काम करत आहेत तर बॅन्क मॅनेजर बोरकर "मी आता सुट्टीवर जाणार... मला काही काम नाही...मला बोर्ड नोकरीवरून काढून टाकणार....आता तुम्हीही जावा सुट्टीवर..." असले काही बोलत त्या दोघींच्या टेबलजवळ येऊन कामेच थांबवितो. जान्हवी व गीता गोंधळतात, खुलासा विचारतात तर त्याला उत्तर म्हणून बोरकर कुठल्या तरी पार्टीला चेकचे पैसे दिले किंवा दिले नाहीत याबद्दल बोर्डवरील सदस्य त्याना जाब विचारीत आहेत. चूक कुणाची हे माहीत नाही, त्यामुळे मॅनेजरच्या नोकरीवर गदा येणार या भ्रमात ते आहेत. त्याच सूरात ते आपल्या केबिनमध्ये जातात आणि इकडे दोघी मैत्रिणी कुणाची चूक या विचारात एकमेकीकडे पाहतात.

गोखले गृह उद्योगाच्या ऑफिसमध्ये भागीरथीबाई एकट्या आहेत. त्यांचे कामात लक्ष नाही. सारे काही "शरयूचे काय ?" याच प्रश्नात आहे आणि त्याना ती सून म्हणून आलेल्या दिवसापासूनची आठवत आहे. त्याना वाईट वाटते तिच्या वाट्याला आलेल्या दुर्भाग्याची. पण शेवटी आपण तिच्याच कल्याणासाठी प्रत्यक्ष पोटच्या पोराला बाहेर काढून सुनेला घरी ठेवले आहे. आता ते विसरून जर ही नवर्‍याला भेटत असेल तर ? या शंकेने मॅडम अस्वस्थ आहेत. जान्हवीने खरे सांगितले तर हा गुंता सुटेल अशी आशा त्याना वाटत आहे. भागीरथीबाईंचे मनातील द्वंद्व दार उघडून आत आलेला श्री पाहतो. तो हे पाहतो की आईआजी आता मोकळेपणे रडतही आहेत. न राहवून त्यांच्याजवळ जातो. आजी त्याच्याकडे पाहतात, तोही रडत आहे...."मी तुम्हाला मेल केला आहे..." अशी काहीतरी आजी सबब सांगतात, पण श्री तिकडे लक्ष न देता टेबलवरील पाण्याचा ग्लास त्यांच्यापुढे धरतो. आजी नातवाकडे बघत राहतात.

लवकर ? अगं, सादर करण्याची वेळ पाहा ना....बरोबर ११.३१, म्हणजे कार्यक्रम संपल्यावर पुढच्याच मिनिटाला अपडेट दिले आहेत. आज फार रडारडच होती, त्यामुळे लिहिणेही काही जास्त नव्हतेच.

१. बेबी आत्याचे खरे नाव काय असेल? एक अंदाजः चंबळ देवी >>> Proud Lol
२. श्री आणि जाह्नवीला मुलगी झाली तर तिचे नाव काय ठेवायचे बरं? यमुना/गोदावरी/ चंद्रभागा/ ब्रह्मपुत्रा /कावेरी / इरावती/ परुष्णि/ गोमती का आणखी काही ?>>> इंद्रायणी , गंगा सध्या इतकेच आजून सुचले कि लिहीनच Wink Lol

भास्कराचार्य....

खरं म्हणजे अजून वाढ झाली असती....कारण पिंट्याच्या घरातील ताणाताणीचा एक प्रसंग मी पूर्णपणे वगळला. तिथे काहीही चालले होते....पिंट्याचे ते बिझिनेसचे रडगाणे....फोनवरून आपटेसोबत बोलणे....एका बाजूला आई तर पेपर वाचत बसलेले सदाशिवराव दुसर्‍या बाजूला....आणि तिघांतील नित्याचा विषय : जान्हवी.

यावर काहीच लिहू नये असेच वाटले....अन्यथा ६०-७० लाईन्स झाल्या असत्याच.

भास्कराचार्य....

खरं म्हणजे अजून वाढ झाली असती....कारण पिंट्याच्या घरातील ताणाताणीचा एक प्रसंग मी पूर्णपणे वगळला. तिथे काहीही चालले होते....पिंट्याचे ते बिझिनेसचे रडगाणे....फोनवरून आपटेसोबत बोलणे....एका बाजूला आई तर पेपर वाचत बसलेले सदाशिवराव दुसर्‍या बाजूला....आणि तिघांतील नित्याचा विषय : जान्हवी.

यावर काहीच लिहू नये असेच वाटले....अन्यथा ६०-७० लाईन्स झाल्या असत्याच.
<<<

Lol

भास्कराचार्य....

खरं म्हणजे अजून वाढ झाली असती....कारण पिंट्याच्या घरातील ताणाताणीचा एक प्रसंग मी पूर्णपणे वगळला. तिथे काहीही चालले होते....पिंट्याचे ते बिझिनेसचे रडगाणे....फोनवरून आपटेसोबत बोलणे....एका बाजूला आई तर पेपर वाचत बसलेले सदाशिवराव दुसर्‍या बाजूला....आणि तिघांतील नित्याचा विषय : जान्हवी.

यावर काहीच लिहू नये असेच वाटले....अन्यथा ६०-७० लाईन्स झाल्या असत्याच.
<<<

Lol

<<<
<<<

Lol

श्री घरी आलेला आहे व त्याच्या डोक्याला तेल लावण्याची जबाबदारी आता आईआजींनी जान्हवीकडून काढून घेऊन स्वतःकडे घेतलेली आहे. ह्या बदलामुळे श्री, जान्हवी, आईआजी व प्रेक्षक ह्यांना काहीही फरक पडलेला नाही.

'धर श्रीला अन् थाप त्याच्या डोक्यावर तेल' असे चाललेले आहे.

श्रीची मावशी त्या घरात का वावरत आहे हे मला अडाण्याला समजलेले नसून ते ज्ञान कृपया कोणीही मला देऊही नये.

आज डाळिंबीची उसळ (म्हणजे काय कोण जाणे, वालाची असावी बहुधा), भाज्या घातलेला पुलाव, मटार पॅटीस, सायीचं दही घातलेलं फ्रूट सॅलड असा मेन्यू होता. फ्रूट सॅलडमध्ये सायीचं दही घालणार्‍यांवरूनच 'दिमागका दही' हा वाक्प्रचार अस्तित्वात आला असावा.

शरयू वहिनींनी आज 'ती' ह्या विषयावरून नवर्‍याला फोनवरून आडवेतिडवे झापले व सरसूमावशी ते चोरून ऐकताना चपापली. इथे एक विबासं झाला तर बायका घर डोक्यावर घेतात, आणि मी!

फ्रस्ट्रेटेड बेबी आज थुई थुई नाचत होती. इंदू वहिनींना आज प्रथमच आजूबाजूला काय चालले आहे ते नीट समजले. अभिनंदन इंदूवहिनी! आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो.

आज एक विमनस्क तरुण जान्हवीला तिच्या ऑफीसमध्ये भेटला व त्याला काही फायनान्सर्स फायनान्स करणार असून त्यातून तो एक गृह उद्योग सुरू करणार आहे असे त्याने सांगितले. तो पुढे हेही म्हणाला की श्री (तो श्रीला भावजी का म्हणत होता ते समजलेले नाही) गोखले गृह उद्योग सोडणार आहे. जे श्रीला स्वतःलाही माहीत नाही ते ह्या विमनस्क तरुणाला माहीत असल्याचे दाखवून दिग्दर्शकाने सस्पेन्सही समाविष्ट केला आहे.

पिंट्या नावाचे कोणीही नसून ते एक बोगस पात्र ह्या धाग्यावर वावरत आहे असा निष्कर्ष काढून थांबतो.

-'बेफिकीर'!

अगदी अगदी आता श्री च्या डोक्याला तेल लावण्याची जबाबदारी आई आजीने घेतलेय. भारी तेल थापताहेत श्री च्या डोक्यावर. म्हणून श्री एवढा गुळमुळीत झालाय. बघून अगदी जळायला होत. आमच्या घरात कोणी लावत नाही अस डोक्याला तेल Happy काश हमारे भी घरमे ऐसा तेल लगाते Happy

काही ठळक बाबी लिहायच्या राहिल्या त्याबद्दल क्षमस्व!

आज श्री बसमध्ये चढताना दाखवला नाही.

आज आपटे दिसला नाही.

आज जान्हवीने श्रीला डबा दिल्याचे दाखवले नाही.

गुरुवार दि. १३ फेब्रुवारी २०१४ : अपडेट

~ अपेक्षेप्रमाणे आजी आणि नातू यांच्यातील तो दुरावलेल्या नात्यांना परत एकत्र आणण्याचा प्रसंग कालच्या भागापासून आज पुढे सुरू झाला. आजच्या कार्यक्रमात तसे पाहिले तर संवादाला काही स्थान नव्हतेच, त्यामुळे दोघेही डोळ्यात पाणी आणून एकमेकाकडे पाहातच राहिले. आजी काही कार्यालयीन पातळीवरील संवाद बोलायचा प्रयत्न करतात, पण श्री त्याना उत्तर देण्याऐवजी पाण्याचा ग्लास देतो....त्या घेतात. मग हा त्यांच्या खुर्चीजवळ जाऊन खाली गुडघे टेकवितो आणि आजीचे हात आपल्या हाती घेऊन तिची क्षमा मागतो. त्याही "मी घेतलेले निर्णय बरोबर होते असे नाही....माझाही कठोर स्वभाव आपल्यात दूरी निर्माण करणारा ठरला..."अशी कबुली देतात. या पद्धतीचे थोडेफार संवाद होतात. थोड्या वेळाने त्याच ठिकाणी आजी त्याला "मी काही सांगणार आहे.." असे म्हणतात तर त्यावर श्री, "नाही, मी लहान असल्याने मी काहीतरी तुला सांगणार.." असा हट्ट धरतो. शेवटी दोघेही एकाच वेळी "घरी परत ये....घरी परत येतो आहे"....असे म्हणतात आणि आनंदीत होतात.

बॅन्केत जान्हवीसमोर तिचा भाऊ पिंट्या तो पाया नसलेल्या बिझिनेसचा प्रस्ताव घेऊन आला आहे. त्या अगोदर असल्या बिनबुडाच्या उद्योगधंद्याविषयी घरी आईवडिलांना सांगत आहे आणि सांगताना "माझ्याकडे एक मोठा फायनान्सर आहे. तो श्री भावजीना धंद्यासाठी भांडवल देण्यास तयार आहे. आता फक्त जान्हवीताईने भावोजीना पटवून दिले की मग मी देखील त्या धंद्यात त्यांच्यासोबत पार्टनर होणार..." असले स्वप्न ऐकून आईला काहीच समजत नाही, तर सदाशिवराव याना अर्थातच त्यात सत्याचा अंश दिसत नाही. तरीही त्याला धोक्याचा कंदिल दाखवितात....मात्र पिंट्या मी ताईकडे जाऊन तिला सारे सांगतो असे म्हणत बॅन्केत येऊन तिच्यासमोर बसला आहे. जान्हवी त्याचे सारे ऐकते; पण "ते ठीक आहे पिंट्या पण तुला नवीन उद्योगासाठी एवढे मोठे भांडवल देणारी व्यक्ती कोण आहे ?" या प्रश्नाला पिंट्याकडे अर्थातच उत्तर नाही; पण तो निव्वळ वेळ मारून नेत आहे...भावोजीना तू तयार कर...असा आग्रह धरतो. जान्हवी त्यालाच उलट विचारते, "अरे, त्याना तयार कर म्हणजे काय ? ते काही आपला गोखले उद्योगधंदा सोडणारे नाहीत..." हा पिंट्यासाठी एक धक्काच असतो.

गोकुळ बंगला....शरयूची खोली. ती फोनवर तळमळीने नवर्‍याशी बोलत आहे. "मला कधीकधी असे वाटते की संपवून टाकावे हे सारे आता. इतकी मरमर करते मी तुमच्याशी पण त्याचे तुम्हाला आहे काही का ? मी काय केले म्हणजे तुम्हाला पटेल हे मला सांगा जरा. तुम्ही एकदा इथे येऊन बघा जरा म्हणजे तुम्हाला माझी अवस्था कळेल. मी कुठल्या परिस्थितीतून घरातून बाहेर पडते, तुम्हाला भेटायला कशी येते, त्याचा काही उपयोग आहे का? मी तुमच्यासाठी काही, कितीही केले तरी तुम्ही प्रत्येकवेळी तिलाच जवळ करणार. मी शपथ घालून निघाले होते ना तुम्हाला ? मग तुम्ही असं का केलं ? मी काय केले म्हणजे तुम्हाला पटेल ? अहो पण ते शक्य नाही ना, मग ? आता एक उपकार करा माझ्यावर....पुरे करा आता हे सगळं !" रडतरडतच शरयू फोन बंद करते....तिचा हा नवर्‍याशी संवाद चालू आहे आणि तिच्या मागे दरवाजा उघडून सरसूमावशी आली आहे आणि तिने सारा संवाद अविश्वसनीय चेहरा करून ऐकला आहे.

श्री जान्हवीला फोन करून सांगत आहे, "जान्हवी माझी आता डिनर मीटिंग आहे तेव्हा मी जेवायला फ्लॅटवर नाही. तू घरी जा...." जान्हवी म्हणते, "अरे रोज भेटतो ना आपण ? मग थोडावेळ येते ना मी फ्लॅटवर..." श्री ला माहीत आहे तो आणि आजी आता थेट घरीच जाणार आहे आणि ते दोघेही जान्हवीला सरप्राईझ करणार आहेत. सबब तो आग्रहाने तिला घरी जाण्यास सांगतो. श्री काहीही बोलत असला तरी त्याच्या आवाजातील आनंद लपत नाही. जान्हवीला ते समजते तरीही कोड्यात पडलेली असल्याने ती म्हणते, 'किती दिवसांनी तुझा असा मस्त आवाज ऐकत आहे मी..." श्री इकडे हसतो आणि बाय म्हणतो. या दोघांचा खट्याळ संवाद मागे उभी असलेली आजी ऐकते आणि मग त्यानाही हसू फुटते.

घरी आजीसह सार्‍या स्त्रिया विशेष भोजनाची तयारी करण्यात गुंतल्या आहेत. सारे स्वयंपाकघर आनंदाने बहरले असल्याचे दिसते. कारण उघड आहे....आज श्री घरी परतणार आहे....शरयू उदास आहे, पण तीही या कार्यक्रमात सामील झाली आहे. एरव्ही आजी थेट जेवायलाच येत असतात पण आज त्या स्वतः स्वयंपाक करण्यात आघाडीवर आहे.....एवढ्यात जान्हवी बॅन्केतून येते आणि घरातील हा मेजवानीचा बेत आणि हास्यकल्लोळ पाहून चक्रावते. तिला काहीही कळत नाही....आणि कुणी तिला काही सांगतही नाही. बेबीआत्यासह सार्‍याच तिच्याकडे पाहून हसत राहतात. जान्हवी हिला विचार तिला विचार असे करत राहते...शेवटी आजीच नर्मदाबाईला म्हणतात, "सांग तिला, काय आहे ते"....नर्मदाबाई आणि इंदूबाई दोघीनी जान्हली दरवाजाकडे पाहा अशी खूण करतात....जान्हवी उत्सुकतेने तिकडे पाहते....तो तेथून हळुहळू चालत येत असलेला श्री समोर येतो. जान्हवीचा हर्ष अपार आहे...इतका की तिच्या तोंडून शब्दही फुटत नाही.....नवर्‍याकडे जाण्याच्या अगोदर ती आजीला आनंदाने मिठी मारते.

हा सारा प्रसंग अत्यंत खिन्नपणे पाहाणारी शरयू जणू काही हे आपल्या नशिबात आहे का ? याचा विचार करीत बसली आहे. तिच्याकडे कुणाचेच लक्ष नाही.

मामा मस्त अपडेट्स. आज मामा खुश जावईबापू घरी परतले. पिंट्या कोणाच्या पाठीमागे आहे जान्हवीने जरा शोध घ्यावा, नाहीतर भाऊ बिघडेल.

बेफिकीर सोललेले वाल असतात त्याला आम्हीपण डाळींब्या म्हणतो, त्यामुळे वालाच्या उसळीलाच डाळींब्याची उसळ म्हणतात.

आयत्या वेळेला वाल / डाळिंब्या इत्यादी करायच्या असतील तर सोललेल्याच मिळतात ना? अचानक त्याला मोड आणणे शक्य नाही. मग बेबी नक्की काय करत होती Uhoh

अचानक त्याला मोड आणणे शक्य नाही. मग बेबी नक्की काय करत होती>>> एकेक वाल हातात घेउन त्याला मोड आणत होती.

आज डाळिंबीची उसळ (म्हणजे काय कोण जाणे, वालाची असावी बहुधा), भाज्या घातलेला पुलाव, मटार पॅटीस, सायीचं दही घातलेलं फ्रूट सॅलड असा मेन्यू होता. फ्रूट सॅलडमध्ये सायीचं दही घालणार्‍यांवरूनच 'दिमागका दही' हा वाक्प्रचार अस्तित्वात आला असावा.

फ्रस्ट्रेटेड बेबी आज थुई थुई नाचत होती. इंदू वहिनींना आज प्रथमच आजूबाजूला काय चालले आहे ते नीट समजले. अभिनंदन इंदूवहिनी! आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती होवो.
आता इयत्ता पहिलीला असा धडा येईलः

बेबी मोड आण

आजी तेल लाव

शरे पळून जा

श्री घरी ये

इंदू लक्ष दे >>> हेहे सॉलीडच, बेफि... १ नंबर Biggrin

Pages