Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो! मला एक तुकडा पोचव ठाणे
हो!
मला एक तुकडा पोचव ठाणे स्टेशनवर.. लोणी लावून.
नक्की! आज करीन हा प्रयोग. बघू
नक्की! आज करीन हा प्रयोग. बघू तरी काय होतंय...
खिचडीचं थालिपीठ! बर! त्यात
खिचडीचं थालिपीठ! बर!
त्यात भाजणीची बरीच अॅडीशन करायला लागते हे लक्षात ठेवा. तेलही जास्त लागतं नेहेमीच्या थालिपिठापेक्षा.
(एक भांडंभर खिचडी संपेल पण नंतर दोन ताटं भरून थालिपिठं उरतील ;))
वाटीभर किंवा थोड्या खिचडी॑वर
वाटीभर किंवा थोड्या खिचडी॑वर प्रयोग करीन आधी. नायतर ते फोडणीची खिचडी आहेच...
वाटीभर किंवा थोड्या खिचडी॑वर
वाटीभर किंवा थोड्या खिचडी॑वर प्रयोग करीन आधी.>>>
केवढं मोठं भांडं भरून खिचडी उरलीये?
मी पाणी प्यायचं भांडं समजले.
पुष्कळ उरली असेल तर त्यात कांदा घालू नये, कांद्याचं पाणी सुटलं तर आवरणं कठीण होईल.
मंजूडी पाऊण लिटर वालं भांड
मंजूडी पाऊण लिटर वालं भांड भरून आहे खि. मला कळेच ना काल की ती एवढी जास्त झालीच कशी! मग कळाल की १ वाटी तांदूळ + १ वाटी डाळ असं होतं :p
अरे, शिळी खिचडी चवीला किती
अरे, शिळी खिचडी चवीला किती अफलातून लागते राव! त्यात आवडीप्रमाणे दही/ ताक घालायचे, मस्त कालवायचे... सोबत एखादी चटणी/ लोणचे / पापड. पोटात गारेगार.
खिचडीचे छोटे छोटे वडे तोडुन
खिचडीचे छोटे छोटे वडे तोडुन ताटं उन्हात ठेव योकु. हवे तेव्हा ते पापडासारखे तळुन खाता येतात.
तेल टाकुन केलेली (फोडणीची खिचडी ) असल्यास वड्यांना वास येईल लवकर संपवावे १५-२० दिवसात.
सेम हा प्रकार राहिलेल्या भाताचा पण करता येतो.
भरीस हवे तर थोडे तिखट - मीठ वाढवायचे.
ठाणातल्या धुळीनं ते
ठाणातल्या धुळीनं ते काळेकुट्ट्ट्ट्ट होतील २ दिवसात :p
पण आयडियाची कल्पना छान आहे!
योकु, त्यात अजुन थोडे पाणी
योकु, त्यात अजुन थोडे पाणी घालुन मस्त १-२ शिट्ट्या देऊन मऊ शिजवुन घे. मग छान घोटुन पिठल्या एवढी पातळ पाहिजे. वरतुन तुपाची जीरे, मीरे, काजु, बारीक हि.मिरची आणि भरपुर आल्याची फोडणी करुन, एक वाफ आण. मस्त खारा पोंगल तयार.
डाळ ढोकली / वरण फळ / चकोल्या
डाळ ढोकली / वरण फळ / चकोल्या नेहमीची रेसिपी फक्त पास्ता /फुसेली घालून ढोकळी. डाळ शिजवून त्यात नेहमीचे साहित्य घालायचे फक्त पीठ लाटून ढोकली न घालता फुसेली पाण्यात शिजवून डाळीत घालायची. व्होल व्हीट फुसेली किंवा जाड पास्ता हि चालतो. पटकन होणारी डिश, पण दुसर्या दिवशी घट्ट होते कारण पाणी शोषले जाते.
खारा पोंगल +१... वेळही वाचेल.
खारा पोंगल +१... वेळही वाचेल.
इंडियन स्टोर मधे मिळणार्या
इंडियन स्टोर मधे मिळणार्या पंजाबी वड्या कशा वापरायच्या कोणि सांगू शकेल का प्लीज?
स्नेहा१, त्याचा जरा चुरा
स्नेहा१, त्याचा जरा चुरा करुन(मी घेतलेल्या जंबो वड्या होत्या). वांगं, बटाटा आणि कांदा घालुन रस्सा भाजी करायची.
चालणार असेल तर शिळं खाऊ नका,
चालणार असेल तर शिळं खाऊ नका, काहीच मिळणार नाहिये शरिराला, मनाला फक्त अन्न न वाया गेल्याच समाधान. ('खाऊन माजा टाकून माजू नका' माहित आहे.)
शबाना, इथे आहे ती रेसिपी
शबाना, इथे आहे ती रेसिपी सखिप्रियाने दिलेली.
काल केलेली खिचडी ना? टाकून
काल केलेली खिचडी ना? टाकून द्या. खरचं सांगतीये. मला तरी नेहमी अस वाटत कि शिळ्या पदार्थाला उगाच डेकोरेट करत बसण्यात काही पॉइंट नाही. शेवटी वायाच जातो बरेचदा तो. उलट आता पेक्षा जास्त एनर्जी वाया.
प्रीती, त्या वड्या तळल्या
प्रीती, त्या वड्या तळल्या होत्या की तशाच टाकल्या होत्या?
sneha1, नाही तळल्या नाही पण
sneha1, नाही तळल्या नाही पण थोडं जास्त तेलात सगळं चांगलं परतुन मग पाणी टाकायचं.
फुसेली घालून ढोकळीची आयड्या
फुसेली घालून ढोकळीची आयड्या आवडण्यात आली आहे. आजकाल आमचा धाकला वरणाला हातच लावायला बघत नाही. पांढरा भात चालेल म्हणतो. ...बघुया फूस लावायला फुसेली उपयोगी पडतेय का
आदल्या दिवशीची खिचडी योकुला
आदल्या दिवशीची खिचडी योकुला टाकायला का सांगसां? आदल्या दिवशीचं खाल्ल्याने लगेच काही अपाय वगैरे होतो का?
वेका, सखिप्रियाची पास्त्याची वरणफळंही भारी लागतात.
http://www.maayboli.com/taxonomy/term/985
आभार्स सायो. तिचा फोटोपण
आभार्स सायो. तिचा फोटोपण टेम्प्टींग आहे...लिस्ट्वर ठेवते.
तुझ्या मुलाकरताच नव्हे,
तुझ्या मुलाकरताच नव्हे, आपल्याकरताही वन डिश मील म्हणून मस्त आहे. मी अगणित वेळा केली आहेत ही वरणफळं. फक्त मी पास्ता अगदी ७,८ नं. इतकाच घालते.
झालं खिचडीचं प्रकरण. वाटीभर
झालं खिचडीचं प्रकरण. वाटीभर बाजूला काढून थालीपीठ लावलं; एकाच थालीपीठात गार झालो मी! लईच तेल पितात
भाजणी + एखादं दुसरं पीठ घेतलं असतं तर कमी तेल पितील असं वाटतंय. बाकी खिचडी टाकूनच द्यावी लागली.
आत्ताच मस्तपैकी कोथिंबीरीची भाजी केलेली भाजणी घालून, ती मात्र अप्रतिम झाली होती.
थॅन्क्स प्रीती , मी करून
थॅन्क्स प्रीती , मी करून बघीन..
राजमा, चना करताना टोमाटोऐवजी
राजमा, चना करताना टोमाटोऐवजी पिकलेले सफरचंद घातले. इकडे उन्हाळ्यात खुप सफरचंद होतात किंवा इतर वेळीही विकत आणलेल्या पैकी शिल्लक राहतात. ज्या ज्या पातल् उसळीत कांद्याबरोबर टोमाटो घालतो तिथे हा प्रयत्न करून बघा. आमटीत एवडा चांगला लागत नाही. मऊ शिजून एकजीव झाला पाहिजे रश्शामध्ये.
स्प्रिंग रोल किंवा
स्प्रिंग रोल किंवा सामोश्याच्या तयार पट्टया अमेरिकेत कुठे मिळतात? इंडियन ग्रोसरी/वॉलमार्ट वगैरे? काय ब्रॅंड आहे? एनी आयडिया?
Try to buy spring roll in
Try to buy spring roll in frozen section of Chinese market· Names vary based on your location.
धन्यवाद वेका. चायनिझ मार्केट
धन्यवाद वेका. चायनिझ मार्केट आहे इथे जवळच..तिथे पहाते.
ईथे कुणी आठवड्या साठी तयार
ईथे कुणी आठवड्या साठी तयार भाज्या , आमट्या ईत्यादी फ्रीज केलंय का? कुठल्या भाज्या जनरली अशा फ्रीज करून टिकतात? साधारण एका आठवड्यात संपेल अशाच दृष्टीने शिजवायचं आहे.बटाट्याची रस्सा भाजी वगैरे टिकते का? काही टिप्स असतील तर प्लीज शेयर करा.
Pages