युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इमर्जन्सी असेल तर आयत्या टोमॅटो प्युर्‍या, आलंलसणीचं वाटण, तयार पास्ता सॉस, रेडी टू कूक ग्रेव्हीज, परंपरा सारखी तयार वाटणं, नेसले कोकोनट पावडर/मिल्क यावर विसंबणे मी पसंत करीन. >>> यामध्ये मॅगीच्या तयार ग्रेवीज चांगल्या आहेत...

चला बुवा, माझ्यासारखं कोणीतरी सापडलं. :).
माझ्यावर अजून तशी 'वेळ नसण्याची' वेळ आली नाही म्हणून(च) असेल, पण पूर्वतयारी प्रकरण माझ्याच्याने होत नाहीये. माझा मूड व वेळ व सर्वांची भूक जशी असेल त्याप्रमाणे रोजचा स्वैपाक केला जातो. भारतात असताना स्वैपाकाला कुक यायची तेव्हा मात्र मेन्यू प्लान करुन ठेवायला आवडायचा, आता सगळी भिस्त त्यावेळी हाताशी असलेल्या भाज्या / इंग्रेडियंट्स व काय खायची इच्छा आहे त्यावर. Happy
शर्मिला च्या अख्ख्या पोस्टला अनुमोदन. Happy

कांद्याची आयडिया मस्त स्नेहमयी.कारण तेल कमी लागेल. आता नक्की करून बघेन
मी असा कांदा फक्त बिर्याणी ला वापरात असे .

मवा & शर्मिला - तुमचे वाचून मला धीर आला. नाहीतर मला असे वाटत होते कि माझे काहीतरी प्रचंड चुकते आहे. बर्याच वेळा माझ्या पूर्व तयाऱ्या घरातील सदस्यांनी हाणून पडल्या आहेत.

' रोज रोज काय करू चा विचार न करावा लागणे ' हा विचारच प्रचंड सुंदर आहे. & " रोज रोज किचन न आवरावे लागणे ' अहाहा काय सुंदर स्वप्न .

पण माझ्या कडे नाही जमणार.

वाटण तयार ठेवण्यापेक्षा मी खोबर किसून लसून सोलून ठेवणे प्रिफर करते. आणि तेवढा पण वेळ नसेल तर रेडी मिक्स तो हि वेळ नसेल तर हॉटेल. तेही नको तर होम डिलिवरी

ती तयारी करून ठेवणे मला स्वतःला तरी नाहीच पटत. हा, एकवेळ लसूण सोलून ठेवला फ्रीजात तर ओके, ऐन्वेळेला ठेचून वा बारीक चिरून वापरता येतो. पेस्ट करून ठेवली तर मग सगळीकडे पेस्ट वापरणं नाही आवडत. वेगवेगळ्या पदार्थांना लसूण वेगवेगळ्या पद्धतीचा लागतो. जसं दाल तडक्यात ठेचलेला तर वेज स्टर फ्राय ला तिरपा चिरलेला... हेच बाकी पदार्थांना पण लागू.
अन खरं सांगायचं तर अगदी वाटणघाटणाचे प्रकार जास्त केलेच नाही जात. फुरसतीचा वेळ पाहून मगच होतात... Happy

शर्मिला Biggrin
तुझ्या अख्ख्या पोस्टला अनुमोदन!!
मी पण दाण्याचं कूट करणं आणि खोबरं खरवडून (हे बाई करते) फ्रिजमधे ठेवणे याव्यतिरीक्त काहीही पूर्वतयारी करत नाही. ऑफिसातून येता येता मार्केटातून भाजी घेऊन येते. पालेभाजी, कोथिंबीरीची जुडी इत्यादी फ्रिजमधे ठेवते, दुसर्‍या दिवशी बाई येते तेव्हा ती ते निवडून झिपलॉक/ डब्यामध्ये भरून ठेवते. पोळ्यांना बाई आहे त्यामुळे मला सकाळी भाजी चिरून ती शिजवणं आणि नाश्ता तयार करणं ही कामं पाऊण तासात होतात. फळे (डाळींब, मोसंब, कलिंगड, खरबूज) आणि सॅलड चिरण्याचं काम साबा करतात Wink नाश्ताही फार खटपटीचा नसतो. वेळखाऊ नाश्ते सुट्टीच्या दिवशी करायचे. पराठे, थालिपीठं असेल तर पोळीवाल्या मावशीच करतात. पीठ भिजवून देण्याचं काम तेवढं करावं लागतं.
माझी ऑफिसातून घरी येण्याची वेळ ८५% निश्चित आहे, म्हणजे बॉस लोकांना मी तशीच सवय लावलेली आहे Wink आठवड्यातून एखाद दुसरा दिवस उशीर होतो. संध्याकाळी घरी आल्यावर कोशिंबीर करणं एवढंच काम असतं. कूकर साबांनी लावून ठेवलेला असतो. रात्रीचं जेवणानंतरचं आवरलं की दुसर्‍या दिवशीची थोडीफार तयारी करायची. म्हणजे कोबीची भाजी करायची असेल तर डाळ भिजत घालायची इत्यादी...
पाहुणे जनरली आधी कळवूनच येतात. सुट्टी असेल तरच त्यांच्यासाठी विशेष सैपाक, सुट्टी नसेल तर सकाळीच भाजी जास्त करायची, पोळ्या जास्त करवून घ्यायच्या. रात्री ताजी कोशिंबीर आणि आमटी-भात. पाहुणे अचानक आले तर बाहेरून जेवण मागवायचं.

मी मागे एक 'चौदा मिनिटांत स्वयंपाक' नावाचं अचाट पुस्तक आणलं होतं. म्हणजे आधी पूर्वतयारी असली की कोणताही शाही स्वयंपाकही कसा चौदा मिनिटांमधे होतो रोज, हे विविध मेन्यूंमधून लिहिले होते. मेन्यूही सगळे मोगलाई, कॉन्टिनेटल, सणासुदिंचे "फक्त चौदा मिनिटांत."

ते वाचल्यावर आयुष्यातला काही काळ फार तणावाखाली गेला. म्हणजे रोज उठून त्यातल्या पूर्वतयारींची यादी वाचायची, मनातल्या मनात ती करुन पाहिल्यावर मानसिक थकवा यायचा जो दिवसभर जायचा नाही. आणि जगात अशीही काही घरं आहेत जिथे हे मेन्यू रोजच्या रोज (चौदा मिनिटांत) बनत असतील त्यापैकी आपलं घर नाही हे मनात येऊन अपराध भावना. घरच्यांबद्दल कणव इत्यादीही Proud

सुदैवाने ही स्टेज आठवड्याच्या आतच (काहीही न करता) संपली हे माझं सुदैव.

नो पूर्वतयारी, माझ्याकडे पण. वाटण-घाटण काही नसतं. दाण्याचं कूट, खोवलेले खोबरे, काळामसाला, धने-जिरेपूड जिंदाबाद. शाळेच्या दिवसांत साडेपाचला उठून ६ पर्यंत आन्हिक आणि खूप झोप येत असेल तर आंघोळ करून स्वयंपाकाला सुरु करते. सुरुवात कणिक भिजवणे, भाजी चिरून फोडणीला टाकली की ब्रेफा करायला घेते मोस्ट्ली पोहे, सांजा, शिरा, शेवया उपमा, रेडिमेड बॅटरचे उत्तप्पे, शेवया खीर, ताज्या भाताचा फो.भा, सँड्विच यापैकी एक काहितरी असते. मग सगळ्यांच कॉफी / दूध तयार करते. एखादे सॅलड आयटम + सफरचंद / केळ (हीच फळ आलटून पालटून) ड्ब्याला. शेवटी पोळ्या करून डबे भरणे. ७.३० पर्यंत आटपतं. पालेभाज्या मोलकरीण निवडून देते. पनीर-बटर-मसाला, पास्ता, स्ट्फ्ड पराठे, रेड्करी, वरणफळ, छोले-पुरी, पावभाजी, मिसळ अश्या मागण्या विकेंडला, एकच पदार्थ करून तोच दिवसभर खायचा. बहुतेक रात्रीच्या जेवणांत नो पोळी, एकतर मुगाची खिचडी + दहि / रायता, आम्टी-भात किंवा पातळ्भाजी+भाकरी + कोशिंबीर. विकेंड ब्रेफा मोस्ट्ली भाजलेला ब्रेड / खारी + कॉफी / दूध

मला अश्या तयारीचेच दडपण येते. म्हणजे तयारी करण्याचेही आणि फ्रीज मोकळा करण्याचेही>> अनुमोदन.

दुरून डोंगर साजरे आणि जवळून आपापले जे चालले आहे ते बरे>>अनुमोदन

प्राची आणि पूनम + १

ते वाचल्यावर आयुष्यातला काही काळ फार तणावाखाली गेला.>> शर्मिला Lol
त्या चौदा मिनिटांच्या पूर्वतयारीसाठी किती वेळ लागेल असं लिहिलं होतं त्या पुस्तकात?

मी किती आळशी आहे हे आणि एवढंच कळलं मला गेली काही पाने वाचून पण मी त्याबरोबरच निर्लज्जही असल्याने काहीच तणाव आला नाही. Happy

हे म्हणजे झटपट समुद्रमेथीची भाजी असला प्रकार झाला...
दोन जुड्या समुद्रमेथी पटकन निवडा अन धुवून घ्या. ८/१० लसूण पाकळ्या पटकन सोलून ठेचा... अर्धीवाटी दाणे झटकन भिजवा... मजाकच आहे!!!

पेट थेरपी,
पास्ता सॉस घरी करणार असेल तर मी साधी लिडीआची मरीनारा सॉसची रेसीपी वापरते. बरेचदा मी जारमधले सॉस वापरते. निम्मे वापरायचे. निम्मे फ्रिजरला.

भारतात राहात असाल, रोज खात्रीने ताज्या भाज्या मिळत असतील, कामाला बाई/मदतीला घरातली माणसे असतील तर खरे तर पूर्वतयारी करावी लागत नाही. इथे मिडवेस्टमधे हे सुख नाही. साहाजिकच फ्रिझरमधे स्टॉक ठेवणे याला पर्याय नाही.

काही कारणास्तव भिजवलेले हरभरे (१ कि) आहेत. कसे संपवू?
रोज भाजी करणे, शक्य नाही. धीरड्यात थोडे ढकलेन.. थालीपीठात अजिबात नकोय. नुसती हरभर्‍यांची उसळ घरात कुणालाच आवडत नाही आणि मानवतही नाही. अजून काय करता येईल?
सध्यातरी शिजवून फ्रीझरमध्ये ठेवण्याचा विचार करतेय. पण लवकर संपवता आले तर उत्तम.
सल्ल्यांसाठी आगाऊ धन्यवाद.

१ कि. Uhoh

चाट आवडेल का?
हरभरे मीठ/ हळद घालून शिजवून त्यात पुर्‍यांचे तुकडे आणि बाकी चाट स्पेशल पदार्थ/ चटण्या घालून वरून थंडगार दही, शेव घालून खातात. मस्त लागतं.

chana kabab, chana paratha karata yeil.
harbhare nusatech telat partun kadak karun varun meeth n tikhat ghalun mast lagtat.

१ कि. अ ओ, आता काय करायचं >>>> हो ना.... का ते विचारू नका... लोक कसे मुर्खात काढतात याचे उत्तम उदा. असो. उगाच पुन्हा जखमेवर मीठ नको.

चाट, किंवा कबाब वगैरे बाद करावे लागतील कारण घरातील सगळ्यांचे घसे बेक्कार खराब झाले आहेत. थोडंसं तेलकट्/कडक्/कुरकुरीत खाल्लं की रात्रभर पश्चाताप असतो. सॉरी, या ऑप्शन्सचा विचार केलेला, पण लिहायचं राहिलं - कारण तेच वरचंच - जखमेवर मीठ. Sad

पराठे छान वाटतील. बाकी, प्रतिसादासाठी मनापासून धन्यचवाद.

काही कारणास्तव भिजवलेले हरभरे (१ कि) आहेत. कसे संपवू?
- काबुली चण्यांचे "हमस" खुप छान होते - पण काळे किंवा हिरवे चणे बहुदा नाही चालणार - त्यांची साले खुप जाड असतात

धारा, जमलं तर मैत्रिणींमध्ये किंवा शेजार्‍यांमध्ये हरभरे वाटून संपवून टाक. १ किलो म्हणजे बरीच क्वांटिटी आहे. टिकवता आले तर छानच आहे. पण तसे नसेल तर रोज हरभरे खाऊन पोट बरे राहील का?

इथे तुला हरभर्‍याच्या बर्‍याच रेसिपीज मिळतील.

Pages