युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह मला कळल नव्हत की फ्रीज म्हणजे फ्रिझर.

मी शनिवार, रविवार मध्ये २-३ भाज्या (कोबी, आलु गोबी, पालक ई.), २ आमट्या आणि भात (रोज च्या लंच साठी) एवढं करुन ठेवते.
पोळ्या जमेल तश्या रोज करते नाहीतर फ्रोझन पराठे. आम्ही प्रत्येक जेवणात भात किंवा पोळीच खातो, दोन्ही नाही. मधल्या वेळात किंवा जेवणानंतर फळं, काकडी टोमॅटोच सॅलड अस खातो.
कधी ऑफिस मधन लवकर आलो तर भाज्या बनवतो पण - उकडलेले बटाटे ई.

हे सगळ एक काय दोन आठवडे पण नीट टिकत फ्रिज मध्ये (फ्रिझर नाही) सिअ‍ॅटलच्या.

ब्रेडसाठी सगळे सोपस्कार करून कणिक भिजवली. तासाभरात मस्त दुप्पट फुगली. आता ओवनमध्ये ठेवणार एवढ्यात वीज गेली आणि ती पुढचे चार तास तरी येण्याची शक्याता नाही. त्या पिठाचं आता काय करु ? पिझ्झा बेस तव्यावर करता येतील का ? की पीठ तसेच ४ तास आंबले तरी चालेल ?

पिझ्झा बेस तव्यावर करता येतील का ? >>> बहुतेक हो. पण पिझा नाही होणार मला वाटतं... त्याला वरून हीट लागते चीझ वितळण्याकरता... एक संजीव कपूर ची पॅन पिझा ची रेसीपी आहे. ती शोधा युट्यूबवर.

की पीठ तसेच ४ तास आंबले तरी चालेल ? >>> माझ्यामते तरी ४ तास जास्त होतील.

मी करते आठवड्याचा स्वयम्पाक एकदाच !
डीप फ्रीझर मधे छान रहतो. कालच केला आहे. सध्या बाई रजेवर असल्याने - रवीवारी करणे सोपे जाते. म्हणजे मग रोजचे प्रत्येकी तीन डबे भरणे जड जात नाही .... Happy
सध्या डीप फ्रीझर मधे असलेल्या वस्तुन्ची यादी
काही वस्तु -तयारीला मदत करणार्या

  1. frozen peas /frozen corn - ready made मी आणुन्/सोलुन freeze नाही केलेले
  2. whole wheat pizza base -readymade
  3. marinated fish
  4. बर्फ
  5. हिरवे वाट्ण - हे मी दोन तीन आठ्वड्यातुन करते
  6. चिन्चेचा कोळ - हे सुध्हा
  7. कान्दा खोबरे वाटण हे पण
  8. वाळवलेला कान्दा - एका वेळी मी पाच किलो वाळवते . पुरतो तीन एक महीने

तयार पदार्थ डीप फ्रीझर मधे

  1. कोबीची भाजी
  2. फलोवरची रस्सा भाजी
  3. शिजवुन घाटलेली मुग डाळ आणि तुर डाळ
  4. लाल माठ भाजी - वाटण घालुन -थोडी सैल
  5. कालची उरलेलि बिर्याणि

तयार पदार्थ खाली फ्रीज मधे

  1. मश्रुम ची परतुन भाजी
  2. पातीची भाजी
  3. अळुवड्या
  4. कच्या केळ्यान्चे काप
  5. खजुर चटणी
  6. पुदिना चटणी
  7. कापलेला पपई
  8. कापलेला टरबुज
  9. दाण्यान्चे कुट

आता लिहितेच आहे तर हे हि
इतर तयरि

  1. इडलिचे पीठ
  2. भाजाणि - real all purpose मी थालिपिटान्ना / धिरडि घालायला / भाजीला लावायाला एकच वापरते
  3. गरम मसाला /गोडा मसाला
  4. डाळीची चटणी - South Indian पोडी सारखी
  5. तुप - साबान्ना outsourced (btw अनुस्वार कसा लिहायचा?)

खरच आठवडा सोपा जातो - आळशी पणात पटाइत असल्याने अशा अनेक युक्त्या काढ्ल्या आहेत. Happy
कुणाला interest असल्यास नक्कि विचारा. मला आवडेल सान्गायला. तेवढाच आळशी पणाचा पण उपयोग!

मॅरिनेटेड फिश / मीट असेल तर ते कसे थॉ करता?>>>>>>>>>>>>>>>>>>>
शक्यतोवर मी ते खाली फ्रीज मधे ठेवते ८-९ तास . अगदीच घाई असेल तर direct microwave मधे होते व्यवस्थित . २-३ वेळा उलटसुलट करते थॉ होत असताना. भाज्यान्चे पण तसेच

एक उत्सुकता म्हणून विचारते आहे.
आठवड्याचा इतका सगळा स्वयंपाक एकदम करून ठेवण्याची गरज का पडते? ते प्रकृतीसाठी अपायकारक नाही का?

अरे बापरे, स्नेहमयी तुमचे फ्रीझ क्ती मोठे आहे?>>>>>>>>>>
हे सगळे एका normal two door fridge मधे रहाते Happy खरोखर

हे तके तुम्ही एकाच दिवशी करता का?>>>>>>>>>>>>>>>
भाज्या/ चट्ण्या /मासे आणे चिकन marination दर आठ्वड्यासठि (एका दिवसात सहज होते)
वाटणे - २/३ आठवड्यातुन एकदा -गरजे प्रमाणे
मसाले /पीठे - २/३ महीन्यातुन एकदा --गरजे प्रमाणे
उदाहरण द्यायचे तर काल केलेल्या "स्वयम्पाकाच्या" कामान्चि यादी
- भाज्या /चटण्या
-अळुवड्या
-कच्या केळ्यान्चे काप
- फळे कापणे
-डाळी शिजवणे
-कैरीचे लोणचे (धन्यवाद जागु ताई)
- भाजाणि

आठवड्याचा इतका सगळा स्वयंपाक एकदम करून ठेवण्याची गरज का पडते? >>>>>>>>>>>
- वेऴखाउ आणि थोडे uncertain वेळान्चे career -but one that I enjoy
- कामवाल्या बाई चे काही long term issues चालु आहेत. ती सध्या २-३ महिने रजेवर आहे.
-नवर्याने नवीन व्यवसाय सुरु केला आहे - तो सध्या घराकडे फार लक्श नाही देउ शकत - त्यातच त्याला सध्या माझी मदत लागत आहे -कामात पण आणि मैत्रिण म्हणुन पण
- साबा आणि आई दोघी आता थकत चालल्या आहेत - आपल्या सन्साराची जबाबदारी त्यान्च्यावर टाकणे योग्य नाही वाटत
- ७ वर्षाची मुलगी आहे - तिचे वय/शाळा / घरातील घडामोडी (बाबाचा नवीन व्यवसाय / बाई अचानक आजारी ई.ई.) बघता - सध्या तिला आई ची गरज जास्तच भासत आहे
- मला माझ्यासाठी असाही वेळ ऱोज हवा असतो
- झोप पुर्ण होणे माझ्या साठी खुप गरजेचे असते - नाही तर मी लगेच आजारी पडते. सध्या मी आजारी पडले तर खुप गोन्धळ होइल आमच्या घरी Happy

या सर्व मुद्यान्चा विचार करता हाच पर्याय योग्य वाटतो.

ते प्रकृतीसाठी अपायकारक नाही का?
तापमान , हाताळणि आणि storage चे नियम पाळले , तर नक्कि नाही . असा निर्णय मी (माझ्या पुरता) घेतला आहे. आई/पत्नी /मुलगी/सुन आणि मी स्वतः ह्यातल्या सर्व जबाबदार्या पार पाडताना - bulk cooking is a great help.

Snehamayee I am really impressed. Hang in there. tough times dont last. etc etc. Happy

स्नेहमयी, माझे काहीच म्हणणे नाही. Happy
आठवड्याच्या सैपाकात 'फळे कापणे'चा समावेश बघून माझी बोलतीच बंद झाली.

स्नेहमयी - तुमचा अ‍ॅप्रोच मनापासून आवडला. सही नियोजन आहे. सगळी घडी व्यवस्थित बसण्यासाठी शुभेच्छा. Happy

स्नेहमयी, अहो इतके स्पष्टीकरण देउ नका हो कोणाला. तुम्हाला जे योग्य तेच बरोबर असे करावे लागते.
आता शक्यच नाही तर करावेच लागणार.

मन्जुडी - अग तू म्हणण्याचा काहिच प्रश्न्न नाही .... मुद्दाम स्प्ष्ट लिहिले कारण - बर्याच बायका , ह्या पर्यायाचा विचार पण न करता - तब्येतीची ओढाताण करुन /स्वतःला अजीबात वेळ न देता - रोज ताजा स्वयमपाक किन्वा मग daily canteen food या trap मध्ये अडकलेल्या दिसतात.

आणि फळान्विश्यी म्हणशील तर - ती कापलेली नसतील -तर सध्या तरी माझा नवरा शान्त्पणे biscuits खातो snacks म्हणुन Sad

आणि माझे सगळे उद्योग मीच ओढावुन घेतलेले आहेत - डबा वगैरे लावला तर कोणि काहिच म्हणणार नाही. त्यामुळे I really enjoy being on run always .

अरे बाप रे!!! एवढा सगळा स्वैंपाक एकाच दिवशी केला तुम्ही? हाताशी मदतीला कोणी होते का?
नाहीतर एक सुट्टीचा दिवस मिळतो तोही आख्खा किचनमध्ये खपणे जास्त दमवणारे नाही का?
वाटण, कोळ वगैरे समजू शकते, पण ५-५ भाज्या, कापं वगैरे म्हणजे खूपच व्याप झाला.

शिवाय, फळे आधी कापून ठेवू नयेत हो. माबोवरच याबाबत पूर्वी बरीच चर्चा झालेली आहे.

स्नेहमयीने लिहिलेली फळं- पपई, टरबुज, कलिंगडं वगैरे कापायला लागणारा वेळ कामाच्या घाईत असेल तर खूप जास्त वाटू शकतो. आणि आधी कापल्यावर त्यातून जितका न्यूट्रिशनल लॉस होईल तो जमेस धरुनही बिस्किटांपेक्षा ते नक्कीच हेल्दी.

बिस्किटांपेक्षा ते नक्कीच हेल्दी.>> त्यापेक्षा बिस्किटं खाणार्‍याला फळं कापायला दिली तर? Happy

सगळं रिलेटिव्ह आहे. एके काळी हेच कोणी केलं असतं तर '१) सुपरवूमनगिरी २) ताजे अन्न व्हर्सेस फ्रीजमधले अन्न ३) घरातल्या लोकांकडून मदत घेणे ४) मोलाने मदत घेणे/ विकत आणणे याच मुद्द्यांवर यापेक्षा वेगळी चर्चा झाली असती/ झाली असेलही कदाचित Happy

ती म्हणतेय ना की तिच्या नवर्‍याला सध्या अजिबात वेळ नाही.

बाकी मुद्द्यांवर नक्कीच चर्चा होऊ शकते/व्हावी. अर्थात इथली जागा योग्य नाही शिवाय स्नेहमयीने तिच्या वरच्या उत्तरांमधे आधीच या सगळ्या पर्यायांचा विचार केला आहे असं दिसत आहे. तेव्हा या उदाहरणात ती तशी करणंही व्यर्थ.

एके काळी हेच कोणी केलं असतं तर '१) सुपरवूमनगिरी २) ताजे अन्न व्हर्सेस फ्रीजमधले अन्न ३) घरातल्या लोकांकडून मदत घेणे ४) मोलाने मदत घेणे/ विकत आणणे याच मुद्द्यांवर यापेक्षा वेगळी चर्चा झाली असती/ झाली असेलही कदाचित स्मित>>> झाली आहेच की पूनम. दुसर्‍या बाफवर फ्रोजन/ रिहिटेड फूड आरोग्यावर काय आणि कसा परिणाम करतं ते हिरीरीने लिहिणारे आयडी इथे काही वेगळंच लिहित आहेत Wink
असो!

दुसर्‍या बाफवर फ्रोजन/ रिहिटेड फूड आरोग्यावर काय आणि कसा परिणाम करतं ते हिरीरीने लिहिणारे आयडी >>> ते कोण मला माहीत नाहीत, पण इमर्जन्सीच्या काळात स्नेहमयीने जे मार्ग शोधले आहेत ते मला तरी कौतुकाचे वाटत आहेत. एरवी ते आरोग्याला वाईट हे तिलाही ठाऊक असणारच.

(ती हे सगळं एव्हढं प्रचंड करत असताना चक्क एन्जॉय करते आहे ते तर मला अचंबीत करुन जात आहे Wink )

दुसर्‍या बाफवर फ्रोजन/ रिहिटेड फूड आरोग्यावर काय आणि कसा परिणाम करतं ते हिरीरीने लिहिणारे आयडी >>> ते कोण मला माहीत नाहीत >>> हो, मलाही कोण हे कळलं नाही.

शर्मिलाच्या वरच्या पोस्टला अनुमोदन.

बिस्किटांपेक्षा ते नक्कीच हेल्दी.>> त्यापेक्षा बिस्किटं खाणार्‍याला फळं कापायला दिली तर? स्मित>>>> पौर्णिमाशी सहमत. निदान काही बाबतीत तरी नवर्‍याची मदत घ्यावीच, नव्हे त्याला करायला लावावी. तुम्ही स्त्री/पत्नी/मैत्रिण्/आई/सून्/मुलगी अशा बहुविध जबाबदार्‍या पार पाडता आहातच की.:स्मित:

आणी बिस्किटेच कशाला हवीत? पौष्टिकच हवे असेल तर लाडु( मुग, ड्रायफ्रुट्स वगैरेचे ). वगैरे पण चालतील की विकतचे पण.

>> निदान काही बाबतीत तरी नवर्‍याची मदत घ्यावीच, नव्हे त्याला करायला लावावी.

रश्मी * ती म्हणतेय की तिच्या नवर्‍याला सध्या अजिबात वेळ नाही.*

आणि तुमच्या दुसर्‍या मुद्द्यासंदर्भात स्नेहम्यीचे हे वाक्य वाचा <<< आणि माझे सगळे उद्योग मीच ओढावुन घेतलेले आहेत - डबा वगैरे लावला तर कोणि काहिच म्हणणार नाही. त्यामुळे I really enjoy being on run always >>>

एनीवेज.. आय विड्रॉ (दोन्ही हात वर करुन) Proud

:फ़िदी: Wink

मस्त स्नेहमयी! तुमची पोस्ट आवडली. आठवडयाचा स्वयंपाक (अगदी पोळ्यासुध्दा) करुन ठेवणारी इतरही काही कुटुंबं माहीत आहेत. ते बरं पडतं खरंच.

स्नेहमयी, सेम पिंच. दे टाळी. रोज ताजा भारतीय स्वयंपाक करणे मला झेपत नाही. माझी मुलगी लहान असताना मी अगदी तुझ्यासारखीच सिस्टिम ठेवली होती. आता ती थोडी मोठी झाली आहे. फिजिकली माझी खूप गरज तिला नसते म्हणून ५ दिवसांऐवजी मी २-३ दिवसांचा स्वयंपाक करते. पण पूर्वी ग्रोसरी, भाज्या निवडणे इ. शनिवारी करून रविवारी सकाळच्या ३-४ तासात मी आठवड्याचा पूर्ण स्वयंपाक करून ठेवायची. नवरा पण मदत करायचा. आणि कामाचा झपाटा पण वाढवला. मग सोम-शुक्र दिवस अगदी हसतखेळत जायचे. थकवा यायचा नाही, घर स्वच्छ राहायच आणि मुलीबरोबर जास्त वेळ मिळायचा. मला पण इतर अनेक उद्योग असतात आणि माझ्यासाठी माझा स्वतः चा वेळ मिळणे हे प्राधान्य असतं.

आता गेल्या ३-४ वर्षात काही वेळा इमोशनल इम्बॅलन्स झाला इथे तिथे वाचून की हे असं शिळं खाणं वाईट, आत्ता नाही पण म्हातारपणी जाणवेल, पोषण मूल्यांचा र्‍हास इ. इ. त्यात त्या दिवेकर बाईंची पुस्तके वाचली तर आणखी त्रास होऊ शकतो. Happy पण असे विकली प्लानिंग करण्यात काहीही चूक नाही. त्यामुळे पिक युवर बॅटल. काही वेळा असं प्रवाहाविरुद्ध चांगलं असतं. मी कोणी पाव्हणे असताना, गटगला हे करत नाही कारण प्रत्येकाची विचारसरणी आणि मते वेगळी असतात. काहींना असं खाणं पचत नाही ( कदाचित मानसिकतेमुळेही असेल). साबासाबु इथे असतील तर तेव्हादेखील रोजचा स्वयंपाक रोज करावा लागे. पण मग नंतर सगळं आवरणं, स्वच्छता इ मुळे मला माझा असा वेळ मिळायचा नाही. इतरांची मदत मिळाली तरी मला हे रोज जमत नाही.

मी पण कलिंगड, टरबूज इ कापून ठेवते. फिश चिकन मॅरिनेट करते. २-३ दिवसांचे वरण शिजवलेले असते. पराठ्याचे पीठ भिजवून ठेवते.

आणि तुमच्या दुसर्‍या मुद्द्यासंदर्भात स्नेहम्यीचे हे वाक्य वाचा <<< आणि माझे सगळे उद्योग मीच ओढावुन घेतलेले आहेत - डबा वगैरे लावला तर कोणि काहिच म्हणणार नाही. त्यामुळे I really enjoy being on run always >>> अब्बा! धन्यवाद शर्मिला लक्षात आणुन दिल्याबद्दल, आणी असे असेल तर मी पण पास.:स्मित:

Pages