Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्रेड उपमा म्हणजे ब्रेड फ्राय
ब्रेड उपमा म्हणजे ब्रेड फ्राय पेक्षा वेगळा प्रकार आहे का? ब्रेड चे चौकोनी तुकडे करून फोडणीत घालायचे ते नकोय.. उपमा म्हणजे चक्क मिक्सर मधून बारीक करून उकळते पाणी टाकून करायचा??
ब्रेड पॅटिस, ब्रेड पकौडे, चीज
ब्रेड पॅटिस, ब्रेड पकौडे, चीज चिली टोस्ट.
ब्रेडचा चुरा घालून कटलेट्स.
कडकडीत उन्हात ब्रेडचे तुकडे करून वाळवता येतील व नंतर क्रूटॉन्स म्हणून सूपमध्ये वापरू शकाल.
गायत्री ब्रेड तेलात तळून घेऊन
गायत्री ब्रेड तेलात तळून घेऊन वरून एकतारी पाक घालून शाही टुकडा करू शकता. पण ब्रेड तळणे अपरिहार्य आहे.
मटार टपरवेयरच्या फ्रीज
मटार टपरवेयरच्या फ्रीज मेटच्या डब्यात भरुन फ्रिजर मध्ये ठेवले होते .. पन भाजि केलि तर चव वेगळि लागलि .. अजुन १ किलो आहेत.. ( फ्रिजर मध्ये बर्फ होतो म्हनुन २ दा डीप्रेस केला होता..म्हनुन झाले असेल का ??)
मैत्रिणींनो, गोड काही सांगू
मैत्रिणींनो, गोड काही सांगू नका! आठवडाभर घरात काही न काही गोड चालूये! चितळ्यांच्या गायीच्या दुधाची कृपा.. सायीचे तूप होत नाही म्हणून ती वापरलीये सो आता ब्रेड चा तिखट आणि कमी तेलकट पदार्थ सांगा प्लीज!
उपमा म्हणजे चक्क मिक्सर मधून
उपमा म्हणजे चक्क मिक्सर मधून बारीक करून उकळते पाणी टाकून करायचा?? >>>
नाही मिक्सर मधून बारीक करून कांदेपोह्यासारखा करायचा. खूप कोरडा वाट्ला तर थोडा पाण्याचा हबका मारून वाफ काढायची. खूप मस्त लागतो.
हं हे इंटरेस्टिंग वाटतंय!
हं हे इंटरेस्टिंग वाटतंय!
ब्रेडचे चे पकोडे ? ब्रेड्चे
ब्रेडचे चे पकोडे ? ब्रेड्चे स्लाईस तिरके कापून पिठात बुडवून तव्यावर शॅलोफ्राय करायचे. मस्त लागतात स्मित
फ्रिजर मध्ये बर्फ होतो म्हनुन
फ्रिजर मध्ये बर्फ होतो म्हनुन २ दा डीप्रेस केला होता..म्हनुन झाले असेल का ??) >> सृष्टे हेच चुकलं तुझं.
>>freeze kelelya pithacha
>>freeze kelelya pithacha barf zalyavar to tarihi ferment hot rahil ka?
नाही. घरातल्या फ्रीजर्समधलं साधारण -२० डिग्री सेल्सिअसइतकं कमी तापमान बॅक्टेरिया, मोल्ड/फंगस, यीस्ट यांची वाढ आणि त्यामुळे होणारे फरमेंटेशन प्रोसेस थांबवेल. पुन्हा फ्रीजमधे ठेवून किंवा खोलीच्या तापमानाला आणून स्टीम केल्यावर इडल्या चवीला कशा लागतील याची कल्पना नाही.
इंटरेस्ट असेल तर इथे बघा. इडली-दोसे बॅटर फरमेंट होताना कुठला मायक्रोबिअल फ्लोरा लागतो त्याची यादी आहे. यातला कुठलाही जीव इतक्या कमी तापमानाला वाढत नाही. (तसे सबझीरो तापमानाला वाढणारे इतर मायक्रोब्ज आहेत.)
प्रीझर मधल्या भाज्या ६
प्रीझर मधल्या भाज्या ६ तासापेक्षा जास्त वेळ ४० फॅ वर तापमानाला राहील्या असतील तर फेकून द्या. आईस होतो म्हणून फ्रीझर डीफ्रॉस्ट करणार असाल तर कुलरमधे बर्फात फ्रोझन फूड ठेवावे.
खोलीच्या तापमानाला आणून स्टीम
खोलीच्या तापमानाला आणून स्टीम केल्यावर इडल्या चवीला कशा लागतील याची कल्पना नाही >>> वाईट लागत नाहीत. मी इथे हाटेलात राहिले होते तेव्हा फ्रोझन इडल्या आणून खाल्ल्या आहेत अनेकदा. मी इडल्या ओल्या पेपर टावेलने झाकून मायक्रोवेव्ह करायचे.
शिळ्या पोळ्यांचा चिवडा करतात
शिळ्या पोळ्यांचा चिवडा करतात तसाच ब्रेडचा चिवडाही मस्त लागतो.
मी नेहमी करते ब्रेडचा चिवडा
मी नेहमी करते ब्रेडचा चिवडा
सिंडे, मी ते बरोबर लिहिलं
सिंडे, मी ते बरोबर लिहिलं नाही बहुतेक. फ्रोजन इडल्यांबद्दल नव्हे, फ्रोजन बॅटर पुन्हा पातळ करून त्याच्या इडल्यांबद्दल म्हणत होते. फ्रोजन इडल्या पुन्हा गरम करून चांगल्या लागतात.
ब्रेड व्यवस्थित टोस्ट करून
ब्रेड व्यवस्थित टोस्ट करून केलेले ब्रेडक्रम्स जास्त टिकतात असा निष्कर्ष गुगलसंशोधनाने दाखवला.
शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे
शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे केलं मी.. इतक्या रेसिपीज मिळूनही sandwich च केलं..जरा वेगळ्या पद्धतीने! बारीक चिरून कांदा ,लसू,, मक्याचे दाणे,मटा,,तिखट मीठ गरम मसाला चाट मसाला कोथिंबीर सगळं १ चमचा तेलात परतून घेतलं आणि sandwich मेकर मध्ये मस्त टोस्ट sandwich बनवून खाल्ले! पण थँक्स सगळ्यांना! एवढ्या पाककृती सांगितल्याबद्दल
आईस होतो म्हणून फ्रीझर
आईस होतो म्हणून फ्रीझर डीफ्रॉस्ट करणार असाल तर कुलरमधे बर्फात फ्रोझन फूड ठेवावे. >> अजुन काय करता येइल ??? कुलर नाहि आहे.
आईस होतो तेव्हा तुम्हि सगळे काय करता ...डीफ्रॉस्ट केल्यावर फ्रीझर मधल्या वस्तु कुठे ठेवता ??
सृष्टी , लागेल तेवढंच
सृष्टी , लागेल तेवढंच डीफ्रॉस्ट करायच.
Aaj aappe + Idalya karun
Aaj aappe + Idalya karun peethacha sokshmoksh lavala. Eka Aussie maitriNeela idalya + aappe avaDale! TyamuLe aapoaapach duva miLalya! AaNi recipe share karane, pudheel veLee kelyas tila aathaVaNeene deNe oghane aalech!
लागेल तेवढंच डीफ्रॉस्ट करायच.
लागेल तेवढंच डीफ्रॉस्ट करायच. >> म्हनजे. ??
@गायत्री, मी कांदा घालते
@गायत्री, मी कांदा घालते फोडणीत आणि परततांना भरपुर कोथिंबीर टाकावी. मग त्या फोड्णीत नेहमीप्रमाणे हळद, तिखट टाकावे. कांद्यामुळे ओलसरपणा राहतो. मी त्यात दही टाकते खातांना. चांगले एकजीव केले कि अहाहा अप्रतिम लागते चविला:पः)
लागेल तेवढंच डीफ्रॉस्ट करायच.
लागेल तेवढंच डीफ्रॉस्ट करायच. >> म्हनजे. ?? > अगं म्हणजे हवे तेवढेच मटार एका वेळी फ्रीजरमधून काढायचे.
सृष्टी, तुम्ही फ्रीझरला बरेच
सृष्टी, तुम्ही फ्रीझरला बरेच फूड ठेवणार असाल तर एक कुलर घ्या. साधा थर्माकोलचा मिळतो तसा घेतला तरी चालेल. किंवा प्लॅल्स्टीकच्या बादलीत बर्फ घालून त्यात फ्रोजन फूड झाकून ठेवायचे. ४० फॅ म्हणजे साधारण ४ सेल्सीयसच्या वर तापमानाला फ्रोजन फूड दीर्घकाळ न रहाणे महत्वाचे. दुसरा उपाय म्हणजे नोफ्रॉस्ट फ्रीज.
@muktajit, आणि ब्रेड कुठे
@muktajit, आणि ब्रेड कुठे वापरता ह्याच्यात?
thanks ..रावि ,स्वाती२
thanks ..रावि ,स्वाती२
गेल्या आठवड्यात घरी बरेच
गेल्या आठवड्यात घरी बरेच पाहुणे आले होते, सो घरात पेढ्याचे २ बॉक्स शिल्लक आहेत. फ्रिज मधे आहेत त्यामुळे चान्गलेच आहेत.
आता ईतक्या पेढ्यान्च काय करता येईल? प्लिज सुचवा.
वाटुन टाका अस नका सुचवु प्लिज.
पेढे कुस्करून कणकेच्या
पेढे कुस्करून कणकेच्या उंड्यात भरून खव्याच्या पोळ्या करता येतील.
गाजर/ दुधि आणा . हलवा बनवा
गाजर/ दुधि आणा . हलवा बनवा त्यामध्ये टाका....
थोडे बासुन्दीत पण वापरता
थोडे बासुन्दीत पण वापरता येतील घट्टपणाला. बाकी प्राचीने सुचवले आहेच. तसेच बदाम कुल्फी/ आईस्क्रीममध्ये वापरता येतील. साखरेचे प्रमाण कमी करुन पेढे घालुन मावा केक करता येईल.
Pages