युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग बाई - सगळ्यान्च्च्याच जिव्हाळ्याचा आहे की हा विषय... माझ्या सारखा विचार करणारी ईतर माणसे पण आहेत हे पाहुन खुप छान वाटल .

माझी ही दगदग पुढचे ३-६ महिनेच आहे - नन्तर मग मी परत पीठे / मसाले / वाट्णे / कोरड्या चटण्या अश्या पुर्व तयारी वर येईन .... Happy

पण frozen food चान्गले कि वाईट ? नवर्याने घरात काय आणि किती काम करावे ? हे विषय त्या त्या बाफ वर बोलुच ( की लिहुच?) ... पण ह्या आहार शास्त्र फलकावर आठवड्याचे नियोजन आणि पुर्व तयारी अशा विषयाची चर्चा करायला मला तरी नक्किच आवडेल.कुणाला आहे का interest? आणि तो विषय इथे बोलावा कि वेगळा धागा असावा?

अजुन एक धागा आवडेल तो म्हण्जे - general पुर्व तयारी ( स्वयम्पाका व्यतिरिक्त) . त्यात मी जरा (जास्तच) कच्चि आहे ! त्या साठि योग्य जागा कोणती?

@ आकान्शा ( परत अनुस्वाराचा प्रश्न- कोणितरी सान्गा न कसा लिहायाचा ते - pls )
स्नेहमयी - कांदा वाळवुन फ्रिज मध्ये कसा साठवता >>>>>>>>>>>>>>>>>>>

  1. processor var कान्द्याच्या चकत्या करणे - त्यात आकराला फार महत्व देण्याची गरज नाही . कोणता पण आकार चालतो.
  2. steel च्या ताटान्मधे / plastic sheet वर ठेउन कडकडीत उन्हात २/३ दिवस वाळवणे - मे महीन्यात २ दिवस पुरते .. जानेवारी मधे मात्र ३-४ दिवस लागतात
  3. steel च्या ताटान्मधे / plastic sheet वर ठेउन कडकडीत उन्हात २/३ दिवस वाळवणे - मे महीन्यात २ दिवस पुरते .. जानेवारी मधे मात्र ३-४ दिवस लागतात
  4. कावळे किन्वा कबुतरे यान्चा त्रास असल्यास cotton साडीच्या एका पदराने झाकावे - आजीची नउ वारी best

हा वाळवलेला कांदा कसा/कशा कशामधे वापरता तुम्ही? म्हणजे ग्रेवीकरता पेस्ट करायला की फोडणीत वगैरेही? कांद्याचा फ्लेवर्/वास्/चव रहातो क तसाच?

>>>>>हा वाळवलेला कांदा कसा/कशा कशामधे वापरता तुम्ही? म्हणजे ग्रेवीकरता पेस्ट करायला की फोडणीत वगैरेही? कांद्याचा फ्लेवर्/वास्/चव रहातो क तसाच?>>>>>>>>>>>>>>>>

-ग्रेवीकरता पेस्ट करायला
- कान्दा -खोबर्याच्या वाटणात
- बिर्यानी साठी तळताना
या तिन्ही गोष्टिन्साठी स्वाद खुप छान येतो - शिवाय वेळ आणि तेल दोन्हि कमी!

फोडणीत मात्र नाही कधी वापरुन पाहिला

>>>>>>>>>>>स्नेहमयी, तुम्ही मसालेही घरीच करता का?

थोडेफार - गरम मसाला /गोडा मसाला /धणे -जीरे पुड / कोल्हापुरी मसाला ई.ई.
या वर्षी तिखट आणि मसाला पण केला आहे ...
इथे माबो वर छान छान क्रुती आहेत.

>>>>>>>>>>इथे आहेत २-३ बाफ पूर्वतयारीचे.

सिंडरेला
अहो link द्या ना pls ... किन्वा इथे कसे शोधायचे ते सान्गाल का ?

मी पण वर्षभराचा कांदा वाळवून ठेवते. इथे मिडवेस्टमधे हिट इंडेक्स १०५ फॅ. पर्यंत जातो. त्यामुळे बागेतले टोमॅटो पण वाळवून ठेवते. फ्रुट लेदर पण छान होते.

कांदा उन्हात किती दिवस वाळवायचा. आणि नंतर कुठे ठेवायचा म्हणजे फ्रिज मध्ये कि बाहेरच.

कांदा उन्हात किती दिवस वाळवायचा. आणि नंतर कुठे ठेवायचा म्हणजे फ्रिज मध्ये कि बाहेरच>>>>>>>>

कांदा चांगला कडकडीत होई पर्यंत वाळवायचा - मे महीन्यात २ दिवस पुरते .. जानेवारी मधे मात्र ३-४ दिवस लागतात
मी तरी नंतर तो डीप फ्रीजर मधे ठेवते - ziplock मधे फार जागा घेत नाही.

हिरवे वाट्ण, आणि कान्दा खोबरे वाटण कसं बनवता स्नेहमयी?? वाळवणासाठी कांदा पांढरा वापरता की लाल??
कृपया सांगु शकाल का??? Happy

धन्यवाद Anjut - नक्कि बघीन मी हे बा.फ.

@ ऱोचिन
हिरवे वाट्ण, आणि कान्दा खोबरे वाटण कसं बनवता स्नेहमयी?? वाळवणासाठी कांदा पांढरा वापरता की लाल??>>>>>>>>>>>>>>>>
हिरवे वाटण - कोथिंबीर +आले+लसुण + मिरच्या वाटुन घेते . मग ही paste -ice cube tray मधे टाकुन फ्रीझ करते. फ्रीझ झाली की मग cube वेगळे करुन ziplock bag /plastic bag यात काढुन ठेवते

कान्दा खोबरे वाटण - सुके खोबरे कढईत कोरडे भाजुन घेते . त्याच कढईत सुकवलेला कांदा (नेहेमीचा - पांढरा नाही) भाजुन घेते , कांद्या मधे अजीबात ओलेपण नसल्यामुळे खोबर्याला सुटलेले तेल पुरते-अजुन वरुन तेल लागत नाही . मग ही पेस्ट पन वर सांगितल्या सारखि cube मधे ठेवते
गरजेप्रमाणे १-२ cube वापरता येतात . मी २ ice cube tray खास वाट्णे फीझ करण्यासाठी ठेवले आहेत.

स्नेहमयी,
मी टोमॅटो अर्धे कापुन त्यावर थोड मीठ भुरभुरवते आणि कुलिंग रॅक वर ठेवते. कुठल्या प्रकारचे टोमॅटो आहेत त्यावर वाळायला ८-१० दिवस लागतात. मी पेस्टो करायला किंवा फोकाच्यात वापरते.

माझ्या फ्रीजरमधे हिरवे वाटण, तळलेले वाटण, पंजाबी ग्रेवी बेस, टोमॅटो बेस पास्टा सॉस, खोबर्‍याची चटणी, इडल्या, मफिन्स, बनाना ब्रेड, पोळ्या, आलू पराठे, गोड शिरा वगैरे नेहमी असते. मुलाच्या डॉर्मसाठी देखील फ्रीजर असलेला फ्रीज घेतला. मफिन्स आणि आलु पराठे ठेवल्यामुळे स्टॉर्म मधे अडचण आली नाही.

बागेतील भाज्या मी फ्रीज करुन ठेवते. कॅनिंगपेक्षा मला फ्रीज करणे जास्त सोईचे पडते. मास्टर गार्डनरच्या एका मिटिंगला एक्स्टेंशनच्या बाईंनी हार्वेस्ट प्रिझर्व करायला शिकवले. त्याच सेशनमधे बेसील सॉल्ट करायला शिकले.

स्वाती , तुम्ही हे टॉमेटो ऊन्हा मधे वाळवता कि dehydrator मधे? cooling rack म्हणताय म्हणुन शंका आली . आणि बिया /साले काढायची गरज असते का?
शिवाय , हे असे वळवलेले टॉमेटो - puree साठी चांगले कि paste साठी? ते फ्रीझर मधे ठेवायची गरज असते का?

स्नेहमयी, मी टोमॅटो उन्हात वाळवते. बीया, साले काढायची गरज नाही. कुकीज साठीच्या कुलिंग रॅकवर ठेवते. वाळले की फ्रीजरमधे ठेवते.
पेस्ट किंवा प्युरी करायला वापरता येतात. थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालायचे.

ऑन लायटर नोट - अशी खूप पूर्वतयारी केली की नेमके मला ते इंग्रेडियंट्स असलेले पदार्थ करावेसेच वाटत नाहीत. Proud म्हणजे उकडलेले बटाटे फ्रीजमधे आहेत असं माहित असेल तर बटाटा नसलेल्याच भाज्या कराव्याश्या वाटतात, शिजवलेला जास्तीचा राजमा असेल तर राजमा नकोच वाटतो, असे. ज्याची स्क्रॅच पासून तयारी करावी लागेल अश्याच गोष्टींची क्रेविंग्स होतात. Wink

टोमॅटो बेस्ड पास्ता सॉसची रेसीपी टाकाल का स्वाती२? मला एक येते पण तुमच्या पद्धतीने करून जर रविवारी फ्रिझ मध्ये ठेवता आला तर बरे पडेल. माझ्या फ्रीझर मध्ये पीज, पनीर, झोराबिअन चिकन ची पाकिटे असतात.

पुण्याच्या वातावरणात उन्हात वाळवलेला कांदा नंतर फ्रिजबाहेर डब्यात भरून ठेवला तर राहील का? >> हो. पण खडखडीत वाळला पाहीजे अन एअरटाईट कंटेनरात ठेवला तर जास्त चांगलं...

मी पण त्यातलाच... काल लसूण सोलून ठेव्लेला, आलं किसून ठेवलेलं व्यवस्थित फ्रिजात... मात्र ऐन्वेळी पटापट सगळम पुन्हा केलं... जेवण झाल्यावर मग आठवण झाली... Lol

हो हो मवा, माझंही तसंच. खवलेलं खोबरंही वापरलं जात नाही साधं Proud

वर कितीही स्नेहमयींचं कौतुक केलं तरी मला स्वतःला अजिबात पूर्वतयारी करायला आवडत नाही. किंवा जमत नाही. माझ्याकडे वेळ कमी असेल तेव्हा मी ज्याला काहीही पूर्वतयारीची गरज नाही असाच स्वयंपाक करणं पसंत करीन. माझा एरवीचा स्वयंपाक आणि मधलं खाणंही साधं, घरच्या रेग्युलर सप्लाइजमधलंच असतं.
घरचे सदस्य काही कॉम्प्लिकेटेड मागण्या करतात त्यावेळी पूर्वतयारीची जबाबदारी मी त्यांच्यावर टाकते Proud

इमर्जन्सी असेल तर आयत्या टोमॅटो प्युर्‍या, आलंलसणीचं वाटण, तयार पास्ता सॉस, रेडी टू कूक ग्रेव्हीज, परंपरा सारखी तयार वाटणं, नेसले कोकोनट पावडर/मिल्क यावर विसंबणे मी पसंत करीन.

लसुण सोलणं आणि कांदा चिरणं ही सगळ्यात कंटाळवाणी कामं. त्यातल्या त्यात मुलीला लसुण सोलायला खूप आवडतं म्हणून तो प्रश्न सुटतो. टीव्ही बघताना, अभ्यास करत असताना ती एका बाजूला फटाफट सोलून टाकते लसणीचा कांदा :फिदी:. मात्र कांदा चिरायला घरातले कोणीच तयार नसतात. मी कांद्यावाचून पदार्थ करीन अशी धमकी दिली तरीही Proud आता हा स्नेहमयीचा मार्ग अवलंबून बघते. आमचं घर पूर्वाभिमुख असल्याने एरवीही प्रचंड उन्ह असतच.

Pages