पोहे, पौवा, पहुवा, चिवडा, चिडवा.... ही आणि अशी अनेक नावे असलेले गोरे गोरे, बारीक, शेलाट्या बांध्याचे पोहे.
जाड पोहे, पात़ळ पोहे, भाजके पोहे, नायलॉन पोहे...अनेक रुपं
'पोहे' न खाल्लेला मराठी माणूस मिळणे अवघड आहे.
'पोहे' हा आयटम नसलेली किराणामालाची यादी मिळणे अवघड आहे.
कांदेपोहे, दडपे पोहे, कोळाचे पोके, मेतकूट पोहे, लावलेले पोहे.... अश्या बर्याच पाकृ आहेत पोह्यांच्या.
तुम्ही केलेले नवे नवे प्रयोग, जुन्या परंपरागत चालत आलेल्या पाककृती....सगळ्या या एका धाग्यावर एकत्र करू या.
पोहे फॅन क्ल्बचे सदस्य व्हा
जुन्या लिंक्स द्या.
नव्या पाकृ लिहा.
चला तर मग....
प्रतिसादात दिल्या गेलेल्या पाककृती आणि लिंक्स.
१. प्राची - कृती -
पातळ पोहे एका पसरट भांड्यात घ्या.
त्यावर चवीप्रमाणे मीठ, साखर, लाल तिखट, मेतकूट घाला. (मेतकूट भरपूर घालायचे.)
एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे, हिंग्,हळद यांची फोडणी करा.
गरम गरम फोडणी पोह्यांवर घालून हाताने सगळे नीट मिक्स करा. सगळा मसाला पोह्यांना नीट लागला पाहिजे.
पांढरा पोहा दिसता कामा नये.
हे झाले पोहे तयार. आता -
१. त्यावर नुसती काकडी किसून घाला आणि खा.
२. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घाला. वर किसलेली काकडी आणि लिंबू...अहाहा!!!!
३. चिराचिरी करायचा कंटाळा आलाय? नुसते पोहे वाटीत घेऊन आडवा हात मारा.
हे पोहे भरपूर प्रमाणात करून ठेवले तरी राहता डब्यात ३-४ दिवस.
मग जसे लागतील तसे वापरायचे. स्मित
२. अश्विनीमामी -
माझ्या साबा एक अद्वितिय प्रकार करतात. तो मी एकदाच खाल्ला आहे. पातळ पोहे तळून घ्यायचे. त्यात हल्के तळलेले काजू, ओले खोबरे टोमाटो मिरची कोथिंबीर इत्यादी. पाव्हण्यांसाठी केले होते त्यामुळे फार हाणता आले नव्हते.
३. पौर्णिमा -
पातळ पोहे, तेल, तिखट, काळा मसाला, मीठ, दाणे आणि कोथिंबीर! ऑस्सम लागतात हे पोहे. पोहे भिजवायचे नाहीत, तसेच कच्चे खायचे.
४. प्राची -
जाड पोहे घ्यायचे. त्यावर लाल तिखट, साखर, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे घालायचे. आणि पाण्याचा हात लावत लावत मिक्स करायचे सगळे. पोहे ओलसर होतील एवढे पाणी लावायचे म्हणजे मसाला चांगला लागतो पोह्यांना. झाले पोहे तयार.
५.योगेश कुलकर्णी -
एक वाटी साधे कच्चे पातळ पोहे अन १ ते दीड वाटी आमरस. एका बोलमध्ये घ्यायचे अन ५ मींट मुरले की हाणायचे.
६.योगेश कुलकर्णी -
भाजक्या पोह्यात सातूच पीठ घालायचं काकडी चोच्वून / कोच्वून घालायची तिखट मीठ घालायचं वर फोडणी घालायची. अप्रतीम लागतो हा प्रकार.
७.भरत मयेकर
इंदोरी पोहे
८. योगेश कुलकर्णी -
नेहेमीचे फोडणीचे पोहे भिजवून घ्यायचे त्यात आवडीनुसार भाजके दाणे वा खारे दाणे / फुटाणे घालायचे. कोथिंबीर हवी असेल तर. त्यात एकाच ठिकाणावर मीठ, चवीपुरती साखर, तिखट, चिमूट हळद घालायची (हे सगळं पसरून नाही घालायचं) मग टेस्पूनभर तेलाची जीरं मोहोरीची खमंग फोडणी त्या तिखटामिठावर ओतायची, हवी तर वर बारीक चिरून हिमी घालायची. व्यवस्थित सगळं मिसळायचं, थोडी भुजिया शेव असेल तर उत्तमच! अन खायचं एकट्यानी. एका बोलमध्ये पटकन होणारा पण तरीही पोट भरणारा प्रकार.
९. लक्ष्मी गोडबोले -
आधी कांदापोहे करुन घ्यायचे नेहमीप्रमाणे.
मग तव्यात आम्लेट करायचं .. ते अर्धवट झालं की प्लेटभर कांदेपोहे त्यात घालायचे आणि उलथन्याने हलवायचे... आम्लेट फाटून त्याचे तुकडे तुकडे होतील .. ते पोह्यात मिक्स होतात ...
१०.के अंजली -
भिजवलेले जाडे पोहे+ उकडलेला बटाटा+ भिजवून वाटलेले मूग+तिखट्मीठ्कोथिंबीर असं सगळं मिक्स करुन याचे आप्पे किंवा पॅटीस पण छान होतात.
११. आरती. - आलेपाक.
त्यामुळे पोह्यांचा कार्यक्रम
त्यामुळे पोह्यांचा कार्यक्रम क्वचितच होतो.
<<
ओ.
आता तुमच्या पोरा बाळींचा "पोह्यांचा कार्यक्रम" करायची वेळ आली असेल. तुम्ही कुटं करायलाय
तेबी खराय म्हणा
तेबी खराय म्हणा
लोक कोणत्याही भाजी उसळीत सोडे
लोक कोणत्याही भाजी उसळीत सोडे घालतात म्हणे
पुलंच्या खाद्यजीवनात वाक्य
पुलंच्या खाद्यजीवनात वाक्य आहे. वांगी-सोडा आणि व्हिस्की-सोडा यात जास्त चांगलं काय ते ठरवणे कठीण आहे Happy (मला दोन्हीचा अनुभव नाही ते सोडा Wink ) >>>
वांग्यांत सोडा कसा लागेल ते
वांग्यांत सोडा कसा लागेल ते नुस्ता विचार करूनच हहपुवा.
>>>>>>>
सोडे सुकटाचे ओ, बहुधा तुम्हाला तो फसफसणारा सोडा आठवला असावा कि गंमतीने लिहिले वरचे?
कारण वांगीसोडे हे बोंबीलबटाट्या ईतके कॉमन कॉम्बिनेशन आहे
हा धागा एकदम स्ट्रेसबस्टर
हा धागा एकदम स्ट्रेसबस्टर झालाय. पहुआ काय, बाबूआ काय सोडे काय... हा हा हा..
फोडणी, कांदा, कढीपत्ता, मिरच्या, पातळ नाजूक बटाट्याच्या कचऱ्या आणि मग त्यावर मऊसूत भिजलेले पोहे ,मीठ, थोडी चवीला साखर( कांदा परतायला घेतला की पोहे भिजवायचे म्हणजे परफेक्ट ओलसर मऊ होतात नाहीतर कोरडे होतात - आई ) लिंबू कोथिंबीर भरपूर ओलं खोबरं.. बस ..
असे मऊसूत पोहे पुण्यात कोथरूड बेडेकर गणपती मंदिराबाहेर एका आजीची गाडी होती तिथे मिळायचे. एकेकाळी एम आय टी ला असताना रोज पोहे खायचो तिकडे.आता असतात की नाही माहीत नाही.. 15-18 वर्ष झाली याला...(म्हातारपण आलं
)
आणि स्वीकार चे पोहे सांबार.. अहा हा.. तोंडाला पाणी सुटले..
माझे सासरे कितीही मऊसूत पोहे केले तरी त्यावर दही घेतात. त्यांना घशाला ठोठरा बसतो म्हणे.. (राग)
सांगली त एक नंबर पोहे मिळतात
सांगली त एक नंबर पोहे मिळतात.सोबत कढी किंवा सांबार..त्याच चवीचे पोहे कोथरूडमध्ये DP road वर मिळाले..गुरू गणेश नगर च्या समोर...पण नो सांबार or कढी..
बाकी पोहे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी चालतात..सर्व मालमसाला असेल तर उत्तमच अन्यथा साधे पण आवडतात ..
इति पोहे पुराण समाप्तत.हे पोहे खात च लिहीत आहे .
सोडे म्हणल्यावर विक्रम गोखले
सोडे म्हणल्यावर विक्रम गोखले आठवले. ते शेजारी अशोक सराफ कडे जेवायला जातात, वंदना गुप्ते अशोक सराफची बायको. वंदना गुप्ते सोड्याची खिचडी करते. घरी आल्यावर विक्रम म्हणतात की सोड्याची खिचडी मस्त झाली होती तर सविता प्रभुणे ( विक्रमची बायको ) म्हणते की खिचडी मध्ये सोडा कसा घातला? ती फसफसली नाही का?
लपंडाव ना रश्मी? त्यात असे
लपंडाव ना रश्मी?
त्यात असे गैरसमज बरेच आहेत!
वावे हो, बहुतेक तोच आहे.
वावे हो, बहुतेक तोच आहे.
पोह्यांना हे नाव कसं पडलं
पोह्यांना हे नाव कसं पडलं असेल? काही इतिहास माहित आहे काय कुणाला?
तुळशीबागेत कावरे
तुळशीबागेत कावरे आईस्क्रीमच्या शेजारी एक वाडा आहे. ( अजूनही आहे) त्याच्या प्रवेशद्वाराच्या कमानीतच एक तरुण गरमागरम पोहे विकायचा. अप्रतीम चव होती. मी आणी आई कधी तिकडे गेलो की आणायचो. मागे गेले तेव्हा दिसला नाही. आता जावेने सांगीतले की सकाळी ८ पर्यंतच ठेवतो ते पोहे आणी लग्गेच संपतात देखील.
चिंचवडला एका खानावळीत मस्त
चिंचवडला एका खानावळीत मस्त पोहे मिळतात.बशीभर पोह्यांत अगदी थोडासाच कांदा असतो.दाणे कोथिंबीर,वरून शेव भुरभुरलेली.सोबत एक पातळ चटणी असते. चव सुरेख असते.
कोणती खानावळ?
कोणती खानावळ?
पोह्यांना हे नाव कसं पडलं
पोह्यांना हे नाव कसं पडलं असेल? >>>
तांदूळ पाण्यात बुडतात.
तांदळा पासून पहिल्यांदा पोहे केले, ते धुवायला पाण्यात टाकले तेव्हा पूर्ण भिजण्या आधी तर पाण्यावर तरंगू लागले.
ते पाहून एक व्यक्ती आश्चर्याने म्हणाली "अरे! हे तर पोहे!"
ज्याने बनवले त्याला वाटले की त्या व्यक्तीला हा पदार्थ माहीत आहे आणि त्याचे नाव पोहे आहे, त्याने त्याला पोहे म्हणायचे ठरवले. अशा रीतीने नंतर पोहे पूर्ण भिजल्यावर बुडाले तरी त्यांचे नाव पोहे पडले.
पोह्यांना हे नाव कसं पडलं
डपो.
(No subject)
(No subject)
(No subject)
:p
पोह्याची व्युत्पत्ती
पोह्याची व्युत्पत्ती
कल हम पोहा
कल हम पोहा
पैले पानी मे शिरा
फिर पोहा
ऐसा मजा आया की उसको उपमाच नै
पोहे
पोहे
मानव
मानव
कोणती खानावळ?....मंगलमूर्ती
कोणती खानावळ?....मंगलमूर्ती भोजनालय! तिथे आलूपराठाही झकास मिळतो.
मानव,पोह्यांची व्युत्पत्ती भारी आहे.
मानव
मानव
>> पोहे पूर्ण भिजल्यावर
>> पोहे पूर्ण भिजल्यावर बुडाले तरी त्यांचे नाव पोहे पडले

सहीच! मानव्युत्पत्तीकोष
>> पोह्यांना हे नाव कसं पडलं असेल?
थोडेफार गुगलून मिळालेले ग्यान:
संस्कृतमध्ये पृथ म्हणजे विशाल विस्तीर्ण रुंदावलेले (त्यावरूनच पृथ्वी शब्द आला)
पृथुक म्हणजे रुंद/सपाट केलेला भात
त्यावरून प्राकृत मध्ये पिहुय शब्द आला (पृथुक चे पिहुय का व कसे झाले असावे याबाबत फारशी माहिती मिळाली नाही)
पिहुय चे मराठीत अपभ्रंश होऊन पोहा/पोहे झाले
(या माहितीत कोणी दुरुस्ती/भर सुचवत असेल तर स्वागतच आहे)
(No subject)
मानव
मानव
@मानव झकास व्युत्पत्ती.
@मानव
झकास व्युत्पत्ती.
Pages