मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्रुपदाचे पुढे काय झाले माहित नाही

महाभारत युद्धामध्ये द्रोणाचार्य द्रूपदाचा वध करतात.खरे तर अर्जुनासहित पान्डव सेनेकडे द्रोणाला मारू शकेल असा कुणीही योद्धा नसतो. कृष्ण हाती शस्त्र धरणार नसतो आणि भीम अर्जुन, सात्यकी, दृष्टद्युम्न, द्रुपद, विराट आदी सर्व रथी-महारथी द्रोणान्च्या पराक्रमापुढे हतबल झालेले असतात अश्या वेळेस द्रोणाला एक प्रकारे फसवून मारले जाते. नंतर अश्वत्थामा दृष्टद्युम्नला झोपेत मारुन बदला घेतो. एकुण द्रुपद म्हणजे सुड घेण्यासाठी काहीही करू शकणारा घमंडी राजा होता. द्रोणा पुढे पराक्रमाच्या बाबतीत तर तो किस झाड की पत्ती होता.

अंजू +१.

पण काय आहे, की मधूनच काहीतरी सूचक वाक्य बोलतात, किंवा काही कारणाने ती द्रौपदी बराच वेळ आरसा बघत बसते, नि नंतर त्या मुली लग्नाचा विचार तिच्या डोक्यात भरवतात. म्हणून पुढे ती लग्न व प्रतिबिंब या दोन गोष्टींची सांगड घालून आपला स्वयंवराचा पण असा करते की आरशात बघून जो बरोबर नेम मारेल तो जिंकला!

असे तर्क कुर्तक मनात येतात.

नाहीतर आरसा बघून सामान्य लोकांप्रमाणे तिने नाक मुरडून, जीभ काढून, डोळे तिरपे करून वगैरे बघितले असते!
त्यामुळे ती सामान्य नाही हे दिग्दर्शकाने किती चातुर्याने दाखवले आहे!!! Wink

नेमका मी तो आरशात बघतानाचा सीन बघितला नाही.

शिखंडीणीची भूमिका करणारी ' ना आना इस देस लाडो' या सिरीयलमध्ये होती तिथेपण तिने काम चांगले केले होते, त्या अम्माजीची मुलगी असते टाकून दिलेली, डाकू दाखवली आहे.

ही सिरीयल मी फार क्वचित बघितली पण अम्माजी आणि अंबा (आत्ता शिखंडीणी झाली आहे ती) ह्यांनी कामे चांगली केली.

हिडींब, हिडींबेचा मेकप सही केला होता. हिडींब वनातले सगळे सीन भारी झालेत. विशेष म्हणजे, हिडींबेच्या खाण्यावरून, ढेकर देण्यावरून ती राक्शसी आहे हे ओळखण्याचा बच्चे प्रेक्शकांवर योग्य तो परिणाम झाला. Happy द्रौपदीजन्म, कृष्णाच्या गदेची करामत, हिडींबवध सगळेच सीन आबालवृध्दांना खिळवून टाकणारे. आता स्वयंवर, बकासुरवध, मयसभा, प्रत्यक्श युद्ध किती रंजक असेल अशी उत्सुकता वाटू लागली आहे.

अर्जुनाला नको तेवढे फुटेज देतायत.
खरे तर हिडिंबवध भीमाचा सीन आहे , पण त्यातही उगाच अर्जुनाला भाव दिलाय .

त्यात तो अर्जुन दळ्या आहे. ब्दला यार त्याला.

बाकी मस्त चालले आहे. कृष्ण पण आवडला. त्याला सगळंच माहीत. Happy दुर्योधनाला बरीच विश्रांती दिली आहे. तो भारी आहे.

ते बहुतेक महाभारत न दाखवता अर्जुनायन दाखवत आहेत. प्रत्येक ठिकाणी अर्जुन मुख्य नायकासारखा असतो व बाकी सगळेजण साईड हिरो... प्रत्येक भागात त्याला काही ना काहीतरी काम दिले आहे. रुक्मिणीहरणात देखील त्याला काम मिळाले.

अर्जुन महानायक आहे हे मान्य.. पण ज्यावेळी इतर हिरोंची कथा चालु आहे जसे कृष्ण, भीम तर त्यांनाच फोकस करायचे ना... त्यात देखील अर्जुन असतोच. आता रुक्मिनीहरणात तो नसला असता तरी काही फरक पडला नसता. मुळ कथेप्रमाने दाखविले असते तरी चालले असते. पण त्यात देखील तो आहे.

महाभारताचा कुणी एक नायक आहे असे वाटत नाही.
<<<<

अगदी बरोबर... महाभारतात अनेक नायक, महानायक आहेत... रथी महारथी....मला तर सर्वजण एकापेक्षा एक वाटतात. प्रत्येकात काही ना काहीतरी टॅलेण्ट आहे.

काल हाणामारी बघायला मज्जा वाटली.

मला पण हाणामारी, युद्ध असलेच बघायला जास्त आवडते.

बाकी कुठल्याहि साध्या साध्या संवादात सुद्धा उगीचच काहीतरी तत्वज्ञानातली वाक्ये बोलायची! आपण रोजच्या जीवनात कितीदा तत्वज्ञान्यासारखे बोलतो?

किंवा मग द्रौपदी तासन तास हळू हळू एक एक पाऊल चालते आहे! नाहीतर अर्जुन!

कुणा बायकांना आवडत असेल त्याच्या कडे बघत बसायला! जसे त्या टी पार्टी पार्ले वरील बायका त्या कंबर का कुणितरी बद्दल सतत बोलत बसल्या आहेत तसे!!

चाळीस पन्नास वर्षांपूर्वी मी पण बायकांकडे असाच बघत बसलो असतो!

मग द्रौपदी तासन तास हळू हळू एक एक पाऊल चालते आहे! नाहीतर अर्जुन!

कुणा बायकांना आवडत असेल त्याच्या कडे बघत बसायला
<<<<

नाही हो आम्हाला देखील आवडत नाही असे बघत बसायला.... थँक्स टु इंटरनेट... सिरियल युट्युबवर बघत असल्यामुळे... असा हळू हळू चालण्याचा शॉट सुरु झाला कि लगेच व्हिडियो पुढे ढकलला जातो. टिव्हीवर बघणारया बायकादेखील असे शॉट सुरु झाले कि इतर कामे आवरुन घेत असतील.

भीमाने फायटींग सही केली होती. शेवटच्या युद्धात मजा आणेल हा भीम. चिडल्याचे एक्स्प्रेशन सही होते.

भीम हिडिंबा विवाह वगैरे एकदम मस्त चालू होतं. मज्जा आली. ते वरमाला घालताना नवरीला उचलायची पद्धत "राक्षसी" आहे हे आपल्या इथल्या काही लोकांना समजलं तर बरं!!!!

भीम हिडिंबा विवाह वगैरे एकदम मस्त चालू होतं. मज्जा आली. >>> ++१ मस्त घेतलेय ते. मला भीम - हिम्डिंबेचे लग्नातले कपडे, दागिने वगैरे आवडले एकदम !!

ते वरमाला घालताना नवरीला उचलायची
मला वाटले तिला कुणि उचलले नाही, तीच आपणहून मायावी पद्धतीने उंच झाली. बाकी भीमाचे भाऊ सुद्धा बरेच बलवान असले पाहिजेत. त्याला उचलणे म्हणजे गंमत नाही.

वरमाला घालताना नवरीला उचलायची पद्धत "राक्षसी" आहे

अहो दीडशे वर्षांपूर्वी पाच वर्षाच्या मुलीचे लग्न ३० वर्षाच्या बाप्याशी लावायची आपली 'उच्च परंपरा ' होती. मग बिचार्‍या मुलीला उचलायला नको का? तश्या उच्च परंपरा चालू ठेवण्यासाठी, संस्कृति जपण्या साठी तसे करतात.

आपल्याला अक्कल कुठे आहे धर्मात, संस्कृतीत काय म्हंटले आहे, परंपरा का आहेत. कुठल्या ठेवायच्या, कुठल्या मोडायच्या!!! त्यात भरहि घालण्यात येते - जसे दारूपान.

Happy

मीपण युट्यूबवर बघते आता, टीव्हीच्या आणि माझ्या वेळा जमत नाहीत, यशस्विनी म्हणाली तसे स्लो वाटत असेल तर पुढे जाता येते.

पांडवांचा राज्यावर अधिकार नव्हता>>

राज्यावर धॄतराष्ट्राचा मोठा असला तरी आंधळा असल्यामुळे अयोग्य ठरुन अधिकार मुळातच नव्हता. त्यामुळे त्याच्या मुलाच्या अधिकराचा प्रश्नच नाही.
पंडुला शाप असल्यामुळे त्याने राज्याचे कार्यवाहक म्हणुन धॄतराष्ट्राला राजा नेमुन वनवास घेतला होता.
शेवटी युवराज तर नेमावाच लागणार होता. तेव्हा योग्यतेच्या जोरावर युधिष्ठीराला युवराज नेमले गेले. आणि योग्यतेवर युवराज नेमणे ना कि मुलाला ही राजा भरताने घालुन दिलेली परंपरा होती.
वार्णावर्तात युवराज मेल्या नंतर नविन युवराज दुर्योधनाला नेमले. पण पांडव जिवंत परत आल्यामुळे एका राज्यात २ युवराज हि स्थिती निर्माण झाली आणि यावर "पळपुटा" निर्णय म्हणुन खांडवप्रस्थ (इंद्रप्रस्थ) पांडवांना देउन, त्यांच्यावर अन्याय करुन वेगळे राज्य केले गेले.
महाभारत युद्ध हे तेच खांडवप्रस्थ (इंद्रप्रस्थ) परत घेण्यासाठी होते. हस्तिनापुर साठी नाही.

काल थोड्या गॅपनंतर पाहिलं, तर घटोत्कच एवढा मोठा कसा झाला एकदम ?? पांडव जरा तरी एजेड दिसतायत पण कुंती मात्र लांब केस, टवटवीत चेहरा. लांब पापण्या वगैरे वगैरे सकट तर्रुण एकदम! ती हिडिंबा, द्रौपदी यांच्याच वयाची वाटते!!. का असा अट्टाहास !! Uhoh

माझी आजी महाभारत मालवणीत सांगायची त्यावेळी बोलायची भीमाचो झिल हवा खाउन एका दिवसात ह्यो मोठो होता. कारण तो राक्षस असता.... ते आठवले आणि द्रोपदीबद्दल बोलायची, त्या दुरपदीची तिच्ये दिर पार विटंबना करतत म्हणुन ह्या मोठा महाभारत घडता... Happy

राज्याचे कार्यवाहक म्हणुन धॄतराष्ट्राला राजा नेमुन वनवास घेतला होता.

कार्यवाहक वगैरे काही नाही. राज्य त्यागूनच तो गेला. धृतराष्ट्राला हस्तिनापूर नरेश असेच म्हणत असत.

आंधळा राजा असू नये असा प्रोटोकॉल असतो. पण इतरांच्या मदतीने धृतराष्ट्राने आता ते राज्य चालवून दाखवले, तर काही वर्शानी त्या प्रोटोकॉलला अर्थ उरत नाही.

त्यामुळे राजा धृतराष्ट्रच ठरतो आणि वारस कौरवच ठरतात.

Pages