मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )
पुनर्प्रसारणाबद्दल :
सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.
प्रस्तावना :
स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.
परीक्षण :
बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.
मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.
त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.
आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.
त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)
अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!
महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.
सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.
कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:
भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.
मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.
अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat
गुरु द्रोण कुणाकडूनच रोखले
गुरु द्रोण कुणाकडूनच रोखले जात नव्हते. पाच पांडव, सात्यकी, दृष्टद्युम्न वगैरे सगळे महारथी मिळून पण द्रोणाचार्यांना हरवू शकले नसते. एकटे द्रोण या सगळ्यांना भारी ठरत होते म्हणून त्यांचा वीक पोइण्ट म्हणजे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी पांडव पसरवतात. खरे तर पांडव अश्वत्थाम्याला पण मारू शकत नव्हते. हे द्रोण पण जाणून होते. मात्र आपण धर्माने वागलो नाही म्हणून आपला मुलगा मरण पावला या विचाराने त्यांनी शस्त्रे टाकून ते निरिच्छ भावनेने/ विरक्ती येवून ते ध्यानाला बसले. तेव्हा द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न त्यांना मारून टाकतो. हातात शास्त्र असताना आणि छल/कपट न करता द्रोणांना हरवणे पांडवाना शक्यच नव्हते.
कृष्णाची मायक्रो
कृष्णाची मायक्रो प्रोग्रामिंग:
टाइम स्टॉप करून आपला हुशार आणि चाणाक्ष कृष्ण द्रोणाचार्य च्या माइंड मध्ये शून्य प्रहरी मायक्रो सेकंद प्रोग्रामिंग करून त्यांना शस्त्र त्याग करायला लावणार. अशीच प्रोग्रामिंग त्याने अर्जुन (गीता) आणि भीष्म यांच्या माइंड मध्ये केली होती.
धर्माने बोललेल्या या
धर्माने बोललेल्या या असत्यवचनामुळे नेहेमी दोन इंच हवेच चालणारा त्याचा रथ जमिनीवर येतो. जुन्या महाभारतात हे बहूतेक दाखवले होते.
हो कांदापोहे बरोबर, आधीच्या
हो कांदापोहे बरोबर, आधीच्या महाभारतात रथ जमीनीवर येतो असं दाखवलं होतं.
घटोत्कच हा राक्षस असतो.
घटोत्कच हा राक्षस असतो. राक्षसाला रात्री अतोनात शक्ती प्राप्त होत असते. घटोत्कच लढतो तो रात्री. राक्षस असल्यामुळे तो अजस्त्र शरीर धारण करुन शत्रूचा पाडाव करतो. दिव्यास्त्र लागून धारातिर्थी पडतो ते ही रात्रीच. त्यामुळे त्याचे शरीर अवाढव्यच असते. पण सुर्य उगवल्या बरोबर लगेच त्याचे राक्षसी शरीर लहान होते... कारण दिवसा राक्षसाची मायावी शक्ती काम करत नाही किंवा कमी काम करते. (हे सगळं कृष्ण सांगतो की!)
घटोत्कच आधीच का येत नाही याचेही उत्तर त्यांच्या संवादात आहे. नियमा प्रमाणे युद्ध हे दिवसाच करायचे असते. घटोत्कचची सगळी शक्ती ही रात्रीची... म्हणजे दिवसाच्या युद्धात तो काही कामाचा नव्हता. अभिमन्यूवधानंतर नियम भंगाची मालिका सुरु होते. त्यामुळे घटोत्कचला महत्व प्राप्त होतो. घटोत्कच कौरवाना चिरडतो ते युद्ध रात्रीचे युद्ध असते.
----
सुर्य ग्रह्ण नाही... कृष्णाने चक्र पाथवून सुर्य झाकला होता. त्यावेली मामाश्री युद्धभूमिवर दूर कुठेतरी असतात. लगेच अंधार झाल्यावर मामाश्रीना कळतं ना की अवेळीच अंधार झालाय ते. मामाश्री लगेच पुटपुटतात की ही कृष्णाची खेळी आहे म्हणून. अन मग धावत धावत येतात पण तोवर जयद्रथ मरायला हजर झालेला असतो.
-----
भीम उडी मारतो तेंव्हा दिव्यास्त्र दुभंगते तो सीन मात्र निव्वड मुर्खपणा होता.
----
धन्यवाद मिस्टर "THOR" !! खूप
धन्यवाद मिस्टर "THOR" !!
खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल!!
असे काही नाही....महाभारतात
असे काही नाही....महाभारतात फक्त शकुनी कडेच "घड्याळ" असते.. मे महिन्यात अचानक ५ - ५.३० ला अंधार कसा झाला म्हणुन तो घड्याळ बघतो.... मग त्याला वाटते की कृष्णाने काहीतरी केले म्हणुन अंधार झाला....
अभिमन्युचा मृत्यु युद्धाच्या
अभिमन्युचा मृत्यु युद्धाच्या १३ व्या दिवशी झाला आहे त्याप्रमाणे दुसर्या दिवशी म्हणजे १४ व्या दिवशी जयद्रथाचा वध करुन संध्याकाळी किंवा रात्री त्याच्या अंतिमसंस्काराच्या वेळी कौरव आक्रमण करतात, रात्री घटोत्कच लढुन त्याचा मृत्यु होतो सकाळ होते तो १५ वा दिवस १५ व्या दिवशी घटोत्कचावर अंतिमसंस्कार होतात नंतर १६ व्या दिवशी जेव्हा लढायला सुरुवात होते ज्यावेळेस गुरुद्रोण ला मारण्याबाबत चर्चा होते आणी द्रौपदीचे वडील मरतात तेव्हा ह्या मालिकेत " युद्ध का १५ वा दिवस" अस म्हणतात ते नाही समजलं , एकतर काही गडबड झालीये दिवस दाखवण्यात किंवा जर सकाळी घटोत्कचाचे अंतिमसंस्कार करुन जेवणानंतर युद्ध सुरु केलं असेल.
द्रुपद मेल्यावर द्रौपदीला
द्रुपद मेल्यावर द्रौपदीला दुखः होणे स्वाभाविक आहे मात्र ती द्रोणाचार्यांवर चिडणे, त्यांचा वध आवश्यक आहे म्हणून दृष्ट्द्युम्न्ला टिळा लावणे वगैरे फिल्मी गोष्टी घुसडल्या आहेत. युद्ध म्हटल्यावर संहार हा होणारच. आणि त्यात द्रोणांपुढे द्रुपद किस झाड कि पत्ती. द्रोणाचार्य द्रुपदाला समोरासमोर लढाईत मारतात मात्र द्रौपदीचा आवेश असा असतो कि जणू काही त्यांनी तिच्या पित्याला कपटाने मारले आहे.
वास्तविक पाहता द्रोण आणि द्रुपद यांच्यातल्या वैरामध्ये चूक द्रुपदाचीच असते. द्रोणाला द्रुपद कधीच हरवू शकत नसतो. द्रोण द्रुपदाचे राज्य जिंकून त्याला परत त्याचे अर्धे राज्य देतात. चिडलेला द्रुपद द्रोणाला ठार मारण्यासाठी पुत्रप्राप्तीचा यज्ञ करतो वर अर्जुनाला जावई करून घेतो. स्वतःच्या मुलाला द्रोणांकडेच शिकायला पाठवतो वर त्याच्या हातूनच द्रोणांचा वध होईल अश्या अर्थाचा आशीर्वाद मिळवतो. एवढे करूनपण स्वतःच द्रोणाकडून मारतो आणि त्याचा मुलगा आपल्या गुरूला (द्रोणाला) तो निशस्त्र अवस्थेत धायानाला बसलेला असताना भ्याडपणे मारतो. द्रुपद आणि त्याचा मुलगा दृष्टद्युम्न म्हणजे नुसते सुडाने जाळणारे साप होते असे म्हटल तर चूक ठरणार नाही.
मत्स्यनरेश विराट (अभिमन्यूचे सासरे) हे सुद्धा द्रोणांकडून मारले जातात आणि नंतर त्याच दिवशी द्रुपदाचा वध होतो. मात्र या महाभारतात विराटाचा मृत्यू अभिमन्यु मरण पावलेल्या रात्री होतो असे दाखवले आहे.
द्रुपद मेल्यावर द्रौपदीला
द्रुपद मेल्यावर द्रौपदीला दुखः होणे स्वाभाविक आहे मात्र ती द्रोणाचार्यांवर चिडणे, त्यांचा वध आवश्यक आहे म्हणून दृष्ट्द्युम्न्ला टिळा लावणे वगैरे फिल्मी गोष्टी घुसडल्या आहेत. >>> युद्ध चालू झाल्यापासून अति फिल्मीपणा चालू आहे. द्रौपदीला म्हणे तिची सर्व मुले मरणार हे माहित अस्तं तरीही "धर्मस्थापने"साठी ती हे युद्ध होउ देते. कृष्णाला प्ण पुढे काय घडणार हे माहित असतं. यामुळे त्या युद्धामधला संहारकपणा, क्रूरता आणि हिंसा सगळीच फिल्मी होऊन गेलेली आहे.
हो नंदिनी करेक्ट, आता
हो नंदिनी करेक्ट, आता फिल्मीपणा चालू आहे. नाहीतर हे महाभारत छान वाटलं होतं.
द्रोणाचं कॅरेक्टर करणारा
द्रोणाचं कॅरेक्टर करणारा अभिनेता खूपच अप्रतिम. त्याची डोळ्यांतून अभिनय करण्याची कला तर लाजवाब. वीररस, कारुण्य, नैराश्य, पश्चात्ताप, पुत्रप्रेम आणि हतबलता या सर्व गोष्टींचा अचूक अभिनय.
हो मला पण द्रोणाचे काम करणारा
हो मला पण द्रोणाचे काम करणारा कोण अभिनेता आहे तो आवडतो. सुरुवातीपासूनच त्याचे काम मस्त आहे. विशेषतः डोळ्यातले भाव.
निसार खान आहे द्रोण बनलेला.
निसार खान आहे द्रोण बनलेला. सोनी च्या सी. आय. डी. / क्राईम पेट्रोल मालिकेत ही दिसतो कधी कधी पोलिस म्हणून.
तो कल्रर्स वरच्या अनिल
तो कल्रर्स वरच्या अनिल कपुरच्या २४ मध्ये पण होता, शेवटी शेवटी
तो निसार खान 'युद्ध' मध्ये पण
तो निसार खान 'युद्ध' मध्ये पण आहे.
महाभारत युद्ध रोज होत नव्हते.
महाभारत युद्ध रोज होत नव्हते. एक दिवस युद्ध एक दिवस विराम असे युद्ध होत होते.
पैकी सतरा दिवस युद्ध सतरा दिवस विराम. झाले. मग अर्धा दिवस युद्ध झाले. मग विराम. मग पुन्हा अर्धा दिवस युद्ध .
अशा प्रकारे सतरा व दोन अर्धे असे अठरा दिवस युद्ध झाले.
इति डॉ. वर्तकांचे कोणते तरी पुस्तक
म्हणजे एकुन ३७. दिवस युद्ध.
म्हणजे एकुन ३७. दिवस युद्ध. सुरु होते
तो निसार खान 'युद्ध' मध्ये पण
तो निसार खान 'युद्ध' मध्ये पण आहे>> हाच निसार खान तोंड काळं करून गोरं बनविण्याच्या औषधाच्या जाहिरातीतंही मी पाहिला... काय पण दिवस असतात एकेकावर.. महाभारतामुळे त्याला ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा आहे.
हो टोच्या, तिथेपण आहे तो.
हो टोच्या, तिथेपण आहे तो.
निस्सार खान कुठे कुठे आहे ?
निस्सार खान कुठे कुठे आहे ? स्पर्धा !!

निस्सार खान आहे तरी कुठे? स्पर्धा !!
आज दुशासन ला शासन घडेल.
आज दुशासन ला शासन घडेल. भीईईईईम घडवेल.
आता मध्येच तक्षक कुठून
आता मध्येच तक्षक कुठून आला?
तो युद्धात भाग घेतो का?
युद्ध चालू झाल्यापासून अति
युद्ध चालू झाल्यापासून अति फिल्मीपणा चालू आहे. द्रौपदीला म्हणे तिची सर्व मुले मरणार हे माहित अस्तं तरीही "धर्मस्थापने"साठी ती हे युद्ध होउ देते. कृष्णाला प्ण पुढे काय घडणार हे माहित असतं. यामुळे त्या युद्धामधला संहारकपणा, क्रूरता आणि हिंसा सगळीच फिल्मी होऊन गेलेली आहे.
सहमत.
त्यात आता गाणी नि नाच दाखवले की झाली पूर्ण हिंदी फिल्म. भारतीय इंग्रजीत लिहीलेले (on the roof, in the rain, u and me, love करेंगे! )हिंदी फिल्म संगीत असलेले ठेकेबाज, धमाल नाच असलेले काही सीन टाकायला पाहिजेत. युद्ध चालू असले तरी इकडे युद्ध नि तिकडे पहा काय चालले आहे असे दाखवायला! बलरामाच्या द्वारकेत! तो युद्धावर गेलाच नव्हता, फक्त सैन्य गेले. बाकीचे लोक होतेच!!
कर्ण वधाचा एपिसोड छान दाखवत
कर्ण वधाचा एपिसोड छान दाखवत आहेत. प्रत्येक गोष्टीत लॉजिक आहे. आवडले.
कर्णवधाच्या आधीचे कृष्णाचे
कर्णवधाच्या आधीचे कृष्णाचे डायलॉग सुंदर लिहिले होते आणि कृष्णाने ते खूप छान आपल्यापर्यंत पोचवले. मस्त कृष्ण छा गया. कर्णाने पण छान काम केलं. टचिंग होतं सगळं.
कृष्ण जेव्हा म्हणतो कर्णाला
कृष्ण जेव्हा म्हणतो कर्णाला की 'तुझ्या रथाचे चाक जमिनीत अडकलंय आणि तू नि:शस्त्र आहेस अशावेळी तुला मारावे लागते ह्यातच समज तुझे सामर्थ्य किती आहे ते'. अगदी डोळ्यातून पाणी आले तेव्हा. किती सुंदर डायलॉग.
कृष्ण जेव्हा म्हणतो कर्णाला
कृष्ण जेव्हा म्हणतो कर्णाला की .....किती सुंदर डायलॉग.
अनुमोदन.
भीष्म, द्रोण नि कर्ण या तिघांनाही मरणापूर्वी कृष्ण त्यांचे काय चुकले हे सांगतो. स्वार्थी विचारांपेक्षा . समाजकल्याण महत्वाचे हा खरा धर्म. हे कृष्ण त्यांना पटवून देतो, त्यामुळे मरताना ते सगळे शांतचित्त होतात.
तेंव्हा सर्व महाभारताचे सार की स्वार्थापेक्षा समाजकल्याण महत्वाचे.
हो एक अभिमन्युचा वध सोडला तर
हो एक अभिमन्युचा वध सोडला तर भीष्म, द्रोण , जयद्रथ आणि कर्णाचा वध चांगला दाख व लाय, दुशासनाचा देखील फील्मी वाटला.
900
900
Pages