मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या महाभारतात शकुनीचे काम गुफी पेंटलने केले तर दुसर्या एका पेंटलने (कंवरजीत पेंटल) शिखंडी आणि त्याच्या आधीच्या एक-दोन भागात सुदाम्याचेपण काम केले होते.

मला कर्णाचे एक कळत नाही. आता इतक्या वर्षांपासुन अर्जुनासोबत युद्ध करायची इच्छा पुर्ण झाली ना. मग सुरुवातीलाच ती ईंद्राने दिलेली शक्ती सोडायची ना त्याच्यावर. उगिचच कशाला टाईमपास करायचा मी तुझे रक्त काढतो तु माझे रक्त काढ असा? आणी त्या गांधारीला दिवे विझतांना कसे कळते? बहुधा विझलेल्या वातिच्या वासावरुन कळत असावे. तो द्रोणपुत्र अगदी रडीचा डाव खेळल्या सारखा वाटला मला. काय तर म्हणे बाबा, तुम्हीपण खेळा युद्ध युद्ध नाहीतर कट्टी. आणी इकडे द्रोणानी युधिष्टीराला जर हरवले तर संपेल ना युद्ध, मग कसला कर्ण मारतोय अर्जुनाला?

मला कर्णाचे एक कळत नाही. आता इतक्या वर्षांपासुन अर्जुनासोबत युद्ध करायची इच्छा पुर्ण झाली ना. मग सुरुवातीलाच ती ईंद्राने दिलेली शक्ती सोडायची ना त्याच्यावर >>>>> हे चुकिचे दाखवले आहे

कर्णाला अर्जुन शेवटीच भिडलेला कारण कृष्णाने मुद्दामुन त्याला त्याच्या पासुन लांब ठेवलेला कारण इंद्राची शक्ती ...
त्या इंद्राच्या शक्तीसाठीच घटोकच ला मैदानात आणलेले ... ज्या दिवशी कर्णाने त्याच्यावर इंद्राची शक्ती चालवलेली त्याच्या दुसर्याच दिवशी अर्जुनला कृष्णाने कर्णासमोर उभा केलेले..........

बर परशुरामांनी कर्णाला जो महत्वाच्या युद्धात अस्त्र-विस्मरणाचा शाप दिला होता तो फक्त त्याण त्यांनी दिलेल्या/शिकविलेल्या अस्त्रांसाठी कि त्याला येत असलेल्या सर्व अस्त्रांसाठी? कदाचीत तो शाप सर्व अस्त्रांसाठी असावा, म्हणुनच तो अर्जुनासोबत युद्ध करतांना महत्वाची अस्त्रे विसरला असावा, आणी तुलनेने कमी महत्वाच्या घटोत्क्वचावेळी त्याला ती अस्त्रे आठवली असावीत.

उदयन तुमचे मत पटते. नाहीतर एवढी मोठी इंद्राने दिलेली शक्ती असतांना कर्णाने ती लगेचच अर्जुनाविरुद्ध वापरली असती.

नक्कीच ........आणि मालिके मधे कृष्ण स्वतः सांगतो की इंद्राच्या शक्ती पासुन वाचु शकत नाही..... मग कृष्णाने कर्णासमोर का उभे केले अर्जुन ला .. ? हा देखील प्रश्न येतो... मालिके मधे कुठे ही काही ही कसे हि जोडले गेलेले आहे.. म्हणुन बघताना लॉजिक लागतच नाही

काल स्टार परिवार अवार्ड्स मधे सगळे महाभारत कलाकार फुल सूट वगैरे घालून (पण सेम हेअर्स्टाइल !!) पहाताना गंमत वाटत होती Happy

त्या दुर्योधनाच्या एकसुरी ओरडण्याचा कंटाळा आला आता़ अरेरे
अनुमोदन! आता युद्धाचे डावपेच आखताना, सगळे लोक जवळ असताना, बोंबलतोस कशाला? तिकडे पांडवांना ऐकू जाईल ना!! असे का युद्धाचे डावपेच आखायचे असतात?
कर्णाला अर्जुन शेवटीच भिडलेला कारण कृष्णाने मुद्दामुन त्याला त्याच्या पासुन लांब ठेवलेला कारण इंद्राची शक्ती ...
त्या इंद्राच्या शक्तीसाठीच घटोकच ला मैदानात आणलेले ... ज्या दिवशी कर्णाने त्याच्यावर इंद्राची शक्ती चालवलेली त्याच्या दुसर्याच दिवशी अर्जुनला कृष्णाने कर्णासमोर उभा केलेले......

मी पण असेच वाचले आहे. जास्त तर्कसुसंगत वाटते.

मालिके मधे कुठे ही काही ही कसे हि जोडले गेलेले आहे.. म्हणुन बघताना लॉजिक लागतच नाही
अनुमोदन.

आता अभिमन्यू वध, जयद्रथ वध, शल्य नि कर्ण यांचा संवाद हे सगळे कधी दा़खवणार? अजून पुष्कळ युद्ध राहिले आहे.
मी तर ऐकले/वाचले होते की आधी अभिमन्यू वध झाला नि तो अधर्म होता नि त्याचा फायदा घेऊन मगच पांडवांनी भीष्म, द्रोण, जयद्रथ, या सर्वांचे वध, व घटोत्कचाची रात्रीची लढाई, दुर्योधनाचा वध अशी कपटे केली.

....आधी अभिमन्यू वध झाला नि तो अधर्म होता नि त्याचा फायदा घेऊन मगच पांडवांनी भीष्म, द्रोण, जयद्रथ, या सर्वांचे वध, व घटोत्कचाची रात्रीची लढाई, दुर्योधनाचा वध अशी कपटे केली.

भीष्माचा पाडाव अभिमन्युवधाच्या आधी झाला होता.
तसेच खरे तर युद्धाच्या तिसर्या-चौथ्या दिवसापासूनच भीम धृतराष्ट्रपुत्रांचे वध करायला सुरुवात करतो. या महाभारतात मात्र ते भीष्म पडल्यानंतर (युद्ध्याच्या १०व्या दिवसानंतर) सुरु करताना दाखवले आहे.

या महाभारतात पांडवांना चांगल दाखवण्याच्या नादात कौरव, अश्वत्थामा, कर्ण यांच्या प्रत्येक कृतीला ओढून ताणून चूक दाखवले आहे. द्रोण कौरवांकडून लढले याला अश्वत्थामा हे एकमेव कारण नव्हते.अश्वत्थामा हे पात्रच खरोखर एक गूढ आहे. अर्जुनाबद्दल असणारी ईर्ष्या या एकमेव कारणामुळे अश्वत्थामा कौरवांकडे गेला नाही. अश्वत्थामा आणि पांडवांचे संबंध एवढे वाईट नव्हते मात्र तो दुर्योधनाच्या (मित्रांप्रती असणाऱ्या) उदार स्वभावामुळे त्याच्याकडे तो आकर्षित झाला. अन्यथा अश्वत्थामा/द्रोण तटस्थ पण राहू शकले असते असे मला वाटते.हस्तिनापुरच्या गादीवर दुर्योधनाचा पहिला अधिकार आहे असे अश्वत्थाम्यला वाटायचे मात्र दुर्योधनाने पांडवांशी तह करावा हे त्याने वेळोवेळी सुचवले होते (अगदी द्रोण हत्येनंतरही). द्रोणांच्या हत्येचा बदला घेणे माझी वैयक्तिक बाब आहे राज्याच्या भल्यासाठी आत्ता तरी तह कर असेच तो म्हणत असतो.शेवटी कर्ण पडल्यावर आणि दुर्योधनही गदायुद्धात पडल्यानंतर मरताना अश्वत्थाम्याला सेनापती करतो तेव्हा तो रात्रीतच दृष्टद्युम्न (काहींच्या मते शिखंडीसुद्धा) आणि पांडवपुत्रांना संपवतो.

भीष्मांनी वारंवार 'या आणि माझ्यावर हल्ला करा' म्हणणे आणि पांडवांनी घुटमळणे हा प्रसंग मालिकेत पाहताना हसू येते.

कौरवांनी अभिमन्युचा वध चान्सपे डान्स पद्धतीनं केलेला ना? की आधीच प्रीप्लान्ड मर्डर होता.

या महाभारतात पांडवांना चांगल दाखवण्याच्या नादात कौरव, अश्वत्थामा, कर्ण यांच्या प्रत्येक कृतीला ओढून ताणून चूक दाखवले आहे.>>> हो. द्रोण पांचाल वैर हेदेखील एक महत्त्वाचे कारण होते, पण बहुतेक लेखक तो प्लॉट विसरून गेले आहेत.

माझ्या मते चान्स पे डान्स होता. द्रोणाचार्यांनी युधिष्टिराला चक्रव्यूह पकडण्यासाठी रचलेला असतो (कृष्ण-अर्जुनाला तोपर्यंत त्रिगर्त नारेशांशी दुसर्या लढाईत गुंतवून ठेवतात). चक्रव्यूहाला उत्तर देण्यासाठी युधिष्टिराला यावेच लागेल आणि तो बंदी बनेल अशी योजना असते.

परवा कुंती अचानक युध्दभुमीवर कॅटवॉक करत आली......... फीट यायचीच वेळ होती पण तेवढ्यात ते कर्णाचा भास आहे असे दाखवले..... मग मला श्वास घेता आला

आधीच भविष्य माहिती असल्याने कृष्ण आपल्या भाच्याला वाचवण्याचा प्रयत्न करत तर नाहीच पण कधी अभिमन्यू चा वध होतो याची कृष्ण वाट बघत आहे असे वाटते आणि त्या दृष्टी ने अधीर झालाय असे वाटते.

या महाभारतात आपली पाच मुले, अभिमन्यु हे या युद्धात मरणार हे द्रौपदीला माहित असते तरी देखील ती गप्प राहते (नाइलाज, कर्तव्य, धर्म वगैरे). हे काही पटत नाही आपली सगळी मुले मरून जर राज्य मिळणार असेल तर फक्त उलट्या काळजाची स्त्रीच त्याला होकार देईल.द्रौपदी रुपगर्विता, मानिनी वगैरे होती मात्र इतकी कठोर नसावी. महाभारताचा निकाल फक्त कृष्ण, भीष्म , शकुनी यांनाच माहित होता किंवा त्यांना त्याचा अंदाज होता असे वाटते. बाकी हे युद्ध व्हावे असे द्रौपदीला वाटत असते ते फक्त तिच्या अपमानाचा बदल म्हणूनच. तिला धर्म वगैरेचा मुलामा देण्यात अर्थ नाही. एवढे मोठे युद्ध जिंकून पण द्रौपदीची सर्व मुले, भाऊ- दृष्टद्युम्न, शिखंडी,पिता द्रुपद हे सगळे मृत्युमुखी पडले.कुरुकुळातील पाच पांडव आणि अभिमन्यु-उत्तरेचा पुत्र परिक्षित तेवढे वाचले. हा वाचलेला परिक्षित पण सुभद्रेच्या मुलाचा मुलगा होता याच पण दुःक्ख द्रौपदीला झाल असणार.युद्धाचा असा शेवट होणार हे माहित असत तर तिने पांडवाना विशेष करून भीमाला वेळोवेळी युद्धासाठी भडकावल असत का हा प्रश्न पडतो.

परवा कुंती अचानक युध्दभुमीवर कॅटवॉक करत आली......... फीट यायचीच वेळ होती पण तेवढ्यात ते कर्णाचा भास आहे असे दाखवले..... मग मला श्वास घेता आला

+१

कुंती पाच पांडवांसाठी अभय मागण्यासाठी कर्णाकडे जाते आणि कर्ण अर्जुन सोडून बाकी पांडवांचा वध करणार नाही असे वचन देतो.मात्र कर्ण अभिमन्युवर (भतीजा म्हणून) दया दाखवतो हे नवीन आहे. अर्जुनाने जर कर्णाच्या मुलांना ठार केले होते तर कर्ण कशाला त्याच्या मुलावर दया दाखवेल. (काहींच्या मते अर्जुनाने विराट युद्धातच कर्णाचा एक मुलगा मारला, बाकी शेवटच्या महायुद्धात मारले. यात काहीना तर त्याने कर्णाच्या समोर मारून टाकले. कर्णाच्या मुलांपैकी एकटा विश्वकेतू हा या युद्धात वाचला. पुढे कर्णजन्माची खरी हकीकत कळल्यानंतर पांडवानी त्याला आपलेसे केले). कर्णाने भीमपुत्र घटोत्कच याचा वध केला होता. अभिमन्यूला चक्रव्युहात मारताना कर्ण पण सामील होता.

सध्याच्या महाभारतात काही गोष्टी उगाच घुसवल्यासारख्या वाटतात आणि पटत नाहीत. शिखंडीची नाही पटली मला, द्रौपदीला आधीच कृष्णाने सांगितलं की पांडव फक्त जिवंत राहणार हेपण पटलं नाही. युद्धाचे काही प्रसंग आधीच्या महाभारतातले आवडले होते. ह्यात जरा अतिरंजित वाटतात. जरी टेक्नोलॉजी आत्ताची जास्त सरस आहे तरीसुद्धा.

या महाभारतात सात्यकी, कृतवर्मा वगैरें योद्ध्यांचा पण अजून उल्लेख नाही. जुन्या महाभारतात युद्धात सात्यकीचे दर्शन होत होते. पांडवांकडून सात्यकीने मोठा पराक्रम गाजवला होता. जुन्या महाभारतात सात्यकी- भूरिश्रवा युद्ध चालू असताना मध्येच येवून अर्जुन भूरीश्रवाला मारतो. या कपटाबद्दल अर्जुनाची निर्भत्सना होते वगैरे दाखवले आहे. (भूरीश्रवाचे दर्शन होते मात्र त्याचा केवळ महाबली म्हणून उल्लेख आहे. त्याचे नाव घेतलेले दाखवले नाही).
सध्याच्या महाभारत पांडव, कौरव , कर्ण आणि त्यांचा कुटुंब कबिला यावरच जास्त भर दिला आहे.पितामह भीष्म तर कधीपासून 'हिट विकेट' साठी आसुसले दाखवले तो भाग पण जमला नाही.

सध्याच्या महाभारतात काही गोष्टी उगाच घुसवल्यासारख्या वाटतात आणि पटत नाहीत. शिखंडीची नाही पटली मला, द्रौपदीला आधीच कृष्णाने सांगितलं की पांडव फक्त जिवंत राहणार हेपण पटलं नाही.
अगदी अनुमोदन.
त्यातून ते दुर्योधनाचे सतत ओरडणे ऐकवत नाही. आता हे केवळ त्यांनी काय दा़खवले त्याची टिंगल करता यावी म्हणून बघतो.

ते पाच निळे दगड निघून खाली पडले.. पाहिले का?
मी पूर्वीपासूनच कुणि सुंदर बाई येऊन मला पाच निळे दगड देईल याची वाट बघत होतो पण कुणि आलेच नाही. Sad
शेवटी मी सौ. ला सांगितले की तू कुठून तरी तसे पाच निळे दगड शोधून आणून मला दे! Happy
पितामह भीष्म तर कधीपासून 'हिट विकेट' साठी आसुसले दाखवले तो भाग पण जमला नाही.
मला तर वाटायला लागले की आता या बुळ्या दाखवलेल्या पांडवांच्या नादी लागण्यापेक्षा त्यांनी स्वतःच स्वतःला मारून घ्यावे!

या महाभारतात आपली पाच मुले, अभिमन्यु हे या युद्धात मरणार हे द्रौपदीला माहित असते तरी देखील ती गप्प राहते (नाइलाज, कर्तव्य, धर्म वगैरे). हे काही पटत नाही आपली सगळी मुले मरून जर राज्य मिळणार असेल तर फक्त उलट्या काळजाची स्त्रीच त्याला होकार देईल.द्रौपदी रुपगर्विता, मानिनी वगैरे होती मात्र इतकी कठोर नसावी. महाभारताचा निकाल फक्त कृष्ण, भीष्म , शकुनी यांनाच माहित होता किंवा त्यांना त्याचा अंदाज होता असे वाटते. बाकी हे युद्ध व्हावे असे द्रौपदीला वाटत असते ते फक्त तिच्या अपमानाचा बदल म्हणूनच. तिला धर्म वगैरेचा मुलामा देण्यात अर्थ नाही. एवढे मोठे युद्ध जिंकून पण द्रौपदीची सर्व मुले, भाऊ- दृष्टद्युम्न, शिखंडी,पिता द्रुपद हे सगळे मृत्युमुखी पडले.कुरुकुळातील पाच पांडव आणि अभिमन्यु-उत्तरेचा पुत्र परिक्षित तेवढे वाचले. हा वाचलेला परिक्षित पण सुभद्रेच्या मुलाचा मुलगा होता याच पण दुःक्ख द्रौपदीला झाल असणार.युद्धाचा असा शेवट होणार हे माहित असत तर तिने पांडवाना विशेष करून भीमाला वेळोवेळी युद्धासाठी भडकावल असत का हा प्रश्न पडतो >>>>

हेच मी फार पुर्वी लिहिले आहे तसेच मालिका बनवणार्यांच्या फेबु पेज वर देखील टाकले ..अश्याने द्रौपदीचा अपमान होत आहे.....

तिला धर्म वगैरेचा मुलामा देण्यात अर्थ नाही.
बरोबर आहे. गोष्टीत जरी ते धर्म म्हणत असतील तरी तरी त्या काळी त्यांच्या मते तसा धर्म असावा म्हणून आपण त्याला आज तोच धर्म नि त्यांनी केलेले सगळे धर्म किंवा अधर्म इतके सरळ आहे असे समजू नये.
त्यानंतर धर्म म्हणजे काय यावर हजार वर्षाहून अधिक वर्षे चर्चा, लिखाण झाले आहे.
जेंव्हा धर्माचा पगडा जनमानसात कमी झाला तेंव्हा मनुष्याने कायदे केले. आ़जकाल प्रचलित कायद्याप्रमाणे कायदेशीर काय नि बेकायदेशीर काय ते ठरते, तेंव्हा न्याय्य काय असे कुणि म्हंटलेले दाखवले नाही.

काल चा एपिसोड आज बघितला...... डोळे भरुन आले..... रडु येउ लागले.....ऑफिसातले लोक माझ्याभोवती जमा झाले... सगळ्यांनी विचारले काय झाले.... मी म्हणालो.. अभिमन्युला मारण्यासाठी द्रोण ने चक्रव्युह लावले.. त्यात कर्ण दुर्योधन, जयद्रथ, दु:शासन सगळे होते.. ..

एकाने तोंडावर जोरात पाणी मारले..... म्हणाला... येड्या चक्रव्युह युधिष्ठीर साठी लावलेले.. आणि चक्रव्युह मधे जयद्रथ नव्हता तो अर्जुन बरोबर लांब युध्द करत होता.. आणि चक्रव्युह हा युध्दाच्या मध्यात लावलेला दिवसाच्या सुरुवातीला नाही...

मी म्हणालो असे कसे.. यात तर दाखवले सक्काळी लावले आणि खास अभिमन्युसाठीच लावलेले आहे दुर्योधन रक्ताचा भुकेला झालेला आहे त्याच्या....

परत एकाने पाणी मारले...... म्हणाला येड्या... दुर्योधन अभिमन्युच्या मागे कधीच नव्हता.. तो फक्त पांडवांच्यामागेच होता.. चक्रव्युह मधे युधिष्ठीर च्या जागी अभिमन्युला बघुन दुर्योधनाला क्रोध येतो. तो सर्व पांडवांना शिव्याची लाखोली वाहतो.. स्वत यायचे सोडुन या लहान बालकाला चक्रव्युह तोडायला पाठवले.. तेव्हा शकुनी दु:शासन आणि अश्वत्थामाला फुस लावुन अभिमन्युचा मृत्यु घडवुन आणतो नाईलाजाने त्यात कर्ण , दुर्योधन, द्रोण यांना देखील सामिल व्हावे लागते कारण एकटा अभिमन्यु त्या तिघांना ( शकुनी दु:शासन अश्वत्थामा) यांना भारी पडत होता..

------------------ शेवटी मी निश्चय केला.............. कैच्याकै दाखवत आहे...बघायचे आणि सोडुन द्यायचे Happy

Pages